श्रम कमी करणारी अवजारे / यंत्रे

विवेक मराठी    20-Jul-2020
Total Views |
@जयंत उत्तरवार
 
@आरती देशमुख

लक्ष्मी विळा

कोणतेही पीका पक्व झाल्यानंतर वेळेत काढणी करणे गरजेचे असते. कापणीचे काम बहुतांशी महिला करतात. या कापणीच्या कामात कित्येकदा उकिडवे बसून, तसेच कमरेतून वाकून विळ्याने कापणी करावी लागते. पारंपरिक पद्धतीत कापणीसाठी विळा वापरतात. या विळ्याचे वजन तुलनेने जास्त असते आणि त्या विळ्यांनी दणका मारल्यास कापणीची क्रिया होते. या दोन्ही बाबींमुळे महिलांना कापणीच्या कामात बरेच श्रम पडतात. त्यामुळे महिलांना थकवा येतो. कार्यक्षमतेत घट येते. त्याचप्रमाणे कापणीच्या क्रियेमुळे विळ्याची धार कमी होत जात असल्याने पुढच्या कापणीच्या कामाआधी विळ्याला धार लावावी लागते. यासाठी पैसे खर्च करावे लागतात.

seva_1  H x W:


अशा या कापणीच्या कामात महिलांची श्रमशक्ती वाचविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने ‘लक्ष्मी विळा’ विकसित केला आहे. या विळ्याचे पाते दातेरी असल्याने व कापणीची क्रिया ओढून करावी लागत असल्याने श्रम कमी लागतात, तसेच विळा वजनाने हलका असल्याने थकवा कमी होतो. या लक्ष्मी विळ्याने सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, मका ही पिके कापणी करतात. पाते दातेरी असल्याने विळ्याला वारंवार धार लावण्याची गरज नाही.

वैभव विळा

गव्हाची, तसेच भाताची कापणी वेळेवर झाल्यास वाऱ्यामुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते. पारंपरिक विळ्याने गव्हाची व भाताची जमिनीलगत कापणी करताना दाताच्या बोटांना इजा होते, पर्यायाने मजूर जमिनीलगत कापणी करताना थोड्या वरूनच करतात. यामुळे चारा कमी प्रमाणात मिळतो. गहू आणि भात कापणीसाठी पारंपरिक विळा वापरण्याच्या मर्यादा लक्षात घेऊन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीने ‘वैभव विळा’ विकसित केला आहे.


seva_1  H x W:

वैभव विळ्याला पाते आणि मूठ यांच्यामध्ये एक खटका (उंचीत फरक) दिलेला आहे. त्यामुळे कापणी करताना पाते जमिनीलगत असले, तरी हाताच्या बोटांना इजा होत नाही. या वैभव विळ्याने जमिनीलगत कापणी होत असल्याने भातातील खोडकिडीच्या नियंत्रणास मदत होते. तसेच या विळयाला दातेरी पाते असल्याने कापण्यासाठी कमी श्रम लागतात. विळ्याचे वजन २५० ते ३०० ग्रॅम. असल्याने कापणीचा वेग जास्त असतो. त्यामुळे कार्यक्षमता वाढते आणि श्रमातही बचत होते.

 
 
कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार.