मदतीची बेटं

विवेक मराठी    30-Mar-2020
Total Views |
 
जम्मू काश्मीर ह्या केंद्रशासित प्रदेशातील खालिदा बेगम नावाच्या महिलेने नुकताच पाच लाख रुपयांचा धनादेश रा.स्व.संघ परिवारातील सेवा भारती ह्या संस्थेला देणगी म्हणून दिला आहे. ८७ वर्ष वयाच्या खालिदा बेगम यंदा हज यात्रेला जाणार होत्या पण करोना साथीमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे त्यांना प्रवास रद्द करावा लागला. ह्या यात्रेसाठी त्यांनी पाच लाख रुपये बाजूला काढले होते. श्रीमती खलिदा यांना रा स्व संघाच्या कामाबद्दल व संघाच्या सेवा कार्यांच्या बद्दल माहिती होती. त्यांनी बाजूला काढलेले पाच लाख रुपये सेवा भारती मार्फत चालणाऱ्या सेवाकार्यासाठी देणगी म्हणून देण्याचा निर्णय केला. त्यांची इच्छा आहे की जम्मू काश्मीर भागातील गरीब जनतेसाठी चालणाऱ्या कामांत ह्या रकमेचा विनियोग व्हावा. श्रीमती खलिदा बेगम ह्या सुशिक्षित असून त्यांचे सासरे कर्नल पीर मोहम्मद खान हे जनसंघाचे जम्मू-काश्मीर राज्याचे अध्यक्ष होते.
 
-शरदमणी मराठे