खरंच भारत झुकला?

विवेक मराठी    09-Apr-2020
Total Views |

भारताकडून आवश्यक त्या व्यापारी गोष्टी मिळालेल्या नसल्याबाबतची नाराजी त्यांनी जाहीरपणे मांडली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांनी ट्रम्प यांनी अमेरिकेला अनेकदा अडचणीत आणले आहे. आज जागतिक आरोग्य संघटनाही ट्रम्प यांच्या याच स्वभावामुळे काहीही ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. क्लोरोक्विनबाबत भारतावर केलेल्या वक्तव्याप्रकरणीही डोनाल्ड ट्रम्प निश्चितच चुकले आहेत. त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरण्याची गरजच नव्हती. भारत-अमेरिकेचे संबंध पाहता ट्रम्प यांनी भारताला अशा पद्धतीने डिवचायला नको होते.
 
tramp_1  H x W:

कोरोना संसर्गाने जगाला विळखा घातला आहेच, परंतु आता जगासमोर प्रश्न आहे की या महामारीला किंवा संसर्गाला नियंत्रणात कसे आणायचे? दिवसेंदिवस हा विळखा वाढतो आहे. रुग्णांची संख्या वाढतेय, मृतांची संख्या वाढतेय. अजूनही कोरोनावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात यश आलेले नाही. शिवाय ठोस औषधही नसल्याने तो रोखायचा कसा? हादेखील प्रश्न पडला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध देशांतील विविध संघटना परीक्षण करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनाही यासाठी प्रयत्नशील आहे.

ट्रम्प यांनी चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावला. ट्रम्प यांनी दिलेल्या उत्तरातून त्यांचा सौदेबाजीचा स्वभाव समोर येतो. डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत, तेव्हापासून आपले हित साधण्यासाठी समोरच्या देशावर प्रचंड दबाव आणणे, तो कितीही टोकापर्यंत नेणे आणि आपल्या मागण्या मान्य करवून घेणे ही त्यांची कार्य करण्याची पद्धती आहे. राज्यकर्ते ट्रम्प आणि व्यापारी वृत्तीचे, अटी-शर्ती ठरवणारे ट्रम्प या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन वेगळ्या छटा आहेत. जे डोनाल्ड ट्रम्प भारतात आले, आपल्याला मोटेरा स्टेडियमवर दिसले, ते स्टेटसमन होते. दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प हे टफ निगोशिएटर आहेत. ते हाडाचे व्यापारी वृत्तीचे आहेत. त्यांनी अनेक बाबतीत भारतावर दबाव टाकला आहे आणि बोलूनही दाखवले आहे.


आजपर्यंत असे चित्र होते की भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे
, विविध देश त्यांच्याकडील गोष्टी विकून आपला नफा कसा होईल याचा विचार करत असत. परंतु आताच्या घडीला अनेक देश भारताकडून काहीतरी घेण्यासाठी येत आहेत. या देशांकडे असणारी मोठी शस्त्रसज्जता, जीडीपी, क्षेपणास्त्रे, रणगाडे या सर्व गोष्टी निरर्थक ठरल्या आहेत. एक औषधाची गोळी घेण्यासाठी आज जगात भारताशिवाय पर्याय नसल्याने भारत अचानक चर्चेत आला आहे, ही अभिमानाची बाब आहे.


असे असताना भारताला अमेरिकेकडून धमकावले गेले
, अमेरिकेकडून भारतावर टीका करण्यात आली हे दुर्दैवी प्रकार काही दिवसांपूर्वी घडले. हे प्रकरण नेमके काय आहे हे समजून घेतले पाहिजे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली. अमेरिकेने काही औषधे निर्यात करणे थांबवले आहे. अमेरिकेने काही दिवसांपूर्वी हा निर्णय घेतला आहे, कारण तेथे कोरोना विषाणूबाधित रुग्णाची संख्या वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने असा प्रश्न विचारला की "भारतानेही असा निर्णय घेतला आहे. याबाबत अमेरिकेवर कोणी कारवाई करेल का, तुम्ही त्याविषयी काय धोरण ठरवले आहे?" हा प्रश्न प्रामुख्याने अमेरिकेने औषध निर्यातीवर बंदी घातली होती त्याविषयी विचारला होता. त्यात भारताचा उल्लेख केवळ उदाहरणादाखल होता. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी जाणीवपूर्वक आपल्यावरील प्रश्नाला बगल द्यायची म्हणून भारतावर तोंडसुख घेतले. त्यांनी उत्तर देताना, "मी रविवारीच भारताच्या पंतप्रधान मोदींशी बोललो आणि ते आम्हाला पूर्ण मदत करायला तयार आहेत. या मदतीमध्ये आम्हाला प्राथमिकता देणारच आहेत; पण समजा भारताने मदत करायला नकार दिला, तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. का द्यायचे नाही?" असा प्रश्न ट्रम्प यांनी उपस्थित केला. या उत्तरातील 'प्रत्युत्तर देऊ'' आणि 'का द्यायचे नाही' ही वाक्ये भारतीय प्रसारमाध्यमांनी उचलून धरली. यानंतर भारताने अंशतः औषध निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. तथापि याचे वर्णन भारत अमेरिकेपुढे झुकला आहे असे करण्यात आले. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही, हे यातील तांत्रिक मुद्दे समजून घेतल्यास लक्षात येते.


tramp_1  H x W:
ट्रम्प यांना विचारण्यात आलेला प्रश्न भारताच्या निर्यातबंदीबाबत नव्हताच. ट्रम्प यांनी चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावला. ट्रम्प यांनी दिलेल्या उत्तरातून त्यांचा सौदेबाजीचा स्वभाव समोर येतो. डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत, तेव्हापासून आपले हित साधण्यासाठी समोरच्या देशावर प्रचंड दबाव आणणे, तो कितीही टोकापर्यंत नेणे आणि आपल्या मागण्या मान्य करवून घेणे ही त्यांची कार्य करण्याची पद्धती आहे. राज्यकर्ते ट्रम्प आणि व्यापारी वृत्तीचे, अटी-शर्ती ठरवणारे ट्रम्प या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन वेगळ्या छटा आहेत. जे डोनाल्ड ट्रम्प भारतात आले, आपल्याला मोटेरा स्टेडियमवर दिसले, ते स्टेटसमन होते. दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प हे टफ निगोशिएटर आहेत. ते हाडाचे व्यापारी वृत्तीचे आहेत. त्यांनी अनेक बाबतीत भारतावर दबाव टाकला आहे आणि बोलूनही दाखवले आहे. भारताकडून आवश्यक त्या व्यापारी गोष्टी मिळालेल्या नसल्याबाबतची नाराजी त्यांनी जाहीरपणे मांडली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांनी ट्रम्प यांनी अमेरिकेला अनेकदा अडचणीत आणले आहे. आज जागतिक आरोग्य संघटनाही ट्रम्प यांच्या याच स्वभावामुळे काहीही ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. क्लोरोक्विनबाबत भारतावर केलेल्या वक्तव्याप्रकरणीही डोनाल्ड ट्रम्प निश्चितच चुकले आहेत. त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरण्याची गरजच नव्हती. भारत-अमेरिकेचे संबंध पाहता ट्रम्प यांनी भारताला अशा पद्धतीने डिवचायला नको होते.


आता प्रश्न उरतो तो भारत ट्रम्प यांच्या धमकीपुढे झुकला का? भारत हा हायड्रॉक्सिक्लोरोफिन या औषधाचे उत्पादन करतो. मलेरियाच्या रुग्णाला हायड्रॉसिक्लोरोफिनच्या १४ गोळ्यांची एक पट्टी पुरेशी मानली जाते. भारत दर महिन्याला १०० टन क्लोरोफिन तयार करू शकतो. आजघडीला आपल्याकडे जो साठा आहे, तो भारताला ८ महिने पुरू शकणारा आहे. भारत आफ्रिकेतील देशांना क्लोरोफिन हे औषध निर्यात करतो आहे. २०१८-१९मध्ये भारताने सुमारे ४०० कोटी रुपये किमतीच्या क्लोरोफिनची निर्यात केली आहे. त्यामुळे भारत या औषधाच्या निर्यातीतील अग्रगण्य देश आहे. परंतु आज भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत चालली आहे. त्यामुळे भारतालाही आता क्लोरोफिनची गरज लागणार आहे, हे लक्षात घेऊन २५ मार्चला भारताने क्लोरोफिनच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.


पाच एप्रिलपर्यंत भारताकडे ३० देशांनी क्लोरोफिनसाठी मागणी केली होती. अमेरिका आणि ब्राझिल या दोन देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी तर मोदींना याबाबत प्रत्यक्ष फोन करून विनंती केली होती. त्यामुळे भारताच्या डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड - म्हणजे परकीय व्यापारविषयक निर्णय घेणार्या संस्थेने याविषयी पुनर्विचार करायला सुरुवात केली होती. अमेरिकेच्या अध्यक्षांचा फोन येण्यापूर्वीच भारताने आम्ही आमची गरज भागवू, मग शेजारील देशांची गरज भागवू, असा निर्णय घेतला होता. आपली गरज भागवून अतिरिक्त साठा उरला, तर त्याची निर्यात करू असा निर्णय ट्रम्प यांची पत्रकार परिषद पार पडण्यापूर्वीच भारताने घेतला होता. त्यामुळेच ट्रम्प यांच्याशी चर्चेत पंतप्रधान मोदींनी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. कारण तोपर्यंत सहकार्य करण्याचा निर्णय झालेला होता. ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपण ठरलेला निर्णय जाहीर केला. हा केवळ एक योगायोगच म्हणावा लागेल. याव्यतिरिक्त वेगळे काहीच घडलेले नाही. याचा अर्थ भारत ट्रम्पपुढे झुकला, असा होत नाही.

 

 
परराष्ट्र धोरण विश्लेषक