॥ शापित क्रांतिकारक ॥

विवेक मराठी    25-Feb-2020
Total Views |

स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभर हिंदू भूमीसाठी, ज्या हिंदूंच्या न्याय्य हक्कांसाठी लढले, तेच हिंदू सावरकरांबद्दल अपशब्द वापरतात हे सावरकरांचे आपले दुर्दैव!



sawarkar_1  H x

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे धगधगती राष्ट्रनिष्ठा, जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेम असणारे थोर देशभक्त.
स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतरही भारतीय राजकीय प्रवासातून बाजूस सारला गेलेला मृत्यूनंतरही संकुचित मनोवृत्तीकडून आजतागायत अवहेलना होणारा शापित स्वातंत्र्यसेनानी!

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
 

प्रत्येक देशाचा स्वातंत्र्यलढा क्रांतिकारकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. क्रांतिकारकच सत्ताधार्‍यांना / सरकारला जेरीस आणू शकतात. त्यात शांततेच्या मार्गाने जाणार्‍यांचा जसा सहभाग असतो, तसा जहाल मतवाद्यांचाही असतो.

सावरकरांचा द्विराष्ट्रवादाला विरोध होता, हे पूर्णसत्य आहे. फाळणीच्या निर्णयाला हिंदू महासभा प्रखर विरोध करीत होती. सावरकरांचा फाळणीला असलेला विरोध त्यांनी वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहारावरून दिसून येतो. Historic statement made by V.D savarkar ह्या एस.एस. सावरकर जी.. जोशी यांनी संपादित केलेल्या पुस्तकात सावरकारांचे फाळणीबद्दलचे विचार स्पष्टपणे कळून येतात.

 

ऑगस्ट १९४४मध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, लंडनला व अमेरिकेतील प्रेसला पाठविलेल्या तारेत ते म्हणतात -

“Hindu mahasabha the only all india repesentaive body of the hindus condemns emphatically Gandhijis proposal to vivisent india.. hindu mahasabha can never tolerate the breaking up of unity of india their fatherland and holy land”


फाळणीच्या
निर्णयावर मार्च १९४७मध्ये शिक्कामोर्तब झाले असले, तरीसुद्धा १९३७पासूनच त्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती. काँग्रेसमधील हिंदू नेतेसुद्धा हळूहळू फाळणीसाठी अनुकूल होत असताना सावरकर अखंड हिंदुस्थानचे स्वप्न बघत राहिले. त्यामुळेजीना सावरकर हे एकाच माळेचे मणी आहेत हे मणिशंकर अय्यर यांचे मत म्हणजे सावरकरांची बदनामी करण्याचा प्रकार आहे.

भारतीय समजमन गांधीजींनी बरोबर ओळखले होते. सनातनी, पापभिरू, दरिद्री अशा भारतीय माणसाला क्रांतिकारकांचे सशस्त्र क्रांतीचे विचार पचनी पडणार नाहीत, तो शांततेच्या मार्गाने येऊ शकेल याबद्दल त्यांना खात्री होती. त्यामुळे बहुसंख्य हिंदू, मुस्लीम, काँग्रेसचे पुढारी मोठ्या प्रवाहात सामील झाले, तेव्हा हिंदू महासभा, सावरकरप्रणीत विचार किंवा सशस्त्र क्रांतीचे सुभाषचंद्र बोस यांचे विचार मागे पडले सबंध समाज गांधींबरोबर गेला.

तत्कालीन राजकीय परिस्थिती, सत्ताधारी नेते मंडळींचा सावरकरांच्या विचारांना असलेला विरोध याची परिणती महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्यावर आरोपपत्र ठेवण्यात झाली. त्या वेळी विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती आत्मशरण यांनी सावरकरांना निर्दोष सोडले.

आपल्या विचारांना विरोध करणार्‍या विरोधकांना एखाद्या खटल्यात / आरोपात गुंतवण्याचे तंत्र अनेक सत्ताधीश इतर देशांमध्येही वापरतात, सावरकर त्याचे बळी ठरले. आणीबाणीत नाही का फक्त संघात जातो म्हणून अनेक स्वयंसेवकांना तुरुंगवास पत्करावा लागला.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

सावरकरांनी ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करली, असे त्यांचे विरोधक (म्हणजे फक्त मतांसाठी राजकारण करणारे) दुसरा आरोप करतात. ज्यांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी जिवावर उदार होऊन भर समुद्रात उडी घेतली, तो माणूस मातृभूला घाबरेल का? हे सर्वांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे.

सावरकरांची सुटका व्हावी यासाठी हजारो लोकांनी सह्यांनिशी केलेले अर्ज बासनात गुंडाळण्यात आले. सावरकरांनी एप्रिल १९२० रोजी अंदमानातून सुटकेसाठीची याचिका पाठविली, ती व्हाइसरॉयने फेटाळली होती. या याचिकेमागे काहीतरी काळेबेरे असावे, असा इंग्रज सरकारला दाट संशय होता, हे अनेक कागदपत्रांवरून सिद्ध झालेले आहे. कारण इंग्रजांच्या दृष्टीने सावरकर म्हणजे खतरनाक क्रांतिकारक होते. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे इंग्रजांचे मत होते.

 

महात्मा गांधींनीसुद्धा आपल यंग इंडिया ह्या पत्रातून राजकीय कैद्यांना सोडा अशी इंग्रज सरकारला विनंती केली, तरीही त्यांची सुटका होण्यास जानेवारी १९२४ हा दिवस उजाडावा लागला. ही सुटका सशर्त झाली.

तत्पूर्वी २७ डिसेंबर १९२३ रोजी आपल्यावरचे खटले वाजवी रितीने चालवण्यात आले असून ठोठावण्यात आलेली शिक्षा न्याय्य असल्याचे लिहून दिले. याचा अर्थ सावरकरांचे सर्व कार्य मातीमोल ठरते का?

 

सुटका झाल्यानंतर १९३७पर्यंत इंग्रजांचे त्यांच्यावर बारीक लक्ष होते. सुटका झाल्यानंतरसुद्धा हिंदू महासभेचे काम करीत असताना वेळोवेळी त्यांनी केलेले विचारप्रकटन मार्गदर्शक ठरले आहे. उदा., झेंड्याबद्दलचे विचार, भाषाशुद्धीबद्दलचे विचार, द्विराष्ट्रविरोधी मते इत्यादी.

 

१९२४ साली सावरकरांची सुटका (सशर्त) झाली. त्यापूर्वी राजकीय चित्र, स्वातंत्र्यचळवळ कोणत्या स्थितीत होती हे पाहणे उद्बोधक ठरेल.

१८९३ साली दक्षिण आफ्रिकेत गेलेले गांधीजी १९१५मध्ये परत आले. १९१७ व १९१८ साली गांधीजींनी बिहारमधील चंपारण्य गुजरातमधील अहमदाबाद खेडा येथे शेतकरी / कामगार यांच्या प्रश्नांवर सत्याग्रही लढे दिले. १९१९ - असहकार चळवळत्याच वेळी जालियनवाला बाग हत्याकांड झाले. १९२१-२४ मुळशी सत्याग्रह (सेनापती बापट) असे लढे होत होते सबंध भारतीय समाज शांततापूर्वक सत्याग्रहाच्या मार्गाने जात होता. गांधीजींनी अहिंसेच्या मध्यमातून स्वातंत्र्यचळवळ खूपच पुढे नेली होती.

 

ह्या सर्व घटना घडत असताना सावरकर इंग्रजांच्या ताब्यात होते. त्यानंतर जवळजवळ २६ वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले; म्हणजे सावरकर अंदमानात असताना ब्रिटिशांची भारतावर पकड अतिशय मजबूत होती. स्वातंत्र्य मिळणे ही केवळ कल्पना होती. नजीकच्या काही वर्षांत भारत स्वतंत्र होईल हे दुरापास्त होते.

स्वातंत्र्यवीरांनी तुरुंगात राहण्यापेक्षा बाहेर येऊन राजकीय मते प्रकट करावीत असे अनेकांचे मत असू शकते. काळकोठडीत खितपत पडून राहण्यापेक्षा बाहेर येऊन स्वातंत्र्यलढा छुपेपणाने लढणे सयुक्तिक ठरेल, असा यामागचा विचार सावरकरांनी निश्चित केला असावा. (त्या वेळी सावरकरांचे वय ४१ वर्षे होते.)

घरदार, संसार उद्ध्वस्त झालेला असताना ते बाहेर येऊन काय करणार होते? ते मरणाला घाबरले का? ह्याचे उत्तर त्रिवार नाही असेच द्यावे लागेल. ह्या ठिकाणी आपण अंदमानातील मरणयातनांचाही विचार केला पाहिजे. इंग्रज सरकार सावरकरांना सोडतही नव्हते फाशीची शिक्षाही त्यांना दिलेली नव्हती. अशा कोंडीत सावकर सापडले.

त्यांनी सुटकेसाठी याचना का केली? असा प्रश्न विचारणार्‍यांना अंदमानात कोलू पिसायला पाठीवर आसूडाचे रोज फटके मारून घ्यायला पाठवले पाहिजे. पाठीवर ढुंगणावर मिठात बुडवलेल्या आसूडाचे फटके खाल्ल्यावर जी जळजळ होईल, त्यानंतर मात्र त्यांची तोंडे असा प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य करणार नाहीत.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

सावरकरांसारखा एवढा महान पुरुष, विद्वान, व्यासंगी असा निर्णय घेतो, त्या वेळी सर्वसामान्य माणूसही चक्रावून जातो. परंतु सर्व बाजूंनी विचार करता सावरकरांचा निर्णय योग्यच असल्याचे दिसून येईल.


२३ सप्टेंबर १९२३ रोजी कर्नल मरे यांनी सावरकरांच्या सुटकेसंबंधात आपले मत कळवले - ‘सावरकर प्रामाणिक आहेत असे भासत असले, तरी त्यांच्या खोल मनाच्या तळाशी काय चालले आहे याचा थांग लागत नाही, हे तुम्ही जाणताच. आपण गणेश सावरकरांची सुटका केलेली आहेच. विनायक सावरकरांस तशी संधी द्यायची झाल्यास त्यांची बिनशर्त मुक्तता करणे मात्र शहाणपणाचे ठरणार नाही.’

ब्रिटिशांसारखा महाबलाढ्य शत्रूसुद्धा असे मत व्यक्त करतो, यातच सावरकरांच्या विनंतीमागे काही अंतस्थ हेतू असू शकतो, असे म्हणावे लागेल.

स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभर हिंदू भूमीसाठी, ज्या हिंदूंच्या न्याय्य हक्कांसाठी लढले, तेच हिंदू सावरकरांबद्दल अपशब्द वापरतात हे सावरकरांचे आपले दुर्दैव!

सुभाषचंद्र बोसांनाही राजकीय नेत्यांनी / सत्ताधार्‍यांनी अशीच वेगळी वागणूक दिलेली आहे. पैशाच्या, संपत्तीच्या मतांच्या मागे धावणार्‍या राजकारणी मंडळींनी अशा प्रकारची वक्तव्ये करणे सोडून दिले पाहिजे, नाहीतर जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

सद्यःस्थितीत सावरकरांना भारतरत्न द्यावे की द्यावे हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. ह्या महान क्रांतिकारकाला भारतरत्न मिळो वा मिळो, पण प्रत्येक हिंदू मनाने आपल्या हृदयाच्या कोंदणात सावरकर नावाचे रत्न केव्हाच स्थापित करून ठेवले आहे.

- सतीश मधुकर मोहोळे

 ९४२१६०८१०४
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/