पवारसाहेब यांची उत्तरे द्या!

विवेक मराठी    18-Feb-2020
Total Views |

- अक्षय बिक्कड


आदरणीय शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत
, त्या ज्येष्ठत्वाचा आदर ठेवून काही प्रश्न त्यांना विचारत आहोत, ज्याची त्यांनी यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.

pawar_1  H x W: 

१) ज्या सुधीर ढवळे यांनी सत्य बोलले म्हणून भाजपा सरकारने त्यांना अटक केली असे पवारसाहेब म्हणतात, त्या सुधीर ढवळे यांनी भांडवलशाहीचा सरंजामी देव 'बाळ ठाकरे' या पुस्तकात बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांना लाखो दलितांचे खुनी व दलितांच्या मायबहिणींवर बलात्कार करणारे म्हटले आहे, तेदेखील सत्य आहे काय?

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


bhima_1  H x W:

 
२) भीमा कोरेगाव येथील दंगलीत छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेला शर्ट घातला म्हणून राहुल फटांगळे या तरुणाचा खून झाला, असे त्याच्या आईने पोलीस फिर्यादीत म्हटले आहे. त्या दुर्दैवी तरुणाचे खुनी नेमके कोण हे मराठा नेता म्हणवणारे पवारसाहेब त्या आईला सांगतील काय?

३) छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या पवारसाहेबांना ' शिवाजीचे उदात्तीकरण' नामक अत्यंत अश्लाघ्य पुस्तक मोफत वाटणारी एल्गार परिषद आक्षेपार्ह वाटत नाही काय?

 
bhima koregaon history_1&


४) माजी गृहमंत्री स्व. आबा पाटलांच्या किंवा मनमोहन सिंग प्रणीत आघाडी सरकारच्या काळात एल्गार परिषदेत आरोपी असलेल्या लोकांनाच तुरुंगवास घडला
, शिक्षा झाल्या त्या सगळ्या शिक्षा अथवा तुरुंगावास तत्कालीन सरकारचे, म्हणजेच पवारसाहेबांचे षडयंत्र होते काय?


५)
पवारसाहेबांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे या विषयावरील मत वाचून दाखवले
, परंतु इतर दोन सर्वोच्च न्यायाधीश असोत किंवा सत्र न्यायालय, उच्च न्यायालाय यांनी वेळोवेळी या आरोपींना जामीन नाकारताना या केसमध्ये प्रथमदर्शनी ठोस पुरावे समोर आल्याचे मत मांडले आहे, हे मोठ्या चतुराईने का लपवले?


६) संबंधित प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाकडून भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. परंतु सध्याचे ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी भिडे गुरुजी यांची पाठराखण का केली होती
?

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 


७) तसेच मिलिंद एकबोटे हे न्यायालयात रीतसर अर्ज करून जामिनावर बाहेर आले असताना जामीनाचा निर्णय देणाऱ्या न्यायालयापेक्षा पवारसाहेबांना कायद्याचे अधिक अधिकार आहेत काय
?


८) कुठल्या तरी व्हिडिओवर बनावट नावाने कॉमेंट करणाऱ्या सामाजकंटकाचा आधार घेऊन एका वृद्ध पत्रकाराला हातपाय तोडण्याची धमकी देणारे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी सत्य बोलतात
, परंतु पंतप्रधानांना जिवाचा धोका आहे हे न्यायालयात पुराव्यानिशी मांडणाऱ्या विविध तपास संस्था मात्र असत्य बोलतात, हे पवारसाहेबांच्या तरी बुद्धीला पटते काय?

 
९) सदर दंगलीमध्ये भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. परंतु यांच्याबरोबरीने मुख्य आरोपी असलेले आरोपी क्रमांक ३ व आरोपी क्रमांक ४ हे कुठल्या पक्षाचे आघाडीचे कार्यकर्ते आहेत, हे पवारसाहेब सांगतील काय ? (अर्थात ते दोन आरोपीदेखील विशिष्ट समूहाकडून आलेल्या दबावापोटीच गोवले गेले आहेत, याची नोंद घ्यावी.)


१०) पवारसाहेबांच्या म्हणण्यानुसार एल्गार परिषदेत १०० संघटना सहभागी झाल्या होत्या व तेथे राजकीय शपथा घेतल्या गेल्या
, हे सगळे खरेच आहे. पण मग इतर माननीय उपस्थित व राजकीय संघटनांना सोडून हे बिगरराजकीय परंतु अत्यंत संशयास्पद व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकच प्रत्येक सरकारच्या वेळी का पकडले जातात, याचे उत्तर पवारसाहेब देतील काय?


११) तोंडाने सतत शाहू-फुले-आंबेडकर जप करणाऱ्या पवारसाहेबांनी एल्गार प्रकरणातील एक आरोपी असलेला आनंद तेलतुंबडे याने
'बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगावची लढाई हे एक मिथक तयार केले आहे' असे लिहिले आहे - म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर खोटे बोलतात असे पवारसाहेबांना म्हणायचे आहे काय?

 
bhima koregaon history_1&

 
१२) बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे स्वतः 'कोरेगाव भीमाच्या जयस्तंभाला फुटीरतावाद्यांचा गराडा पडला आहे' असे लिहीतात तेदेखील खोटारडे आहेत, असे पवारसाहेबांना म्हणायचे आहे काय?
 
 
- अक्षय बिक्कड 
 
 
 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/