कोरोनाचा प्रकोप आणि मास्क

विवेक मराठी    11-Mar-2020
Total Views |

***अजय जाधव***

न्यू nCoV 2019 कोरोना हा विषाणू कोरोना फॅमिलीतील आत्तापर्यंतचा सर्वात घातक असा गणला जाऊ शकणारा विषाणू आहे. कोरोनाच्या बचावासाठी अनेक लोक मास्क लावून फिरताना दिसत आहेत. मात्र चुकीचा मास्क वापरल्याने व चुकीच्या पध्दतीने हाताळल्याने, लावण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे सुरक्षा निर्माण होण्यापेक्षा धोकाच जास्त आहे.
 

nCoV 2019_1  H  

हा लेख लिहायला घेईपर्यंत जगात 1,20,000 लोकांना न्यू कोरोना विषाणूची लागण झालेली असून 4,293 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. भारतात ह्याचे 60 पॉझिटिव्ह रुग्ण असून पुण्यातही काही रुग्ण आहेत, पण एकही अजून दगावलेला नाही. (संदर्भ - ncov2019.live)


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

कोरोनाने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था मंद करून टाकली असून विमान व सागरी वाहतूक जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

न्यू nCoV 2019 कोरोना हा विषाणू कोरोना फॅमिलीतील नवीन अस्तित्वात आलेला आत्तापर्यंतचा सर्वात घातक असा गणला जाऊ शकणारा विषाणू आहे. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे हा सर्दी-खोकल्याचा घातक असा विषाणू आहे. शरीरात पोहोचल्यानंतर दोन ते अकरा दिवसात ह्याची लक्षणे दिसू लागतात. ह्यावर अजून ठोस असा उपचार नसून फक्त लक्षणानुसार उपलब्ध असलेली औषधे दिली जातात.

ह्या सर्वात एक जमेची बाजू म्हणजे लागण झालेल्यापैकी सर्वच मृत्यू होत नाहीत, 60%पेक्षा जास्त लोक बरे झालेले आहेत व लागण झालेल्यापैकी होणारे मृत्यूचे प्रमाण 3.4% आहे. म्हणजे 1000 न्यू कोरोनाबाधित रुग्णांपैकी 34 लोक मृत्यू पावत आहेत. (हे प्रमाण बदलत राहणार आहे.) 70च्या वर असलेले वृध्द, ज्यांची प्रतिकारशक्ती व तब्येत चांगली नाही असे रुग्ण, हृदयविकार व श्वसनविकार असणारे तसेच व्यसनाधीन व्यक्ती ह्यांचा ह्यात प्रामुख्याने समावेश आहे. लवकर बरे होणाऱ्यांमध्ये तरुण व सुदृढ व्यक्तींचा समावेश आहे. अगदी दोन नवजात शिशूसुध्दा ह्यातून नीट होऊन बाहेर पडलेले आहेत.

कोरोना विषाणूपासून  बचाव

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी निरोगी व हायजीनिक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्याला काही आजार असल्यास त्यावर लगेच उपचार करून नीट होणे गरजेचे, जेणेकरून आपली तब्येत व प्रतिकारशक्ती नीट राहील.

सर्दी-खोकला असलेल्या व्यक्तींपासून कमीत कमी तीन फूट अंतर ठेवणे अत्यंत गरजेचे असून त्यांनी हाताळलेल्या वस्तू स्वछ न केल्याशिवाय हाताळणे धोक्याचे ठरू शकते. जर सर्दी-खोकला असणाऱ्या व्यक्तींची सर्दी गोळया घेऊनही दोन दिवसात बरी होत नसल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात रक्ताचे नमुने चाचणीसाठी द्यावेत. दोन-तीन दिवसांत न्यू कोरोनाचे रिपोर्ट मिळतात.

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
 
 

व्यक्तिगत सुरक्षा

न्यू कोरोना विषाणू हा खोकल्याद्वारे पसरणारा असल्याने, रुग्णापासून 1 ते 3 मीटर - म्हणजे 3 ते 10 फूट दूर राहावे, त्यांनी हाताळलेल्या वस्तू स्वच्छ केल्याशिवाय हाताळू नये.

आपले हात नाका-तोंडाला व डोळयांना लावू नये. असे हात लावल्याने आपल्या नकळत न्यू कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका असतो. वारंवार हात हँडवॉशने स्वच्छ धुवावेत, वीस सेकंदापेक्षा जास्त वेळ चालून तसेच बोटांच्या मध्यात स्वच्छ करावेत. ह्यामुळे विषाणू मरणार नाही, पण दूर नक्कीच राहील.

निरोगी व्यक्तींनी गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. मास्क वापरण्याची गरज नाही, पण कोणी खोकताना आढळल्यास साधा रुमाल नाकावर धरावा. रुमाल नसल्यास हात कोपरावर दुमडून नाकाजवळ धरावा 


nCoV 2019_1  H

न्यू कोरोना आणि मास्क

सगळयात महत्त्वाचे - अनेक लोक कोरोनापासून बचावासाठी मास्क लावून फिरत आहेत. 20 रुपयात कोरोना मास्कचा व्हिडिओसुध्दा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे मास्क उपयुक्त नसून उलट जास्त धोकादायक आहेत. चुकीचा मास्क वापरल्याने व चुकीच्या पध्दतीने हाताळल्याने, लावण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे सुरक्षा निर्माण होण्यापेक्षा धोकाच जास्त आहे. नाकातोंडाजवळ कोरोना विषाणू वाढण्यासाठी योग्य असे दमट व ओले वातावरण तयार होते आणि रेग्युलर मास्कमधून न्यू कोरोना सहज आरपार जाऊ शकतो. फक्त एन-95 टाइपचे मास्क न्यू कोरोना रोखण्यासाठी उपयुक्त असून ते फक्त रुग्ण व त्यावर उपचार करणारे डॉक्टर-नर्स ह्यांनीच वापरावे, जेणेकरून मास्कचा कृत्रिम तुटवडा होणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHOने) जाहीर केलेले आहे (संदर्भ - Should I wear a mask to protect myself? - bit.ly/nCoVfaq.)

कोणता मास्क कसा वापरावा, त्याआधी व नंतर काय करावे, वापरून झाल्यावर मास्क नष्ट कसा करावा ह्याबद्दल WHOच्या मार्गदर्शक सूचनांसाठी दुवा - bit.ly/nCoVmask.

nCoV 2019_1  H

रुग्ण व त्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स ह्यांनी एन-95 रेस्पिरेटर ह्या टाइपचेच मास्क वापरावेत.

1. मास्क/ग्लोव्हजचे पॅक फोडण्याआधी आपले हात व चेहरा अतिशय स्वच्छ धुऊन घ्या. त्यासाठी उपलब्ध असलेले डेटॉल, सॅव्हलोन, सॅनिटायझर, हँडवॉश किंवा कोणताही चांगला साबण व स्वछ पाणी वापरावे.

हातातील बोटांमधील फटी नीट साफ कराव्यात.

2. मास्क लावताना हात व चेहरा पूर्ण निर्जंतुक व कोरडे आहेत ह्याची खात्री करा.

 

3. मास्कचे पॅक फोडून ते नीट चेहऱ्यावर ठेवा व त्यानंतर नीट फिट करा.

4. फिट करताना कसलीही मोकळी जागा राहणार नाही ह्याची पूर्ण खात्री करा.

 

5. मास्क, ग्लोव्ह्ज, गाउन, मोजे व बूट, डोळे संरक्षक घातल्याशिवाय डॉक्टरांनी रुग्णाजवळ जाण्याचे टाळावे.

 

6. वापर पूर्ण झाल्यावर WHOच्या निर्देशांनुसार मास्क व इतर साहित्य स्वच्छ करावे किंवा त्याची विल्हेवाट

लावावी.

7. मास्क व इतर पोशाख उतरवल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःचे नीट निर्जंतुकीकरण करावे.

 

8. बाहेरून आल्यावर हात, बोटे, चेहरा, डोळे, पाय स्वच्छ धुवावेत.

 

9. आपले हात डोळयांना, चेहऱ्याला, नाकातोंडाला लावण्याचे कटाक्षाने टाळा.

 

10. संशयित व्यक्तीला घरात ठेवू नये, लगेच रुग्णालयात दाखल करा व रक्त चाचणीसाठी द्यावे, त्या संदर्भात अफवा पसरवू नयेत.

 
nCoV 2019_1  H

अपवादात्मक स्थितीत - उदा., हॉस्पिटलमध्ये जागा नाही, किंवा कोरोनाचा वॉर्ड नाही अशा वेळेस घरात कोरोना रुग्ण असल्यास त्याला वेगळया खोलीमध्ये ठेवावे, त्याला अन्न, औषध देताना जवळ जाताना मास्क व पोशाख ह्याविषयी सर्व निर्बंध पाळावेत.

 

निर्बंध - bit.ly/cdcncov19.

अजूनही WHO तसेच UNISEF ह्यांनी अनेक मार्गदर्शक सूचना तयार केलेल्या असून त्या वाचाव्यात. अनेक डॉक्टरसुध्दा पूर्ण ज्ञानाअभावी चुकीचे संदेश व्हायरल करण्यात मग्न झालेले दिसून येतात. स्वयंसुरक्षा तसेच योग्य व वेळीच उपचार हाच एकमेव उपचार असून त्याशिवाय कोणताही पर्याय नाही.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

चुकीचे संदेश व काही तथ्य

* न्यू कोरोनाचा आकार - न्यू कोरोना विषाणूचा आकार 500 मायक्रो आहे - चूक.

nCoV2019चा आकार 0.12 मायक्रॉन आहे.

 

* हवेतून फैलावत नाही - चूक.

रुग्ण खोकल्यानंतर 3 फुटांपर्यंत विषाणू पोहोचू शकतात, तसेच हवा वेगात असल्यास 10 फुटांपर्यंत जाऊ शकतात.

 

* उन्हामुळे कोरोना दोन तासात मरतो - चूक.
 

उन्हात विषाणूच्या प्रसाराला काही प्रमाणात आळा बसू शकेल, पण तेही अजून सिध्द झालेले नाही. रुग्णाच्या श्वसनसंस्थेत, ओल्या वातावरणात विषाणू वेगाने वाढतो व खोकल्याने पसरतो.

* होळीतील गोवरीच्या धुराने, गोमूत्राने न्यू कोरोना विषाणू मरतो - चूक.

केवळ आगीमध्ये गेल्याने विषाणू जळून नष्ट होऊ शकतो, मग ती आग होळीची असेल किंवा इतर कोणतीही. गोमूत्र, शेण किंवा गोवऱ्या ह्याचा अजूनही कोणताच उपयोगी ठरू शकणारा परिणाम समोर आलेला नसून जगात कुठेही असले उपचार चालू नाहीत.

 

(संदर्भ - bit.ly/nCoVfact)

 

- अजय जाधव, नांदेड - ८४४६९५२२५०

साहाय्य - डॉ. रवींद्र वाठोरे
------------------------------------------------


#जनजागृती 
पुणे महानगरपालिका आरोग्य अधिकारी माहिती देताना...