संघ आणि सेवा कार्य : या आणि जाणून घ्या...

विवेक मराठी    16-Jan-2020
Total Views |

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

पुण्यात दोन दिवसीय
सेवा संगमचे आयोजन,

१०० सेवा प्रकल्पांच्या माहितीसह असंख्य उपक्रम


RSS_1  H x W: 0

हिंदू समाजाच्या संघटनातून सशक्त, सामर्थ्यशाली भारताच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना नागपुरात उभी राहिली आणि पाहता पाहता संपूर्ण देशभरासह विदेशातही पसरली. गेल्या ९०-९५ वर्षांच्या वाटचालीत नियमित संघकार्य, शाखा, संपर्क यांसह देशाच्या कानाकोपर्यात रा.स्व. संघाचे असंख्य सेवा प्रकल्पही उभे राहिले. ग्रामविकास, कृषी, जलसंधारण, शिक्षण, पर्यावरण यासह असंख्य क्षेत्रांत हजारो स्वयंसेवकांच्या कष्टांतून, निष्ठेतून व समर्पणातून अभिमानास्पद असं काम उभं राहीलं. आज रा.स्व. संघ व संघप्रणीत सेवा कार्य एखाद्या डेरेदार वटवृक्षाप्रमाणे डौलाने उभं आहे आणि दिवसेंदिवस आणखी बहरतं आहे. या अशा कित्येक सेवा प्रकल्पांपैकी पुणे व पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील सेवा कार्यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी, या हेतूने रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे पुण्यातसेवा संगमहा दोन दिवसीय विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

शनिवार व रविवार दि. १८ व १९ जानेवारी रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ८.०० या वेळात पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील सुमारे १०० सेवा प्रकल्पांचं भव्य प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. रा.स्व. संघाचा सेवा विभाग, रा.स्व. संघ जनकल्याण समिती, सेवा सहयोग, सामर्थ भारत आणि सेवावर्धिनी या संस्थांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे.सेवा संगमद्वारे शहरी तसंच ग्रामीण भागात चालणार्या विविध प्रकल्पांबाबत पुणेकरांना माहिती घेता येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व रा.स्व. संघाचे सह-सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १८ जानेवारी रोजी या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे, तर दि. १९ जानेवारी रोजीचा समारोप कार्यक्रम मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक रितू छाबरिया व संघाचे अ.भा. कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दोन्ही दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे
.
RSS_1  H x W: 0

सेवा कट्टा’, चर्चासत्रं, गप्पासंवाद..
सेवा संगममध्ये प्रदर्शनाबरोबरच इतर अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे. पर्यावरण, तसंच इतर अनेक विषयांची माहिती देणारासेवा कट्टाहे यापैकी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. शिवाय कुटुंबसंस्था आणि कौटुंबिक मूल्य, सेवाभावी कार्यकर्ता, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन या आणि इतरही काही विषयांवर सेवा कट्ट्यावर छोटी चर्चासत्रं, परिसंवाद आणि तज्ज्ञांशी गप्पा-प्रश्नोत्तरं असे कार्यक्रम होणार आहेत. याखेरीज कागदी पिशव्या तयार करण्याचं प्रशिक्षण देणार्या कार्यशाळाही या वेळी आयोजित करण्यात येणार असून येणार्या प्रत्येक नागरिकाला कागदी पिशव्यांची भेट दिली जाईल. विशेष म्हणजे या कागदी पिशव्या पुण्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. याशिवाय प्रदर्शन पाहण्यास येणार्या नागरिकांनी आपल्या घरातील रद्दी, तसंच लहान मुलांची गोष्टींची पुस्तकं भेट देण्यासाठी आणावीत, असंही आवाहन आयोजनांकडून करण्यात येत आहे.



सेवा संगम : २०१९ प्रमुख वैशिष्ट्यं

* सेवा प्रकल्पांचे १०० स्टॉल्स

* विविध विषयांवरील चर्चेसाठी सेवा कट्टा

* कागदी पिशव्यांची कार्यशाळा

* वारली कलेसह इतरही काही कलांचं प्रशिक्षण

* विविध ग्रामीण

* चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद व खरेदीचा आनंद


अशा प्रकारे
सेवा संगम दर्शन सेवा कार्यांचेहा आगळावेगळा कार्यक्रम दि. १८ व १९ जानेवारी रोजी पुण्यात होत असून या प्रदर्शनास सर्व नागरिकांनी आवर्जून, सहकुटुंब भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे.


अधिक महितीसाठी संपर्क : अनिल व्यास
८८८८८७१३१०, शैलेंद्र बोरकर ९४२२०८५९४२
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/