लॉकडाउनच्या बहाण्याने लोकशाहीवर प्रहार

विवेक मराठी    03-Apr-2020
Total Views |

 

**** नताशा राठौड*****


modi_1  H x W:


नताशा राठौड ही बॉलीवूडशी संबंधित एक फिल्ममेकर आहे. तिने शाहरूख खानच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटावर बहुचर्चित अशी एक डॉक्युमेंट्री बनवली होती. नताशाचं शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झालेलं आहे. सध्याच्या एकूण परिस्थितीमुळे अस्वस्थ झाल्याने तिने पहिल्यांदाच राजकारणाशी निगडित मुद्द्यांवर आपले विचार ट्विटरच्या माध्यमातून मांडलेले आहेत. या संदर्भात संशोधन करून आणि तथ्यांच्या आधारावर तिने एकूण ६९
ट्वीट्स लिहिली आहेत. ही सगळी ट्वीट्स त्यांची या विषयातील  सखोल समज दाखवून देतात. यामुळेच या ट्वीटसना लेख स्वरूपात एकत्र करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.


https://twitter.com/natashjarathore


विशेष सूचना - हे लेखन पूर्णपणे स्वत:च्या जबाबदारीवर वाचा. हे पूर्णपणे राजकीय किंवा पॉलिटिकली इनकरेक्ट आहे, असंही म्हणता येईल. मी पहिल्यांदाच माझे राजकीय विचार व्यक्त करत आहे आणि याआधी मी कधीच राजकीय विषयावर भाष्य केलेलं नाही. पण आज जीवन-मृत्यूशी संबंधित प्रश्न आहेत आणि म्हणूनच मला माझे विचार तुमच्यासमोर ठेवणं अतिशय महत्त्वाचं वाटतं. जर मी लिहिलेलं पूर्ण वाचूनही आपल्याला मी काय लिहिलं आहे हे समजत नसेल, तर आपल्या नकारात्मक आणि द्वेषपूर्ण कमेंट्स करू नका. माझ्याकडे अशा कमेंट्सना उत्तर द्यायला वेळ आणि ऊर्जा नाहीये, त्याचप्रमाणे माझी मानसिक स्थितीदेखील या विषयावर आपल्याशी वाद घालण्याची नाहीये. त्यामुळे तुम्ही मला अनफॉलो करू शकता.

----------

जेव्हा जीवन आणि मृत्यूशी संबंधित परिस्थिती उद्भवते, तेव्हाच कोणत्याही व्यक्तीची खरी ओळख होते. अशा वेळीच त्या व्यक्तीचे खरे हेतू आणि विचार चांगल्या प्रकारे समजतात. हा असा काळ असतो, ज्यात आपल्याला व्यक्तीची मूळ प्रवृत्ती दिसून येते. माझा विश्वास आहे की एकीकडे मोठ्या प्रमाणात असलेले निर्बुद्ध ट्रोल्स, गुंड आणि भक्त आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत आपले अतिरेकी धार्मिक विचार आणि अजेंडा पुढे करण्याच्या मागे लागलेले असतात आणि दुसरीकडे 'बौद्धिक' आणि 'जागृत' लोकं आहेत, ज्यांच्या मनात मोदींविषयी फक्त द्वेषभावनाच आहेत. अशामुळे दोन टोकाच्या विचारांनी एकाच वेळी आपण मार्गक्रमण कसे काय करू शकतो? आपल्याला सत्य काय आहे हे कसं समजणार?

जीन शार्प नावाचे एक अमेरिकी राजकारणी आणि शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी 'एखादं सरकार कसं पाडलं जातं', यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकात त्यांनी हिंसा न करता लोकशाही मार्गाने एखादं सरकार कसं पाडायचं असतं, याचे १९८ प्रकार सांगितलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारविरुद्ध जी आंदोलनं केली जातात, त्यात शांती आणि लोकशाही ह्या गोष्टी तर आल्याच पाहिजेत, पण या मार्गांनी सरकारला निष्क्रिय करण्याची इतकी परिसीमा गाठायची की सगळी व्यवस्थाच बंद पडली पाहिजे. आणि शेवटी सरकारला पाठबळ देणारी व्यवस्था खंडित होऊन सरकार पडेल. इजिप्तमध्ये ताहरीर चौकात यापैकी काही प्रकार वापरले गेले होते, तर युक्रेनमध्ये रशियाच्या विरूद्ध असंच काहीसं झालेलं होतं. याच प्रकारे हाँगकाँगमध्ये ७६ दिवस कहर केला होता. यांत काही असे प्रकार आहेत - पोलिसांवर आणि आपल्या सुरक्षा दलांवर दगडफेक करणं, त्यांचे रस्ते उखडून टाकणं, रस्ते बंद करणं, अग्निशमन दलाच्या गाड्यांना आगी लावणं म्हणजे हे दुसऱ्या ठिकाणी आग विझवावयास जाऊ शकणार नाहीत, विरोधी आंदोलनांत सर्वात पुढे बायका आणि मुलं यांना उभं करणं. याचबरोबर ऍसीड बॉम्ब फेकणं, पेट्रोल बॉम्ब फेकणं, नकारात्मक मोहिमा चालवून प्रसारमाध्यमांचा वापर करणं, फेक न्यूज पसरविणं, लोकांची दिशाभूल करून आपल्याच लोकांना सरकारविरूद्ध भडकावणं अशा प्रकारच्या क्लृप्त्या वापरणं यांचा समावेश होतो.

जर तुम्ही नुकत्याच झालेल्या दिल्ली दंग्यांचा आढावा घेतलात, तर तुमच्या लक्षात येईल की धार्मिक दंगलींच्या बुरख्याआड जे काही झालं, ते या संदर्भातून पाहिलं तर सरकार अस्थिर करण्यासाठी याच क्लृप्त्यांचा वापर करून घडवून आणलेलं होतं. जर तुम्ही या सगळ्याच्या खोलात गेलात, तर लक्षात येईल की या सगळ्यामागे तथाकथित बुद्धिवंत आणि शिकलेल्या तसंच 'जागरूक' नागरिकांचाच हात होता.

 
 

जीन शार्पनी एक सरकार पाडण्यासाठी ज्या क्लृप्त्यांची यादी दिली होती, त्यापैकी किमान ७० ते ८० प्रकार दिल्लीच्या घटनांमध्ये सरळ सरळ वापरलेले होते. दिल्लीमध्ये जे काही झालं, त्याचा सीएएशी तसंच मुसलमानांशी काहीही संबंध नव्हता. आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की या देशाचा आकार आणि लोकसंख्या पाहता धर्मनिरपेक्षतेवर प्रश्न उपस्थित करण्याची गरजच नाहीये. फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटिश आणि मुघल यांच्या आक्रमणांना तोंड देऊनही भारताने आपलं अस्तित्व केवळ वाचवलंच नाही, तर आपल्या धर्मनिरपेक्ष संस्कृतीला तडा जाऊ दिलेला नाही.

सगळ्यात मोठी चिंतेची गोष्ट ही आहे की या राष्ट्राला युगानुयुगे लुटण्यात आलं आहे. या देशाला अनेक दशकं जगात 'थर्ड वर्ल्ड कंट्री' बनवून ठेवलेला आहे. अनेक दशकं इथे भ्रष्टाचाराचं आणि वंशवादाचं राजकारण हेच चालू आहे. यात सर्वाधिक चिंतेची बाब ही आहे की सुशिक्षित, समजूतदार आणि बुद्धिवंत लोकच चुकीच्या माहितीच्या आधारे दिशाभुलीला बळी पडताहेत. तुम्ही हे समजून घ्या की मोदीजींची मान खाली घालण्यासाठी जे राजकारण खेळलं जातंय, ते भारताच्या लोकशाहीसाठी आणि धर्मनिरपेक्षतेसाठी अत्यंत घातक आहे.

नेतृत्वगुणांबाबत जाणणारी व्यक्ती हे तर नक्की जाणते की एक नेता असण्याचा पहिला नियम म्हणजे तुम्ही आपल्या टीमला बरोबर घेऊन चला, मग ती टीम कितीही नवी आणि अक्षम असली तरीही. शेवटी हे सगळं टीमवर्कच आहे. ज्या कुणाला एका चांगल्या टीम प्लेअरचे गुण माहीत आहेत, तो हे जाणतोच की तुमचे अंतर्गत वाद काहीही असोत, पण तुम्ही स्वत:च्या चुकीसाठी आपल्या टीममधील सदस्याला जबाबदार धरत नाही, तर त्याची कमतरता झाकून पुढे सरकता.
 
rytasha_1  H x

1 / THREAD WARNING: READ AT YOUR OWN RISK. The following is an extremely political and possibly politically incorrect piece. I've never really expressed my political views. However, this time, it's a matter of life and death and I think this is of critical importance.

— natashjarathore (@natashjarathore)
March 30, 2020 ">

भारतात खूप काळ गेला, असा नेता झालेलाच नव्हता, जो भारतातील ९०% जनतेचं प्रतिनिधित्व करतो. आपल्याकडे असा नेता कधीही झालेला नव्हता, जो एक चहावाला होता, जो त्या सामान्य सामाजिक स्तरातून आलेला आहे आणि जो सामान्य भारतीय जनतेची नस ओळखतो. पंतप्रधान मोदींचा असा विश्वास आहे की भारतात कोणताही बदल घडवून आणावयाचा असेल तर कायद्याची नसून आंदोलनांची गरज आहे. मोदींनी देशात जे काही बदल घडवलं, ज्या वेगाने घडवलं आणि ज्या पद्धतीने त्यांची अंमलबजावणी केली, ज्या प्रकारे जनतेशी संवाद साधून आलेल्या परिस्थितीला तोंड दिलं, हे खूपच वाखाणण्यासारखं आहे. एकाच विषयात त्यांना अजून अपेक्षित यश मिळालेलं नाही आणि तो विषय म्हणजे अर्थव्यवस्था. यासाठीदेखील त्यांनी कठोर उपाययोजना केलेल्या आहेत आणि आता काळच ठरवेल की हे उपाय खरोखरच प्रभावी आहेत की नाहीत ते. सत्य हे आहे की संपूर्ण जगात COVID च्या संकटानंतरदेखील जोरात पुढे जातेय ती भारतीय अर्थव्यवस्था आहे, कारण भारतीय अर्थव्यवस्था ९०% स्वयंपूर्ण आहे.

अलीकडेच मला MBBS, MD व लेखक डॉ. शरद ठाकर यांच्याकडून गुजरातीमध्ये एक ऑडिओ क्लिप मिळाली, ज्यात नुकतंच त्यांचं मोदींबरोबर COVID संबंधी झालेलं संभाषण आहे. त्यांनी मोदींना विचारलं की "हल्ली काय चालू आहे?" डॉ शरद म्हणाले की सामान्यपणे कोणीही "मी ठीक आहे" असं उत्तर देतील. पण मोदीजींनी एक क्षण थांबून गंभीरपणे उत्तर दिलं की "साधना". तेव्हा डॉक्टरांनी पुन्हा विचारलं, "कशा प्रकारची साधना?" याच्या उत्तरादाखल मोदीजी म्हणाले, "झोपेवर नियंत्रण मिळविण्याची साधना". तेव्हा डॉक्टर म्हणाले, "पण मी तर असं ऐकलं आहे की तुम्ही आधीपासूनच खूप कमी वेळ झोपता. आता तुमच्या झोपेच्या तासांमधले आणखी किती तास तुम्ही कमी करू इच्छिता?" मोदींनी गंभीरपणे उत्तर दिलं, "मला अजिबात झोपायचं नाहीये." लोकांचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण ते म्हणाले, "मी हे समजू शकतो कारण मी स्वत: साधना करतो आणि साधना करून झोपेवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. असं म्हणतात की हनुमान कधी झोपलेच नाहीत." डॉ. शरद यांनी त्यांना आणखी एक प्रश्न विचारला, "पण तुम्ही असं का करू इच्छिता? कोणासाठी हे करायचं आहे?" मोदींनी उत्तर दिलं, "या देशासाठी आणि देशातील गरिबांसाठी. हे एक महान राष्ट्र आहे, पण आपल्याला खूप लुटलं आहे आणि ते सगळं नीट करण्याची गरज आहे. त्यासाठी २० तास खूप कमी आहेत. मला पूर्ण २४ तास पाहिजेत." हे बोलताना मोदीजींच्या डोळ्यांत अश्रू आलेले होते आणि हे ऐकून डॉ. शरद यांचेही डोळे भरून आलेले होते.
 
 
vivek add_1  H

त्यांनी मोदींच्या हिमालयात घालवलेल्या दिवसांच्या बाबतीत, त्यांच्या अज्ञातवासासंबंधी गप्पा मारल्या. मोदीजींनी सांगितलं की त्यांना साधू न बनण्याचा आणि देशसेवा करण्याचा आदेश मिळाला. म्हणूनच त्यांना परत यावं लागलं. डॉ. शरद यांनी त्यांना विचारलं, "हल्ली तुमच्या जिवाच्या मागे अनेक लोक लागलेले आहेत. तुम्ही हिट लिस्टमध्ये सगळ्यात वर आहात. तर तुम्हाला भीती नाही वाटत?" मोदी म्हणाले, "मी या राष्ट्राची सेवा करावी हेच माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. जोपर्यंत माझं उद्दिष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत मला कोणीही मारू शकत नाही. एकदा का माझं उद्दिष्ट पूर्ण झालं की मला कोणी वाचवूही शकणार नाही. मी मृत्यूला घाबरत नाही. मी इथे माझं उद्दिष्ट पूर्ण करायला आलो आहे." डॉ. शरद म्हणतात, "मी डोळे झाकून कुणाचंही अनुकरण करत नाही. जेव्हा आपण घडा विकत घ्यायला जातो, तेव्हा ठोकून ठोकून त्याची परीक्षा करतो की तो कच्चा आहे की पक्का. हा तर घडा नसून एक व्यक्ती आहे. यांची कित्येक वेळा परीक्षा घेतली गेली आहे. त्यांची परीक्षा केवळ एकाच व्यक्तीने नाही, तर १३० कोटी जनतेने घेतलेली आहे आणि अजूनही ते कणखरपणे उभे आहेत. ते कच्चा घडा नाहीत आणि कच्चा माणूसही नाहीत."

चीनच्या हुबेई प्रांतात लॉकडाउन झाल्यावर जी हिंसक विरोधी आंदोलनं झाली त्यांचे व्हिडिओ आणि ट्वीट्स चिनी शासनाने काढून टाकले. पण भारतात हजारो प्रवासी कामगार भारत सरकारवर टीका करत असलेले व्हिडिओ आणि ट्वीट्स अजूनही इंटरनेटवर प्रचंड संख्येने आहेत. जर तुम्ही दावा करत असल्याप्रमाणे सरकार जर हुकूमशाही असतं, तर तुम्हाला हे सगळं करण्याचं स्वातंत्र्य असतं? मोदी सरकारची ६ वर्षं झाली आहेत आणि त्यांचा हेतू जर पूर्ण हुकूमशाही लागू करण्याचा असता, तर ते आत्तापर्यंत कधीच झालेलं असतं. अमेरिकेतील एका मित्राने मला एक व्हॉइस मेसेज पाठवलाय. त्यात म्हटलंय, "नताशा, माझं हे निरीक्षण आहे की सर्व ठिकाणी लोक सरकारवर टीका करतात. पण भारतात सरकारचा विरोध ट्विटरवर ज्या नीचपणे केला जातो, हे कुठेही पाहिलेलं नाही." भारतात ट्विटरवर खूप नकारात्मक वातावरण आहे. आजदेखील ते सगळे ट्वीट्स आणि पोस्ट्स अगदी सुरुवातीला जसे ट्रेंड होत होते, तसेच होत आहेत. जवळजवळ ४५० कोटी लोक इंटरनेटवर आहेत, जर त्यांची दिशाभूल करून तुम्ही एक कथा बनवाल - उदा., सरकार अकार्यक्षम आहे, तर तुमचं अर्धं काम झालं हे समजा.
 

modi_1  H x W:

जीन शार्पचं असं म्हणणं आहे की कोणतीतरी व्यवस्था सरकारला बळ देतेय, तर सरकारला कमजोर करण्यासाठी तुम्हाला प्रसारमाध्यमांचा वापर करणं गरजेचं आहे. आता लोकांनी सद्गुरूंना आणि आध्यात्मिक संस्थांना लक्ष्य केलं आहे. यात काहीही आश्चर्याची गोष्ट नाही. खरं तर जग्गी वासुदेवजींच्या तर्कांना आणि त्यांच्या कार्याला तुम्ही खोटं नाही पाडू शकत. म्हणून एका विशिष्ट वर्गाच्या लोकांनी त्यांच्याविरूद्ध अतिशय नीच प्रकारच्या रणनीतीचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे. आज जेव्हा काही लोक आपल्या ट्विटर अकाउंट्सच्या माध्यमातून द्वेष पसरविण्यात बिझी आहेत, तेव्हा सद्गुरू अजूनही विश्वाच्या कल्याणासाठी अतिशय सुंदर कार्य करण्यात व्यग्र आहेत.

ट्विटरवर असे पुष्कळ लोक आहेत, ते कोणत्याही पोस्ट्स न वाचताच मशीनसारखं री-ट्वीट करतात, कारण त्यांच्या मनात चांगल्या भावना नाहीयेत. काही जणांना तर री-ट्वीट करण्यासाठी पैसेदेखील मिळतात, तर काही जणांना सनसनाटी पसरवायला आवडतं. ट्विटरवर २५ जणांचा गट कोणत्याही ट्वीटला ट्रेंड करण्यास पुरेसा आहे. जेव्हा तुम्ही संध्याकाळपासून रात्रीपर्यंत नकारात्मक ट्वीट्स ट्रेंड करता, तोपर्यंत पाश्चिमात्य देशात लोक झोपेतून उठलेले असतात आणि मग तेसुद्धा त्याच विषयावर चर्चा करण्यास सुरुवात करतात. अशा प्रकारे खोट्या नॅरेटिव्हला (कथेला) बळ मिळतं. शिकलेले बुद्धिवंत आणि रात्री उशिरा जागून काम करणारे महाविद्यालयीन विद्यार्थी हे या लोकांचं लक्ष्य असतात. कोणालाही हुकूमशाही किंवा धर्मांधता नको आहे. कोणालाही सांप्रदायिक दंगली आणि रक्तपात नको आहेत.

आज लॉकडाउनचा चौथा दिवस आहे आणि भारतात अशा हजारपेक्षा अधिक घटनांची नोंद झालेली आहे. यातच हजारो प्रवासी कामगार आपापल्या गावी जाण्यास महामार्गावरून चालत निघालेले आहेत, तर काही लोकांना दिल्ली परिवहनच्या बसेसमधून राज्याच्या सीमेवर सोडून देऊन त्यांच्या नशिबावर सोडून दिलं गेलंय. जेव्हा भारत #COVID19सारख्या भयंकर महामारीशी लढा देण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा शिकलेले अडाणी, खरेखुरे अडाणी, व्हॉट्स ऍपवरील खोट्या बातम्या, पूर्वग्रहाने ग्रासलेले बुद्धिवंत आणि पाताळयंत्री नेते यांच्यामुळे देशासमोर अनेक नवीन आव्हानं उभी केली आहेत. गेल्याच आठवड्यात पंतप्रधानांनी आपल्या राष्ट्राशी संवादात व्यापारी, उद्योगपती यांना या कठीण परिस्थितीत आपापल्या कर्मचाऱ्यांचं वेतन न कापण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची हात जोडून विनंती केली होती. तरीही #CoronaVillainsवर एका महिलेने पाठविलेल्या व्हिडिओत ती म्हणते आहे, "या तीन आठवड्यात माझ्या कामवालीचा पगार कोण देईल? काय तुम्ही तिचा पगार देणार? काय पंतप्रधान तिचा पगार देणार आहेत? ती ठीक आहे, तिला काहीही झालेलं नाहीये. ती काम करण्यास येईल." असे अनेक व्हिडिओज आलेले आहेत. दुर्दैवाने अधिकाधिक भारतीय मालकांची हीच मानसिकता आहे, ज्याचा परिणाम असा झालाय की कितीतरी प्रवासी कामगारांना नोकरीवरून काढून टाकलंय.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय टीव्हीवर हात जोडून विनंती केली होती, "कृपा करून सामाजिक अंतर राखा आणि तुम्ही जिथे आहात तिथेच राहा, आपापल्या गावी परत जाऊ नका." तरीही अजूनही दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमांवर जनसागर दिसतो आहे. अशात असा विचार येऊ शकतो की कुठेतरी चूक तर नाही झालेली? काही लोकांचं म्हणणं असं आहे की सरकारने लॉकडाउनची घोषणा करण्याच्या आधी त्याच्या परिणामांचा विचार करावयास हवा होता. त्यांचं म्हणणं आहे की देशातील जनता कशी आहे हे माहीत असल्याने त्यांनी याच्या परिणामांचा अंदाज लावायला हवा होता. चला, आपण हे स्वीकारू. पण आपल्याला हे समजायला पाहिजे की आपल्याकडे अजिबात वेळ नव्हता आणि अगदी त्याच वेळी लॉकडाउनची घोषणा अत्यावश्यक होती. खरं तर कोरोनासारख्या महामारीविरूद्ध लढा देण्यासाठीच्या क्रमांत अशा प्रकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची तीच खरी योग्य वेळ होती. जर काही दिवस आधी लॉकडाउन केलं असतं, तर आपण खूप त्रासलो असतो आणि दमलोही असतो. दुसरीकडे जर ही घोषणा काही दिवसांनंतर केली असती, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती.

सरकार या प्रवासी मजुरांसाठी स्टेडिअम्समध्ये तात्पुरती निवास व्यवस्था उभी करू शकली असती का? खरंच हे एक चांगलं पाऊल ठरलं असतं. पण हे तर तुम्हीही जाणता की पंतप्रधानांच्या राष्ट्रीय संवादानंतर कोणीच अशा प्रकारच्या अव्यवस्थेची अपेक्षा करत नव्हतं. उद्भवलेली अवघड परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने वैद्यकीय सुविधा आणि आर्थिक पॅकेजेसची घोषणा करून उपचारासाठी लागणारी उपकरणं, तसंच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रकारचे निर्णय घेतले. चीनला हजार खाटांचं रुग्णालय उभारण्यास दहा दिवस लागले, पण भारताने रातोरात भारतीय रेल्वेच्या डब्यांना ६००० बेड्सचं, सगळ्या सुविधा उपलब्ध असलेलं हॉस्पिटल करून टाकलं. भारतासारख्या देशात या महामारीशी लढा देण्यास ज्या प्रकारची तयारी केली आहे, ज्या प्रकारच्या योजना बनवलेल्या आहेत, हे एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आहे.

खरं तर चुकीच्या माहितीला आणि खोट्या बातम्यांना प्रवासी कामगार बळी पडले. कितीतरी कामगारांनी सांगितलं की त्यांना दिल्ली परिवहनच्या बसेसमध्ये चुकीची माहिती देण्यात आली की आनंद विहारपासून तुमच्या ठिकाणापर्यंत जाण्याची व्यवस्था केली जाईल. हे सगळं जीन शार्पच्या १०१ नमुन्यांप्रमाणे झालं. अफवा पसरवल्या गेल्या आणि अराजक पसरवण्यासाठी दहशत पसरवली गेली. या महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने देशाचा आकार, लोकसंख्येची घनता आणि जनतेची समज लक्षात घेऊन जे काही करता येणं शक्य होतं ते सर्व केलं आहे. पण दुर्दैवाने चर्चा या गोष्टींची न होता अशाच गोष्टींची होते आहे, ज्या खोट्या आहेत. दिल्लीतील घटनेने पुन्हा हेच सिद्ध केलंय की राजकीय पटलावर कितीतरी अशा शक्ती आहेत, ज्यांना मोदी सरकारला अयशस्वी झालेलं पाहायचं आहे, मग त्यासाठी नागरिक आणि राष्ट्राची किंमत मोजावी लागली तरी चालेल.

भारतीय राजकारणात सध्या जे काही चालू आहे, ती राजकारणातील एक शोकांतिका तर आहेच, पण ही मानवतेची सर्वाधिक शोकांतिका आहे. भारतात आरोग्यसेवांची अत्यंत खराब स्थिती, अपुरी टेस्टिंग किट्स, गरिबी, बेशिस्त, अव्यवस्थितपणा आणि अशास्त्रीय मानसिकता असलेली जनसंख्या अशा सर्वच आव्हानांना तोंड देत मोदींनी मागच्या एक आठवड्यात देशासाठी जे केलंय ते कल्पनातीत, विश्वास बसणार नाही असं आणि अभूतपूर्व आहे. पर्यावरणाशी निगडित कितीतरी आंतरराष्ट्रीय संमेलनांमधून मोदींनी स्पष्टपणे पर्यावरणरक्षणाशी संबंधित भारताची भूमिका मांडलेली आहे. त्यांनी पर्यावरणाशी खेळ करणार्या विकसित देशांना हेच समजावण्याचा प्रयत्न केलाय की, "माणसाचं जीवन हे अर्थव्यवस्थेपेक्षा कितीतरी महत्वांचं आहे." याच सिद्धांताला मूलमंत्र मानून सगळे निर्णय घेऊनदेखील ट्विटरवर #ModiMadeDisaster ट्रेंड होतो आहे आणि असं म्हटलं जातंय की मोदींनी एकट्याने भारताला #COVID19च्या तिसर्या स्टेजमध्ये ढकललेलं आहे.

भारतात आज जे काही चालू आहे, ते याचीच साक्ष देतंय की विरोधी पक्ष हताश झालेले आहेत. हाच याचाही पुरावा आहे की विरोधी पक्ष मोदींच्या यशाला निरर्थक सिद्ध करण्यासाठी जे काही शक्य आहे ते सर्व करत आहेत. ते मोदींची प्रतिमा धुळीस मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, मग त्यासाठी मानवी जीवनाचं मूल्यदेखील द्यायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. हा एक असा काळ आहे, जेव्हा लोक मरत आहेत, जीवन-मृत्यूशी झुंजत आहेत. अशा वेळी संपूर्ण देशाने उभं राहिलं पाहिजे. पण अशा वेळीदेखील विरोधी पक्ष मोदींना कमीपणा येण्यासाठी देशाच्या सगळ्यात कमकुवत विभागाचा हत्यार म्हणून वापर करून घेत आहेत. हे तेच राक्षस आहेत, ज्यांच्यासाठी तुम्ही मतं दिली होतीत.

आता तर मला पक्कं समजलंय राष्ट्रप्रेमी असणं म्हणजे काय ते. आज मला समजलंय की खरे राष्ट्रविरोधी कोण आहेत आणि आज मला याचा सार्थ अभिमान आहे. खरं तर अवघड परिस्थितीत संयम, हिम्मत, धीर राखणं आणि विजयी होणं हे वेगळ्याच लोकांचं काम आहे. आज मी त्या प्रत्येक पावलासाठी पंतप्रधानांची आभारी आहे, जे त्यांनी या महामारीशी लढण्यासाठी, भारतीयांच्या संरक्षणासाठी उचललं आहे. त्याचबरोबर मला आज या गोष्टीची शरम वाटते की माझे डावे-उदारमतवादी मित्रं काय विचार करतील असा विचार करून मी याआधीच मोदीजींबरोबर उभी नाही राहिले. पण आज मी सार्वजनिकरित्या मोदी सरकारला माझा पाठिंबा जाहीर करते. तुम्ही मला भक्त म्हणू शकता, सोशल मीडियावर माझ्यापासून दूर जाऊ शकता - मला त्याची अजिबात पर्वा नाही.
 
अनुवाद  - डॉ. अपर्णा लळिंगकर