मदतीची बेटं - वेश्यावस्तीतील महिलांच्या जेवणाची केली संघाने व्यवस्था

विवेक मराठी    09-Apr-2020
Total Views |

लॉकडाऊनमुळे येथील बुधवार पेठेत राहणाऱ्या आणि वेश्या व्यवसायात असलेल्या महिलांची, त्या वस्तीतील अन्य वृद्ध महिलांची उपासमार टाळण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती मदतीसाठी पुढे आली असून या समितीने या महिलांच्या जेवणाचा प्रश्न मिटविला आहे.


vsk_1  H x W: 0 

या वस्तीमध्ये अन्नपदार्थ पोहोचविण्यासाठी अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अन्न तयार करण्यासाठी एका संस्थेने जागा उपलब्ध करून दिली आहे. तर अन्न शिजविण्याचे काम शाम चंदनशिवे हे आचारी विनामूल्य करीत आहेत. त्यांच्या हाताखालील कामगारही नाममात्र मोबदला घेऊन ही सेवा देत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत सर्व प्रकारची काळजी घेऊन तेथे भोजन बनविले जात आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

तेथे तयार होत असलेली अन्नाच्या पाकिटांचे पॅकिंग एका वेळी फक्त चार कार्यकर्ते एकत्र येऊन करीत आहेत. तसेच ते अन्न नियमितपणे वेश्यावस्तीत पोहोचवले जात आहे. या कामासाठी एका कार्यकर्त्याने ४०० किलो तांदूळ दिला. तर अन्य एकाने मुबलक प्रमाणात गव्हाचे पीठ दिले आहे. मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांनीही मदत दिली. त्यामुळे पुढील सुमारे २० दिवस या वस्तीतील ३०० महिलांना एकवेळचे जेवण मिळेल एवढा शिधा जमा झाला आहे.

समाजाकडून उपेक्षा होत असलेल्या या महिलांना आपत्तीच्या काळात अन्न देण्यासाठी सुरु झालेल्या या केंद्रातून आता शहराच्या विविध भागातील अनेक गरजूंनाही अन्न दिले जात आहे. रोजंदारीवर काम करणारे मजूर, बेघर, शहरी गरीब अशा अनेक दुर्बल घटकांचे जीवन यामुळे सुसह्य झाले आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 - विश्व संवाद केंद्र