लार्ज, स्मॉल, मिड कॅप : संधी आणि जोखीम यांचा खेळ

विवेक मराठी    03-Apr-2020
Total Views |


घरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरं! : भाग

इन्फोसिसही कंपनी १९९४ साली स्मॉल कॅप होती. परंतु पुढील १० वर्षांत हीच कंपनी लार्ज कॅप झालीदेखील. दुसरीकडे, या उदाहरणाच्या अगदी उलटही वाटचाल शेअर बाजारात होऊ शकते. म्हणजे एखादी लार्ज कॅप कंपनी स्मॉल कॅपही होऊ शकते. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला आढळतील. अनेकदा मिड कॅप व स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा जास्त परतावा (Returns) मिळण्याची संधी असते. परंतु त्याचबरोबर त्यामध्ये जोखीम (रिस्क)देखील अधिक असते.


market_1  H x W

निफ्टी मिड कॅप ५० आणि निफ्टी स्मॉल कॅप ५० या निर्देशांकांबद्दल जाणून घेण्यापूर्वी आधी मार्केट कॅपिटलायझेशनम्हणजे काय, हे समजून घेऊ. त्यानंतर मिड कॅप ५० आणि स्मॉल कॅप ५० समजून घेणं अधिक सोपं होईल.

मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे एखाद्या कंपनीच्या शेअर बाजारातील एकूण शेअर्सची संख्या गुणिले शेअर बाजारातील त्या कंपनीच्या एका शेअरचा भाव.’ (Total Number of Outstanding Shares in Market X Market Price of the Share). म्हणजेच जर या कंपनीचे १,००,००० (एक लाख) शेअर्स मार्केटमध्ये असतील व त्यातील प्रत्येक एका शेअरचा बाजारातील भाव आजच्या दिवशी १०० रुपये इतका असेल, तर त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन १ कोटी इतकं असेल. दुसऱ्या दिवशी जर त्या कंपनीच्या शेअरचा भाव १५० रुपये झाला, तर हेच मार्केट कॅपिटलायझेशन दीड कोटी इतकं असेल. म्हणजेच, शेअर्सचा भाव जसा वर-खाली होतो, त्यानुसार मार्केट कॅपिटलायझेशनदेखील बदलतं. आता यालाच अनुसरून आपण लार्ज कॅप’, ‘मिड कॅपस्मॉल कॅपम्हणजे काय ते समजून घेऊ.

) लार्ज कॅप :

लार्ज कॅप कंपन्याम्हणजे ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन सुमारे २० हजार कोटीहून अधिक आहे. त्यामुळे सर्वसामान्यतः या कंपन्या त्यांच्या क्षेत्रातील (सेक्टरमधील) ‘बडे खिलाडीअसतात व आपल्यापैकी बहुतांश सर्वांना माहीत असतात. उदाहरणार्थ रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस, विप्रो इत्यादी. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीची जोखीम (Risk Factor) ही मिड कॅप व स्मॉल कॅपपेक्षा कमी असते.

) मिड कॅप :

मिड कॅप कंपन्या म्हणजे ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन सुमारे ५ हजार कोटी ते २० हजार कोटीपर्यंत असतं. या कंपन्यांमध्ये लार्ज कॅपपेक्षा जास्त प्रमाणात वाढ, प्रगती होण्याची आणि भविष्यात लार्ज कॅपबनण्याची क्षमता असते.

) स्मॉल कॅप :

स्मॉल कॅप कंपन्या म्हणजे ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन ५ हजार कोटीहून कमी आहे. अनेकदा स्मॉल कॅप कंपन्या या त्यांच्या उद्योगव्यवसायातील प्रगतीच्या पहिल्या पायरीवर असतात. तसंच, त्यांची क्षमता अर्थातच आधी मिडकॅपव नंतर लार्ज कॅपबनण्याची असते.

इथे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अनेकदा मिड कॅप व स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा जास्त परतावा (Returns) मिळण्याची संधी असते. परंतु त्याचबरोबर त्यामध्ये जोखीम (रिस्क)देखील अधिक असते. त्यामुळेच, मिड कॅपमध्ये व स्मॉल कॅपमध्ये पैसे गुंतवायचे असल्यास ते मिड कॅपच्या वा स्मॉल कॅपच्या म्युच्युअल फंडांमार्फत गुंतवावे, असा सल्ला दिला जातो.

आता आपण निफ्टी मिड कॅप५० आणि निफ्टी स्मॉल कॅप ५०म्हणजे काय, हे पाहू. निफ्टी मिड कॅप ५० हा देशातील ५० उत्तम मिड कॅप कंपन्यांचा निर्देशांक आहे. तसंच निफ्टी स्मॉल कॅप हा देशातील ५० उत्तम स्मॉल कॅप कंपन्यांचा निर्देशांक आहे. या दोन्ही निर्देशांकांमध्येसुद्धा अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमधील (सेक्टर्समधील) कंपन्यांचा समावेश केलेला असतो. या सर्व माहितीवरून आपल्या असं लक्षात येतं की, बऱ्याचदा एखादी स्मॉल कॅप कंपनी कालांतराने मिड कॅपहोते व त्यानंतर ती लार्ज कॅपदेखील होते. उदाहरणार्थ, ‘इन्फोसिसही कंपनी १९९४ साली स्मॉल कॅप होती. परंतु पुढील १० वर्षांत हीच कंपनी लार्ज कॅप झालीदेखील. खालील चित्राद्वारे ही वाटचाल स्पष्ट होईल.

market_1  H x W


दुसरीकडे, या उदाहरणाच्या अगदी उलटही वाटचाल शेअर बाजारात होऊ शकते. म्हणजे एखादी लार्ज कॅप कंपनी स्मॉल कॅपही होऊ शकते. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला आढळतील. म्हणजेच हे सर्व काही बिझनेस सायकलवर अवलंबून असतं. आता यापुढील लेखात आपण शेअर बाजारातील काही मूलभूत संकल्पना सविस्तररीत्या जाणून घेऊ..

- अमित पेंढारकर
(लेखक शेअर मार्केटचे अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार आहेत.)