जनतेशी नाळ जोडलेला नेता - आ.सुधाकर भालेराव

विवेक मराठी    11-Sep-2019
Total Views |

उदगीर जळकोटचे आमदार व अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी सनियंत्रण समितीचे कार्याध्यक्ष सुधाकर भालेराव हे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे आमदार म्हणून प्रसिध्द आहेत. गेल्या दहा वर्षांत त्यांनी आपल्या मतदारसंघात खूप मोठया प्रमाणात विकासकामे केली आहेत. प्रामाणिकता, पारदर्शकता आणि जनतेशी जोडलेली घट्ट नाळ ही त्यांची वैशिष्टये आहेत. त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.



राजकारण म्हटले की गाजावाजा आणि जाहिरात याला पर्याय नसतो असे अनेक जाणकारांचे मत असले, तरी आपल्या आसपास काही निवडक लोक असे असतात, जे राजकारणात असतात, धडाडीने काम करतात, जनतेचे अनेक प्रश्न तडीस नेतात ते सकारात्मक विकासाचा मार्ग चालताना नेहमीच सामाजिक समन्वयाची भूमिका घेऊन वाटचाल करतात आणि आपले काम शांतपणे करत राहतात. त्यांना कोणत्याही जाहिरातबाजीची गरज लागत नाही, कारण त्यांनी केलेल्या कामावर आणि मतदारांवर त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्व म्हणजे उदगीर जळकोटचे आमदार सुधाकर भालेराव हे होय. गेली दहा वर्षे सुधाकर भालेराव उदगीर जळकोट तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत सुधाकर भालेरावांनी केलेली 2174 कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. इतक्या भरीव निधीतून उभारलेल्या या कामांमुळे त्यांच्या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलू लागला आहे. ज्या भागात विकास म्हणजे काय हे माहीत नव्हते, त्या भागात राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक योजना साकार करण्याचे काम सुधाकर भालेराव यांनी केले आहे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक चळवळया, सामाजिक जाणीव असणारा तरुण भाजपामध्ये दाखल होतो आणि आपल्या सचोटीच्या आणि कष्टांच्या बळावर 2009 साली प्रस्थापित आमदाराला पराभूत करतो. पाच वर्षे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी अभिनव आंदेलने करतो, सत्ताधारी पक्षाबरोबरच स्वपक्षाच्या नेतृत्वालाही आपल्या मतदारसंघातील विकासाकडे लक्ष देण्यास भाग पाडतो आणि 2009 ते 2014 या काळात अनेक कामांच्या रूपाने आपल्या मतदारसंघात विकासगंगा अवतीर्ण करतो. 2014 ते 2019 या पाच वर्षांत सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून पहिल्या आमदारापेक्षा जास्त तडफेने काम करणारा हा लोकप्रतिनिधी आजही तळागाळाशी आपली नाळ जोडून आहे. सुधाकर भालेराव नावाचा हा लोकनेता सर्वसामान्य जनतेच्या हाकेला ओ देणारा व मदतीसाठी तत्पर असतो. कारण अडचणी काय असतात, दु:ख-वेदना काय असतात, गरिबी काय असते, कष्ट काय असतात या साऱ्या गोष्टींचा अनुभव घेत घेत सुधाकर भालेराव या पदी पोहोचले आहेत. गरिबीचा आणि बेरोजगारीचा अनुभव घेतलेले सुधाकर भालेराव जेव्हा राजकारणात आले, तेव्हाच त्यांनी प्रतिज्ञा केली - ''जर राजकारणाच्या माध्यमातून मी भ्रष्टाचार केला, माझ्या हातून एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार झाला तर तो माझ्या अंतिम यात्रेच्या कफनाचा टिळा होईल'' ही शपथ आजपर्यंत प्राणपणाने जपणारे सुधाकार भालेराव कार्यसम्राट आमदार म्हणून प्रसिध्दी पावले आहेत. 

पोटाची आग विझवण्यासाठी, बेकारीचा सामना करण्यासाठी हमाली करणारे सुधाकर भालेराव आज मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार आहेत. या क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय असून अनेक गृहसंकुलांसाठी आणि औद्योगिक आस्थापनांसाठी सुधाकर भालेराव काम करत असले, तरी राजकारण आणि व्यवसाय यामध्ये त्यांनी कधीही सरमिसळ होऊ दिली नाही. उपजीविकेसाठी उद्योग करायचा आणि समाजसेवेसाठी, सामाजिक विकासासाठी राजकारण करायचे, ही सुधाकर भालेराव यांची धारणा आहे. आणि म्हणूनच गेल्या दहा वर्षांत 2174 कोटी रुपयांचा विकासनिधी ते आपल्या मतदारसंघात आणू शकले. रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचे काम करून सुधाकर भालेराव यांनी विकासाची दिशा स्पष्ट केली आहे. 


उदगीर शहरातील रस्ते खराब झाले होते. त्यासाठी नगरविकास विभागाच्या नगरोत्थान विकास योजनेअंतर्गत शहरात सी.सी. रोड तयार करून घेण्यात आले. या दर्जेदार रस्त्याच्या निर्मितीसाठी 77 कोटी रुपये खर्च आला. तसेच उदगीर-नळेगाव-लातूर रोडवरील रेल्वे फाटक हे वाहतूक कोंडीचे केंद्र झाले होते. या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला व पुलाचे बांधकाम केले. तसेच उदगीर-बिदर मार्गावरील रेल्वे फाटक बंद करून तेथे पूल बांधण्यासाठी 23 कोटी 57 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. उदगीर शहरातील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी खूप वर्षापासून प्रलंबित असणारा वळण रस्त्याचा विषय मार्गी लागला असून मलकापूर येथील उड्डाणपुलासाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून लवकरच कामास सुरुवात होईल. उदगीर शहरातील बस स्थानकाच्या विस्तार व नूतनीकरणासाठी 9 कोटी 46 लाख रुपयांची मंजुरी मिळाली असून दोन टप्प्यात हे काम होणार आहे. जळकोट व उदगीर तालुक्यांतील मुख्य रस्ते व गावांना जोडणारे रस्ते, तांडा वस्ती रस्ते यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 92 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून 209 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती व विस्तार केला जाणार आहे.

सुधाकर भालेराव यांनी जळकोट-उदगीर-तोगरी-कर्नाटक बॉर्डर, जळकोट-जांब-कंधार-नांदेड अशा 111 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला मान्यता मिळवली असून उदगीर मतदारसंघातील कामासाठी 335 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. उदगीर-नळेगाव-लातूररोड-आष्टामोड-रेणापूर या 150 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी 567 कोटी रुपये फक्त उदगीर तालुक्यातील महामार्गासाठी वापरले जात आहेत. उदगीर व जळकोट तालुक्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने 132 कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून शासकीय इमारती, दवाखाने, शाळा, समाजमंदिरे, बालवाडया इत्यादीची दुरुस्ती व विस्तार केला जात आहे.

दळणवळणाच्या साधनांइतकेच, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणे ही सर्वसामान्याची गरज असते. उदगीर शहराची 2051ची लोकसंख्या लक्षात घेऊन शहरास लिबोटी धरणातून मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा करता यावा, यासाठी 147 कोटी रुपये मंजूर झाले असून या योजनेमुळे शहराच्या पाणीपुरवठयाचा दीर्घकालीन प्रश्न निकालात निघणार आहे. शहरात घरोघरी नळ जोडणी देण्यासाठी 130 कि.मी. पाइपलाइन टाकली जाईल. शहरात पाण्याची साठवण करण्याठी पाच जलकुंभांची निर्मिती केली जाईल. लिबोटी धरणातून मिळणाऱ्या पाण्याचे शुध्दीकरण करण्याचा फिल्टर प्लँट पाच एकर जागेत उभारला आहे. पाणीपुरवठा करताना सौर ऊर्जा वापरण्यात येईल. ही महत्त्वाकांक्षी योजना लवकरच प्रत्यक्षात येणार असून ही योजना म्हणजे सुधाकर भालेराव यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याचप्रमाणे जळकोट शहरासाठी पाणीपुरवठा करणारी योजना तयार करण्यात आली असून त्यासाठी 7 कोटी 30 लाख रुपये मंजूर झाले आहेत. चांदेगाव साठवण तलावासाठी 21 कोटी, डोंगरकोनाळी साठवण तलावासाठी 21 कोटी, रावणकोळा साठवण तलावासाठी 9 कोटी 30 लाख, चोंडी साठवण तलावासाठी 26 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिली आहे. मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना उदगीर व जळकोट तालुक्यात यशस्वीपणे राबवली गेली असून त्यासाठी 27 कोटी 79 लाख रुपये खर्च केले आहेत. मतदारसंघातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जावा, शेतीसाठी पाणीपुरवठा करता यावा याच भूमिकेतून सुधाकर भालेराव यांनी वरील उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

सर्वसामान्य माणसाला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध व्हायला हवी, अशी सुधाकर भालेराव यांची इच्छा असून मतदारसंघातील आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यावर त्यांचा भर आहे. उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालय अद्ययावत करण्यात यश आले असून 200 खाटांच्या रुग्णालयास मान्यता मिळाली आहे. तर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर ट्रॉमा केअर हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर असून या हॉस्पिटलसाठी डॉक्टर व अन्य कर्मचारी अशी 173 पदे मंजूर करून घेतली आहेत. आजवर मतदारसंघातील अनेक रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेतून, विविध धर्मादाय ट्रस्टकडून, मुख्यमंत्री साहायता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी भालेराव यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. 

सुधाकर भालेराव यांनी मूलभूत सुविधा योजनेतून 32.50 कोटी व आमदार विकास निधीतून 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला व त्या निधीतून विविध गावांमध्ये सभामंडप, सुशोभीकरण इत्यादी कामे करून घेतली.

 

सुधाकर भालेराव ही व्यक्ती सतत समाजात वावरते आणि समाजाच्या सुखदु:खाशी समरस होते. गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात जो विकास केला, त्याला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. म्हणूनच भविष्यात मतदारसंघात काय काम करणे आवश्यक आहे याचा आराखडा त्यांनी तयार केला आहे. उदगीर मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारी औद्योगिक वसाहत उभारण्यांचा त्यांचा मानस आहे. मुबलक पाणी, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा आणि उद्योजकीय वातावरण निर्माण करून उदगीर, जळकोट मतदारसंघात विकासगंगा प्रवाहित ठेवण्याचा सुधाकर भालेराव यांचा प्रयत्न असून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी ते काम करत आहेत. मागील दहा वर्षांत त्यांनी जे काम केले आणि मतदारांचा पाठिंबा मिळवला, त्याच बळावर ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा उदगीर, जळकोट मतदारसंघात निघाली. या यात्रेत सुधाकर भालेराव यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सचोटी, प्रामाणिकपणा आणि समाजाचा कळवळा असणारा हा लोकप्रतिधी पुन्हा मोठया मताधिक्याने निवडून येईल आणि आगामी विधानसभा गाजवेल, याची खात्री आहे.