सातत्यपूर्ण जनसंपर्कातून आत्मविश्वास वाढतो : आ. सिद्धार्थ शिरोळे

विवेक मराठी    23-Jan-2021
Total Views |

“अनेकदा प्रशासन लोकप्रतिनिधीचे ‘पेशन्स’ तपासत असतं. लोकांची कामं प्रशासनही विसरतं आणि लोकप्रतिनिधीही विसरतात. लोक तुम्हाला रोज भेटत नाहीत त्यामुळे ती कामं मग मागे पडतात. असं न होऊ देता सातत्याने आणि संयमाने पाठपुरावा करत राहिलं की कामं मार्गी लागतात. हीच गोष्ट न थकता, अधिकाधिक आणि सातत्यपूर्ण जनसंपर्काच्या माध्यमातून करत राहण्याचं माझं उद्दिष्ट आहे....” अशा शब्दात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्या कार्यतत्परतेचं रहस्य उलगडतात.


Siddharth Shirole_2 

 

विधिमंडळ सदस्य म्हणून आपली ही पहिलीच टर्म आहे. एक युवा नेतृत्व म्हणून आपण वाटचाल करत आहात. तुमची जनसंपर्काचीस्टाइलकशी आहे आणि त्यामध्ये सातत्य कसं ठेवता?

 

मी 2019 विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आलो आणि तोही थोड्या (5200) मतांच्या फरकाने. या मतदारसंघात जवळपास 50 टक्के भाग वस्त्यांचा आहे. 2009मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात वस्त्यांचा समावेश झाला. 2019मध्ये मला संधी मिळाली. मी निवडून आलो तो 5200 मतांनी. हा फरक टिकवायचा असेल, वाढवायचा असेल तर त्यासाठी तीन सूत्रांनुसार काम करायचं, असं मी ठरवलं. ही तीन सूत्रं म्हणजे availability, visibility आणि credibility. त्यानुसार कामाची एक चौकट ठरवली. या वेळी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे अनेक लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमांना कुणी बोलावलं की जातात. असे लोक खूप आहेत. मात्र रोज आपणहोऊन ठरवून एखाद्या ठिकाणी जाणं, याचा प्रभाव जास्त असतो. निवडून आल्यानंतर ज्या वेळी मी मा. देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं कीप्रतिमा आणि संपर्क यावर अधिक लक्ष केंद्रित करा.” यातील संपर्काची व्याख्या तुम्हाला स्वतःलाच ठरवावी लागते. समाजात समरस व्हावं लागतं आणि हे प्रत्येकाचं वैयक्तिक कौशल्य आहे. भले अटीतटीच्या निवडणुकीत, पक्षाचा उमेदवार आहे म्हणून तुम्हाला समाजाने निवडून दिलं असेलही, परंतु त्यानंतर हा आपला प्रतिनिधी आहे ही ओळख तरी लोकांना व्हायलाच हवी. त्यासाठी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचायला हवं. जाहीर कार्यक्रमांतून ओळख अशी कितीशी होणार? त्यामुळे मी वस्ती संपर्क मोहीम सुरू केली. या मतदारसंघात सुमारे 40 वस्त्या असतील, तर एखाद्या वस्तीत मी संध्याकाळी पाच-साडेपाच वाजता जातो आणि अगदी आठ-साडेआठ वाजेपर्यंत तिथे थांबतो. बाराशे-तेराशे लोकसंख्येची एक वस्ती असते, तिथे यामुळे आपला थेट संपर्क होतो. पाण्याचे प्रश्न, सांडपाण्याचे प्रश्न, अन्य वेगवेगळे प्रश्न लोक या वेळी मांडतात. शिवाय, आपला आमदार आपल्या वस्तीत येऊन भेटून जातो, याचाही वेगळा संदेश लोकांना मिळतो. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम लगेचच जाणवून येऊ लागला. माझ्या कार्यालयात रोज असे किती लोक येणार? फार तर शंभर-दीडशे. मात्र मी स्वतः लोकांमध्ये गेलो तर मी किमान पाचशे-सातशे लोकांना रोज भेटू शकतो. महिला, लहान मुलं, युवक आदींना भेटता येतं. त्यामुळे आपण अशा प्रकारे वस्ती संपर्क मोहीम राबवली आहे आणि त्याचा चांगला परिणाम जाणवतो आहे. याशिवाय मतदारसंघात चार गावठाणं आहेत - शिवाजीनगर, औंध, बोपोडी, संगमवाडी इत्यादी. मग राहतात त्या सोसायट्या. सोसायट्यांना आम्ही 12 भागांत वाटून घेऊन तेथे नियोजनपूर्वक संपर्क साधतो आहोत. अशा प्रकारे संध्याकाळच्या वेळी ठरवून थेट समाजात जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय वेगवेगळे कार्यक्रम, उद्घाटनं, लग्नकार्यं वगैरे आणखी वेगळं.

या जनसंपर्कामुळे आपलाही आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. मी असं म्हणणार नाही की मी स्वतःच्या बळावर निवडून आलो. मी निवडून आलो तो पक्षाच्या बळावर, विचारधारेच्या बळावर आणि अगदी स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्यापासून आजपर्यंत पक्षासाठी योगदान देणार्या नेते-कार्यकर्त्यांच्या परिश्रमांच्या बळावर. आता हा मतदारसंघ आपल्या पक्षाचा, विचारांचा बालेकिल्ला बनवायचा असेल तर ती विचारधारा संपर्काच्या माध्यमातून पोहोचवली पाहिजे, हेच उद्दिष्ट केंद्रस्थानी ठेवून मी काम करतो आहे. त्यामुळेच त्यात सातत्य ठेवणंही शक्य होतं.

आपण निवडून आल्यापासून गेल्या वर्ष-दीड वर्षाच्या काळातील बराच काळ कोविडचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउन .मध्ये गेला. त्यातही कोविडच्या काळात सुरुवातीला शिवाजीनगरच्याच काही भागांतील वाढती रुग्णसंख्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनली होती. पहिल्या टर्मच्या पहिल्याच वर्षात हे अशा प्रकारचं आव्हान समोर आल्यावर काय केलंत?

एक तर जेव्हा कोविडची सुरुवात झाली, तेव्हा सर्वच लोक संभ्रमात होते की आता नेमकं करायचं काय.. मात्र तेव्हापासून मा. देवेंद्रजींनी आणि पक्षाने व्यवस्थित गाइडलाइन्स आखून दिल्या होत्या, त्याचं नियोजन उत्तमरित्या केलं होतं. आजच्या या परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या मतदारसंघात तुमची गरज काय आहे, मग तुम्ही तिथे काय करायला हवं याबद्दल पक्षाने स्पष्टपणे आणि योग्य मार्गदर्शन केलं. त्यानुसार मग अन्नधान्य पुरवठा, सॅनिटायझर वाटप, मास्क वाटप अन्य कामं सुरू झाली. पहिल्या दोन-तीन आठवड्यात तर याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पक्षाच्या रोज बैठका होत होत्या. त्यानुसार काम करताना एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे अशा संकटकाळात जो लोकप्रतिनिधी घराबाहेर पडेल, लोकांमध्ये मिसळून काम करेल, त्याला लोक सहजासहजी विसरणार नाहीत. कारण तेव्हा खरंच कुणी बाहेर पडत नव्हतं. त्यामुळे मी बाहेर पडून काम करता करता अनेक विषय माझ्या लक्षात येत गेले, त्यावर मी काम करत गेलो. एक धाग्यातून दुसरा धागा विणत जावं, तसं झालं. आर्थिक पुनर्वसन, पुण्यात जंबो कोविड केअर सेंटर सुरू करणं, मास्क-सॅनिटायझर वाटप असे अनेक विषय त्यातून मिळत गेले. त्या वेळी आम्ही आमच्या मतदारसंघाचा एक छोटा अहवाल रोज संध्याकाळी तयार करून व्हॉट्सअॅपद्वारा सर्वांना पाठवत होतो. त्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघाचा प्रत्येक भागानुसार तपशीलवार अहवाल नागरिकांना मिळत होता. प्रशासन वस्ती-वाडीत प्रत्यक्ष काम करत होतं. प्रशासनाला अशा वेळी स्थानिक पाठिंबा, सहकार्य आवश्यक असतं. ते मिळालं की त्यांचं काम सोपं आणि गतिमान होतं. त्यांचं मनोबल वाढतं. अशा वेळी लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून उतरल्यास आपल्या मतदारसंघातील लोकांना प्रशासनाकडून अधिक चांगली सेवा मिळते, ही बाब लक्षात ठेवून आम्ही इथे काम केलं. अनेक ठिकाणी बँकांचे लोक सामान्य लोकांना कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावत होते. सर्वसामान्य लोक, रिक्षावाले, कामगार आदींचं उत्पन्नच जर बंद आहे, तर हप्ते फेडणार कसे? अशा वेळी तिथे शक्य तितका हस्तक्षेप, मदतकार्य केलं. त्यामुळे ज्याला समाजासाठी काही काम करायची मनापासून इच्छा आहे, त्याच्यासाठी तर ही एक चांगली संधी होती असं मी मानलं आणि तसं काम करत गेलो.

 
Siddharth Shirole_1 
 

कोविडशी संबंधित मदतकार्य वगळून अन्य विषयांत आपण गेल्या वर्ष-दीड वर्षांत काय काम केलं?

यात आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे शिवाजीनगरमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापाशी जो रस्ता आहे - जो एका अर्थाने पुण्याचाएंट्री पॉइंटआहे, तेथील उड्डाणपूल जवळपास दहा वर्षांपूर्वी बांधला होता. तो पाडायचं या सरकारने ठरवलं. त्याला आम्ही विरोध केला नाही, कारण तो बांधलाच चुकीचा होता. मात्र मी पालकमंत्र्यांना मात्र सातत्याने सांगितलं की उड्डाणपूल लवकर पाडला गेला पाहिजे आणि पाडताना पर्यायी वाहतूक व्यवस्थादेखील उपलब्ध झाली पाहिजे. त्या दृष्टीने आराखडा बनायला हवा. त्यासाठी सातत्याने बैठकांमध्ये पाठपुरावा केला. त्यातून आता नव्या पुलाचा आराखडा हा पुढची चाळीस-पन्नास वर्षं उपयोगी पडू शकणारा असा तयार झाला आहे. आज मला याचं समाधान आहे की या पुलाचं नियोजन चांगलं झालं आणि त्यामध्ये मला योगदान देता आलं. कारण जवळपास निम्म्या पुण्याच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे. या निमित्ताने रस्ते, वाहतूक नियोजन आदी विषयांत काम करण्याची संधी मला मिळाली. पाषाण पंचवटी भागातून एक भूमिगत रस्ता गेली अनेक वर्षं प्रस्तावित आहे. हा भूमिगत बोगदा थेट सेनापती बापट रोड आणि पुढे कोथरूड असा बाहेर पडतो. एक मोठा आणि अत्यंत उपयुक्त असा हा प्रकल्प आहे. तो अनेक वर्षं प्रस्तावित आहे, मात्र त्याचा आम्ही सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता त्याला 100 कोटींचा निधी उपलब्ध झाला, सर्वेक्षण सुरू झालं. याबाबत पालकमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी या दृष्टीने सातत्याने चर्चा केली. या प्रकल्पामुळे सेनापती बापट रोड, लॉ कॉलेज रोडपासून ते अगदी औंध, पाषाण, बाणेर आदी सर्व भागांच्या ट्राफिकची समस्या पुढच्या किमान वीस-तीस वर्षांसाठी कमी होऊ शकेल. याचं सर्वेक्षण आता लवकरच पूर्ण होईल आणि काही मान्यता, परवानग्या मिळाल्या की लगेचच याचं काम सुरू होऊ शकेल. कदाचित या वर्षीदेखील. अशा प्रकारे या दोन प्रकल्पांना गती देण्यात मी यशस्वी ठरलो. याशिवाय सुरू असलेली कामं गतीने सुरू राहतील हे पाहणं सातत्याने सुरूच होतं. उदा. मेट्रोची कामं.

आमदार म्हटलं की त्याच्या मतदारसंघातील कामाबरोबरच विधानसभा सभागृहातील कामगिरीही महत्त्वाची ठरते. गेल्या वर्षभरात कोविडमुळे विधिमंडळ कामकाजावर मोठा परिणाम झाला, जेमतेम काही अधिवेशनं मिळाली. अशा परिस्थितीत सभागृहात आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यात आणि त्याचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात आपण कितपत यशस्वी ठरलात?

साधारणपणे सहा-सात वेळा विधानसभेत बोलण्याची संधी मला आतापर्यंत मिळाली. या वेळी मतदारसंघातील वेगवेगळे प्रश्न मांडले. उदा., खडकी भागातील काही प्रश्न होते ते मांडले आणि त्यानंतर त्याकरिता पाच कोटींचा निधी उपलब्ध झाला. एक अधिवेशन वगळता पुढील सर्व अधिवेशनं केवळ एकेक-दोनदोन दिवसांची झाली. त्यामुळे तिथे खूप काही करण्याची संधी मिळाली नाही. भविष्यात लवकरच कोविडची परिस्थिती निवळेल आणि नियमित अधिवेशनं सुरू होऊन तेथे माझ्या मतदारसंघाचे अधिकाधिक प्रश्न मी मार्गी लावू शकेन, असा मला विश्वास वाटतो.


Siddharth Shirole_1  

केंद्र सरकारच्या कोणत्या योजना आपण आपल्या मतदारसंघात कितपत प्रभावीरित्या राबवू शकलात?

शिवाजीनगर मतदारसंघ हा पूर्णपणे शहरी भाग असल्याने केंद्राची एमएनजीएलची गॅस पाइपलाइनची योजना येथे राबवण्यात आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळालं. ही योजना खूप चांगली आहे आणि उपयुक्त अशी आहे. मात्र अनेकदा त्याकरिता महापालिका आणि एमएनजीएल यांच्यामध्ये समन्वय करून द्यावा लागतो, अनेक ठिकाणी सिमेंटचे तयार रस्ते पाइपलाइनसाठी खोदायचे कसे, हा प्रश्न उभा राहतो. अशा अनेक प्रसंगी समन्वय साधण्याचं कामही आम्ही केलं. या पाच वर्षांत माझ्या मतदारसंघातील प्रत्येक सोसायटीत गॅस पाइपलाइन पोहोचली पाहिजे, असं उद्दिष्ट मी निर्धारित केलं आहे. ते वापरतील किंवा नाही हा ग्राहक म्हणून त्यांचा प्रश्न आहे. याशिवाय आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात सुमारे 30 हजार लोक रिश्रिळलरलश्रश आहेत. त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम सुरू आहे. या दोन प्रमुख योजनांचा उल्लेख आपल्याला करता येईल.

आता तुमच्या विद्यमान टर्मपैकी साधारण चार वर्षं शिल्लक आहेत. या चार वर्षांच्या काळातील आपलाड्रीम प्रोजेक्टकाय आहे?

वर उल्लेखल्याप्रमाणे दोन वाहतूक प्रकल्पांचं नाव मी इथे घेईन. एक म्हणजे विद्यापीठ भागातील उड्डाणपूल. या पुलाचं काम माझ्या या टर्ममध्ये पूर्ण झाल्यास ती माझ्यासाठी अत्यंत आनंदाची, समाधानाची बाब असेल. आणि भूमिगत बोगदा प्रकल्पही (पाषाण-पंचवटी ते सेनापती बापट रोड आणि कोथरूड) माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास या शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी त्यांचं मोठं योगदान असेल. या दोन प्रकल्पांवर मी प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं आहे. बाकी प्रकल्पांमध्ये केवळ सातत्याने पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे, जे काम अव्याहतपणे सुरू आहे आणि राहील. अनेकदा प्रशासन लोकप्रतिनिधीचेपेशन्सतपासत असतात. लोकांची कामं प्रशासनही विसरतं आणि लोकप्रतिनिधीही विसरतात. लोक तुम्हाला रोज भेटत नाहीत, त्यामुळे ती कामं मग मागे पडतात. असं होऊ देता सातत्याने आणि संयमाने पाठपुरावा करत राहिलं की कामं मार्गी लागतात. हीच गोष्ट थकता, अधिकाधिक आणि सातत्यपूर्ण जनसंपर्काच्या माध्यमातून करत राहण्याचं माझं उद्दिष्ट आहे.