दूरदृष्टी, कल्पकता आणि अंत्योदय साकारणारे - नितीन गडकरी.

विवेक मराठी    29-May-2020
Total Views |

@सर्वेश फडणवीस

 नितीन गडकरी नावातच एक विलक्षण दूर दृष्टी ही बघायवयास मिळते.राजकारणी नेता समाजाभिमुख,तळागाळातील कार्यकर्त्यांशी ही तितक्याच आपुलकीने कार्य करणारा असावा असे वाटते आणि नितीनजी आज त्यात अग्रेसर आहेतसर्वांशी एक होत आपले वेगळे अस्तित्व नाही याची जाणीव करून देण्याची इच्छा आणि आकांक्षा असलेले व संघ संस्कार नकळतपणे लहानपणापासून भिनलेले पुढे विद्यार्थी परिषदेपासून राजकारणात असलेले प्रतिभावंत,मुदसद्दी राजकारणी अर्थात नागपूरचे खासदार  नितीन गडकरी.


gadkari_1  H x ️ 

नितीन जयराम गडकरी !! हे नाव आज जगाला परिचित आहे. देशात "रस्ते विकासाचा महामेरू" म्हणूनच गौरव होईल इतके कार्य आज युद्धपातळीवर सुरू आहे. पण जेव्हा हे नाव २०१४ च्या निवडणूकीनंतर विजयी होत दिल्लीला राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात शपथविधीच्या वेळी ऐकले तेव्हा मी आणि माझ्यासकट प्रत्येक नागपूरकर हा आनंदात होता आणि त्याचा आनंद हा गगनात ही मावणार नाही अशी विलक्षण अनुभूती त्यावेळी प्रत्येकाची होती. कारण नितीनजी प्रत्येकाला आपलेच वाटतात.

मुळात नितीनजींचे कार्य आणि कर्तृत्व ह्यावर अनेकांनी भरपूर लेखन केले आहे. आज राजकारणात प्रत्येक राजकीय पक्षाशी त्यांची जी जवळीक आहे ती सुद्धा शब्दांच्या पलीकडची आहे. पण राजकरणापलीकडचे नितीनजी ह्यावर सुद्धा पुस्तक होईल इतकं त्यांचे कार्य विपुल आहे. मैत्रीतले नितीनजी,नात्यातले नितीनजी,सामाजिक बांधिलकी जपणारे नितीनजी, इतर राजकीय पक्ष आणि स्वतःच्या पार्टीतले नितीनजी आज अनेक वलयांच्या अवतीभवती असतांना सुद्धा ज्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे त्याने मला तरी अचंबित व्हायला होतं. माणूस म्हणून स्वतः भोवती एवढे परिघ असतांना प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देण्याची नितीनजींची शैली अफाट आहे. नितीनजींच्या खवय्येगिरीची चर्चा सुद्धा प्रत्येक माध्यमातून होत असतेच. एक माणूस इतक्या वेगवेगळ्या भूमिकेतून बघतांना आपण अवाक होऊ इतकं काम त्यांचं प्रत्येक क्षेत्रांत आजही आहे आणि उद्याही राहील.

 नितीन गडकरी नावातच एक विलक्षण दूर दृष्टी ही बघायवयास मिळते.राजकारणी नेता समाजाभिमुख,तळागाळातील कार्यकर्त्यांशी ही तितक्याच आपुलकीने कार्य करणारा असावा असे वाटते आणि नितीनजी आज त्यात अग्रेसर आहेत. सर्वांशी एक होत आपले वेगळे अस्तित्व नाही याची जाणीव करून देण्याची इच्छा आणि आकांक्षा असलेले व संघ संस्कार नकळतपणे लहानपणापासून भिनलेले पुढे विद्यार्थी परिषदेपासून राजकारणात असलेले प्रतिभावंत,मुदसद्दी राजकारणी अर्थात नागपूरचे खासदार  नितीन गडकरी.

आपल्या कामासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी नितीनजी हे सुप्रसिद्ध आहेतच. गडकरींच्या रस्ते बांधकाम विषयाची आवड पाहता त्यांना रोडकरीहे टोपणनाव पडले. हे नाव त्यांना शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनीच दिलेले आहे आणि हे नाव आज ते भारतभर कोरत आहेत यात शंकाच नाही. नितीनजींची रस्त्यांची आवड ही त्यांच्या दमदार कामगिरीतुन आज दिसून येते आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बांधून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. वरळी सी लिंक हुन जातांना नितीनजींचे नाव आपसूक अनेकांच्या ओठांतून बाहेर पडतेच. माझे परिचित प्रत्येकजण मुंबईत गडकरी यांचे कौतुकच करतात. २०१४ साली रस्ते,वाहतूक आणि महामार्ग खाते मिळाल्यापासून देशात गडकरींनी जणू रस्त्यांचे जाळेच विणायला सुरुवात केली अर्थात, याचे पूर्ण श्रेय ध्येय असणाऱ्या आणि ते ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या नितीनजींना जाते. पत्रकारांशी बोलताना असो किंवा सामान्य जनतेशी गप्पा मारताना असो नितीनजी दिलखुलास आणि मनमोकळे बोलतात. आपले यश-अपयश सांगायला ते कुठेही स्वतःला कमी लेखत नाहीत आज नितीनजी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील प्रसिद्ध आहेत.

गडकरींच्या कामांची यादी संपणारी नाही. त्यांच्या प्रत्येक क्षेत्रातील अनुभव हा शब्दातीत आहे. मग जनता दरबार असो किंवा रुग्णांना मदत करणे असो,सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड असो,क्रीडा क्षेत्रातील कार्य असो, नितीनजींच्या कामांचा लेखाजोखा न संपणारा असाच आहे, याची पूर्तता करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण, कामच इतक्या प्रचंड प्रमाणात झाले आहे की त्याला तोड नाहीच. इतकं असूनसुद्धा कौटुंबिक वातावरणात ही नितीनजी आपुलकी आणि ममत्व जपणारे आहेत. याचा अनुभव नुकताच अतिरुद्र निमित्ताने आला. पूर्णाहुतीच्या दिवशी दर्शनार्थ जाण्याचा योग आला. प्रसादाची व्यवस्था खाली पार्किंग मध्ये होती. आम्ही ३-४ जण आणि नितीनजी एकाच लिफ्टमधून खाली येत होतो. लिफ्ट मध्ये असतांना ज्या आपुलकीने त्यांनी आमची विचारपूस केली त्यावेळी आम्ही तरी काहीवेळ वेगळ्याच विश्वात होतो. पुढे प्रसाद घेतांना सुद्धा सावकाश होऊ द्या म्हणून पंक्तीभर फिरणारे नितीनजी अनेकांनी बघितले. आज या पदावर असतांना सुद्धा त्यांनी प्रत्येक क्षेत्रांत जे स्थान निर्माण केले आहे ते शब्दांच्या पलीकडचे आहे.

आपण करत असलेले कार्य विलक्षण आदरयुक्त व प्रत्येकाला अभिमान वाटावा असेच आहे आणि आम्हा नागपूरकरांचे आपण भूषण आहात. आपल्या सारखे नेते आणि राजकारणी आज देशाला वेगळ्या उंचीवर नेतील यात शंका नाहीच. आई रेणुका आपल्याला निरामय आरोग्य प्रदान करो हीच तिच्या चरणी प्रार्थना. आपली पुढील वाटचाल अशीच भरारी घेत राहावी हीच सदिच्छा आहे.