“लोकसंग्राहक कार्यकर्ते सन्मार्ग दाखवतात” - मा. मोहनजी भागवत

विवेक मराठी    07-Jan-2020
Total Views |

 अंबाजोगाई : “लोकसंग्राहक कार्यकर्ते जीवनाचा सन्मार्ग दाखवतात. त्यांचे अनुकरण आचरण यातून समाजाला आचरणाची नवी प्रेरणा मिळते. हे काम डॉ. शरद हेबाळकर यांनी आपल्या आयुष्यात करून दाखविलेअसे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केले.


mohanji_1  H x

अंबाजोगाईत भारतीय इतिहास संकलन योजनेचे महासचिव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक प्रा. डॉ. शरदराव हेबाळकर यांच्या अमृतमहोत्सव समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मोहनजी भागवत बोलत होते. या वेळी व्यासपीठावर राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताक्का, प्रा.डॉ. शरद हेबाळकर, शरयू हेबाळकर उपस्थित होते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

भागवत पुढे म्हणाले, “डॉ. हेबाळकर यांनी आपल्या कार्यातून आयुष्याचे सार्थक केले. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायक आहे. अशा कुटुंबांची संख्या भौगोलिक आणि सामाजिक व्याप्तीने वाढली, तर समाजात सुसंस्कृत पिढी निर्माण होईलअसा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

आपल्या भाषणात शांताक्का म्हणाल्या, “जीवनाचे सार्थक कशात आहे याचा शोध डॉ. हेबाळकर यांनी घेतला तो मार्ग पत्करून शरयू हेबाळकर यांना सोबत घेऊन सक्रिय कार्यातून आपली ओळख निर्माण केली. राष्ट्रकार्याच्या प्रेरणेने त्यांनी आपली ओळख समाजासमोर ठेवली. राष्ट्राच्या यज्ञकुंडात हेबाळकर कुटुंबाने आयुष्य समर्पित केले. हा महोत्सव त्यांच्या त्यागाची कर्तृत्ववान जीवनाची पावतीच म्हणावी लागेल. या अमृतमहोत्सव समारंभातून या दोघांचे जीवनही अमृताप्रमाणे निरखून निघाले आहेअसे सांगून त्यांनी हेबाळकर परिवाराला भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. शरद हेबाळकर म्हणाले, “संघाच्या संस्कारातूनच माझी जडणघडण झाली. आगामी काळातही माझी वाटचाल सुरूच राहील. माझ्या जीवनात अंबाजोगाईचे स्थान मोठे आहे. मी जरी पश्चिम महाराष्ट्रातून आलो असलो, तरी अंबाजोगाईकरांनी मला स्वीकारले, नवी ओळख दिली. त्यांच्या ऋणात मी कायम राहू इच्छितो.” शरयू हेबाळकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते डॉ. शरद हेबाळकर शरयू हेबाळकर यांना शाल, श्रीफळ सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रा. डॉ. संपदा कुलकर्णी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.

डॉ. शरदराव हेबाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित सकाळी गंगाखेड येथील सोमयाजी यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांच्या उपस्थितीत यज्ञ पार पडला.
 

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/