पोस्टाच्या काही लोकप्रिय बचत योजना

विवेक मराठी    30-Sep-2020
Total Views |

आर्थिक गुंतवणुकीचे अनेक पयार्य आहेत. त्यातीलच एक म्हणजे पोस्टाच्या विविध योजना. मोठ्या शहरात आथर्क गुंतवणुकीचे विविध पयार्य उपलब्ध असले तरी ग्रामीण विभागातील नागरिक अजूनही पोस्टांच्या योजनांमध्ये आपली बचत ठेवत असतात. पोस्टाची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांचा भारतातील कानाकोपऱ्यात झालेला विस्तार.


post_1  H x W:


बचतीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील आयुर्विमा, म्युच्युअल फंड, शेअर बाजार याबद्दल मागील काही लेखांत आपण माहिती करून घेतली. असाच एक अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासाचा बचतीचा मार्ग आहे पोस्टाच्या विविध योजनांमधील बचत. मोठ्या शहरातील मंडळी जरी याकडे दुर्लक्ष करीत असली, तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पोस्ट ऑफिसेसचे जाळे विणले असल्याने ग्रामीण विभागातील नागरिक अजूनही या योजनांमध्ये आपली बचत ठेवत असतात.

पोस्ट ऑफिसेसची वैशिष्ट्ये

प्रसिद्ध साहित्यिक पु.. देशपांडे यांनी, तसेच इतरही अनेक लेखकांनी आपल्या लेखनातून पोस्टात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यथेच्छ टिंगलटवाळी केली असली, तरी देशाच्या अर्थव्यवस्थेत पोस्टाचे योगदान विसरून चालणार नाही. पोस्टाची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांचा भारतातील कानाकोपऱ्यात झालेला विस्तार. भारतात जवळपास लाख खेडी आहेत आणि पोस्टाच्या शाखा आहेत ,५५,६१८ - म्हणजे जवळपास दर - खेड्यांत मिळून एक पोस्ट ऑफिस आहे. स्टेट बँकेच्या जवळपास २४,००० शाखा आहेत, तर रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार भारतातील सर्व बँकांच्या एकूण शाखा आहेत ,५६,३४१ - म्हणजे पोस्टाच्या जेवढ्या शाखा आहेत, तेवढ्या सर्व बँकांच्या शाखा आहेत, यावरून पोस्टाच्या कार्याची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना येईल. जगातील दुसऱ्या कुठल्याही देशात पोस्टाच्या इतक्या शाखा नाहीत, तसेच जगातील सर्वात जास्त उंचीवरील (१५,५०० फूट) पोस्ट ऑफिसचा मान हिमाचल प्रदेशातील हिक्कीम पोस्ट ऑफिसला जातो. पोस्टाचे वैशिष्ट्य हे आहे की पोस्टाच्या सर्व सेवा सर्वांना सर्व ठिकाणी एकाच दरात मिळतात. ५० पैशाचे पोस्टकार्ड भारतात कुठेही पाठवायचे असेल, तरी सर्वांना तेवढीच रक्कम द्यावी लागते.

पोस्टाच्या विविध सेवा

पोस्टात कार्ड, पाकिटे, अंतर्देशीय पत्र, स्टॅम्प्स तर मिळतातच, तसेच पोस्टातून बचतीच्या विविध योजना, विम्याच्या योजना, म्युच्युअल फंड यांत गुंतवणूक करता येते, तसेच नवीन पेन्शन स्कीमचे (NPSचे) खातेही उघडता येते. शिवाय परदेशात पैसे पाठवणे, पार्सल पाठवणे, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा योजना, (PMSBY), अटल पेन्शन योजना या योजनांमध्ये सहभागीसुद्धा होता येते. पोस्टाच्या बचतीच्या काही लोकप्रिय योजनांची आपण माहिती करून घेऊ या.

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

आई-वडिलांना आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ला बेटी बचाओ, बेटी पढाओमोहिमेअंतर्गत ही योजना सुरू केली. पालकांनी अल्पवयीन मुलींसाठी (कमाल ) बचत करावी, असे या योजनेचे लक्ष्य आहे. मुलीच्या जन्मापासून ते मुलगी दहा वर्षांची होईपर्यंत केव्हाही सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येते. या योजनेमधे किमान गुंतवणुकीची रक्कम दर वर्षी २५० रुपये आणि कमाल .५० लाख रुपये इतकी आहे. या खात्यात किमान १५ वर्षे रक्कम जमा केल्यावर मुदत संपेपर्यंत दर वर्षी किमान रक्कम जमा करण्याचे बंधन नाही. दर वर्षी जमा करण्याची किमान रक्कम जमा केल्यास ५० रुपये दंड भरावा लागतो. कन्येचे वय २१ झाले की याची मुदत संपते. कन्येचे वय १८ झाल्यावर जमा रकमेतून (व्याजासकट) ५०% रक्कम काढता येते. कन्येच्या वयाच्या १८नंतर तिचा विवाह ठरल्यास, त्यासंबंधी दस्तऐवज दाखवल्यानंतर, मुदतीपूर्वी खाते बंद करून सर्व रक्कम मिळू शकते. हे खाते पोस्टात किंवा कुठल्याही अधिकृत वाणिज्य बँकेत उघडता येते. व्याजाच्या दराबद्दलची घोषणा वित्त मंत्रालय करीत असते. त्यानुसार खात्यावर व्याज जमा होते. खात्यात रक्कम जमा करतेवेळी किंवा खाते उघडतेवेळी जो व्याजदर असेल, तो व्याजदर खाते बंद होईपर्यंत मिळेल अशा गैरसमजुतीत कृपया राहू नये. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६मध्ये .२०% व्याजदर होता, जो एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी .६०% आहे. बदललेले व्याजाचे दर खालीलप्रमाणे

post_1  H x W:


या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात जमा केलेल्या रकमेला आयकर कायद्याच्या कलम ८०-सीनुसार सूट मिळते, शिवाय यावर मिळणारे व्याज करमुक्त असून मुदतीनंतर मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त आहे. या योजनेव्यतिरिक्त फक्त सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीमध्ये अशी कर सवलत उपलब्ध आहे.

उपलब्ध माहितीनुसार या योजनेला तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांतून भरघोस प्रतिसाद मिळाला. जून २०१८पर्यंत .४० कोटी खाती उघडली गेली, त्यातील ४०% खाती या चार राज्यांत उघडली गेली. या योजनेत ३० जून २०१८पर्यंत जवळपास २६,००० कोटी रुपये जमा झाले.

दर वर्षी .% व्याजदर गृहीत धरला, तर या खात्यात जर कोणी दर वर्षी ,५०,००० रुपये एवढी रक्कम १५ वर्षे जमा केली, तर २१ वर्षांच्या शेवटी मुदत संपताना जवळपास ६६ लाख रुपये इतकी रक्कम जमा होईल. ज्या कोणाला १० वर्षांहून लहान वयाच्या कन्या असतील, त्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.

मासिक आय योजना (Monthly Income Scheme - MIS)

पोस्टाची आणखी एक लोकप्रिय योजना म्हणजे मासिक आय योजना. सेवानिवृत्तांमध्ये ही योजना विशेष लोकप्रिय आहे. यात प्रत्येकी .५० लाख रुपये किंवा जॉईंट खात्यात लाख रुपये इतकी रक्कम जमा करता येते. याची मुदत वर्षे असून जो व्याजदर खाते उघडताना असेल तोच पूर्ण मुदतीसाठी असतो. सध्याचा व्याजदर आहे .६०%. पोस्टाच्या बचत खात्यात दर महिन्याच्या तारखेला यावरील व्याज जमा होते. लाख रुपये रक्कम जमा केल्यास दरमहा ,९५० रुपये इतके व्याज जमा होते. खाते वर्षानंतर, पण वर्षांच्या आत बंद केल्यास ९८% रक्कम परत मिळते. वर्षांनंतर आणि मुदत संपण्यापूर्वी खाते बंद केल्यास गुंतवलेल्या रकमेच्या ९९% रक्कम परत मिळते.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF)

पोस्टाची एक अत्यंत लोकप्रिय योजना आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना. पोस्टाव्यतिरिक्त हे खाते कुठल्याही वाणिज्य बँकेच्या शाखेतही उघडता येते. स्वयंरोजगार करणारे, तसेच डॉक्टर्स, वकील यांसारखे व्यावसायिक यांच्यात १५ वर्षे मुदतीची ही योजना खूप लोकप्रिय आहे. याची मुदत संपल्यावर जर खाते चालू ठेवायचे असेल, तर पाच पाच वर्षांनी मुदत वाढवता येते. किमान ५०० रुपये आणि कमाल ,५०,००० रुपये दर वर्षी या खात्यात जमा करता येतात. व्याजदर वित्त मंत्रालय घोषित करते. एकेकाळी १२% असलेला व्याजदर आता .६०%वर आला आहे. वर्षांनंतर खाते बंद केल्यास व्याजातून % रक्कम कापून घेतली जाते. आयकर कायद्याच्या ८० सी कलमानुसार वार्षिक जमा केलेल्या रकमेवर सूट मिळते. तसेच यावर मिळणारे व्याज पूर्णतः करमुक्त आहे आणि विशेष म्हणजे नादारी (bankrupcy) झाल्यास या खात्यात असलेली रक्कम दावेदारांना मिळू शकत नाही. खाते उघडल्याचे वर्ष सोडून एक वर्षाने कर्ज हवे असल्यास कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. खाते उघडल्याचे वर्ष सोडून वर्षे झाली असतील, तर तीन वर्षांच्या शेवटी असलेल्या रकमेच्या ५०% रक्कम खात्यातून काढता येते.

या तीन योजनांव्यतिरिक्त पोस्टात बचत खाते उघडता येते. बचत खात्यावर % दराने व्याज मिळते. आवर्ती जमा खाते (Recurring Deposit Account) किंवा सावधी जमा खाते (Time Deposit Account) उघडता येते. किसान विकास पत्रे घेता येतात, तसेच राष्ट्रीय बचत पत्र (National Savings Certificate - NSC) घेता येतात. या सर्व योजनांवरील व्याजदर वित्त मंत्रालय दर वर्षी जाहीर करते.

जोखीम आणि परतावा हातात हात घालून चालतात असे म्हटले जाते. म्हणजे जास्त जोखीम घेतली, तर जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. मात्र ज्यांना अजिबात जोखीम घ्यायची नसेल, त्यांना जोखीम-विरहित गुंतवणुकीच्या पोस्टाच्या योजनांना पर्याय नाही.

(
लेखक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे वित्त सल्लागार, तसेच इर्डा (IRDA) अर्थात विमा नियामक आणि विकास प्राधिकरण या भारतातील विमा क्षेत्रावर कायद्याचे नियंत्रण ठेवणाऱ्या मंडळाचे माजी सदस्य आहेत.)