वुई टुगेदरच्या अन्नपूर्णांची धडपड

विवेक मराठी    02-Apr-2020
Total Views |

उज्ज्वला बागवाडे, संस्थापक, वुई टुगेदर धान्य बॅंक


bhatu sawant_1  
 
लॉकडाउनच्या आधीचे काही दिवस. कोरोनाचा विषय कानावर येत होता, पण त्याचे परिणाम सभोवतालच्या परिसरात दिसत नव्हता. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणा-या शोभा यात्रेत आम्ही वुई टुगेदरचे सदस्य सहभाग घेतो. त्यामुळे तीच चर्चा सुरू होती आणि अचानक दुपारी लॉक डाउनची घोषणा झाली. कोरोना अगदी दारापाशी आलाय हे स्वीकारावे लागले.

एक-दोन दिवस त्याचे गांभीर्य समजण्यात गेले. घरी काय जेवणाचे बेत करायचे यावर व्हाॅटस् अॅप ग्रूप्सवर चर्चांना ऊत आला. पण डोळ्यासमोर येऊ लागली ती सारी आपली माणसे, जी आपले रोजचे जगणे सोप्पे करत होती. रिक्षावाले दादा, घरी मदतीला येणाऱ्या स्त्रिया, कचऱ्यात उतरून काही प्लास्टिक वेचणाऱ्या आणि असे अनेक लोक. यांचे काय आणि कसे होणार? रोजगारच नाही तर आता? मग धान्य बँकेने यावर मार्ग काढायचा विडा उचलला. अर्थात हे एका दोघांचे काम नाही. मग हाक मारली या समाजाला. केलेल्या आवाहानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मिळतो आहे.


bhatu_1  H x W: 

14 एप्रिलपर्यंत अखंड काम चालू राहील. 5 किलो तांदूळ, 5 किलो ग्रहांचे पीठ, 1 किलो डाळ, 1 लिटर तेल, 1 किलो मीठ असे स्वरूप ठरले. रुपए 500/- फक्त. धान्य मिळत होते, पण दुकानदार किट बनवायला तयार नव्हते. ते तरी काय करणार मदतीचे हात, कामगार वर्गच नव्हता. पण दुकानदार श्री. सावंत दादा देवासारखे धावून आले आणि म्हणाले, "खूप जड जात आहे किट्स बनवायला पण तुमच्या या कामात माझ्याकडून मदत."

पैसे जमले, माल मिळाला पण आता वाटपाचे काय? कोणाला द्यायचे कसे कळणार ? परत त्या शक्तीने समर्थ भारत व्यासपीठाच्या बटू सावंत सरांना मदतीला धाडले आणि खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली . आज मागील 3 दिवसांत आपल्या वुई टुगेदर धान्य बँकेने 300 घरांमध्ये धान्य पोचवले आहे. आणि हे काम अखंड चालूच राहणार आहे . तहान-भूक विसरून आम्ही या कामाशी बांधले गेलो आहोत. आज अभिमान वाटतोय ठाणेकर असण्याचा. 


bhatu sawant_1   

जीवाशी खेळ असूनही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शांतपणे, नियमात राहून काम करणारे हे सारे समाजसैनिक पाहता आले. या लढाईत धान्य बँकेचा हा खारीचा वाटा. हीच वेळ आहे प्रत्येक माणसाला दाखवून देण्याची की तू कधीच कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगात एकटा नाही आहेस. आम्ही सारे तुझ्याबरोबर आहोत. मदतीचा हात पुढे करा, कोरोनाची भीती संपेल आणि येईल तो या युद्धात जिंकण्याचा आत्मविश्वास. Always remember ' We together can do wonders!' 

एका कुटुंबाने कमीतकमी एका कुटुंबाला दत्तक घ्यावे यात, खर्च ५००/- (५ तांदूळ किलो ,१ किलो डाळ, किलो पीठ , १ तेल ,किलो मीठ अंदाजे)

(WhatsApp पावती उपलब्ध)

त्वरित संपर्क करा:

वुई टुगेदर धान्य बँक

9820713303

9769125148