पेणमध्ये संघाच्या माध्यमातून ४८०० व्यक्तींचे स्क्रीनिंग

विवेक मराठी    24-Jul-2020
Total Views |

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने पेण आणि महाड नगरपालिकेत थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे. पेणमध्ये २२ आणि २३ जुलै या काळात एकूण १६७८ कुटुंबांमधील ४८३० नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले.

RSS_1  H x W: 0

(वि.सं.कें.) -
रायगड जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचा आकडा वाढत आहे. हे संक्रमण थांबविण्याच्या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने पेण आणि महाड नगरपालिकेत थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे. पेणमध्ये
२२ आणि २३ जुलै या काळात एकूण १६७८ कुटुंबांमधील ४८३० नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले. नगरपालिकेच्या मागदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. संघाच्या माध्यमातून यापूर्वी मुंबईतील रेड झोन, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक अशा विविध ठिकाणी स्क्रीनिंग मोहीम राबविण्यात आली असून तिचा सकारात्मक परिणामदेखील दिसून आला आहे.

 

पेणमध्ये २२ जुलै ते ३१ तारखेपर्यंत सुरु असणाऱ्या या स्क्रीनिंग मोहिमेला नागरिकांचा अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. कै. काकासाहेब चितळे स्मृती केंद्र आणि निरामय सेवा संस्था यांचे या मोहिमेत महत्वपूर्ण योगदान आहे. सुमारे ८५ कोरोनायोद्धे यात सहभागी झाले असून त्यांना मोहिमेपूर्वी तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून त्यांना आयुर्वेदिक काढा देण्यात येत आहे. पेणमध्ये दोन भागांमध्ये ही मोहीम पार पडणार असून चार चार दिवस दोन गट काम करतील. त्या गटातील सर्व योद्ध्यांची मोहिमेनंतर स्वॅब टेस्ट केली जाणार आहे..