पर्यावरणीय समस्यांवर उत्तर शोधणारे 'मंत्राज'

विवेक मराठी    10-Jun-2019
Total Views |

  पर्यावरण समस्या सोडवणे हे एकटया-दुकटयाचे काम नक्कीच नाही. संघटित होऊन आणि पर्यावरणीय भान जागृत ठेवूनच या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करता येतात. विशेष म्हणजे पर्यावरणीय क्षेत्रात काम करणाऱ्या काही औद्योगिक संस्थाही त्यात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. नाशिक स्थित 'मंत्राज ग्राीन रिसोर्सेस' ही अशीच एक संस्था आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. यू.के. शर्मा यांच्याशी संस्थेच्या कामाविषयी साधलेला संवाद.

 


'मंत्राज ग्राीन रिसोर्सेस'ची सुरुवात कधी आणि कशा प्रकारे झाली?

'मंत्राज ग्राीन रिसोर्सेस, नाशिक' ही संस्था अभियांत्रिकी व पर्यावरण या क्षेत्रांत गेली 15 वर्षे कार्यरत असून आजच्या घडीला ती एक नावाजलेली आणि अग्रागण्य संस्था आहे. 'मंत्राज ग्राीन रिसोर्सेस'ची सुरुवात 1 नोव्हेंबर, 2005 रोजी झाली. 2005पासून पर्यावरण क्षेत्रात सातत्याने यशस्वी प्रकल्प राबवल्यानंतर 2013 साली 'मंत्राज ग्राीन रिसोर्सेस'चे लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतर झाले. त्यानंतर कंपनीने कॉर्पोरेट क्षेत्रातील पर्यावरणीय समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला. या तंत्रज्ञानांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर कंपनीने 2015नंतर प्रदूषणासंबंधित अभियांत्रिकी सेवा सुरू केल्या. त्यामुळे वेगवेगळया प्रकारच्या पर्यावरणीय समस्यांवर एकाच छताखाली उपाययोजना देणे शक्य झाले. त्याचबरोबर ही संस्था NABET/QCI मान्यता प्राप्त आहे.

'एन्व्हायरमेंटल सोल्युशन' या क्षेत्रात आज अनेक संस्था काम करत आहेत. 'मंत्राज'चे वेगळेपण काय आहे ?

'मंत्राज ग्राीन रिसोर्सेस लिमिटेड'ला NABET/QCI सल्लागार म्हणून अधिस्वीकृती मिळालेली आहे. आमच्या संस्थेत पर्यावरण शास्त्रज्ञ व तज्ज्ञ मंडळी कार्यरत असून ईआयए, ग्राीन बिल्डिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, इटीपी, एसटीपी ही कामे मान्यताप्राप्त तज्ज्ञांकडून केली जातात. औद्योगिकीकरणामुळे वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करतो. एक प्रकारे आम्ही पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याचेच काम करतो. ही सगळी कामे एकाच छताखाली होतात.

मंत्राज कंपनी कोणकोणत्या प्रकारची उत्पादने आणि सेवा देते?

पर्यावरण विभाग (Environment Div.) आणि अभियांत्रिकी विभाग (Engineering Div.) अशा दोन विभागांत संस्थेचे काम चालते. या दोन विभागांमध्ये खालील प्रकारची कामे चालतात -

पर्यावरण विभाग (Environment Div.)

  1. नवीन औद्योगिक प्रकल्प प्रस्थापित करताना वन्यजिवांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी आमची संस्था त्या भागातील जीवविविधतेविषयीचे आणि त्या प्रकल्पाचे पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे, म्हणजेच इआयएचे स्वतंत्र अहवाल तयार करते. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारला हे अहवाल सादर करते.
  2. पर्यावरणीय अनुज्ञा प्रमाणपत्र (Environmental Clearance), सीआरझेड अनुज्ञा प्रमाणपत्र (CRZ Clearance), वन विभाग अनुज्ञा प्रमाणपत्र (Forest Clearance) याबाबत मार्गदर्शन.
  3. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सीटीई व सीटीओ यांसारख्या परवानग्या मिळवण्याबाबत मार्गदर्शन.
  4. पर्यावरणीय व्यवस्थापन योजना (EMP) तयार करून देणे.
  5. महानगरपालिका किंवा औद्योगिक क्षेत्रांसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करणे.
  6. पर्यावरणीय साध्य-स्थिती अहवाल (ESR) तयार करणे.
  7. ऊर्जा परीक्षण (Energy Audit))करणे.

अभियांत्रिकी विभाग (Engineering  DIV)

बायोकंपोस्टर BC 02, BCc 01, बायोटॉयलेट, सांडपाणी व्यवस्थापन (ETP आणि STP) आदी आमच्या अभियांत्रिकी विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा आहेत.

  बायोकंपोस्टर BC 02मध्ये कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाचे कंपोस्ट तयार होते. वीज लागत नाही, म्हणजेच शून्य वीज वापर. त्यामुळे एकूणच किमतीच्या दृष्टीने परवडणारे आहे.

बायोकंपोस्टर BCc 01 हे यंत्र वापरण्यासाठी, हाताळण्यासाठी           सोपे आहे.       ह्या यंत्राची रचना सुटसुटीत आणि मजबूत आहे. हे यंत्र 500 ते 1500 किलोपर्यंतच्या क्षमतांमध्ये उपलब्ध आहे.

सांडपाणी व्यवस्थापनातही आम्ही महत्त्वाची भूमिका बजावतो. सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि पुनर्वापर करण्यावर आम्ही भर देतो. औद्योगिक (ETP) आणि घरगुती (STP) अशा दोन्ही स्तरांवर हे काम चालते.

'मंत्राज'चे काम कोणकोणत्या भागात चालते?

मंत्राज कंपनीचे प्रकल्प आणि ग्राहक संपूर्ण देशभर आहे. परदेशातही, विशेषत: आफ्रिका खंडात आम्ही आमची सेवा देतो.

संस्थेच्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांविषयी आणि त्यांच्या यशाविषयी सांगा?

संस्थेची उल्लेखनीय कामगिरी म्हणजे 2015 सालच्या सिंहस्थ कुंभमेळयातली. संस्थेने कुंभमेळयाचे पर्यावरणावर काय काय परिणाम होतात याबाबत अभ्यास केला. त्या अभ्यासावरून पाणी, हवा, ध्वनी यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी व्यवस्थापन अहवाल तयार केला आणि भाविकांना पर्यावरणाबाबत जागरूकता बाळगण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे संस्थेने हे काम निःशुल्क केले.

तसेच राजस्थान सीकर जिल्ह्यातील रामगड तालुक्यात कायमस्वरूपी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यातही संस्थेने पुढाकार घेतला हेता. ग्रामस्थांना फ्लुराइडमुक्त स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी अभिनव स्वरूपाचे नाममात्र दरात (केवळ 1 रुपया प्रतिलिटर) पाणी एटीएम केंद्र सुरू केले. संस्थेने जिल्ह्यात वेगवेगळया ठिकाणी अशा प्रकारची पाण्याची 17 एटीएम बसवली आहेत. संस्थेने आतापर्यंत जितके प्रकल्प हाती घेतले आहेत, ते प्रकल्प 100 टक्के पूर्णत्वास नेले आहेत.

6) 'मंत्राज'चा पर्यावरण संवर्धनाचा मंत्र काय आहे?

'मंत्राज'चा पर्यावरण संवर्धनाचा मंत्र 3R - म्हणजेच Reduce (कमी करणे), Recycle (पुनःप्रक्रिया) आणि Reuse (पुन्हा वापर) असा आहे.

आपला समाज एकात्मतेतून संस्कृती जपणारा आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन करणे हीदेखील सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे, ती सर्वांनी जपावी. 

7) पर्यावरणाविषयी लोकांची मानसिकता कशी आहे असे आपल्याला वाटते? याबाबत जनजागृती करण्यासाठी संस्थेद्वारे कशा प्रकारे प्रयत्न केले जातात?

बदलत्या जीवनशैलीमुळे हेणारे जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण तसेच जीव-वैद्यकीय कचरा विल्हेवाट यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव फार कमी लोकांना आहे. तसेच वन्यजिवांचे संवर्धन, पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, पर्यावरणीय समस्या व पर्यावरण संवर्धन याविषयी समाजात जागरूकता कमी आहे.

आमची संस्था वन्यजिवांचे संवर्धन, पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, पर्यावरणीय समस्या आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजात जनजागृती करते. तसेच वृक्षारोपण व जल संवर्धनासारख्या मोहिमांमध्ये पुढाकार घेऊन लोकांना त्यात सहभागी करून घेते.

 मुलाखत - प्रतिनिधी

मंत्राज ग्रीन रिसोर्सेस लि.

वेबसाइट https://www.mantrasresources.com

इ-मेल  uksharma@mantrasresources.com