पुढील आठवडे थोडं सांभाळून..!

विवेक मराठी    15-Jun-2020
Total Views |


share market 02_1 &n

शेअरटेल्स
: दि. ०८ ते १२ जून

५०% ते ६१.८०% या Fibonacci Retracement level चा झोन तसेच २०० आठवड्यांची चलत सरासरी ही निफ्टीसाठी खूप मोठा अडथळा ठरेल. त्यामुळे कृपया या तसेच पुढल्या काही आठवड्यांमध्ये आपली Position ही हलकी ठेवा किंवा स्टॉप लॉस लावूनच ट्रेड करा.

----------

निफ्टी : ९९७२.९० (+७०.९०)

निफ्टी बँक : २०५६४.५५ (+१२९.३५)

निफ्टी मिडकॅप ५० : ४०२०.०५ (+७५.५०)

निफ्टी स्मॉलकॅप २५० : ३८७१.३० (-५.५५)

मागील लेखात काही प्रमाणात नफा घ्यायचा सल्ला दिला होता १०४०० ते १०६०० हा पट्टा निफ्टीचा अडथळा असेल असे सांगितले होते. त्याप्रमाणे निफ्टी २०० आठवड्यांची जी चलत सरासरी आहे, तिचा रेझिस्टन्स घेऊन खाली आला ९५४४.३५ चा नीचांक दाखवून सरतेशेवटी ९९७२.९० ला बंद झाला.

आता आपण निफ्टीच्या वीकली चार्टवरून पुढे काय होऊ शकेल, याचा अंदाज घेऊ.


share market 01_1 &n 

वर जो निफ्टीचा वीकली चार्ट आहे, त्यावर तुम्हाला दिसेल की, ५०% ते ६१.८०% या Fibonacci Retracement level चा झोन तसेच २०० आठवड्यांची चलत सरासरी ही निफ्टीसाठी खूप मोठा अडथळा ठरेल. त्यामुळे कृपया या तसेच पुढल्या काही आठवड्यांमध्ये आपली Position ही हलकी ठेवा किंवा स्टॉप लॉस लावूनच ट्रेड करा. आता बँक निफ्टीच्या चार्टकडे वळू.


share market 02_1 &n

वर जो बँक निफ्टीचा चार्ट आहे, तो Daily Timeframe Chart आहे. आता इथे या चार्टवरून असे दिसून येईल की, बँक निफ्टी ने Double Bottom हा जो Price Pattern केला होता, ज्याबद्दल मी मागील लेखातही सांगितले होते, त्याचा अजूनही Breakout झालेला नाही. त्यामुळे आता अशी शक्यता आहे की, बँक निफ्टी ही एका पट्ट्यात मार्गक्रमण करेल. हा पट्टा २१८०० ते १६६०० किंवा १६७०० असा असेल.

या लेखमालेच्या पहिल्या लेखात मी ALLEMBIC PHARMA या शेरचा चार्ट दाखवून तो दीर्घ मुदतीसाठी घ्यायला सांगितले होते. आता आपण त्याचेच विश्लेषण करू.


share market 02_1 &n 

वर ALLEMBIC PHARMA चा वीकली चार्ट आहे, त्याने एक मोठी Up Move देऊन हा शे आता Price Correction देत आहे, त्यामुळे त्याच्या प्रत्येक Fibonachi Retracement level ला हा शे घ्यायला पाहिजे. त्या लेव्ह तुम्हाला चार्टवर ८०४, ७३३, ६७७, ६२० अशा दिसत आहे. त्यामुळे पुढील काळात हा शे नक्की घेऊन ठेवून द्या. याचे Fundamental Anlaysis देखील चांगले आहे.

काही Recommendations :

Lupin : खरेदी करा ९१२, लक्ष्य ९६४, स्टॉप लॉस - ७९०

Glenmark Pharma : खरेदी करा – ४०४, लक्ष्य ४९०, स्टॉप लॉस - ३८०

HUL (हिंदुस्तान युनिलिव्हर) : खरेदी करा - २१५० च्या वर, लक्ष्य २३००, स्टॉप लॉस - २०६०

----------

- अमित पेंढारकर

(शेअर मार्केट अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

संपर्क : ९८१९२३०३१० / finmart99@gmail.com

----------

(वरील सर्व निष्कर्ष, अंदाजमते ही अभ्यासांती मांडण्यात आलेली आहेत. या आधारावर कोणाचाही नफा वा तोटा झाल्यास प्रस्तुत लेखक तसेच साप्ताहिक विवेक हे जबाबदार राहणार नाहीत.)