‘होता’ गीता ज्ञान यज्ञाचा

विवेक मराठी    14-Mar-2020
Total Views |

 ***रुचिता राणे*** 

ठाण्याचे कर सल्लागार संस्था प्रशिक्षक श्रीराम उर्फ राजू पटवर्धन यांचा भगवद्गीतेच्या अभ्यासाचा प्रवास शृंगेरी मठात घेतली जाणारी भगवद्गीता पठणाची परीक्षा या दोहोंची माहिती आपल्यासमोर मांडावी, म्हणून हा शब्दप्रपंच. 
 
geeta_1  H x W:

भगवंतांचे गीत असलेली श्रीमद्भगवद्गीता हा भक्तियोग, राजयोग ज्ञानयोग यांचे वर्णन करणारा ग्रंथ असला, तरी देश-विदेशात आजच्या आधुनिक युगासाठी उपयोजित व्यवस्थापन क्षेत्रामध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण उपयोगी ग्रंथ म्हणून याकडे पाहिले जाते. भगवान श्रीकृष्णांनी उपनिषदांचे सार म्हणून युद्धभूमीवर अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता ही जणू त्याच्या निद्राधीन बुद्धीला विश्वरूपदर्शनाने न्हाऊ घातलेले स्नानच होय. श्रीमद्भगवद्गीतेच्या 700 श्लोकांची श्रेष्ठता म्हणजे येथे असलेले दिक्कालातीत ज्ञान जे सर्वांकरिता उपलब्ध आणि उपयुक्त आहे, ते भगवद्गीतेच्या अभ्यासकाला काय मिळते हे खुद्द ग्रंथामध्येच सांगितले आहे -

गीताशास्त्रमिदं पुण्यं : पठेत् प्रयत: पुमान्।

विष्णुपदमवाप्नोति भयशोकादिवर्जित:

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

- जी व्यक्ती पवित्र अशा गीतानामक शास्त्राचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करते, तिला विष्णूचे अढळ स्थान प्राप्त होते भय, चिंता आणि इतर सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. जिच्या पठणाचे असे फळ आहे, अशा या भगवद्गीतेचा अभ्यास त्याचे पाठांतर करण्याकडे अध्यात्माकडे वळलेल्या लहान थोर अशा अनेक लोकांचा कल असल्याचे आपण पाहत असतो. तरी ठाण्याचे कर सल्लागार संस्था प्रशिक्षक श्रीराम उर्फ राजू पटवर्धन यांनी चक्क संपूर्ण भगवद्गीतेचा उत्तमरीत्या स्मरणार्थ अभ्यास करून शृंगेरी येथील श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थान दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठम्च्या जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री भारती तीर्थ महास्वामीजी यांच्यासमोर ती म्हणावी, त्यांच्या शुभहस्ते बक्षीस त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. राजू पटवर्धन यांचा भगवद्गीतेच्या अभ्यासाचा प्रवास शृंगेरी मठात घेतली जाणारी ही परीक्षा या दोहोंची माहिती आपल्यासमोर मांडावी, म्हणून हा शब्दप्रपंच.



शिष्य जेव्हा तयार असतो तेव्हा गुरू सापडतात किंवा प्रकट होतात, हा अनुभव आपण केव्हातरी घेतला असेल किंवा संतांविषयी वाचल्याचे स्मरत असेलच. राजू पटवर्धन यांच्याबाबतदेखील काहीसे असेच झालेले दिसते. ते दोन-अडीच वर्षे नित्यनेमाने वसंतराव मराठे यांच्याकडून भगवद्गीता समजून घेत होते. त्याच काळात त्यांना प्रत्येक एकादशीला संपूर्ण भगवद्गीतेचे पारायण करणार्या ठाणे येथील अनेक गटांविषयी कळले. यातील काहींना तर संपूर्ण भगवद्गीता मुखोद्गत होती. अशाच एका गटामध्ये गीता जयंतीच्या निमित्ताने गेले असता राजू पटवर्धन यांना भगवद्गीतेचे पाठांतर करण्याचे प्रशिक्षण देणार्या सुनंदाताई आपटे यांच्याविषयी तसेच शृंगेरी येथे प्रत्येक महिन्यात घेतल्या जाणार्या भगवद्गीता पाठांतर परीक्षेविषयी माहिती मिळाली. आपल्यालाही भगवद्गीता पाठ करता येईल का? असा विचार मनात आला ठाणे येथील श्रीज्ञानेश्वर मंडळ येथे सुनंदाताई आपटेंच्या वर्गाला ते प्रत्येक रविवारी जाऊ लागले. दीड-एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर परीक्षा देण्याइतपत तयारी झाली असल्याने त्यांनी ही परीक्षा द्यावी असे सुनंदाताई यांनी त्यांना सुचवले. राजू पटवर्धन यांनीदेखील एक वेगळा अनुभव घेता येण्याची संधी मिळत असल्याने परीक्षेची तयारी सुरू केली. ही परीक्षा काय म्हणून वेगळी? याचे कुतूहल तुमच्या मनात जागृत झाले असेलच. ही परीक्षा कोण, कधी, कुठे, कशी आणि का घेतात? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात फिरत असतील यात तिळमात्र शंका नाही. त्यापलीकडे एखाद्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये केवळ कार्यरत नाही, तर अतिशय व्यग्र अशा व्यक्तीने हे कसे जमवले असेल याचे कुतूहलदेखील निश्चितच उत्पन्न झाले असेल. चला तर, या प्रश्नांची उत्तरे पाहू या.


geeta_1  H x W:

निसर्गाच्या सौंदर्याने ज्याच्या शीर्षावर आपला वरदहस्त ठेवला अशा कर्नाटक राज्यामधील चिकमंगळूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शृंगेरी मठ येथील परमात्मा जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री भारती तीर्थ महास्वामीजींच्या 56व्या वर्धंती सोहळ्याच्या वेळी 2006 साली गीतेच्या धार्मिक आणि वेदान्तिक संदेशाचा प्रसार करण्यासाठी दक्षिणामय श्री शारदा पीठम् या संस्थेने गीता ज्ञान यज्ञ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत श्रीमद्भगवद्गीतेचे सर्व 18 अध्याय जे स्मरणार्थ म्हणतील किंवा किमान सहा अध्यायांचे जप करतील, त्यांना बक्षीस म्हणून प्रमाणपत्र शंकराचार्यांचे आशीर्वाद दिले जातील. या गीता ज्ञान यज्ञ योजनेच्या स्थापनेपासून आजवर हजारो जण सहभागी झाले आहेत आणि त्यांना बक्षिसेदेखील मिळाली आहेत. ही परीक्षा दर रविवारी घेतली जाते. प्रत्येक वर्षी देशभरातून गीता ज्ञान यज्ञामध्ये 250 ते 300 जण सहभागी होतात. सहभागी होण्यासाठी वयाची इतर कोणतीही मर्यादा नाही. संस्थेच्या संकेतस्थळावरून नोंदणीचा फॉर्म भरून पाठविल्यानंतर, साधारण कोणत्या महिन्यात आपली परीक्षा घेतली जाईल हे संस्थेकडून कळविण्यात येते. यावरून आपल्या लक्षात आले असेलच की या परीक्षेसाठी बरेच अगोदर आपल्याला नाव नोंदवावे लागते. परीक्षा शृंगेरी मठामध्ये घेतली जात असून, ती एकाच दिवशी दोन सत्रांमध्ये घेतली जाते. पहिल्या सत्रामध्ये उपस्थित सर्व परीक्षार्थी क्रमाक्रमाने तेथील परीक्षकांसमक्ष सांगितल्यानुसार काही श्लोक म्हणतात. याअंतर्गत सर्व अठरा अध्यायांमधील काही श्लोक म्हणून घेतले जातात. या सत्रामध्ये उत्तीर्ण झालेले सर्व जण दुसर्या सत्रासाठी पात्र ठरतात. परीक्षा त्याच दिवशी दुपारच्या सत्रामध्ये घेतली जाते. जगद्गुरू शंकराचार्य स्वत: यशस्वी उमेदवारांची परीक्षा घेतात. मात्र ही परीक्षा स्वतः जगद्गुरू शंकराचार्य घेत असल्याने या सत्रामध्ये प्रत्येक उमेदवाराची परीक्षा वेगळ्याने स्वतंत्र खोलीमध्ये घेतली जाते. यामध्ये उमेदवारास भगवद्गीतेमधील येणारा एखादा शब्द सांगितला जातो त्या शब्दाला धरून भगवद्गीतेमध्ये असलेला श्लोक तिथून पुढचे कैक श्लोक त्याने म्हणावयाचे असतात. अशा प्रकारे स्वामीजींचे समाधान होईपर्यंत ते सांगतील तसे श्लोक म्हणावयाचे असतात. श्लोकोच्चारण, श्लोक सादरीकरणाचे कौशल्य, स्मरण तसेच इतर काही निकषांच्या आधारावर पहिला, दुसरा तिसरा क्रमांक ठरविला जातो. त्यांना त्यांच्या आध्यात्मिक मार्गावर पुढील प्रगतीसाठी स्वामीजी आशीर्वाद देतात आणि त्यासह बक्षीस प्रमाणपत्रदेखील देतात. काही कारणास्तव परीक्षेच्या पहिल्या सत्रामध्ये योग्य असे सादरीकरण केल्यास उमेदवारांना पुन्हा तयारी करून नंतर केव्हातरी परीक्षा पुन्हा देता येते अशा प्रकारे या परीक्षेसाठी सर्वांना प्रोत्साहन दिले जाते.

 
 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

कौतुकाची गोष्ट अशी की 2014 साली जुलै महिन्यामध्ये औरंगाबादच्या ॠद्धी कमलाकर पाटील या सात वर्षाच्या मुलीने 700 श्लोक उत्तम पद्धतीने मुखोद्गत करून ही परीक्षा दिली. आश्चर्याची गोष्ट अशी की या परीक्षेकरिता सामान्यत: 70% सहभाग महिलांचा असतो त्या उत्तम पद्धतीने ही परीक्षा देत असतात. भारताबाहेर अमेरिकेतदेखील या संस्थेची ही परीक्षा घेतली जात असल्याने संस्कृतच्या त्या अनुषंगाने भारतीय संस्कृतीच्या प्रसार, रक्षण संवर्धनाचे कार्य या निमित्ताने यशस्वी पद्धतीने केले जात आहे, यात शंकाच नाही.

राजू पटवर्धन म्हणजे एखादी गोष्ट कराण्याचे ठरविले की मार्ग कसे काढता येतात याचे एक उत्तम प्रेरणादायक उदाहरण आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी प्रवास करायचा म्हणाल तर दिवसाचे येऊन-जाऊन दोन ते तीन तास सहज मोडतात. हा प्रवासाचा वेळ सत्कारणी लावून राजू पटवर्धन यांनी येता-जाता भगवद्गीतेचे श्लोक पाठ केले. आठवड्यालागी पाच श्लोक व्यवस्थित पाठ करत त्यांनी 700 श्लोकांची संपूर्ण भगवद्गीता मुखोद्गत केली. पण परीक्षेचे साधारण शलाका परीक्षासदृश स्वरूप लक्षात घेता त्यांनी यासाठी एक वेगळी योजना आखली. शलाका परीक्षा म्हणजे परीक्षकाकडून एका शलाकेने अर्थात काडीने पुस्तकाचे जे पान उघडले जाईल तिथून श्लोक म्हणावयाचे असतात. ही पद्धत संस्कृत पाठशाळांमध्ये शास्त्रार्थ सभेत शास्त्रग्रंथांच्या अभ्यासाच्या परीक्षणाकरिता वापरली जाते. पटवर्धन अगोदरचे पाठ झालेले अध्याय म्हणून पुढचे नवीन अध्याय म्हणत. जसे अध्याय वाढत गेले, तसाच पारायणाला लागणारा वेळदेखील वाढत गेला. शेवटच्या टप्प्यात रोजचे अडीच ते तीन तास लागणार म्हणून त्यांनी सकाळी, दुपारी संध्याकाळी प्रत्येकी साधारणपणे एक एक तास काढून हा नियमित सराव सुरू ठेवला. अशा पद्धतीने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने त्यांनी हे वयाची सहा दशके ओलांडूनदेखील साध्य केले आणि गीता ज्ञान यज्ञामध्ये यज्ञ करणाराहोताम्हणून सहभाग घेतला. त्यांचा हा सराव परीक्षेपुरता मर्यादित नसून ते सातत्याने रोज भगवद्गीतेचे पारायण करतात.


या
गीता ज्ञान यज्ञामध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने श्लोकांचे केलेले पाठांतर भगवद्गीतेचा झालेला मोघम अभ्यास हा पुढे परीक्षार्थींना गीतेचा सखोल अभ्यास करण्यास प्रवृत्त करणारा ठरतो, या गोष्टीला राजू पटवर्धन यांनी दुजोरा दिला. सुनंदाताई आपटे यांच्या पंक्तीला बसून इतर अनेक जणांना या गीता ज्ञान यज्ञाचाहोताबनविण्याकरिता, त्यांना प्रशिक्षण देण्याचा त्यांची मदत करण्याचा राजू पटवर्धन यांचा मानस आहे.

या लेखाच्या निमित्ताने तुम्हा वाचकांनादेखील या गीता ज्ञान यज्ञामध्ये श्लोकपठणरूपी आहुती अर्पण करण्याचे आवाहन करून राजू पटवर्धन यांना तसेच या यज्ञाकरिता लागणारा होत्यांचा ताफा तयार करणार्या प्रशिक्षकांना शुभेच्छा देते शृंगेरी मठाधिपतींना तेथील सर्व विद्वान मंडळींना सादर वंदन करते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/