आता ९९०० पर्यंत घसरणार?

विवेक मराठी    28-Jun-2020
Total Views |

शेअरटेल्स : दि. २२ जून ते २६ जून

निफ्टी आता १०० दिवस चलत सरासरी २०० दिवस चलत सरासरी या दोन्ही चलत सरासरींच्या पट्यात येत आहे, सध्या निफ्टीचा ट्रेंड जरी वरचा असला तरी Price Pattern आणि चार्टवरील इतर अडथळे बघता प्रत्येकाने स्टॉप लॉस लावूनच ट्रेड करावं..


market 3_1  H x

निफ्टी : १०३८३ (+९४.१०)

बँक निफ्टी : २१५९२.०५ (+२५३.९५)

निफ्टी मिडकॅप ५० : ४१७१.७५ (+२.८०)

निफ्टी स्मॉलकॅप २५० : ४१४८.५० (+२२.९५)

मागील लेखात बँक निफ्टीचे OTM PUT Option विकण्यास सांगितले होते त्यातून मागच्या आठवड्यात १००० रुपये प्रत्येकी एका लॉट मागे मिळाले. यालाच Option Writing असे म्हणतात.

आता आपण निफ्टीच्या चार्टकडे वळू. खालील चार्टमध्ये निफ्टी Rising Wedge या Price Pattern मध्ये मार्गक्रमण करत आहे. तिच्या प्रत्येक वरच्या Resistence Line ला कॅन्डलस्टिकचा बेअरिश पॅटर्न बनून निफ्टी परत Rising Wedge पॅटर्नच्या सपोर्ट लाईनला येते. आत्ताही निफ्टीच्या Resistence Line ला Bearish Engulfing पॅटर्न बनला आहे फक्त त्याच्या खाली अजून निफ्टीने बंद (क्लोज) दिला नाही. जर हा बंद १०२०० च्या खाली आला तर निफ्टी ९९०० पर्यंत जाऊ शकेल. दुसरी गोष्ट अशी की, निफ्टी आता १०० दिवस चलत सरासरी २०० दिवस चलत सरासरी या दोन्ही चलत सरासरींच्या पट्यात येत आहे, सध्या निफ्टीचा ट्रेंड जरी वरचा असला तरी Price Pattern आणि चार्टवरील इतर अडथळे बघता प्रत्येकाने स्टॉप लॉस लावूनच ट्रेड करावं, असं मी सुचवेन.


market_1  H x W

आता बँक निफ्टीचा चार्ट काय म्हणतोय ते बघू. खालील बँक निफ्टीचा चार्ट हा त्याचा Sideways ट्रेंड तोडण्याच्या प्रयत्नात आहे परंतु, तो प्रयत्न यशस्वी होताना नाही. जर बँक निफ्टी २३००० चा स्टार तोडण्यात यशस्वी झाला त्याच्या वर बंद झाला तर आपण म्हणू शकतो की बँक निफ्टी वर जाईल. मात्र जर २०००० चा स्तर बँक निफ्टीने तोडला तर बँक निफ्टी परत १९००० १६७०० पर्यंतच्या स्तराकडेही जाऊ शकतो.


market 2_1  H x

आता आपण USD/INR या Currency पेरच्या चार्टकडे वळू. खालील USD/INR च्या चार्ट मध्ये Rounding Bottom हा Price Pattern तोडून आता Bullish Flag हा पॅटर्न बनत आहे. त्यामुळे येत्या काळात जर USD/INR ने ७६.६० च्या वर बंद दिला तर ७५ चा स्टॉप लॉस ठेवून ८२ पर्यंतचे लक्ष्य आपण ठेवू शकतो. USD/INR चा एक लॉट हा १००० चा असतो या ट्रेडला Margin ३००० ते ४००० रुपयांपर्यंत लागेल. अर्थात, हे करण्याआधी आपल्या ब्रोकरचा सल्ला अवश्य घ्या.


market 3_1  H x

काही Recommendations :

हॅवेल्स : खरेदी करा - ६०० च्या वर, लक्ष्य ६४९, स्टॉप लॉस - ५६०

ट्रेंट : खरेदी करा - ७०० च्या वर, लक्ष्य - ८००, स्टॉप लॉस - ६५०

Hdfc LIFE : खरेदी करा - ५४० च्या वर, लक्ष्य ६५०, स्टॉप लॉस - ५००

Option Writing :

2nd July 2020 Expiry Trade

Sell 1 lot of Nifty 9700 Put @15, and

Sell 1 lot of Nifty 10800 Call @14

Net Premium Received is 29

Keep Stop Loss of 58

----------

- अमित पेंढारकर

(शेअर मार्केट अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

संपर्क : ९८१९२३०३१० / finmart99@gmail.com

----------

(वरील सर्व निष्कर्ष, अंदाजमते ही अभ्यासांती मांडण्यात आलेली आहेत. या आधारावर कोणाचाही नफा वा तोटा झाल्यास प्रस्तुत लेखक तसेच साप्ताहिक विवेक हे जबाबदार राहणार नाहीत.)