रा. स्व. संघाच्या शिवाजी उद्यान प्रभात शाखेचा 'स्मरणोत्सव-2020'

विवेक मराठी    01-Feb-2020
Total Views |


dadar_1  H x W:

मुंबई : रा. स्व. संघाची 80 वर्षांपेक्षाही जुनी असलेल्या शिवाजी उद्यान प्रभात शाखेने 'स्मरणोत्सव - 2020' कौटुंबिक स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवार दि. 25 जानेवारी 2020 रोजी शिवाजी पार्कजवळील साने गुरुजी विद्यालयात कार्यक्रम संपन्न झाला. वयोमानानुसार संघशाखेत येऊ शकत नसलेल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या पुढील पिढीला पुन्हा संघाशी जोडण्याच्या हेतूने हे स्नेहनिलन आयोजित करण्यात आले होते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व सेन्सॉर बोर्डचे सदस्य रमेश पतंगे कार्यक्रमाचे मुख्य वक्ते होते व दादर भाग संघचालक शिरीष केदारे यांचीही विशेष उपस्थित होते. शिवाजी उद्यान प्रभात शाखेशी संबंधित जे सर्व दिवंगत स्वयंसेवक आहेत, त्यांच्यावर आधारित आणि संघाच्या मुंबईतील व मुंबईजवळील सर्व प्रकल्पांची माहिती देणारे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या वेळी जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानच्या संचालिका सुनंदाताई पटवर्धन यांनी त्यांच्या प्रकल्पाविषयी उपस्थितांना सखोल माहिती दिली, तसेच उपस्थितीतांपैकी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक कमलाक्ष महाले, राष्ट्र सेविका समितीच्या घुमरे आणि संघाचे दिवंगत स्वयंसेवक स्व. नानू भिडे यांची सून प्रज्ञा भिडे यांनी संघाबद्दल त्यांचे विचार मांडले.


dadar_1  H x W:
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

मुख्य वक्ते मा. रमेशजी पतंगे यांनी संघाची समाजाप्रति भूमिका, संघाची दिशा आणि संविधान ह्या विषयांवर प्रकाश टाकून उपस्थितांना संबोधित केले. प्रभाकर पै यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रशांत पळ यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम वालावलकर यांनी वक्ते परिचय करून दिला. गणेश विचारे यांनी सादरीकरणाचे प्रास्ताविक केले.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/