दादर येथील सुप्रसिद्ध फॅमिली स्टोअर्सचे आप्पा जोशी यांचे निधन

विवेक मराठी    06-Apr-2020
Total Views |

दादरच्या छबिलदास गल्लीतील सुप्रसिद्ध फॅमिली स्टोअर्सचे मालक शिवराम वि. उपाख्य आप्पा जोशी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 93व्या वर्षी काल मध्यरात्री निवासस्थानी झोपेतच निधन झाले. 75 वर्ष पूर्ण केलेल्या फॅमिली स्टोअर्सने सचोटी, दर्जेदार वस्तू आणि आप्पांच्या प्रत्येक ग्राहकाशी आपुलकीने वागण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावामुळे समस्त मुंबईकरांना आपलेसे केले होते. आप्पा म्हणजे व्यावसायिक चातुर्य आणि प्रामाणिकपणा यांचा संगम. असं वागूनही मराठी माणूस अनेक वर्ष उत्तम व्यवसाय करू शकतो ह्याचा ते आदर्श परिपाठ होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब आप्पांच्या बरोबरीने त्यांच्याच व्यवसायात गेली अनेक वर्ष कार्यरत आहे.

aapa joshi_1  H

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा,सून, 2 मुली~जावई, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी मुंबईत मी शिक्षणासाठी गेलो. आमच्या बाबांनी आमचं मुलांचं शिक्षण सुलभ आणि कोणत्याही त्रासाविना व्हावं म्हणून दादरमधल्या गजबजलेल्या छबिलदास पथावरील 'अब्बास मेंशन' या इमारतीत राहण्यासाठी भाड्याने जागा घेतली. आजीआजोबांसह आम्ही तिथे राहू लागलो. तेव्हापासून त्या इमारतीत तळमजल्यावर असलेल्या फॅमिली स्टोअर या दुकानाचे मालक आप्पा जोशी या हिमालयासमान असामान्य व्यक्तिमत्वाशी आमचा परिचय आला. मनीषा आते विद्यादर जोशी राजू काका यांच्यामार्फत तर संपूर्ण कुटुंबाशी घरोब्याचं नातंच तयार झालं. त्या हिमालयासमान असलेल्या अफाट व्यक्तिमत्त्वाचं जवळून दथ्शन घडलं. आप्पा आजोबा म्हणजे सर्वांना सढळ हस्ते मदत करणारे कल्पवृक्ष होते असं मला वाटतं.

दादर पश्चिमेला स्टेशनजवळ असलेल्या छबिलदास गल्लीत पुस्तकांचं आयडियल बुक डेपो आणि त्या समोरच असलेलं आप्पा आजोबांचं खाद्य पदार्थ-फराळ-गणपती आदी असंख्य पारंपरिक वस्तू,साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे 'फॅमिली स्टोअर'. ही दोन दुकानं माहिती नसतील असे क्वचितच मराठी मुंबईकर असतील असं मला वाटतं. कारण त्या गल्लीची ओळखच मुळी या दोन दुकानांमुळे झालीयेआप्पा जोशी आणि त्यांचं 'फॅमिली स्टोअर' म्हणजे दादरमधल्याच नव्हे तर मुंबईतील तमाम मराठी ग्राहकांचं हक्काचं ठिकाण.

"कोकणातील कुवेशी गावातून एक सामान्य व्यक्ती मुंबईतील दादरसारख्या ठिकाणी येऊन स्वकर्तृत्वावर हिंमतीवर विश्व निर्माण करू शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आप्पा आजोबा होतआप्पा आजोबा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने दादरमध्ये ग्राहकांना अविरत आणि अनमोल सेवा आजवर दिलीये. अभिजित दादा योगेशची ही जोशी कुटुंबियांची तिसरी पिढीही अत्यंत नम्रपणे कार्यरत आहे. खरंच या एकत्र कुटुंबाची स्ट्रेंथ पाहून आजही खूप अभिमान वाटतो.

चार दिवसांपूर्वीच फॅमिली स्टोअरला ७५ वर्षं झाली असल्याची आनंददायी पोस्ट अभिजित दादाने लिहिली होती. तो आनंद मनात ताजा असतानाच आज सकाळी आप्पा आजोबा जाण्याची अत्यंत दुःखद वार्ता ऐकली. खूप वाईट वाटलं. वयाच्या ९२ व्या वर्षी आणि सृष्टीनियमाप्रमाणे जरी देहांत झाला असेल तरीदेखील त्यांच्या नसण्याने निर्माण होणारी पोकळी मात्र नेहमीच दुःखद आहे.

आप्पा आजोबांच्या आत्म्यास चिरःशांती लाभो आणि परमेश्वर त्यांच्या सर्व कुटुंबियांस या दुःखातून सावरण्याची प्रचंड शक्ती देवो ही प्रार्थनात्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचं नाव कायम स्मरणात राहिल.

- ॅड. अमेय मालशे.