शेअर बाजार विश्लेषणाच्या पद्धती

विवेक मराठी    06-Apr-2020
Total Views |

घरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरे! : भाग

Qualitative Analysis मध्ये कंपनीचं व्यवस्थापन कसं आहे, त्यांची विश्वासार्हता ही वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासली जाते. उदा. व्यवस्थापनाचे छोट्या भागधारकांप्रती काय धोरण आहे, तसेच आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रती त्यांचं वर्तन कसं आहे, त्यांची काळजी ते कशी घेतात, कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाविषयी काय वाटतं तसंच, कंपनीच्या भविष्यातील वाढीसाठी व्यवस्थापनाच्या काय योजना आहेत या व अशा इतर बऱ्याच गोष्टींवरून व्यवस्थापनाविषयी माहिती घेतली जाते. Qualitative Analysis आणि Quantitative Analysis मध्ये सर्वात जास्त महत्व हे Qualitative Analysis ला असतं..


Quantitative Analysis_1&n

आपल्याला कुठल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे आहेत, याचं ज्ञान घ्यायचं असेल तर आपल्याला दोन प्रमुख गोष्टींची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या म्हणजे मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis) आणि तांत्रिक विश्लेषण (Technical Analsysis). या दोन्हीपैकी किमान एकामध्ये तरी आपलं प्रभुत्व असेल तर आपल्याला स्वतःला कोणते शेअर्स खरेदी व विक्री करावेत, हे समजेल.
 

आता आपण मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis) या विषयाकडे वळू. मूलभूत विश्लेषण हा शेअर बाजाराचा गाभा आहे. प्रत्येक वित्तीय संस्था उदा. परदेशी वित्तीय संस्था, म्युच्युअल फंड तसेच बऱ्याच दलाली पेढया (Broking Firms) . यांच्याकडे मूलभूत विश्लेषक असतात. यांचा दृष्टीकोन हा दोन प्रकारचा असतो. पहिला म्हणजे टॉप टू डाऊनआणि दुसरा म्हणजे बॉटम अप’. पहिल्या प्रकारात जागतिक अर्थव्यवस्थेविषयीचा अंदाज बांधून असा कोणता देश आहे, जो जागतिक अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक वेगाने वाढू शकतो, त्या देशाच्या शेअर बाजारात जास्त पैसे गुंतवले जातात. तसेच, त्या देशातील कोणती क्षेत्रे (सेक्टर्स) पुढील काही वर्षांमध्ये जास्त वाढ करतील व त्या क्षेत्रातील कोणत्या कंपन्या अधिक वेगाने वाढतील याचा शोध घेऊन ते त्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. दुसऱ्या प्रकारात थेट त्या देशातील क्षेत्रांचा अभ्यास करून कोणती क्षेत्रे पुढील काळात वाढतील, याचा अभ्यास केला जातो व त्या क्षेत्रातील उत्तम कंपंन्यांचा अभ्यास करून त्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जातात.

मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis) हे दोन मुख्य प्रकारात मोडते. एक Value Investing आणि दुसरे Growth Investing. Value Investing म्हणजे एखाद्या कंपनीचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करून त्या कंपनीची खरी किंमत (Intrinsic Value) काढली जाते आणि जर त्या किमतीच्या खाली तो शेअर उपलब्ध असेल तर तो Undervalued आहे आणि घेण्यायोग्य आहे असे समजतात. आणि तो खरेदी करून जेव्हा तो परत त्याच्या खऱ्या किमतीपर्यंत (Intrinsic Value) येतो, तेव्हा तो विकला जातो.

दुसऱ्या पद्धतीत अशा कंपन्यांचा अभ्यास केला जातो ज्या प्रत्येक वर्षी त्यांच्या नक्त विक्री (Net Sales) नक्त नफ्यामध्ये (Net Profit) निदान १० ते २० टक्के वाढ नोंदवतात. अशाच कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जातात. Value Investing चे जनक बेंजामिन ग्रॅहम आहेत व Growth Investing चे जनक फिलिप फिशर आहेत. जर या दोन्ही पद्धतींचा अभ्यास आपल्यापैकी कुणाला करायचा असल्यास त्यांनी खालील पुस्तके वाचावीत.

 

) ‘Security Analysis’ by Benjamin Graham

) ‘Common Stocks and Uncommon Profits’ by Philip Fisher

मूलभूत विश्लेषणात (Fundamental Analysis) एखाद्या कंपनीचा अभ्यास करताना दोन गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या खालीलप्रमाणे.

. Qualitative Analysis

. Quantitative Analysis

Qualitative Analysis मध्ये कंपनीचं व्यवस्थापन कसं आहे म्हणजे त्यांची विश्वासार्हता ही वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासली जाते. उदा. व्यवस्थापनाचे छोट्या भागधारकांप्रती काय धोरण आहे, तसेच आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रती त्यांचं वर्तन कसं आहे, त्यांची काळजी ते कशी घेतात, कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाविषयी काय वाटतं तसंच, कंपनीच्या भविष्यातील वाढीसाठी व्यवस्थापनाच्या काय योजना आहेत या व अशा इतर बऱ्याच गोष्टींवरून व्यवस्थापनाविषयी माहिती घेतली जाते. तसंच, Qualitative Analysis मध्ये कंपनीच्या प्रॉडक्टसंबधी किंवा ती कंपनी जर सेवा क्षेत्रात असेल तर ती आपल्या ग्राहकांना कशी सेवा पुरवते, यासंबधीही माहिती घेण्यात येते.

 

market_1  H x W 

Quantitative Analysis मध्ये कंपनीचं नफा-तोटा पत्रक (Profit & Loss Statement), ताळेबंद (Balance Sheet) आणि कॅश फ्लो स्टेटमेंटबद्दल अभ्यास करण्यात येतो. तसंच यावरून Ratio Analysis करून ही कंपनी गुंतवणूक करण्यायोग्य आहे की नाही, हे ठरवण्यात येतं. इथे हे नमूद करून इच्छितो की, Qualitative Analysis आणि Quantitative Analysis मध्ये सर्वात जास्त महत्व हे Qualitative Analysis ला असतं. कारण कंपनीच्या व्यवसायामध्ये चढ-उतार होतच असतात त्यामुळे Quantitative Analysis मध्ये तुम्हाला काही वेळा चढ-उतार दिसू शकतात पण कंपनीचे व्यवस्थापन कसं आहे यावर त्या कंपनीचं भविष्य अवलंबून असतं. इथे मी शेअर बाजारातील एका मोठ्या जाणकार व्यक्तीकडून ऐकलेलं वाक्य उद्धृत करतो, "Company with good business and good management is good combination." आता यापुढील लेखात आपण Quantitative Analysis संदर्भात अधिक सखोल माहिती घेऊ.


-
अमित पेंढारकर

(लेखक शेअर मार्केटचे अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार आहेत.)

संपर्क : ९८१९२३०३१० / ईमेल : finmart99@gmail.com