प्रमोशनसाठी विवेकाला सोडचिठ्ठी

विवेक मराठी    10-Jan-2020
Total Views |

मुंबईतल्या स्पाइस पीआर या कंपनीने पहिल्यांदा दीपिकाचे हे फोटो प्रसिद्ध केले. या कंपनीच्या संकेतस्थळाला भेट दिली, तर लक्षात येईल की दीपिका त्यांची क्लाएंट आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी असे इमोशनलप्रमोशनल कॅम्पेन करणे हे त्या कंपनीच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे, यात शंका नाही. दीपिकाची जी संवेदनशीलता या फोटोंमधून झळकत आहे, त्यातील थोडी जरी प्रत्यक्षात अस्तित्वात असेल तर तिने अशा देशद्रोही आंदोलकांच्या पाठीशी राहून प्रसिद्धी मिळवण्याचा मोह टाळायला हवा होता.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

आपल्या देशात आजही बॉलिवूडमधील तारे-तारका हेच तरुण पिढीचे आदर्श असतात
, ही वस्तुस्थिती दुर्दैवी आहे. झगमगाटी जगात रमणार्‍या आणि मेकअपच्या थराखाली खरा चेहरा लपवणार्‍या या मंडळींच्या आयुष्यातील क्षुल्लक गोष्टही सर्वसामान्यांना महत्त्वाची वाटते. दीपिका पदुकोणसारख्या यशाच्या शिखरावर असलेल्या बॉलिवूड तारकेचे जेएनयूतील देशद्रोही संघटनांच्या आंदोलनात जाऊन मूक समर्थन देण्याचे वर्तन याचमुळे चर्चेचा विषय बनले आहे.

Why Deepika Padukone JNU

गेल्या कित्येक वर्षांपासून जेएनयूमध्ये माओवादी पुरस्कृत विद्यार्थी संघटनांचे वर्चस्व आहे. त्यांनी या विद्यानगरीला आंदोलनांची रणभूमी बनवून येथील शैक्षणिक वातावरण दूषित करून ठेवले आहे. देशविरोधी आंदोलने, हिंसाचार, तोडफोड यांसाठीच हे विद्यापीठ सातत्याने चर्चेत असते.

आधीच सीएएच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी देशविघातक शक्तींकडून जेएनयूतील विद्यार्थ्यांचा वापर करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच रविवारी 5 जानेवारी रोजी रात्री जेएनयूतील वसतिगृहावर काही अज्ञात गुंडांनी हल्ला केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यात काही विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाल्याचे फोटो-व्हिडिओदेखील मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर झळकू लागले. सळया-लाठ्यांनी हल्ला करणार्‍या या गुंडांनी चेहरे झाकलेले असल्याने त्यांची ओळख पटलेली नव्हती. तरीही हा हल्ला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे आरोप करत जेएनयूच्या कॅम्पसमध्ये पुन्हा एकदा तुकडे गँगचे आंदोलन पेटले. पोलीस या हल्ल्याबाबत अधिक तपास करत आहेत आणि हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे आणि त्यात डाव्या संघटनांचा सहभाग असल्याचे पुरावे समोर येऊ लागले आहेत.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 
या आंदोलनात लक्ष वेधून घेतले ते दीपिकाने. दिल्लीत असलेल्या दीपिकाने या आंदोलनात जाऊन आंदोलकांना आपले मूक समर्थन असल्याचे भासवले. त्या वेळी कन्हैया कुमार भाषण देत होता. दीपिकाने हल्ल्यातील कथित जखमी विद्यार्थिनी आइषी घोष (जी जेएनयूतील विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आहे.) हिची भेट घेऊन सहानुभूती दर्शवली. या भेटीचे फोटो तत्परतेने सगळीकडे व्हायरल झाले. तिच्या मूठभर चाहत्यांनी, समर्थकांनी संवेदनशील अभिनेत्री म्हणून तिचे गोडवे गायला सुरू केले. ट्विटरवर तर काही पाकिस्तानी अधिकार्‍यांनीही दीपिकाचे कौतुक केले. पण देशातील बहुसंख्य जनतेने मात्र देशद्रोही कारवायांत आघाडीवर राहणार्‍या तुकडे गँगची पाठराखण केल्याबद्दल तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली. कारण ती हे सगळे का करत आहे, हे लोकही समजून चुकले आहेत. चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असला की त्याच्या प्रसिद्धीसाठी हे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते काय काय स्टंट करतात हे आपण पाहतोच. त्यातली व्यावहारिकताही लोकांना कळते. पण त्यासाठी किती वाहवत जायचे, कुठल्या पातळीवर उतरायचे याचे भान तरी या सिनेविश्वातील लोकांना असावे, एवढीच अपेक्षा असते लोकांची.

खरे तर अ‍ॅसिड हल्ल्यातील बाधितेची यशोगाथा दाखवणार्‍या छपाकविषयी आणि लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारणार्‍या दीपिकाविषयी सगळ्यांनाच कौतुक होते. (अर्थात या चित्रपटाविषयी इतरही काही वादग्रस्त मुद्दे समोर येत आहेत.) पण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी (थेट नसले, तरी तोच विचार करून) तिने देशद्रोही संघटनांना पाठिंबा देण्यासाठी पुढे यावे हे लोकांना पटणारे नव्हतेच. अर्थात तिच्या चाहत्यांना अजूनही यात तिची संवेदनशीलता दिसत असेल तर कठीण आहे. मग अशांना काही प्रश्न विचारावे लागतीलच. कॅमेर्‍याच्या झगमगाटात व्यग्र असणार्‍या दीपिकाला जेएनयूतील हल्ल्याची वस्तुस्थिती माहीत होती का? आंदोलनाचा म्होरक्या असलेला कन्हैया कुमार आणखी किती युगे जेएनयूचा विद्यार्थीच राहणार? तो प्रत्यक्ष राजकारणात उतरल्यानंतरही विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणून त्याने हे व्यासपीठ वापरून विद्यार्थ्यांची दिशाभूल करणे कितपत सयुक्तिक आहे? ज्या आइषी घोषला भेटून दीपिकाने सहानुभूतिपूर्वक तिची विचारपूस केली, ती जेएनयूतील आक्रमक, हिंसक आंदोलनांत कशा प्रकारे सहभागी असते याबाबत दीपिकाला काही माहिती आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दीपिका योग्य वेळी घटनास्थळी पोहोचून तिचे त्या भेटीचे, अश्रूभरल्या डोळ्यांचे फोटो इतक्या तत्परतेने कसे प्रसिद्ध झाले? वरच्या बहुतांश सर्वच प्रश्नांची उत्तरे तर्काने मिळतील. मात्र शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे, असे वाटते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

मुंबईतल्या स्पाइस पीआर या कंपनीने पहिल्यांदा दीपिकाचे हे फोटो प्रसिद्ध केले. या कंपनीच्या संकेतस्थळाला भेट दिली, तर लक्षात येईल की दीपिका त्यांची क्लाएंट आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी असे इमोशनलप्रमोशनल कॅम्पेन करणे हे त्या कंपनीच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे, यात शंका नाही. दीपिकाची जी संवेदनशीलता या फोटोंमधून झळकत आहे, त्यातील थोडी जरी प्रत्यक्षात अस्तित्वात असेल तर तिने अशा देशद्रोही आंदोलकांच्या पाठीशी राहून प्रसिद्धी मिळवण्याचा मोह टाळायला हवा होता. एरव्ही दीपिकाचे काँग्रेस प्रेम आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयीचा तिचा आशावाद तिच्या काही जुन्या मुलाखतीतून समोर आला आहेच. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेण्याची मानसिकता बॉलिवूडच्या ज्या काही मंडळींनी अवलंबली आहे, त्यापैकीच दीपिकाही एक असल्यास आश्चर्य नाही. अनुराग कश्यप, फरहान अख्तर, स्वरा भास्कर आदींनी सीएएच्या मुद्द्यावरून याच मानसिकतेचे दर्शन घडवले.

बॉलिवूडची मंडळी या देशाचे नागरिक असल्याने त्यांनाही अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, येथील प्रश्नांवर बोलण्याचा अधिकार आहे हे सर्व मान्य आहे. मात्र दुसर्‍यांच्या उसन्या घेतलेल्या वेदना आणि यशोगाथा पडद्यावर साकारून कोट्यवधी कमावणार्‍या या मंडळींनीही जरा खर्‍या प्रश्नांकडे डोळे उघडून बघायला हवे ना! नाहीतरी त्यांच्या आयुष्यात अशा प्रश्नांनी फारसा फरक पडत नसतोच. मग प्रसिद्धीसाठी चढवलेला संवेदनशीलतेचा मुखवटा केवळ लोकांची दिशाभूल करणाराच ठरतो.