समाजमनावर कर्तृत्वाची मोहोर उमटविणारा राजबिंडा कार्यकर्ता

विवेक मराठी    03-Jun-2019
Total Views |

***विकास डुबे***

  1995च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 'थर्मल पॉवर स्टेशनचे एक्स्टेन्शन' करण्याचे आश्वासन त्यांनी जनतेला दिले होते. युतीचे सरकार येताच त्यांनी दिलेले आश्वासन त्यांनीर् पूण केले. 'हाती घ्याल ते तडीस न्या' असा त्यांनी मनाशी चंग बांधला होता. परळीकरांच्या भावनेची त्यांनी नेहमीच कदर केली, परंतु निवडणुकीत परळीतून मतांची आघाडी मिळत नसल्याबद्दल ते खंतही बोलून दाखवीत असत.

दि. 3 जून 2014 रोजी मा. मुंडेसाहेबांच्या मृत्यूची बातमी ऐकली आणि काळजाचा ठोकाच चुकला. विजेचा मोठा धक्का बसल्यानंतर जशी अवस्था होते, तशीच अवस्था झाली. गोपीनाथराव म्हणजे एक वादळ, बेडर राजकरणी, अनाथांचा नाथ, प्रशासनावर पकड असलेला नेता, कुशल संघटक आणि अतिशय चांगला मित्र. त्यांच्या संदर्भात लेख लिहिताना मन भूतकाळात गेले आणि मनात आठवणी दाटून आल्या.

कॉलेजमध्ये असताना मा. गोपीनाथराव अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकतर्े बनले. तेव्हापासूनच कदाचित त्यांच्या मनात 'दैन्य विघटना दिसे सभोवती, मनात सलते हे शल्य, ते काढाया यत्न, करावे यातच जीवन साफल्य' अशा प्रकारचे विचार पिंगा घालत असावेत. राजकारणी माणूस प्रथम समाजकारणी असला पाहिजे. माझ्या आजूबाजूच्या कुटुंबांचा विकास, त्यातून समाजाचा विकास व देशाचा विकास अशी श्ािडी त्यांच्या मनात पक्की होती.

इ.स. 1986ची गोष्ट. परळी वैजनाथ येथे नगर परिषदेची निवडणूक होती. त्या वेळी नगर परिषदेत प्रस्थापित काँगे्रसची सत्ता होती. राजकारण/समाजकारण करावयाचे असेल, तर नगर परिषद ताब्यात असली पाहिजे व मी ती ताब्यात घेणारच, असा मा. मुंडेसाहेबांनी चंग बांधला. त्यासाठी त्यांनी प्रथम बीडच्या त्या वेळच्या खासदारांशी संपर्क साधला आणि तेथील काँगे्रसच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने परळी येथे वेगळी आघाडी करून मला व अशोकशेठ सामंत, बाळासाहेब देशमुख, इटके गुरुजी, वैजनाथ ताटीपामल, शमशोदिन खतीब, सैयद नोमान, वासुदेव पाठक, राजाभाऊ  दहिवाळ, शेख अब्दुल करीम, हमीद कच्छी, शंकर मोगरकर इ.ना सोबत घेऊन नगर परिषदेची निवडणूक लढविली आणि ती जिंकलीसुध्दा. अशोकशेठ सामंत नगराध्यक्ष, तर मी उपनगराध्यक्ष झालो. हाती घेतले ते तडीस नेले आणि विजयाची मुहूर्तमेढ रोवली.

नगर परिषद ताब्यात असतानाच परळी शहरात अखिल भारतीय पातळीवरील अश्विनीकुमार भोईर सर्ुवणचषक कबड्डी स्पधर्ेचे आयोजन करून ती यशस्वी केली. त्यासाठी प्रेक्षक गॅलरी बाहेरून मागविली व मुंबई-पुणे यासारख्या शहरांच्या तोडीस तोड नियोजन करून बीड जिल्ह्यातील प्रेक्षकांच्या डोळयाचे पारणे फेडले. सर्ंपूण वंदे मातरम् म्हणण्यासाठी बीड येथून अ.भा.वि.प. कार्यकर्ता संच आणला होता, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द अभिनेते दारासिंग उपस्थित होते.

समाजजीवन भारुनि टाकू, चैतन्याने मानाने

वैभवशाली भवितव्याला नटवू निजकर्तृत्वाने।

या काव्यपंक्तीप्रमाणे समाजजीवनाला गवसणी घालण्याचा जणू चंगच बांधला होता. परळी नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर वैद्यनाथ बँकेची निवडणूक घोषित झाली. त्या वेळचे मंत्री पंडितराव दौंड परळीत ठाण मंाडून बसलेले असतानादेखील आघाडी करून आणि अशोक सामंत यांना सोबत घेऊन मुंडेसाहेबांनी बँकेची निवडणूक लढविली आणि त्यात त्यांनी यश मिळविले व बँकसुध्दा ताब्यात घेतली. 'लढायचे असते ते केवळ जिंकण्यासाठीच' असेच त्यांनी ठरविले असावे. 1966 साली स्थापना झालेली बँक 1986 साली ताब्यात घेतली, तेव्हापासून आतजागायत ही बँक त्यांनी नुकतीच ताब्यात ठेवली नाही, तर ठेवीची रक्कम एक कोटीवरून दहा कोटीपर्यंत नेली. तसेच ही बँक व्यापाऱ्यांपुरतीच मर्यादित न ठेवता सर्वसमावेशक करून तीन शाखा असलेली ही बँक एक्केचाळीस शाखांपर्यंत विस्तारली. आता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत सर्व शाखा संगणकीकृत केल्या असून ठेवीची रक्कम आजमितीला 666 कोटीपर्यंत पोहोचली आहे. सहकार क्षेत्रात मानाचा तुरा म्हणून वैद्यनाथ बँक यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.

1990 सालची विधानसभेची निवडणूक लढवून मुंडेसाहेब आमदार झाले. त्यांच्या राजकीय संघर्षाला येथूनच खरी सुरुवात झाली. सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी त्यांनी 'संघर्षयात्रा' काढली. त्या यात्रेला उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि काँग्रेसचे पानिपत होऊन महाराष्ट्रात शिवसेना -भाजपा युतीचे सरकार स्थापन झाले आणि साहेब उपमुख्यमंत्री झाले. म्हणतात ना, जबाबदारी वाढली की कामाचा ताणही वाढतो. या सर्व कामाच्या रगाडयात असतानाही ते विजयादशमीला परळीत नाहीत असे कधीच घडले नाही आणि तसेच प्रत्येक दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझ्या घरी येणे कधीही टाळले नाही. कार्यकर्ता कसा जपावा, याचा वस्तुपाठच साहेबांनी घालून दिला होता.

मा. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार तेरा दिवस सत्तेवर असताना मुंडेसाहेबांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर अनेक सहकारी कारखान्यांना र्मार्गदशन केले व त्यातील अनेक कारखाने चालवून दाखविले. 'विना सहकार नही उध्दार' हे सूत्र त्यांनी मनाशी पक्के बांधले होते. त्यानंतर त्यांनी संत जगमित्र नामा सहकारी सूत ग्ािरणीची स्थापना करून शेतकऱ्यांसाठी प्रगतीचे आणखी एक पाऊल पुढे टाकले.

शैक्षण्ािक क्षेत्रातही परळी मागे राहू नये, म्हणून नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात केली व त्याची वास्तूही उभी केली. आज तेथे ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे आहेत.

1995च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 'थर्मल पॉवर स्टेशनचे एक्स्टेन्शन' करण्याचे आश्वासन त्यांनी जनतेला दिले होते. युतीचे सरकार येताच त्यांनी दिलेले आश्वासन त्यांनीर् पूण केले. 'हाती घ्याल ते तडीस न्या' असा त्यांनी मनाशी चंग बांधला होता. परळीकरांच्या भावनेची त्यांनी नेहमीच कदर केली, परंतु निवडणुकीत परळीतून मतांची आघाडी मिळत नसल्याबद्दल ते खंतही बोलून दाखवीत असत.

इ.स. 2000 साली माझा थोरला मुलगा अजितचे - वय वर्षे 25, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला, ज्याचा नुकताच विवाह झालेला होता, त्याचे - अचानक निधन झाले. माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलाच्या निधनाचे वृत्त ऐकल्याबरोबर ते रात्री उशिरा बाहेरगावाहून परळीत आले, मला भेटून माझे सांत्वन केले व मला मोठा धीर दिला. पुढे चार महिन्यांपर्यंत ते सतत घरी येत व धीर देत असत. त्यातूनच मी व माझे कुटुंबीयही सावरलो. काही दिवसांनंतर कै. अजितच्या पत्नीचा पुनर्विवाह लावून दिला. अभियंता असलेला तो मुलगा चांगला होता, पण त्याला नोकरी नव्हती. त्याच्या नोकरीविषयी मी मुंडेसाहेबांशी बोललो. ते लगेच खा. धूत यांच्याशी बोलले व त्याला व्हिडिओकॉन कंपनीमध्ये नोकरी मिळाली. मुंडेसाहेबांमुळेच त्या दोघांचा संसार सुखाने चालू आहे. अशा अनेक दु:खद प्रसंगी मुंडेसाहेब अनेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. विविध र्मागांनी समाजाची सेवा करण्याचा त्यांनी विडाच उचलला होता.

सेवा है यज्ञकुंड समिधासम हम जले,

ध्येय महासागर में सरित रूप हम मिले।

या गीताच्या ओळी मुंडेसाहेब प्रत्यक्ष जगले. केलेल्या चांगल्या गोष्टींचे भरभरून कौतुक करून शाबासकीची एक थाप पाठीवर टाकायलाही ते विसरले नाहीत.

ज्या ज्या क्षेत्रांत मुंडेसाहेबांनी पाऊल ठेवले, त्या त्या सर्व क्षेत्रांत त्यांनी प्रत्येक वेळी यशश्रीच खेचून आणल्याचे लक्षात येते. त्यांच्या या यशाचे रहस्य पुढील ओळींतून प्रतीत होताना दिसते आहे.

कदम निरंतर चलते जिनके

श्रम जिनका अविराम है।

विजय सुनिश्चित होती उनकी

घोषित यह परिणाम है।

राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार इ. क्षेत्रांकडे लक्ष देत असतांना साहित्य क्षेत्र मागे राहणार नाही, यासाठी 71व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद परळी शहराने घ्यावे, म्हणून मी व मधू जामकर यांनी साहेबांकडे शब्द टाकला व त्यांनी मान्य केले. सर्व परळीकरांच्या सहकार्याने परळी शहरात संमेलन घेण्याचे निश्चित झाले. 24 ते 26 एप्रिल 1998 या कालावधीत हे संमेलन अतिशय थाटामाटात पार पाडले. आपल्या घरी मुलीचे लग्न होत असताना आपण सर्व पाहुण्यांची ज्या पध्दतीने बडदास्त ठेवतो, अगदी तशीच व्यवस्था संमेलनात केली होती. माजी संमेलनाध्यक्षांनी संमेलनाला उपस्थित राहावे, म्हणून मा. मुंडेसाहेबांनी स्वत: जाऊन त्यांना निमंत्रण दिले होते. संमेलनासाठी दिल्ली येथून खास मंडप मागविला होता. शासनाकडून संमेलनासाठी रु. 25 लाखाचे अनुदान देण्याची सुरुवात मुंडेसाहेबांनी केली. हे सर्व काही व्यवस्थित चालू असतानाच परळी शहरात रेल्वेचा मोठा अपघात झाला आणि त्याच वेळी नियतीसुध्दा कोपली आणि वादळासह मुसळधार पाऊस झाला. परंतु या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुंडेसाहेबांनी संमेलन यशस्वी करून दाखविले. 'संकटे आजवर आली, थांबून न आम्हा शकली, ती अखेर सारी थकली, नमविला तयांनी माथा' यानुसार संमेलन थाटात व यशस्वी झाले. वादळ-पावसामुळे झालेले स्टॉल्सचे नुकसान 100 टक्के भरून देण्याची व्यवस्था मुंडेसाहेबांनी केली. मनोरंजनाच्या कार्यक्रमामधील हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले  व पद्मजा फेणाणी यांचा सहभाग केवळ मुंडेसाहेबांमुळेच होता. अशा रितीने मुंडेसाहेबांनी परळीकरांना साहित्याची आगळीवेगळी अशी भेट दिली.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सुरू केल्यापासूनच शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र अशी आर्थिक क्रांती घडून आली. सर्वच बाबतीत र्आदश ठरलेल्या या कारखान्याने ग्रामीण भागाचा चेहरामोहराच बदलून गेला. पुढील प्रसंग त्याचे बोलके उदाहरण आहे.

मी एके दिवशी बाजारातून घरच्यांसाठी सफरचंद विकत घेत होतो. तो बागवान मला मुंडेसाहेबांचा सहकारी म्हणून ओळखत होता. तो मला म्हणाला, ''मुंडेसाहेबांनी वैद्यनाथ कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान खूपच उंचावले आहे. ग्रामीण भागातील माणसे सणासुदीलाच सफरचंद खरेदी करत असत. परंतु आता हे ग्रामस्थ रोजच सफरचंद घेऊन जात आहेत. त्यामुळे आमचा धंदा दहा पटीने वाढला आहे. तसेच पायी फिरणारा शेतकरी आता दुचाकी व चारचाकी वाहनातून फिरतो आहे. शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या जीवनात ही आर्थिक क्रांती इतक्या झपाटयाने क्वचितच कोठे झाली असेल.''

आता हे सर्व आठवणींच्या रूपातच उरले आहे. मुंडेसाहेब काळावर मोहोर उमटवून आपल्यातून निघून गेले आहेत. कविवर्य बा.भ. बोरकर यांच्या काव्यपंक्ती त्यासाठी सार्थ आहेत.

देखणी ती पाउले जी, ध्यासपंथे चालती

वाळवंटातूनसुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती।

मुंडे कुटुंबीय,र् पूण बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र व सर्ंपूण देश शोकसागरात बुडाला आहे. प्रज्ञाताई, पंकजा, डॉ. प्रीतम व यशश्री यांना हे दु:ख सहन करण्याची क्षमता द्यावी, ही वैद्यनाथचरणी प्रार्थना. र्अपूण राहिलेले त्यांचे कार्यर् पूण करणे, हीच साहेबांना खरी श्रध्दांजली ठरेल.

- परळी वैजनाथ

 ( सदर लेख २०१४ साली विवेकमध्ये प्रसिद्ध झाला आहे)