कम्युनिस्ट चीन आणि कोविड-१९

विवेक मराठी    20-Apr-2020
Total Views |


china_1  H x W:
चीनने अत्यंत हलगर्जीपणे आणि बेजबाबदारपणे कोवीड
-१९ या महामारीचा विषय हाताळला आहे. हा विषाणू रोखण्यासाठी योग्य निर्णय घेऊन, त्यांची अंमलबजावणी न करता चिनी सरकारने संपूर्ण जगाला या बाबतीत अंधारात ठेवले. आपल्या देशात अशी भयंकर महामारी सुरू झाली आहे, याची सूचना लगोलग जगाला देण्याची खबरदारी खरे तर त्यांनी घ्यायला हवी होती. माहिती लपवून ठेवल्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव थांबेल, अशी भोळी आशा कम्युनिस्ट चिनी सरकारला वाटत होती काय? हा प्रश्न सुरुवातीलाच योग्य प्रकारे हाताळला असता, तर आज इतकी भयावह परिस्थिती आलीच नसती. पण आपण केलेल्या अश्लाघ्य चुकांवर पाघरूण घालण्यातच चीन अजूनही मग्न आहे.
 

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक :

चीनमधल्या वुहान शहरात निर्माण झालेल्या कोरोना विषाणूने आज पृथ्वीवरील दीड लाख लोकांचा जीव घेतला आहे. १८७ देशांमधले जवळजवळ २३ लाख लोक या रोगाने बाधित झालेले आहेत. जगातली एक तृतीयांशहून अधिक लोकसंख्या या ना त्या प्रकारे घरांत डांबली गेलेली आहे. जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत, अब्जावधी डॉलर्सचे नुकसान सहन करत आहेत. जगभरातील लोकांची आयुष्ये, त्यांचे भविष्य अक्षरशः टांगणीला लागले आहे.

आणि या सगळ्या अनर्थाला चीनची कम्युनिस्ट राजसत्ता आणि त्यांनी विकत घेतलेल्या जगातील आंतरराष्ट्रीय संस्था मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत, ही बाब प्रकर्षाने आता जगासमोर येऊ लागली आहे. चीन हा विस्तारवादी धोरणे राबवणारा देश आहे, अशी ओरड गेली अनेक वर्षे सुरू आहेच. चीनकडून विविध देशांना केली गेलेली कर्जवितरण व्यवस्था, वन बेल्ट वन रोड धोरण, सिपेक प्रकल्प, मेक इन चीन २०२५ हे सगळे बहुराष्ट्रीय महाप्रकल्प जगाला आपल्या कचाट्यात पकडण्याच्या दृष्टीने आखले गेलेले आहेत, ही बाब आता जगभर मान्य होऊ लागली आहे.


coronavirus_1  

चीनने अत्यंत हलगर्जीपणे आणि बेजबाबदारपणे कोवीड-१९ या महामारीचा विषय हाताळला आहे. हा विषाणू रोखण्यासाठी योग्य निर्णय घेऊन, त्यांची अंमलबजावणी न करता चिनी सरकारने संपूर्ण जगाला या बाबतीत अंधारात ठेवले. आपल्या देशात अशी भयंकर महामारी सुरू झाली आहे, याची सूचना लगोलग जगाला देण्याची खबरदारी खरे तर त्यांनी घ्यायला हवी होती. माहिती लपवून ठेवल्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव थांबेल, अशी भोळी आशा कम्युनिस्ट चिनी सरकारला वाटत होती काय? हा प्रश्न सुरुवातीलाच योग्य प्रकारे हाताळला असता, तर आज इतकी भयावह परिस्थिती आलीच नसती. पण आपण केलेल्या अश्लाघ्य चुकांवर पाघरूण घालण्यातच चीन अजूनही मग्न आहे.


coronavirus_1  

चीनने जगभर सोशल मीडियाला आणि प्रमुख प्रसारमाध्यमांना विकत घेऊन, तद्दन खोट्यानाट्या बातम्या प्रसारित करून आपल्या सोयीचे जनमत पद्धतशीरपणे जगभरात निर्माण करण्यासाठी मोठी आघाडी उघडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण या प्रचारयुद्धाचे शिकार होणार नाही याची खबरदारी आपणच घेतली पाहिजे. कारण या विषाणूच्या निर्मितीबाबत, तसेच याच्या फैलावासंबंधात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांची समर्पक उत्तरे चिनी राजवटीचे गुन्हे जगासमोर उघडे करू शकतात.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक :

उदा
.,
. वुहानच्या प्राणिविक्री बाजारात या विषाणूचे संक्रमण करणारी वटवाघळे विकलीच जात नाहीत, तर चीनने या वटवाघळांमुळे हा विषाणू फैलाव झाला ही लोणकढी थाप का मारली?

. धोक्याची सूचना देणाऱ्या चिनी डॉक्टरने दिलेली माहिती लपवून आणि सूचित केलेल्या धोक्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून चीनने काय साधले?

. वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजले असता या विषाणूचा नायनाट करणे शक्य असूनही चिनी राजसत्तेने अक्षम्य अशी घोडचूक करून जगभरात या विषाणूला का फैलावू दिले?

. योग्य वेळी या विषाणूविषयीची माहिती जगासमोर आणण्याऐवजी पैशाच्या जोरावर WHO या जागतिक आरोग्य संघटनेद्वारे खोटी माहिती जगभरात पसरवण्यामागे चीनचे नक्की उद्दिष्ट काय?

. जगभरातील प्रमुख प्रसिद्धीमाध्यमांद्वारे खोट्या बातम्या छापवून आणून आणखी किती काळ आपण जगाला मूर्ख बनवून मृत्यूच्या खाईत लोटू शकतो असे चिनी सरकारला वाटते?

. आजही चीनमधली एकूण रुग्णसंख्या किती? मृतांची संख्या किती? अशा प्रश्नांची उत्तरे कम्युनिस्ट चीन देत नाही.

. जेव्हा वुहानमधून बीजिंगला जाणारी विमानसेवा चीनने बंद केली, तेव्हाच वुहानवरून वेगवेगळ्या देशांत जाणारी विमानसेवा चीनने बंद का केली नाही? या ढोंगी, दुष्टपणाला काय म्हणावे?
 

coronavirus_1  

तैवान हे बेट गिळंकृत करण्याचे मनसुबे आखणारे चीनचे कम्युनिस्ट सरकार या जागतिक महामारीच्या प्रसंगातही तैवानबरोबर राजकीय डावपेच खेळून त्यांना डावलत आहे. दक्षिण चिनी समुद्रात आपले संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी अशा दृष्टीने या महामारीकडे पाहण्यात चीनचे कम्युनिस्ट सरकार मग्न आहे. अमेरिकेपेक्षाही अधिक सैनिकी जहाजांची बांधणी आज चीन करतो आहे. चीनचे चिनी समाजाने निर्माण केलेले वार्षिक उत्पन्न चिनी समाजासाठी नव्हे, तर चीनचे सैन्यदल अधिकाधिक संपन्न करण्यासाठी, अधिकाधिक जागतिक मोक्याच्या जागा चिनी आधिपत्याखाली आणण्यासाठी वापरले जाते.

एकीकडे सदोष अशी टेस्टिंग किट्स किंवा मास्क, स्वसंरक्षण पोशाख इ. विविध देशांना पाठवून वर ग्राहकाने माल घेताना तपासून घ्यायला हवा, अशी अरेरावीची भाषा चीन करतो आहे, तर दुसरीकडे कोविड संदर्भातील संशोधन व अन्य माहिती जगापासून लपवून WHO या संघटनेच्या माध्यमातून कोणा देशाला दबावतत्रांचा वापर करून नामोहरम करू पाहतो आहे, तर कोणा देशांची फसवणूक करून आपली पोळी भाजून घेत आहे.

याचा परिणाम म्हणून अनेक देश चीनच्या प्रभावातून बाहेर पडून तटस्थ किंवा असहकाराची, प्रसंगी वैमनस्याची भुमिका घेताना दिसत आहेत. अमेरिका आणि चीन यांचे व्यावसायिक स्तरावरील युद्ध गेली दोन वर्षे जगाच्या चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय आहेच. पण आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी चिनी कम्युनिस्ट सत्तेविरुद्ध महाआघाडीच उघडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आधी या विषाणूला 'चायनीज व्हायरस' असे संबोधण्यास त्यांनी सुरुवात केली. वुहानमधे कोविड-१९मुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत अनेक दिवसांनंतर अलीकडेच अचानक वाढ झाली आहे. त्यावरही त्यांनी, I am not happy with China; अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. WHO ही जागतिक आरोग्य संघटना ज्या प्रकारे चिनी सत्तेच्या हातातले बाहुले झाली आहे, त्यामुळे त्यांचे फंडिंग बंद करण्याचा इशाराही त्यांनी या संस्थेला दिला आहे. अनेक नामवंत अमेरिकन कंपन्या आपला कच्चा माल मोठ्या प्रमाणात इतर देशांकडून खरेदी करू लागल्या आहेत.

कोरोनाच्या निर्मितीबाबतही ट्रंप यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हा विषाणू मानवनिर्मित असून, वटवाघळांमार्फत नव्हे, तर वुहान येथील प्रयोगशाळेत झालेल्या अपघातामुळे कोरोनाच्या मानवी संक्रमणास सुरुवात झाली असावी, अशी माहिती समोर येत आहे.

चिनी मजूरही महाग होत असल्याने अमेरिकेत नवीन नोकरींच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात असे अभ्यासकांचे मत आहे. जपानने विषेश आर्थिक प्रावधान करून आपल्या कंपन्यांना लवकरात लवकर चीनमधल्या गुंतवणुकी काढून व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया, फिलिपीन्स, भारत इ. ठिकाणी आपले प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले आहेत. चीन ज्या वस्तू व वैद्यकीय सामान मदतकार्य म्हणून किंवा व्यवसाय म्हणून पुरवतो आहे, त्याही अत्यंत खराब दर्जाच्या येत असल्याने स्पेनसारख्या देशांनी हा सगळा माल परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आलेली टेस्टिंग किट्सही सदोष असल्याचे निदर्शनास आले आहे. चीनचे झूम हे व्हिडिओ काॅलिंग अँप वापरणाऱ्यांची फसवणूक चीनकडून होते आहे व हे अँप भारतीयांनी वापरू नये अशी केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाने अलीकडेच सूचना दिली आहे. केनिया या देशानेही चिनी रहिवाशांना लवकरात लवकर केनिया सोडून मायदेशी परतण्याचे इशारे दिले आहेत.

अशा अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून चीनच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात गेल्या ४४ वर्षांत प्रथमच मोठी घसरण पाहायला मिळत आहे. ही घसरण पहिल्या वार्षिक सत्रात ६.% इतकी प्रचंड आहे. एकुणात चीन येनकेनप्रकारेण कमावलेली जागतिक पत व आपले स्थान वेगाने गमावून बसतो आहे. केवळ आर्थिक आणि सामरिक शक्तीच्या बळावर जागतिक महासत्ता बनता येत नाही. त्याला 'मानवी दृष्टीकोनातून' जगाकडे, विविध मानवसमूहांकडे पाहण्याची विशाल दृष्टी असावी लागते, हे कम्युनिस्ट विचारधारेची चिनी राजसत्ता कधी जाणणार?


अमिता आपटे