धुंद : प्रेम की गुलामी?

विवेक मराठी    01-Sep-2020
Total Views |
@नरेंद्र

भारतीय स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारी अनेक श्वापदे समाजात वावरत आहेत. अशाच श्वापदांच्या तावडीत सापडूनही जिवंत परत येणाऱ्या रीटाची ही कथा असलेली आस्वाद प्रकाशनची अनोखी कादंबरी - 'धुंद'.


seva_1  H x W:
 
कादंबरीतील एक प्रकरण खास आमच्या वाचकांसाठी....
रीटा आमच्या भाऊसाहेबांची लाडकी लेक. भाऊसाहेब म्हणजे आमच्या इस्लामपूर शहराचे भूषण, उत्तम व्याख्याते आणि बोले तैसा चाले या उक्तीचे जिवंत उदाहरण. खरे तर रीटा हे नाव काही त्यांच्या पठडीतले नाही. काकूंचे नाव लक्ष्मीबाई, मोठी मुलगी शुभदा, मधला मुलगा विनायक. एक जात सगळी पारंपरिक नावे. इस्लामपूर नावालासुद्धा त्यांचा विरोध. त्यांच्या माहितीनुसार आपल्या शहराचे प्राचीन नाव देवपूर, मोगलांनी त्यांच्या राजवटीत देवपूरचे इस्लामपूर केले. नाव बदलण्यासाठी त्यांचे प्रयत्न सतत सुरू असतात, पण अजून यश आलेले नाही. नागरिकांनी सह्यांची निवेदने दिली, मोर्चे काढले, तरी शहरातल्या मोमीनपुरा भागाच्या एकगठ्ठा मतदानाच्या ताकदीपुढे या सह्यांची किंमत शून्यच ठरते. अशा या घराण्यात रीटा नावाची मुलगी कशी? हा निव्वळ योगायोग आहे.
रीटाला जेव्हा अ‍ॅक्सिस बँकेत पुण्याला नोकरी मिळाली आणि ती पुण्याला जाऊन नोकरी करणार हे जेव्हा तिने जाहीर केले, तेव्हा मात्र त्यांच्या संयमाचा बांध सुटला. त्यांची समजूत घालण्यासाठी आत्याला थेट अमेरिकेहून यावे लागले. तिच्या पुण्यातील बंगल्यात फक्त मुली कॉट बेसिसवर राहतात, त्यांच्यासह रीटा राहील आणि आत्या स्वत: अमेरिकेतून तिच्यावर लक्ष ठेवेल, या अटींवर भाऊसाहेबांनी नाइलाजास्तव संमती दिली.


seva_1  H x W:
 
प्रवास फक्त इस्लामपूरहून पुण्याचा असला, तरी या प्रवासाने रीटाला खूप लांब नेले. बँक शिवाजीनगरमध्ये एका भव्य मॉलमध्ये होती. एकाच इमारतीत असंख्य ऑफिसेस, सिनेमा हॉल, ज्वेलर्स, कॉल सेंटर आणि सर्वात वरच्या मजल्यावर सर्वांसाठी एकदम फर्स्ट क्लास कॅन्टीन. रोज बँकेत नव्या गोष्टी शिकताना वेळ कसा जायचा, ते कळायचे नाही. दुपारी कॅन्टीनमध्ये वेगवेगळ्या ऑफिसातल्या नवीन लोकांशी ओळखी व्हायच्या. कधी सिनेमाचे प्लॅन बनायचे, कधी फॅशन स्ट्रीटवर खरेदीचे, तर कधी रविवारी खडकवासला धरणाच्या ट्रिपचे. अशाच एका ट्रिपमध्ये तिला कळले की त्याच इमारतीत असलेल्या येस बँकेतला राजू सांगलीचा आहे. त्यांची ओळख वाढली आणि मग त्यांचे गावी जाण्याचे प्लॅन सोबतच ठरू लागले. पुणे ते इस्लामपूर प्रवास म्हणजे गप्पांची रंगलेली मैफलच असायची. राजू म्हणजे माहितीचा खजिना होता. आमीरच्या सर्व सिनेमांचा तो चालताबोलता संग्रह होता. त्याच्याबरोबर सिनेमा पाहणे म्हणजे पर्वणीच असायची. त्याच्यासोबत असताना तिला कधी एखादा रुपयादेखील खर्च करावा लागायचा नाही. बँकेत उशीर होणार असेल, तर तिला बंगल्यावर आणून सोडायला त्याने कधीच कंटाळा केला नाही. कधीकधी तर हिची कामे संपेपर्यंत दोन दोन तास तो थांबून राहायचा. अशी मैत्री फुलत गेली.
 
 
आणि तो दिवस उजाडला. सर्वांचे खडकवासल्याला जायचे ठरले होते. नेहमीप्रमाणे राजू तिला घ्यायला आला. खडकवासल्याला पोहोचल्यावर पाहिले, तर बाकी कोणीच पोहोचलेले नाही. आपण थोडे पुढे जाऊन यायचे का? राजूने विचारले. तिने होकार दिला आणि गाडी पुढे गेली. एका हॉटेलबाहेर मस्त गुलाबांची रांग होती. दोघे लॉनवर बसले. राजूने मॅनेजरला बोलावून त्याच्या कानात काहीतरी सांगितले. पंधरा मिनिटांनी तो परत आला आणि म्हणाला, "साहेब, तयारी झाली आहे." राजूने हात हातात घेतला, "चला मॅडम!" त्यांनी पलीकडच्या भागात प्रवेश केला आणि समोरील दृश्य पाहून रीटाचा डोळ्यावर विश्वासच बसेना! हिरव्यागार लॉनवर गुलाबी अक्षरात आणि मंद दिव्यांच्या प्रकाशात उमटलेली अक्षरे ेंग्त्त् भ्दल् श्ठ्ठठ्ठब् स् द्भ ठ्ठत्ग्हञ्च्? रीटाने राजूला घट्ट मिठी मारली. भ्छ! भ्छ! भ्छ! हाच तो क्षण, ज्याची प्रत्येक मुलगी वर्षानुवर्षे वाट पाहते. एका विलक्षण धुंदीमध्ये ती बुडून गेली. आज तू मला आयुष्यातले सर्वात मोठे सुख दिलेस. गुलाबांच्या तबकासह एक सुंदर मुलगी पुढे आली. गुलाबाचे चुंबन घेऊन ते राजूला देताना नकळत रीटाची नजर जमिनीला भिडली. मोबाइलचे फ्लॅश आणि टाळ्यांचा कडकडाट ऐकून ती भानावर आली. हाताने डोळे झाकलेल्या स्थितीतच राजूने तिला उचलले आणि त्यांच्या टेबलाकडे नेले. तिच्या आवडीच्या पदार्थांनी टेबल सज्ज होते. सगळे आटोपून बंगल्यावर पोहोचेपर्यंत ती जणू स्वर्गातच होती. झोप तर येतच नव्हती. रात्रीचे बारा वाजले आणि व्हॉट्स ऍपचे नोटिफिकेशन आले. आजच्या संपूर्ण प्रसंगाचा सुंदर व्हिडिओ राजूने पाठवला होता. किती वेळा तो पाहिला तरी समाधान होत नव्हते. किती सुंदर दिसत होता राजू या व्हिडिओत! किती प्रेमाने तिला सांभाळत होता आणि आजूबाजूचे सगळे किती कौतुकाने टाळ्या वाजवत होते. त्या रात्री तिला झोप कधी लागली कोणास ठाऊक. सकाळी घाईघाईने आवरून ती ऑफिसला पोहोचली. ऑफिसमध्ये सगळे तिच्या चेहर्‍यावर फुललेल्या हास्याचे रहस्य विचारत होते. कोणाला सांगावे आणि कोणाला नाही हे मात्र तिला समजेना. सर्वांना सांगण्यापूर्वी एकदा दोघांच्या घरच्यांना सांगून पक्के करायला पाहिजे, हे तिच्या लक्षात आले. दुपारी राजूला भेटल्यावर विषय काढू असे ठरवून तिने कामाकडे लक्ष वळवले. कधी एकदा दुपार होते याची ती वाट पाहू लागली. जेवताना तिने विषय काढला आणि तो गंभीर झाला. "कारण नंतर सांगतो, पण मला थोडा वेळ दे" म्हणाला. काही दिवस जाऊ दे, मग घरच्यांशी बोलू असे ठरले. दिवस गेले, मैत्रीच्या पायर्‍या ओलांडल्या, सुखाची दालने उघडत गेली आणि या शरीराने किती सुख मिळवता येते हे राजूने तिला दाखवले. आता ती त्या सुखाला सरावली.
 
आता मात्र रीटाला असे दूर दूर राहणे सहन होईना. आपण एकत्रच राहायला हवे असे सांगून त्याला माझ्या घरी भेटायला चल असा आग्रह तिने सुरू केला. यावर राजूने जबरदस्त धक्काच दिला. आपण लग्न न करतासुद्धा एकत्र राहू शकतो असा त्याचा साधा सोपा उपाय होता. रीटाला मात्र तो मान्य नव्हता. शेवटी राजूने तिला सांगितले की "आपल्याला घरच्यांना सांगून लग्न करता येणार नाही. रजिस्टर लग्न करावे लागेल."
 
"का बरे?"
 
"माझा धर्म तुझ्या आई-वडिलांना चालणार नाही, मी मुसलमान आहे. माझे आई-वडील तुला आनंदाने स्वीकारतील, पण तुझे आई-वडील मला स्वीकारणार नाहीत. तुझे वडील फार कट्टर, काफिर विचारांचे आहेत. ते आपल्या पवित्र प्रेमाला समजून घेणार नाहीत. आपण लग्न करू आणि मगच त्यांना सांगू. माझे कुटुंब फार सुधारलेले आहे, पण तुमचे लोक आपल्या मुली मुसलमान घरात द्यायला तयार होत नाहीत. तुझ्या वडिलांना सांगितले तर ते मोठा गोंधळ माजवून हे लग्न होऊ देणार नाहीत आणि नंतर तुझ्या धर्मातले कोणी तुझ्याशी लग्नसुद्धा करणार नाही. तुझ्या प्रेमासाठी सांगतो आहे की आपल्याला गुप्तपणे लग्न करावे लागेल. आपण दोघेही कायद्याने स्वतंत्र आहोत. आपले भविष्य ठरवायला आपण मोकळे आहोत, आपल्याला कोणी अडवू शकणार नाही. आपण पुण्यातच स्वतंत्र राहणार आहोत, तुला काही आमच्या सांगलीच्या मोहल्ल्यात राहायला यायचे नाही कायमचे."
रीटा अवाक झाली. आजपर्यंतच्या ओळखीत आपण कधीच धर्म विचारला नाही, कधी घर पाहायला पण गेले नाही, अशी कशी मी मूर्ख ठरले? आता यातून मार्ग काय? पुढे जाऊ की मागे फिरू? पुढे गेले तर आई-बाबांचे काय? मी हिंदू राहू की मुसलमान होऊ? बुरखा घालायला सांगितला तर काय करू? याच्या मोहल्ल्यात मी कशी जाऊ? याचे दुसरे लग्न तर नसेल झालेले? आणि नंतर केले तर काय करू? हा गाय खात असेल का?

 
मागे फिरले, तर त्याच्यावरच्या प्रेमाचं काय? त्याच्याकडे असलेल्या माझ्या फोटोंचे आणि व्हिडिओंचे काय? माझे हे पहिले प्रेम मोडून टाकू? आपले संस्कार काय सांगतात? आयुष्यात एकावरच प्रेम करावे, एकालाच निष्ठेने शरीर द्यावे. केवळ धर्म वेगळा आहे म्हणून इतके प्रेम करणार्‍याला दूर करू? याबद्दल आईशी, ताईशी बोलले तर त्या समजून घेतील का? बाबा काय करतील? कोणाशी बोलू? काय करू? मार्ग कसा काढू?
 
 
यावर मार्ग राजूनेच काढला. "तुमच्या घरात किंवा देवळात यावर मार्ग निघणार नाही. चल, आपण दर्ग्यातल्या अवलिया बाबाकडे जाऊ. बाबा सब मर्जकी दवा जानते है। ते आपल्या सर्व समस्या सोडवतील, तुझ्या सर्व शंका दूर करतील, तुझ्या सर्व चिंता मिटतील. बाबांच्या अंगार्‍याने सगळे दु:ख दूर होते. दर्ग्यात गेलेला माणूस कधी रिकाम्या हाताने परत येत नाही. आपण जाऊ आणि मार्ग काढू." रीटालाही हे पटले. प्रत्येक सिनेमात काही अडचण आली तर हिरोईन दर्ग्यातच जाते आणि तिथले दयाळू बाबा तिच्या समस्या सोडवतात, तिने पाहिले होते ना!....
 
 
पुढे रीटाचे काय होते? लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींना कसे फसवले जाते, त्यासाठी मुस्लीम मुलांना कसे प्रशिक्षण दिले जाते.... हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर 'धुंद' पुस्तकाची आजच नोंदणी करा. नोंदणीसाठी संपर्क : ९५९४९६१८५८.