ये प्रॉफिट की बात हैं..!

विवेक मराठी    07-Apr-2020
Total Views |


घरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरे! : भाग

जरी आपल्याला ब्रिटानिया कंपनीच्या Adjusted Net Profit मध्ये २०११ या वर्षी घट दिसत असेल तरी त्याच्या आधीचे सर्व आकडे हे उत्कृष्ट आहेत. आता याप्रमाणेच जर आपण पुढील आकडे बघितले, तर २०१५ पर्यंतच्या प्रत्येक वर्षाच्या Operating Profit आणि Adjusted Net Profit मध्ये २५% पेक्षा जास्त वाढ दिसते आहे. तसेच Net Sales मध्ये १०% पेक्षा जास्त वाढ दिसते आहे. जर आपण ५ वर्षांचा Operating Profit आणि Adjusted Net Profit यांचा Compounding Growth Rate काढला, तर तो अनुक्रमे ४२% आणि ३६% आहे. थोडक्यात, जर कोणीही २०१०, २०११ आणि २०१२ यावर्षी कंपनीचे अकाउंट्स बघून गुंतवणूक केली असती, तर पुढील ३ वर्षात त्यांचे गुंतवलेले पैसे हे ३ पट झाले असते!


Adjusted Net Profit_1&nbs


या लेखामध्ये आपण Quantitative Analysis विषयी माहिती घेऊ. Quantitative Analysis मध्ये नफा-तोटा पत्रक (Profit and Loss Statement), ताळेबंद (Balance Sheet) व कॅश फ्लो पत्रक (Cash Flow Statement) या तीन गोष्टींचा अभ्यास केला जातो. म्हणजेच वरील अकाऊंटिंग स्टेटमेंट्स मध्ये काही गडबड आहे का, याचा मुख्यत्वेकरून अभ्यास केला जातो. मी इथे हे नमूद करू इच्छितो की, मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis) आणि तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) हे दोन्ही प्रकार म्हणजे एक कला आहे. हे कुठल्याही प्रकारचं सायन्स नाही की, असे असे केल्याने हाच विशिष्ट निकाल येईल. कारण या सर्वांमध्ये माणूस हा महत्वाचा घटक आहे. शेअर बाजार हा बऱ्याच वेळा भावनेवर चालतो आणि या सेंटीमेंट्सचा अचूक मागोवा घेणं आपल्याला तांत्रिक विश्लेषणाद्वारे (Technical Analysis) जमू शकतं. आता इथे खाली एक तक्ता दिला आहे, जो ब्रिटानिया या कंपनीचं नफा-तोटा पत्रक (Profit and Loss Statement) आहे. २०१० ते २०१५ अशा सहा वर्षांसाठीचे हे नफा-तोटा पत्रक (Profit and Loss Statement) आहे ज्यातील मी फक्त काही विशिष्ट घटक इथे समाविष्ट केले आहेत. आता आपण हे पत्रक आणि त्याचं विश्लेषण बघू.

quantitative analysis of

 आता यात जर आपण Net Sales - २०११ च्या आकड्यांची २०१० शी तुलना केली, तर आपल्याला २२% वाढ दिसेल तसेच Operating Profit - २०११ च्या आकड्यांची २०१० शी तुलना केली, तर ५५% ची वाढ दिसेल. तसंच, PBT - २०११ च्या आकड्यांची २०१० शी तुलना केली तर ७२% ची वाढ दिसेल, पण Adjusted Net Profit - २०११ च्या आकड्यांची २०१० शी तुलना केली तर मात्र आपल्याला २% ची घट दिसेल. हे असं कसं, असा प्रश्न आपणास पडला असेलच. Adjusted Net Profit हा Interest, Depreciation, Tax आणि Amortization कंपनीने दिल्यानंतरचा आकडा आहे. आता आपण Operating Profit म्हणजे काय ते बघू. Operating Profit म्हणजे कंपनी जो बिझनेस करते, त्याच बिझनेसद्वारे आलेला नफा. ब्रिटानिया ही कंपनी बिस्किटे, ब्रेड, केक, डेअरी उत्पादने इ. पदार्थ बनवून विकते. त्यातून आलेला नफा हा Operating Profit आहे.

जरी आपल्याला Adjusted Net Profit मध्ये २०११ या वर्षी घट दिसत असेल तरी त्याच्या आधीचे सर्व आकडे हे उत्कृष्ट आहेत. आता याप्रमाणेच जर आपण पुढील आकडे बघितले, तर २०१५ पर्यंतच्या प्रत्येक वर्षाच्या Operating Profit आणि Adjusted Net Profit मध्ये २५% पेक्षा जास्त वाढ दिसते आहे. तसेच Net Sales मध्ये १०% पेक्षा जास्त वाढ दिसते आहे. जर आपण ५ वर्षांचा Operating Profit आणि Adjusted Net Profit यांचा Compounding Growth Rate काढला, तर तो अनुक्रमे ४२% आणि ३६% आहे. थोडक्यात, जर कोणीही २०१०, २०११ आणि २०१२ यावर्षी कंपनीचे अकाउंट्स बघून गुंतवणूक केली असती, तर पुढील ३ वर्षात त्यांचे गुंतवलेले पैसे हे ३ पट झाले असते! ही सर्व आकडेवारी - माहिती आपल्याला www.bseindia.com आणि www.nseindia.com तसेच www.moneycontrol.com आणि www.valueresearchonline.com आदी संकेतस्थळांवर सहजपणे उपलब्ध होते. या उदाहरणातून आपल्या लक्षात येईल की हे विश्लेषण कशाप्रकारे करावं. परंतु, याहूनही जास्त महत्वाचा घटक हा त्या कंपनीचा ताळेबंद (Balance Sheet) आणि कॅश फ्लो पत्रक (Cash Flow Statement) असतं. पुढच्या लेखात आपण Ratio Analysis ची माहिती घेऊ.

----------

- अमित पेंढारकर

(लेखक शेअर मार्केटचे अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार आहेत.)

संपर्क : ९८१९२३०३१० / ईमेल : finmart99@gmail.com

----------