नॉलेज, पेशन्स, मनी..!

विवेक मराठी    10-Apr-2020
Total Views |


घरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरे! : भाग १० 

‘Timing is not important in Share Market, Spending Time in Share Market is very important.’ आपण आपल्या गुंतवणुकीला शेअर बाजारात किती वेळ देतो, यावर आणि आपण निवडलेले शेअर्स हे योग्य आहेत की नाही, यावर आपला शेअर बाजारातील परतावा अवलंबून असतो. Reliance या कंपनीचा शेअर २००९ ते २०१७ या कालावधीत ७५० ते १००० या पट्यात फिरायचा म्हणजेच अंदाजे ५% परतावा देत होता. पण २०१७ ते २०१९ मध्ये हाच Reliance चा शेअर दुप्पटीहून जास्त भावाचा झाला. म्हणजे अंदाजे ३३% परतावा मिळाला. हा एवढा परतावा येण्यासाठी गुंतवणूकदारांना आठ वर्षे थांबावं लागलं, हे लक्षात घ्या..


Share Market_1  

या लेखमालिकेतील मागील नऊ लेखांमध्ये आपण शेअर बाजाराच्या मूळ संकल्पनेपासून ते एखादा शेअर कसा निवडावा, याबद्दल थोडक्यात माहिती घेतली. थोडक्यात, आपण आपला बेसपक्का केला, आणि आता आपण सध्याच्या परस्थितीत शेअर बाजारात काय करायचं ते पाहू.

मागील एका महिन्यापासून कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात लॉकडाऊन झालं असल्यामुळे अर्थातच सर्व शेअर बाजारांतही मंदी आहे. जगामधील सर्व शेअर बाजार निर्देशांक हे ३५% पेक्षा जास्त खाली आले आहेत. आता या अशा परिस्थितीत काय करावं, असं विचार आपण सारेचजण करत असू. सर्वात प्रथम एक बाब लक्षात घ्या ती म्हणजे, आपली जर एस. आय. पी. सुरू असेल, तर ती तशीच चालूच ठेवा आणि नसेल तर सुरू करा. कारण हीच ती संधी असते, जेव्हा हे मंदीचे काळे ढग निघून जातील त्यानंतर जी तेजी येईल ती आपल्याला भरभरून परतावा (Returns) देऊन जाईल. शेअर बाजारात तेजी आणि मंदीचा खेळ चालूच असतो. जर मंदी ही २०% पेक्षाही जास्त असेल तर त्या बाजाराला मंदीचा बाजार म्हणतात. आजवर अशा वेळादेखील अनेकदा आल्या आहेत आणि तरीही बाजाराने दीर्घ मुदतीत १६% परतावा दिला आहे.

शेअर बाजारामध्ये परतावा हा कधीही एकरेषीय (Linear) नसतो. उदा., जर आपण एखाद्या बँकेमध्ये १०% P.A. या दराने ‘FD’ केली तर आपल्याला हे माहिती असतं की, वर्ष पूर्ण झाल्यावर मला माझ्या मुद्दलावर १०% मिळणार आहेत. शेअर बाजाराने दीर्घ मुदतीत १६% परतावा दिला परंतु तो कधीही दरवर्षी दिला नाही, म्हणजेच काही वर्षी तो नकारात्मक असेल काही वर्षी तो FD एवढाच किंवा त्याहूनही कमी असेल पण काही वर्षे तो ५०% इतकाही असू शकेल! त्यामुळे ‘Timing is not important in Share Market, Spending Time in Share Market is very important.’ आपण आपल्या गुंतवणुकीला शेअर बाजारात किती वेळ देतो, यावर आणि आपण निवडलेले शेअर्स हे योग्य आहेत की नाही, यावर आपला शेअर बाजारातील परतावा अवलंबून असतो.

Reliance ही कंपनी आपणा सर्वांना ठाऊक आहेच.या कंपनीचा शेअर २००९ ते २०१७ या कालावधीत ७५० ते १००० या पट्यात फिरायचा म्हणजेच अंदाजे ५% परतावा देत होता. पण २०१७ ते २०१९ मध्ये हाच Reliance चा शेअर दुप्पटहून जास्त भावाचा झाला. म्हणजे अंदाजे ३३% परतावा मिळाला. हा एवढा परतावा येण्यासाठी गुंतवणूकदारांना आठ वर्षे थांबावं लागलं, हे लक्षात घ्या. त्यामुळे शेअर बाजारात पदार्पण करण्यापूर्वी खालील गोष्टी आपण लक्षात घेतल्याच पाहिजेत.

. शेअर बाजार हे दीर्घ मुदतीत (Long Term) संपत्ती निर्माण करण्याचं साधन आहे, हे पक्कं लक्षात असू द्या. आणि आपण भारतासारख्या विकसनशील देशात जन्म घेतला, हे आपलं भाग्य आहे, कारण जगातील २०० देशांमधून पहिल्या १० क्रमांकामध्ये आपली अर्थव्यवस्था आहे आणि ती ७% दराने २ वर्षांपूर्वी वाढत होती. त्यामुळे पुढील काळात आपला शेअर बाजार हा चांगलाच परतावा देणार, हे पूर्णपणे सत्य आहे.

. आपल्या बचतीमधील ८०% हिस्सा हा शेअर बाजारात गुंतवावेत (विशेषतः तरूण वर्गाने). उरलेले २०% आपण अल्प मुदतीसाठी राखून ठेवू शकतो. जर कोणालाही अगदी सुरूवातीलाच शेअर बाजारात अल्प मुदतीसाठी काही सौदे करायचे असतील तर त्यामध्ये पूर्णपणे शिस्त बाळगा आणि आपल्याजवळील थोड्याच पैशामध्ये हे व्यवहार करा.

. शेयर बाजारात उतरताना तीन गोष्टी ध्यानात ठेवा : Knowledge, Patience, Money! या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. एकवेळ पैसा हा कमी असला चालेल पण तो गमावण्यासाठी नाही, हे पक्के लक्षात असू द्या. त्यासाठीच शेयर बाजाराविषयी Knowledge हवं आणि Patience देखील हवेत.

. आपण आपल्या गुंतवणूकीचं ठराविक काळानंतर अवलोकन करणं जरूरीचं आहे. ते करायची तयारी ठेवा.

. शेयर बाजारात नफा आणि तोटा पचवायचीही तयारी लागते, तशी तयारी ठेवा.

. सर्वात महत्वाची गोष्ट ही की, कधीही Intraday Trading किंवा Futures and Options करू नका, असं मी तुम्हाला सुचवेन. Futures and Options हा एक खूप Risky असा प्रकार आहे. त्यामधील Options हा प्रकार आपण करू शकतो परंतु त्यासाठी शेअर बाजारात आधी खूप अनुभव घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आधी Options या प्रकाराची पूर्ण माहिती घ्या आणि मगच त्यामध्ये उतरा.

. आपण एखादा शेअर का घेतो आणि का विकतो, याचं सबळ कारण तुमच्याकडे (किमान तुमच्या स्वतःच्या नियोजन आणि व्यवस्थापनासाठी तरी) असलंच पाहिजे.


. शेअर बाजार हे दरमहा मिळकतीचं साधन नाही, हे लक्षात ठेवा.


. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स घेता तेव्हा त्याअर्थी तुम्ही त्या कंपनीचे मालक आहात हे लक्षात असू द्या आणि एखादा चांगला मालक हा त्याच्या कंपनीबाबत कसा वागेल त्या दृष्टीनेच तुम्हीही विचार करा.


१०
. शेयर बाजारात Patience ठेवा. जर योग्य अभ्यास करून विविध शेअर्सचा पोर्टफोलिओबनवलात आणि तो Patience ठेवून Hold केलात तर तो पोर्टफोलिओ तुम्हाला नक्कीच दीर्घ मुदतीत फायदा करून देईल. शेअर बाजारात सर्व काही तुम्ही कसा पोर्टफोलिओ निवडता आणि तो तुम्ही किती काळ धरून ठेवता, यावरच अवलंबून असतं.


इथे आपण ही लेखमालिका
संपवत आहोत, शेअर बाजारासारख्या मोठ्या विषयाची फारच थोडक्यात माहिती आपण या लेखमालिकेतून समजून घेऊ शकलो. याहूनही अधिक माहिती कुणाला हवी असल्यास वा जर तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) शिकण्याची इच्छा असल्यास मला जरूर संपर्क करा. धन्यवाद..!

----------

- अमित पेंढारकर

(लेखक शेअर मार्केटचे अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार आहेत.)

संपर्क : ९८१९२३०३१० / ईमेल : finmart99@gmail.com