निफ्टी : विकण्याची घाई नको..

विवेक मराठी    21-Jun-2020
Total Views |


Nifty not to sel_1 &
----------

शेअरटेल्स : दि. १५ जून ते १९ जून

निफ्टीला अजूनही २०० आठवड्याच्या चलत सरासरीचा अडथळा आहे. परंतु, निफ्टी Uptrend line जोपर्यंत तोडत नाही, तोपर्यंत निफ्टीमध्ये विकण्याची घाई करण्यात अर्थ नाही. निफ्टी इथून १०५४८ पर्यंत जाऊ शकेल मात्र पुन्हा १०६०० हा निफ्टीचा महत्वाचा अडथळा असेल. बँक निफ्टीदेखील साईड वेज ट्रेंड दाखवत आहे. त्यामुळे जर बँक निफ्टीने २२००० चा अडथळा तोडला तर बँक निफ्टी थेट २४४०० पर्यंत जाईल.

----------

निफ्टी : १०२४४.४० (+१५२.७५)

बँक निफ्टी : २१३३८.१० (+६८३.५५)

निफ्टी मिडकॅप ५० : ४०८८.१५ (+५२.५५)

निफ्टी स्मॉलकॅप २५० : ४०२६.८० (+६६.९०)

मागील आठवड्यात निफ्टी १५२.७५ अंकांनी वाढून बंद झाला बाजारात पूर्णतः तेजीच दिसली. यामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे रिलायन्सचा शे या आठवड्यात १९८.१० रूपयांनी वाढला. याचाच बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. आता आपण या आठवड्यात निफ्टीचा पुढील प्रवास कसा असेल, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न खाली चार्टच्या आधारे करू.


Nifty not to sel_1 &

मागील लेखांत सांगितल्याप्रमाणे निफ्टीला अजूनही २०० आठवड्याच्या चलत सरासरीचा अडथळा आहे. परंतु, निफ्टी Uptrend line जोपर्यंत तोडत नाही, जी वरील चार्टवरही दिसत आहे, तोपर्यंत निफ्टीमध्ये विकण्याची घाई करण्यात अर्थ नाही. निफ्टी इथून १०५४८ पर्यंत जाऊ शकेल मात्र पुन्हा १०६०० हा निफ्टीचा महत्वाचा अडथळा असेल.

आता बँक निफ्टीच्या चार्टवर नजर टाकू.



Nifty not to sell. 2_1&nb

बँक निफ्टीचा चार्ट हा साईड वेज ट्रेंड दाखवत आहे. त्यामुळे जर बँक निफ्टीने २२००० चा अडथळा तोडला तर बँक निफ्टी थेट २४४०० पर्यंत जाईल. त्यावेळी स्टॉप लॉस २१००० चा ठेवावा, असे मी सुचवेन. बँक निफ्टीच्या चार्टवर १९५०० चा HIGHER LOW दिसत आहे. यावरून आपण खालीलप्रमाणे एक ट्रेड करू शकतो.

विका - १९००० PUT Expiry २५/०६/२०२० @३४

विका - १८५०० PUT Expiry २५/०६/२०२० @२४.८५

विका १८००० PUT Expiry २५/०६/२०२० @१४.५०

तिन्ही PUT ची एकूण बेरीज ही ७३.३५ होत आहे. बँक निफ्टीचा एक लॉट २० चा असतो त्यामुळे चार दिवसात १४६७ रुपये मिळू शकतील. अर्थात, हे करताना आपल्या ब्रोकरचा सल्ला अवश्य घ्या. या ट्रेडचा स्टॉप लॉस हा १५० असेल. या ट्रेडला मार्जिन लागेल. त्यामुळे आपल्या ब्रोकरशी चर्चा करूनच हा ट्रेड करावा.

आता आपण Alembic Pharma च्या Fundamental Analsysis बद्दल चर्चा करू. यासाठी मी एक टेबल खाली देत आहे.

ALEMBIC PHARMA

 

2018

2019

2020

SALES

3130

3935

4606

NET PROFIT

421

593

801

BASIC EPS

21.9

31

44

ROA

10.5

12.2

13.4

ROE

18.6

21.5

24.9

यामध्ये आपल्याला दिसेल की, २०१९ मध्ये कंपनीचा सेल्स २१.७१% इतका वाढला २०२ मध्ये सेल्स १७.०५% वाढला. तसेच हेही दिसेल की, कंपनीचा नेट प्रॉफिट आपण २०१८ शी तुलना केल्यास २०२० साली ३८० कोटीने वाढला. तसेच, EPS, ROA आणि ROE मध्येही आपल्याला वाढ झाल्याचे दिसेल. शिवाय, Technical Analysis मी पहिल्याच लेखात दिले होते. त्यामुळे ही कंपनी आपल्या Portfolio मध्ये काही प्रमाणात ठेवा, असे मी सुचवेन.

काही Recommendation:

खरेदी करा : Tata Steel @३२०.५५, लक्ष्य ३५०, स्टॉप लॉस - ३१०

खरेदी करा : JK Lakshmi @२५६, लक्ष्य ३५०, स्टॉप लॉस - २१०

खरेदी करा : HUL - २१५० च्या वर, लक्ष्य २३००, स्टॉप लॉस - २०६०

----------

- अमित पेंढारकर
(शेअर मार्केट अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

संपर्क : ९८१९२३०३१० / finmart99@gmail.com

----------

(वरील सर्व निष्कर्ष, अंदाजमते ही अभ्यासांती मांडण्यात आलेली आहेत. या आधारावर कोणाचाही नफा वा तोटा झाल्यास प्रस्तुत लेखक तसेच साप्ताहिक विवेक हे जबाबदार राहणार नाहीत.)