शेअर बाजार आणि ‘Long Term’ उद्दिष्टांची गुंतवणूक

विवेक मराठी    05-Apr-2020
Total Views |

घरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरं! : भाग


आपल्यापैकी बरेच जण गुंतवणूक (Investment) आणि बचत (Saving) यांमध्ये गल्लत करतात. गुंतवणूक ही दीर्घ मुदतीच्या (Long Term) उद्दिष्टांसाठी करतात, तर बचत (Saving) प्रामुख्याने अल्प मुदतीच्या उद्दिष्टासाठी करतात. गुंतवणुकीमध्ये थोडी जोखीम घ्यावी लागते आणि म्हणूनच परतावा (Returns) जास्त मिळतो, तर बचतीमध्ये जोखीम फारच नगण्य असते. शेअर बाजार हे गुंतवणुकीचं सर्वात उत्तम साधन होय.


 stock market_1 &nbs
या लेखात आपण शेअर बाजारात नेमकं काय करायचं, हे जाणून घेऊ. बऱ्याच जणांना असं वाटतं की, शेअर बाजारातून आपल्याला नियमित उत्पन्न कमावता येऊ शकतं. मी या लेखाद्वारे सांगू इच्छितो की, शेअर बाजाराला नियमित उत्पन्न मिळवण्याचं साधन समजू नका. कारण, पहिल्या लेखातच मी हे सांगतलं की, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स घेता, तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे काही अंशी मालक होता. जर तुम्ही त्या कंपनीचे मालक आहात, तर कंपनी तिचा बिझनेस वाढवून तुम्हाला नफा कमावून देईल व त्यामुळे त्या कंपनीच्या शेअरचा भाव वाढत जाईल. हे सर्व काही १ दिवसात होत नाही, त्यासाठी काही काळ जावा लागतो. त्यामुळे यातून नियमित उत्पन्न मिळू शकत नाही. जे लोक असं सांगतात की शेअर बाजारातून आपल्याला नियमित उत्पन्न कमावता येऊ शकतं, त्यांच्याकडे कृपया दुर्लक्ष करा. हे मी स्वतः गेली १६ वर्षे या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळेच सांगतो आहे.

मग प्रश्न हा येतो की मग शेअर बाजाराचा आपल्याला काय फायदा? तो फायदा कसा, हे आपण या लेखात जाणून घेऊ. खालील तीन प्रकारे आपण शेअर बाजारातून फायदा घेऊ शकतो -

. गुंतवणूक (Investment) 
. शॉर्ट टर्म ट्रेडिंग 
. इंट्रा-डे ट्रेडिंग

. गुंतवणूक (Investment) : 

आपल्यापैकी बरेच जण गुंतवणूक (Investment) आणि बचत (Saving) यांमध्ये गल्लत करतात. बेंजामिन ग्रॅहम हे त्यांच्या ‘The Intelligent Investor’ या पुस्तकात गुंतवणुकीची व्याख्या करताना म्हणतात - 'An Investment operation is one which upon thorough analysis promises safety of principal and an adequate return. Operations not meeting these requirements are speculative.'
गुंतवणूक (Investment) आणि बचत (Saving) यातील मुख्य फरक हा आहे की, गुंतवणूक (Investment) ही दीर्घ मुदतीच्या (Long Term) उद्दिष्टांसाठी करतात. उदा., रिटायरमेंट प्लानिंग किंवा आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी. तर बचत (Saving) प्रामुख्याने अल्प मुदतीच्या उद्दिष्टासाठी करतात. उदा., पुढील दोन वर्षात फोर व्हीलर कार घ्यायची आहे किंवा आपल्या मुलाच्या/मुलीच्या शाळेची फी भरायची आहे इत्यादी. गुंतवणुकीमध्ये थोडी जोखीम घ्यावी लागते आणि म्हणूनच परतावा (Returns) जास्त मिळतो, तर बचतीमध्ये जोखीम फारच नगण्य असते. शेअर बाजार हे गुंतवणुकीचं सर्वात उत्तम साधन होय. ज्यांनी ज्यांनी शेअर बाजारात तज्ज्ञांच्या साहाय्याने दीर्घ मुदतीसाठी आपले पैसे गुंतवले असतील, त्यांना भारतीय शेअर बाजाराने आजवर भरभरून दिलं आहे. फक्त अट एकच, शेअर बाजारातील दैनंदिन चढ-उताराकडे दुर्लक्ष करणं व आपल्या दीर्घ मुदतीच्या उद्दिष्टाकडे लक्ष ठेवणं. अशा गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडआणि पी.एम.एस.’ हेही दोन्ही प्रकार योग्य आहेत. या दोन्हींबाबत विस्तृत माहिती आपण पुढे घेऊच.
 

market_1  H x W 

. शॉर्ट टर्म ट्रेडिंग : यामध्ये शेअर बाजारातील टेक्निकल अॅनालिसिसचा वापर करून एक महिना ते सहा महिने या कालावधीमध्ये बँक मुदत ठेवीपेक्षा दुप्पट पैसे कमावण्याचं उद्दिष्ट असतं. म्हणजे आत्ताच्या घडीला जर आपली बँक ६% व्याज देत असेल आणि आपल्याला शेअर बाजारातील आपल्या शेअर्समधून जर १२% नफा होत असेल, तर ते शेअर्स विकून टाकावे. अर्थात, यासाठी खूप शिस्तीची गरज असते व त्यासाठी टेक्निकल अॅनालिसिसवरही तुमची पकड असावी लागते.

. इंट्रा-डे ट्रेडिंग : यामध्ये शेअर बाजारातील टेक्निकल अॅनालिसिसचा वापर करून एका दिवसात शेअर्सच्या खरेदीविक्रीतून फायदा कमावण्याचं उद्दिष्ट असतं. शेअर बाजारातील हा प्रकार सर्वात जास्त जोखीम (Risk) असलेला आहे. यामध्ये सर्वात जास्त शिस्त पाळावी लागते. ‘इंट्रा-डे ट्रेडिंगम्हणजे शेअर बाजार ३.३० वाजता बंद होण्याआधी आपल्या शेअर्सची पोझिशन शून्य करून जाणं. म्हणजे जर तुम्ही शेअर घेतले असतील तर विकून टाकणं किंवा शेअर आधी विकले असतील तर नवीन घेऊन टाकणं. शेअर बाजारात कधीही इंट्रा-डे ट्रेडिंगकरू नये, असंच मी तुम्हाला सुचवेन.

आता आपण म्युच्युअल फंडआणि पी.एम.एसयाबद्दल माहिती घेऊ.

म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही एकरकमी (Lumpsum) किंवा दरमहा ठरावीक रक्कम (Systematic Investment Plan - S.I.P.) गुंतवू शकता. म्युच्युअल फंड कंपनी ही ट्रस्ट असते, त्यामुळे म्युच्युअल फंड कंपनीत काही झालं, तरी गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित असतात. म्युच्युअल फंड कंपनी काही ठरावीक योजना जाहीर करते व त्या योजनेत कुठे पैसे गुंतवले जातील हे सांगितलं जातं. उदा., जर एखादी योजना लार्ज कॅपमध्ये पैसे गुंतवणार असेल, तर तुमचे पैसे लार्ज कॅपमध्येच गुंतवले जातात. म्युच्युअल फंडमध्ये जे लोक पैसे गुंतवू इच्छितात, त्यांच्याकडून पैसे घेऊन ते पैसे त्या योजनेत गुंतवले जातात, यामध्ये अगदी कमीत कमी ५०० रुपयांपासून ते जास्तीत जास्त कितीही रुपये आपण गुंतवू शकतो.

पी.एम.एस. (Portfolio Management Services) या प्रकारात कमीत कमी ५० लाख रुपयांपासून जास्तीत जास्त कितीही रुपये आपण गुंतवू शकतो. त्यामुळे पी.एम.एस हे अर्थातच अत्यंत सधन परिस्थितीत असलेल्यांसाठीच योग्य आहे. इथे मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, पी.एम.एस. ही म्युच्युअल फंडापेक्षा अधिक पारदर्शक असते. आपण पी.एम.एस.च्या योजनेच्या फंड मॅनेजरचे त्या योजनेविषयीचे विचार जाणून घेऊ शकतो. पी.एम.एस.मधील सर्व शेअर्सची मालकी तुमचीच असते, सर्व डिव्हिडंडदेखील तुमच्या खात्यात जमा होत असतो.

ही झाली म्युच्युअल फंड आणि पी.एम.एस. (Portfolio Management Services) याबद्दलची ढोबळ माहिती. तसं तर या दोन्ही योजना चांगल्याच असतात, पण प्रत्येकाने जोखीम घेण्याच्या आपआपल्या क्षमता ओळखूनच गुंतवणूक करावी. आता यापुढील लेखात आपण फंडामेंटल अॅनालिसिसबद्दल माहिती घेऊ, जेणेकरून कोणत्या कंपनीचे शेअर कसे निवडावे, याबाबत आपल्याला जाणून घेता येईल

- अमित पेंढारकर

(लेखक शेअर मार्केटचे अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार आहेत.)

संपर्क : ९८१९२३०३१० / ईमेल : finmart99@gmail.com