निरोगी त्वचेसाठी पोषक आहार

विवेक मराठी    04-Feb-2020
Total Views |

मनीषा अतुल 

निरोगी त्वचेसाठी आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतर कारणांनी झालेल्या त्वचाविकारांवरचा उपायदेखील योग्य आहारात आहे. आपल्याला शरीराच्या वाढीकरिता, चयापचयाकरिता व शरीराच्या सर्व क्रियांकरता आवश्यक ते अन्नघटक आहारातून मिळतात. अन्नघटकांची कमतरता त्वचेवर निरनिराळया रूपांत उमटते.


food_1  H x W:  

त्वचा हा शरीराचा आरसा आहे. तुमचे आरोग्य तुमच्या त्वचेवरून मापता येऊ शकते. सतेज, रसरशीत, गुलाबीसर त्वचा आपल्याकडे सुंदर गणली जाते. वैद्यकीयदृष्टयादेखील निरोगी त्वचेची लक्षणे हीच आहेत. किंबहुना निरोगी माणसाची हीच प्राथमिक लक्षणे आहेत. त्वचा सुंदरही तेव्हाच दिसते, जेव्हा ती निरोगी असते. त्वचेचा रंग हा सौंदर्याचा मापदंड नसतो, कारण तो रंग आनुवंशिकतेवर जसा अवलंबून असतो, तसाच आपल्या भौगोलिक परिस्थितीवरही बराचसा अवलंबून असतो. आफ्रिकन लोकांच्या त्वचेचा रंग घट्ट काळा असतो, तर पाश्चिमात्य देशांमधील स्वच्छ पांढुरका गोरा. आशिया खंडातील त्वचा या दोघांच्या मधल्या स्केलवर असते. साधारण गुलाबी गोरी ते सावळी - सरासरी गहूवर्ण म्हणता येईल. त्यामुळे त्वचेच्या रंगापेक्षा त्याच्या निरोगीपणाला जास्त महत्त्व आहे, हे लक्षात ठेवू या.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

त्वचाविकारांची कितीतरी कारणे असतात, ती आधी समजून घेऊ या. सगळयाच कारणांवर आहारशास्त्रात उपाय नसले, तरी हे घटक एकमेकांवर परिणाम करणारे असतात. त्यांचे परिणाम व आहार परस्परावलंबी असतात.

 

1) जन्मजात किंवा आनुवंशिक - काही त्वचाविकार जन्मजात असतात, तर काही अनुवंशिक - उदा., कोड, डाग, लाल चक्ते, मासोळीसारखे खवले असलेली त्वचा इत्यादी.

 

 

2) भौतिक कारणे - अ) अतिकमी तापमानात रक्तवाहिन्या गोठल्याने त्वचा निळी पडते. रक्तप्रवाह अपुरा असल्याने त्वचा मृत होऊ लागते व त्यावर जखमा होतात. त्याला फ्रॉस्ट बाइट म्हणतात.

 

 

ब) सतत पाण्याच्या संपर्कात राहिल्याने त्वचा सुरकुतली जाते व तेथे संसर्ग होतो. उदा., पायाच्या चिखल्या, खरखरीत तळवे.

 

 

क) उन्हाच्या कमतरतेमुळे त्वचा रोगट पांढरी पडते.

 

 

3) रासायनिक प्रभाव - अनेक रसायने त्वचेला हानिकारक आहेत - विशेषतः क्षार आणि आम्ल.

 

कारखान्यांचा अथवा वैद्यकीय कचरा वाहवला जात असेल, तर पाण्याचे स्रोत दूषित होतात व त्वचेवर रासायनिक व जैविक हल्ला होऊन त्वचाविकार होऊ शकतात. तरणतलावात मिसळलेले क्लोरीन, ब्लीचिंग पावडर जास्त प्रमाणात असेल तरी त्वचेवर दुष्परिणाम होतो. आपण वापरत असलेले शाम्पू, साबण, कॉस्मेटिक्स, परफ्यूम्सदेखील आपल्या त्वचेसाठी घातक ठरू शकतात.

 

 

4) विशिष्ट रोग - उदा., अ) मधुमेह. यात रक्तवाहिन्या आक्रसून रक्तप्रवाह बाधित होतो व गँग्राीनसारखी समस्या निर्माण होते. त्वचा काळपट पडणे, कोरडी पडणे, खाज येणे, मुंग्या येणे, आग होणे इत्यादी लक्षणे आढळतात.

 

 

ब) संसर्गजन्य त्वचारोग - बॅक्टेरियल व फंगल इन्फेक्शन, त्वचेवर खरूज, लाल चकते, पुरळ निर्माण करू शकते व तेथे खाजवल्याने जखमा होऊन अधिकचे बॅक्टेरिअल इन्फेक्शन होते.

 

 

क) ऍलर्जी - एखाद्या खाद्यपदार्थाची, रसायनाची अथवा प्राण्यांच्या त्वचेची, केसांची ऍलर्जी असल्यास त्वचेवर खाज, खदखद व पुरळ उठू शकतात. कधीकधी ऍलर्जीमुळे त्वचेवर सूज येते व त्वचा काळी-निळी पडते.

 

 

5) आहार-विहारातील अनियमितता व कमतरता - आहार अपुरा असेल किंवा अन्नघटकांच्या बाबतीत निकृष्ट दर्जाचा असेल, आहाराच्या वेळा अनियमित असतील, तर त्याचा सरळ सरळ परिणाम त्वचेवर होतो. आपले शरीर अन्नघटकांपासून बनलेले आहे. त्याची कमतरता होताच त्वचा, केस, डोळे, नखे यावर परिणाम दिसू लागतो.

 

 

6) मानसिक ताणतणाव व अपुरी झोप त्वचेची लवचीकता घालवून त्वचा कोरडी करते. डोळयांखाली काळी वर्तुळे येतात. रंगाची चमक जाऊन त्वचा काळवंडते.

 

 

7) पाणी कमी पिण्याची सवय - ही सवय त्वचेसाठी व एकूणच आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.
 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

8) स्वच्छतेचा अभाव - आपल्या त्वचेवर रोमछिद्रे असतात. त्यातून त्वचेच्या ओलाव्यासाठी व शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी घामाचे बाष्पीभवन होत असते. त्यासाठी रोमछिद्रे उघडी राहणे आवश्यक आहे. त्वचेवर घाण, धूळ जमा झाल्यास किंवा मेकअप असल्यास रोमछिद्रे बंद होतात ज्यामुळे जंतुसंसर्ग होऊन त्वचेवर पुरळ येणे, मुरूम येणे, खाज सुटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. बरेचदा जंतुसंसर्ग वाढून खरूज, एक्झिमा यासारखे विकार होऊ शकतात.

 

9) अयोग्य आहार - अपुरा व असंतुलित आहार त्वचाविकारांचे मुख्य कारण आहे.

 

 

10) व्यायामाचा अभाव - व्यायामाने शरीरातील घातक द्रव्ये घामाद्वारे बाहेर फेकली जातात. शरीरात व्यवस्थित रक्ताभिसरण होऊन शरीर निरोगी राहते. मांसपेशी मजबूत होतात. त्वचा चमकदार आणि तकतकीत दिसते. व्यायामाच्या अभावाने स्नायू ढिले पडून त्वचाही ढिली व फिकी पडते. प्रतिकारशक्ती कमी होऊन त्वचाविकार बळावतात.

food_1  H x W:

 

 

निरोगी त्वचेसाठी आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतर कारणांनी झालेल्या त्वचाविकारांवरचा उपायदेखील योग्य आहारात आहे. आपल्याला शरीराच्या वाढीकरिता, चयापचयाकरिता व शरीराच्या सर्व क्रियांकरता आवश्यक ते अन्नघटक आहारातून मिळतात. अन्नघटकांची कमतरता त्वचेवर निरनिराळया रूपांत उमटते.

 

 

- जीवनसत्त्व ''ची कमतरता त्वचेच्या वरच्या आवरणावर प्रभाव टाकते. विशेषतः डोळयांच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्त्व अतिशय आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेने डोळा कोरडा पडतो व त्यावर लाल व्रण उमटतात. कमतरता वाढल्यास रातांधळेपणा येतो. 

 

 

- जीवनसत्त्व '' बारा प्रकारचे असतात, ज्याला 'बी-कॉम्प्लेक्स' म्हणतात. त्याच्या कमतरतेने ओठांच्या कडा फाटणे, ओठ लाल होणे, तोंडात छाले पडणे, जिभेवर फोड येणे, पोटातील आतल्या आवरणातील त्वचेवर व्रण पडून अल्सर होणे, फिशर होणे, मूळव्याध होणे इत्यादी लक्षणे आढळतात.

 

- जीवनसत्त्व '' - हे दाढेच्या व दातांच्या मजबुतीकरिता आवश्यक आहे. त्याच्या अभावाने दाढेतून रक्त येते, दाढा सुजतात व काळपट पडून दात ढिले होत पडू शकतात.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

जीवनसत्त्व '' ऍंटीऑक्सिडंटचे काम करते, जे त्वचेला सूर्यकिरणांपासून होणारी हानी कमी करते आणि सूर्यकिरणांमुळे त्वचेत निर्माण होणाऱ्या मेलानिन रंगद्रव्याच्या प्रभावामुळे येणारे एजिंग स्पॉट्स फिके करते किंवा नाहीसे करते. शरीरातील हायल्यूरॉनिक (hyaluronic) ऍसिडचा उपयोग करायला मदत करते. हायल्यूरॉनिक ऍसिड हा कोलॅजेनच्या निर्मितीकरिता आवश्यक घटक आहे. 'कोलॅजेन' काय आहे? तर हा त्वचेच्या आरोग्यासाठी मुख्य घटक आहे. हे एक प्रकारचे प्रथिन आहे. ते शरीरातील विविध अवयवांना जोडण्याचे व आधार देण्याचे काम करीत असते, त्वचेला आकार देते, त्वचेची लवचीकता व ओलावा कायम राखते. जसजसे वय वाढू लागते, तसतशी शरीरात कॉलेजन निर्मिती कमी होऊ लागते व परिणामी त्वचेवर सुरकुत्या पडतात, त्वचा कोरडी पडते. कोलॅजेनपूरक आहार तारुण्य राखण्यास मदत करतो. त्वचेवरील मुरूम, पुरळ कमी करतो. केसांची व नखांची वाढ व्हायला मदत करतो. याच्या कमतरतेने केस गळणे, केसात कोंडा होणे, नखे ठिसूळ होणे अथवा तुटणे, नखांवर डाग पडणे इत्यादी लक्षणे दिसतात. म्हणून त्वचा-नखे-केस यांच्या आरोग्याकरिता आपण जीवनसत्त्व ''ची प्रचुर मात्रा असलेले लिंबू, संत्रा, टमाटे, दही यांचा वापर नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन म्हणून करतो. जीवनसत्त्व ''चे आहारातील प्रमाण वाढवायला हिरव्या पालेभाज्या, विशेषतः कोथिंबीर, रंगीत भाज्या व फळे, टमाटे, लिंबू वर्गातील फळे - उदा. मोसंबी, संत्री, आवळा इत्यादींचा समावेश करता येईल.

 

 

- जीवनसत्त्व '' - हे हाडांच्या व त्वचेच्या आरोग्याकरिता आवश्यक आहे. सूर्यप्रकाशात आपली त्वचा याची निर्मिती करून घेते. त्याने त्वचा व हाडे मजबूत होतात. घरात राहणाऱ्या व चेहरा झाकणाऱ्या स्त्रियांची त्वचा पांढरी व निस्तेज दिसते व त्वचेला रोगजंतूंचे संक्रमण लवकर होऊ शकते.

 

 

- जीवनसत्त्व ई - हे मुख्यत्वे त्वचेकरिता ऍंटीऑक्सिडंटचे काम करते, ज्यामुळे त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणे - उदा., सुरकुत्या, डाग, कोरडी व जाड त्वचा होणे यापासून संरक्षण मिळते.

 

गव्हाचे सत्त्व, सनफ्लॉवर, कॉर्न, सोयाबीन, सोयाबीन तेल, शेंगदाणा, बदाम यापासून जीवनसत्त्व '' मिळवता येते.

 

- खनिजे - लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, कॉपर यासारखी खनिजे आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत. लोहाच्या कमतरतेने रक्तक्षय होतो. त्वचा पांढरी व फिकट पडते. गूळ, मसूर, हिरव्या पालेभाज्या, कोथिंबीर, गोड लिंब, शेवगा, मोड आलेली कडधान्ये, अंडयाचा पिवळा भाग इत्यादींमध्ये विपुल प्रमाणात लोह आढळते.

 

 

झिंक- नवीन त्वचापेशींच्या निर्मितीकरिता, त्यांची झालेली झीज भरून काढण्याकरिता व सूज उतरवकरिता झिंक या खनिजाचा महत्त्वाचा वाटा असतो.

 

सालींसह संपूर्ण कडधान्य - विशेषतः चवळी, तसेच बदाम, काजू, पोल्ट्री पदार्थ यात झिंक भरपूर असते.

 

 

- प्रथिने - आपल्या शरीरपेशी प्रथिनांपासून बनलेल्या असतात. शरीराच्या त्वचेच्या जखमांची दुरुस्ती, पेशींची निर्मिती, पेशींची व त्वचेची झीज भरून काढणे, हॉर्मोन्सची व एन्झाइम्सची निर्मिती, पाचक रसाची निर्मिती, रक्तपेशींची निर्मिती हे प्रथिनांचे प्रमुख काम. केस व नखे यांच्याही पेशी प्रथिनांच्या असतात. प्रथिनांच्या अभावाने त्वचा मलूल व निस्तेज होते. चेहरा उदास, पडलेला, भावनारहित (मूनफेस) दिसू लागतो. प्रथिनांअभावी केस भुरकट होऊन त्याची जाडी कमी होते. केस गळतात, पांढरे होतात. त्याचा पोत पातळ होतो. ते तुटतात, दुतोंडे होतात.

 

- स्निग्ध पदार्थ - आपण ओमेगा-3 फॅटी ऍसिड हे नाव सतत ऐकतो. काय आहे हा घटक? ओमेगा-3 फॅटी ऍसिड हा स्निग्ध पदार्थांमधील घटक आहे. स्निग्ध पदार्थ शरीरपेशींचा महत्त्वाचा घटक. शरीराला ऊर्जा देणे हे स्निग्ध पदार्थांचे काम. शरीरात वसा म्हणजे 'फॅट'च्या रूपात ऊर्जा साठवून ठेवली जाते. हे फॅट त्वचेखाली सबक्युटेनस पेशींमध्ये साठवली जाते किंवा यकृत, हृदय, मूत्रपिंड, डोळे यासारख्या अतिमहत्त्वाच्या अवयवांभोवती त्यांना संरक्षक कवच म्हणून साठवली जाते.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

सर्व प्रकारची तेले, तूप हे स्निग्ध पदार्थ आहेत. तसेच अंडी, मास, मासे, दूध, मलई, तेलबिया, सुकामेवा यात स्निग्ध पदार्थ आहेत.

 

या स्निग्ध पदार्थात काही जीवनावश्यक जीवनसत्त्वे विरघळलेली असतात - उदा., , , , के. शिवाय महत्त्वाची फॅटी ऍसिड्स स्निग्ध पदार्थात असतात. त्यामुळे ते आहारातील महत्त्वाचा घटक ठरतात.

 

ओमेगा 3 फॅटी ऍसिड हा घटक त्वचेवरील सूज उतरवतो. त्वचेला ओलावा व तजेला देतो. तिचा पोत घट्ट जाड, मात्र लवचीक करतो. सुरकुत्या दूर करतो. मास, मासे, माशांचे तेल, कॉड लिव्हर ऑइल, पोल्ट्री, अंडयातील पिवळे बलक (egg yolk), तेलबिया - विशेषतः जवस, सूर्यफूल बिया व तेल, सोयाबीन, कापसाच्या बियांचे तेल (कॉटन सीड ऑईल), सुकामेवा - विशेषतः अक्रोड यात हा घटक भरपूर प्रमाणात आढळतो.

 

वर दिलेल्या त्वचाविकारांच्या कारणांचा परिणाम योग्य आहार घेऊन कमी करता येतो का, बघू या. अगदी सरळ सरळ ते परिणाम नाहीसे करता येत नसले, तरीदेखील योग्य आहाराने त्याला नक्कीच कमी करता येऊ शकते. ते परस्पर निगडित असल्याने अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो. मधुमेह, यकृत व मूत्रपिंडविकार, अन्नघटकांच्या कमतरतेमुळे झालेले विकार यावर औषधी व आहार नियोजनाने संपूर्ण नियंत्रण मिळवता येऊ शकते. अपुऱ्या झोपेमुळे त्वचेवर परिणाम होतो. त्याचाही संबंध आहाराशी आहेच. कॅल्शियमची कमतरता हे कमी झोप लागण्याचे कारण असू शकते. वयपरत्वे पोटातून कॅल्शिअमचे शोषण कमी होते, त्यामुळे आहारात उपलब्ध कॅल्शिअम पूर्ण वापरता येत नाही. त्यासाठी जीवनसत्त्व '' उपयोगी ठरू शकते.

 

झोपेवर परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे, जड व न पचणारा आहार. विशेषतः रात्री उशिरा जेवण व जेवल्याबरोबर झोपायला जाणे. तळकट, तेलकट, जास्त तिखट पदार्थांचे सेवन, या गोष्टी झोपेवर प्रभाव टाकतात. यावर उपाय म्हणजे रात्रीचे जेवण लवकर घ्यावे. झोपण्याच्या (किमान दोन तास आधी). जेवण हलके व कमी मसाल्याचे असावे. झोपेपूर्वी गरम दूध फायद्याचे ठरेल.

 

थोडक्यात सांगायचे झाल्यास *निरोगी व सुंदर त्वचेसाठी* हवी असेल तर खालील गोष्टी कराव्यात -

 

तळकट, तेलकट पदार्थांपासून दूर राहावे. त्यांच्या अतिसेवनाने चेहऱ्यावर मुरूम, पुरळ व फोड येतात.

 

भरपूर पाणी प्यावे. दिवसातून कमीत कमी दहा प्याले पाणी प्याल्याने शरीरातील सर्व हानिकारक द्रव्ये वाहून नेली जातात. त्वचेची ओल व लवचीकता वाढते. त्वचा रसरशीत व तजेलदार दिसते.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

'समतोल आहार' घ्यावा. समतोल आहार म्हणजे ज्यात अन्नवर्गातील सर्व घटकांचा आवश्यक प्रमाणात समावेश असेल - उदा., एकदल व द्विदल धान्य (गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, कडधान्ये, उसळी, स्निग्ध पदार्थ, दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मास, मासे, पालेभाज्या, फळभाज्या, इतर भाज्या, फळे, गूळ इत्यादी.)

 

आहारात हिरव्या पालेभाज्या, रंगीत भाज्या व फळे ठेवावी. जेवताना किमान बशीभर सलाड जरूर खावे, लिंबू, टमाटे यांचा भरपूर उपयोग करावा. लिंबू खाण्यापूर्वी त्वरित चिरावे. आधी चिरून ठेवल्याने लिंबातील जीवनसत्त्व ''चे प्रमाण कमी होते.

दुधाचे व दह्याचे नियमित सेवन करावे.

गायीचे तूप, शेंगदाणा, तीळ, जवस, खोबरे, सूर्यफूल, सोयाबीन इत्यादीचे तेल आलटून पालटून घ्यावे.

एकाच प्रकारचे धान्य रोज खाण्यापेक्षा सर्व प्रकारचे धान्य व तेलबिया आलटून पालटून खाण्यात असाव्यात.

कोरफड (ऍलो वेरा) पोटात घेता येईल किंवा त्वचेवर वरून लावल्यास त्वचेला कांती येईल, त्वचेची झीज भरून निघेल व जखमा दुरुस्त होतील.

आंबा, पपई, टरबूज, डाळिंब इत्यादींमधील कॅरोटीन या घटकामुळे त्वचेला जीवनसत्त्व ''चा पुरवठा होईल, त्वचा नितळ गुलाबीसर दिसेल.

योग्य व पोषक आहाराने आपण त्वचेचे सौंदर्य व आरोग्य मिळवू शकतो व कायम राखू शकतो, जेणेकरून त्वचाविकार होणार नाहीत व झाल्यास औषधांचा भडिमार न करता आहारातून इलाज करता येईल.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

9823262966


लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.