ग्राहकहिताय योजना

विवेक मराठी    07-Sep-2019
Total Views |


DNSB SIP (आवर्त खाते)
एस.आय.पी. हा आजच्या काळातील परवलीचा शब्द झाला आहे. त्यालाच अनुसरून डोंबिवली बँकेने DNSB SIP ही नवीन योजना सुरू केली. या योजनेत किमान 100 रुपये (शंभर रुपये फक्त)पासून आवर्त खाते (Recurring Deposit) सुरू करता येते. या योजनेत किमान 12 महिने व कमाल 24 महिन्यांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेचे वैशिष्टय म्हणजे, व्याजदराची व परताव्याची (Returns) मिळणाऱ्या रकमेची निश्चिती व अडीअडचणीच्या काळात रोख रकमेची उपलब्धता.

त्यामुळे निश्चित व्याजदराचा आणि निश्चित परताव्याचा फायदा घेण्यासाठी या योजनेत गुंतवणूक करावी, ती नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

शुभंकर कर बचत योजना

गुंतवणुकीवर उत्तम उत्पन्न व आयकर बचत (Tax Saving) असा दुहेरी लाभ देणारी ही योजना आहे. या योजनेत गुंतवणूक कश्ल्यास आयकर कायदा कलम 80 सी (80C) अन्वये आयकरात सवलत मिळते. या योजनेत 60 महिने गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना 7.75%, तर इतरांना 7.55% या दराने त्रैमासिक व्याज खात्यावर जमा केले जाते. या योजनेत दर वर्षी कमाल एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. त्यामुळे कर बचत आणि उत्तम परतावा असा दुहेरी लाभ देणारी ही एक लोकप्रिय योजना आहे.

लखपती योजना

मुलांच्या शिक्षणासठी तरतूद करता यावी, भविष्यातील संभाव्य अडचणींचा सामना करण्यासाठी हाताशी पैसे असावेत या हेतूने लखपती योजना कार्यान्वित करण्यात आली. दरमहा साधारणत: 1,400 रुपये गुंतवल्यास पाच वर्षांनंतर आपणास एक लाखापर्यंत रक्कम निश्चितच मिळू शकणार आहेत.

या योजनेमध्ये आपल्या खातेदारांनी स्वत:च्या नावे किंवा शक्यतो त्यांच्या मुलांच्या नावाने गुंतवणूक करणे अपेक्षित आहे, जेणेकरून मुदतीअंती मिळणाऱ्या रकमेचा त्यांच्या भविष्यातील शिक्षणासाठी फायदा होऊ शकेल. त्यामुळे या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी व लखपती होण्याचा लाभ घ्यावा.

DNS GOLD Saving Account

बचत खाते असूनही ठेवींवर मिळणाऱ्या व्याजसदृश असे उत्तम व्याज देणारी डीएनएस गोल्ड ही योजना आहे. या योजनेत गुंतवलेल्या रक्कमेवर 6% व्याज अदा करण्यात येते. हे खाते बचत खात्यासारखे वापरता येते. त्याचप्रमाणे या खात्यात गुंतवण्यात येणाऱ्या रक्कमेवर कोणतीही मर्यादा नाही. तसेच या गुंतवणुकीवर मिळणऱ्या व्याजातून कोणत्याही प्रकारे उद्गम कर कपात (TDS) करण्यात येत नाही. तसेच या खात्यावर मिळणाऱ्या व्याजासाठी ग्रााहकाला 15G /15H हा फॉर्म भरून द्यावा लागत नाही.

बचत खात्याला मिळणाऱ्या सर्व सुविधा - उदा. चेक बुक, ए.टी.एम. कार्ड इ. मिळतातच. त्या व्यतिरिक्त रोख रक्कम हाताळणीवरील शुल्क, कर्जावरील प्रक्रिया शुल्क, NEFT तसेच RTGSवरील शुल्क आकारण्यात येत नाही.

व्यक्ती, अविभक्त हिंदू कुटुंबीय (HUF), सहकारी संस्था, विश्वस्त संस्था, सार्वजनिक मंडळे यांना डीएनएस गोल्ड बचत खाते उघडता येते. तरी नजीकच्या शाखेशी संपर्क साधून या आगळयावेगळया योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.

(-2)% कर्ज योजना

व्यापारी किंवा खाजगी बँका, तसेच अन्य पतसंस्था यांच्याकडून ज्यांनी जास्त व्याजाने कर्जे घेतली आहेत व परतफेड नियमित चालू आहे अशा उद्योजकांसाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजेनअंतर्गत उद्योजकांनी व व्यावसायिकांनी इतर बँकांमधून वा पतसंस्थेकडून घेतलेले त्यांचे व्यावसायिक कर्ज आपल्या बँकेत 'शिफ्ट' करता येते, तेदेखील त्यांच्या सध्याच्या व्याजदरापेक्षा 1% ते 2% कमी व्याजदराने. ही योजना नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदारांसाठी सुरू केली असून या योजनेअंतर्गत कुठलेही प्रक्रिया व कायदा शुल्क आकारण्यात येत नाही. जास्तीत जास्त व्यावसायिकांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा व व्याजदरात सवलत मिळवावी.

सुविद्या शैक्षणिक कर्ज योजना

सध्याच्या युगात उच्च शिक्षण घेणे ही गोष्ट अनिवार्य झालेली आहे, मग ते शिक्षण आपल्या देशात असो अथवा परदेशात. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देशात अथवा परदेशात उच्च शिक्षण घेता येणे सोपे झाले आहे. विद्यार्थी 60 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. एवढया रकमेपर्यंत शैक्षणिक कर्ज देणाऱ्या फारच थोडया सहकारी बँका आहेत. विद्यार्थिनींना या योजनेमध्ये व्याजदरात 0.50% सवलत देण्यात आली आहे.

या योजनेमध्ये शिक्षणेतर खर्चसुध्दा समाविष्ट करण्यात आला असून यामध्ये हॉस्टेलचा खर्च, पुस्तकांचा खर्च, शैक्षणिक साहित्याचे - उदा., लॅपटॉप इ.चा खर्चदेखील सामाविष्ट करण्यात आले आहेत.

बँकेने Interest सबसिडीसाठी CSISशी सामंजस्य करारदेखील केला आहे. या कर्जयोजनेचा परतफेडीचा कालावधी 15 वर्षेपर्यंत (Moratorium Periodसह) आहे.

अनेक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले आहे.

Salary Overdraft Scheme/Pensioner Loan Scheme

ज्या ज्येष्ठ नागरिकांना स्वत:चे पेन्शन मिळत आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या आकस्मिक गरजांसाठी कोणावरही अवलंबून राहू नये या उद्देशाने बँकेने त्यांच्याकरीता विशेष कर्ज योजना कार्यान्वित केली आली आहे. वय वर्षे 65पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या कर्जाअंतर्गत वैद्यकीय खर्च, परदेश प्रवास, घरगुती खर्च इत्यादी 5 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाकरिता कर्ज देण्यात येते. कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षांचा असून अत्यंत किफायतशीर व्याजदर लागू करण्यात आला आहे.

नोकरीत कार्यरत असणाऱ्यांसाठीसुध्दा बँकेने एक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज (Over Draft) मिळू शकते. विशेष म्हणजे कर्जरकमेचा जेवढा वापर, त्या रकमेवरच व तेवढयाच काळासाठी कर्जदारास व्याज आकारणी करण्यात येते.

Super Flexi Loan and Super Flexi OD scheme

व्यवसायासाठी/वैयक्तिक खर्चासाठी बँकेने ही योजना कार्यान्वित केली आहे. पगारदार, व्यावसायिक, प्रोपरायटरशिप फर्म, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्याकरिता ही अत्यंत फायद्याची कर्ज योजना आहे. या योजनेअंतर्गत 50 लाखांपर्यंत कर्ज रक्कम मिळू शकते. त्याचप्रमाणे किफायतशीर व्याजदर व फक्त एकच जामीनदार ही या योजनेची वैशिष्टये आहेत.

प्रतिक्रिया

2008पासून डीएनएस बँकेशी आमचे नाते आहे. 2015मध्ये आम्ही डीएनएस बँकेत गोल्ड अकाउंट सुरू केले. त्या अकाउंटमध्ये आम्हाला चांगले व्याज मिळाले. अन्य कोणत्याही सहकारी बँकेमध्ये ही योजना नाही. मुदत ठेवीवरही आकर्षक व्याजदर हे आणखी विशेष. सर्व प्रकारची बिले भरण्यासाठी बँकेने BBPS - भारत बिल पे सर्व्हिस सुरू केली असून ती सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त आहे. सर्वच ग्रााहकांशी विश्वासाच्या पायावर उभे असलेले नाते हे या बँकेचे आवर्जून नमूद करण्याजोगे वैशिष्टय.

- सचिन कर्नावट

फ्लेक्झी कर्ज योजना व्यावसायिकांसाठी खरोखरच उपयुक्त आहे. आमच्या संगम ग्रूपच्या व्यवसायवाढीसाठी मी या योजनेतून कर्ज घेतलं आणि त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला.

बँक सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, त्यानिमित्त बँकेला खूप खूप शुभेच्छा.

श्री. भालचंद्र उपाख्य बाळासाहेब कुलकर्णी , संगम ग्रूप, कराड

माझी मुलगी अनुश्री, तिला पायलट व्हायची इच्छा होती. आम्हाला डीएनएस बँकेच्या शैक्षणिक कर्ज योजनेचा फायदा झाला. आज अनुश्री एका नामांकित विमान कंपनीत पायलट म्हणून रुजू झाली आहे. डोंबिवली बँकेच्या बहुमूल्य सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे.

- सौ. अनिता कुलकर्णी

श्री. सी.जी. कुलकर्णीडोंबिवली

SIP म्हणजे म्युच्युअल फंड हे माहीत होते, परंतु आपल्या DNS बँकेने SIP योजना सुरू केल्याचे समजले. निश्चित व्याजदर आणि खात्रीचा परतावा हे वैशिष्टय असल्याने या योजनेत गुंतवणूक केली आणि त्याचा मला चांगला लाभ झाला.

- हर्षदा मिलिंद करंदीकर