संतसाहित्यातील ‘रामदर्शन’

विवेक मराठी    05-Jan-2021
Total Views |

5 ऑगस्ट 2020 रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत अयोध्येत श्रीराममंदिर निर्माणाचे भूमिपूजन झाले. 15 जानेवारीपासून देशभर राममंदिर निर्माणासाठी निधी संकलनाची मोहीम सुरू होत आहे. ‘राम माझा, राममंदिरास निधी माझाया भावनेने देशाच्या कानाकोपर्यातील रामभक्त या मोहिमेत सहभागी होतील. मकरसंक्रांत ते रथसप्तमी या काळात ही मोहीम चालेल. त्यानिमित्त श्रीराम भावजागृतीची लेखमाला सा. विवेकमध्ये प्रकाशित होत आहे. त्यातील हा दुसरा लेख संतसाहित्याचे गाढे अभ्यासक विद्याधर ताठे यांचा.

jay shree ram_1 &nbs 
 

 

नहि तद्भविता राष्ट्रं यत्र न रामो न भूपतिः ।

 

तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति

(- वाल्मिकी रामायण 2/37/29)


श्रीराम जेथे नसेल, ते राष्ट्र राष्ट्रच राहणार नाही आणि जेथे राम असेल तो उजाड प्रदेश, वनवासी भागही राष्ट्र होईल.’ थोर तत्त्वज्ञ, चिंतक, तपस्वी वशिष्ठ ऋषींचे हे वाल्मिकी रामायणातील उद्गार, प्रभू रामचंद्राचे अनन्य माहात्म्य कथन करणारे सार्थ समर्पक असे शाश्वत वचन आहे. भगवान विष्णूच्या अनेक अवतारांपैकी श्रीराम श्रीकृष्ण हे दोन अवतार भारताचे धु्रवतार्यासारखे अढळ असे सांस्कृतिक मानबिंदू आहेत, राष्ट्रपुरुष आहेत. ‘राम, कृष्ण आम्हा सणु नित्य दिवाळी’, ‘राम, कृष्ण आमुच्या जीवीचे जीवन।ही संतांची अभंग वचने, भारतीय जनमानसाचीच शब्दरूपे आहेत.


राम-कृष्णांच्या दिव्य चरित्रांनी मंडित रामायणाच्या, महाभारताच्या रेशमी धाग्यांनीच भारतीय संस्कृतीचे महावस्त्र विणलेले आहे.” असे विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेले आहे; एवढेच नव्हे, तरभारतवर्षाची साधना, भक्ती, ज्ञान आणि मनोरथ या दोन महापुरुषांच्या महाकाव्याच्या प्रासादात शाश्वत काळाच्या सिंहासनावर विराजमान झालेली आहेत.”


श्रीराम श्रीकृष्ण हे दोन अवतारी महापुरुष भारतीय सांस्कृतिक एकता, एकात्मता, समरसता यांची अधिष्ठानस्वरूप परमनिधाने आहेत. त्यांचा भारतीय जनमानसावर गेली शेकडो वर्षे विलक्षण प्रभाव असून भरतभूच्या सीमा पार करून देशोदेशीची सांस्कृतिक जीवने त्यांनी भारून टाकलेली आहेत.

मराठी साहित्यात संतवाङ्मयाचे योगदान अपूर्व ऐतिहासिक आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या वैभवशाली संतपरंपरेतील संत निवृत्तीनाथ ते थेट संत तुकडोजी, गोंदवलेकर महाराजांपर्यंतच्या प्रदीर्घ संत मालिकेतील सकल संतांनी आपल्या अभंगांमध्ये प्रभू रामाचा, रामभक्तीचा, रामनामाचा विविध अंगांनी गुणगौरव केेलेला आहे.

अणुमाजी राम, रेणूमाजी राम। तृणी काष्ठी राम वर्ततसे॥1

बाहेरी अंतरी राम चराचरी। विश्वी विश्वकार व्यापलासे॥2

रामे विण स्थळ रितेचि ते नाही। वर्ते सर्वाठायी राम माझा॥3

सकल संतजनांच्या मनी रामाविषयी अशी दृढ भावभावना, श्रद्धा आणि अपार भक्ती दिसून येते. रामभक्तीच्या असंख्य सुंदर छटांचा विलोभनीय इंद्रधनू संतांच्या अभंगातून विलसित झालेला आहे. सर्वांचा रामभक्तिभाव एकच असला, तरी शब्दाविष्काराची विविधता थक्क करणारी आहे.

उत्तर भारतातील संत कबीर आदी बहुतेक संतांचा राम हा निर्गुण आहे. पण मराठी संतांचा राम संत तुलसीदासाप्रमाणेच सगुण आहे. अर्थात मराठी संतांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या समत्व दृष्टीने सगुण-निर्गुण हा भेद व्यर्थ आहे. सगुण, निर्गुण दोन्ही एकच आहे. त्यामुळे आपणास मराठी संतांच्या अभंगामध्ये रामाचीसगुणआणिनिर्गुणअशी दोन्ही प्रकारची दिव्य शब्ददर्शने घडतात. ‘सगुण निर्गुण गुणामाजी गुण।’, ‘सर्वांघटी राम बिंबलासे।

 

दोन प्रकारांचेरामदर्शन

मराठी संतसाहित्याचा धांडोळा घेतला, तर आपणास दोन प्रकारांच्या रामाचे दर्शन घडते - 1) उपासना दैवत. परब्रह्म राम. नवविध भक्तीचे आराध्य दैवत असलेला पतितपावन श्रीराम असे आणि 2) देवबंधमोचक योद्धा राम, वीर पुरुषार्थाचा आदर्श. यातील पहिले परब्रह्म-उपासनादैवत म्हणून रामपर जे साहित्य आहे, ते भक्तिरसप्रधान आहे, तर दुसर्या योद्ध्या रामाचे चित्रण करणारे साहित्य हे भक्तीपेक्षाही वीररसप्रधान आहे.

राम उपासना ऐसी। ब्रह्मांड व्यापिनी पहा। राम कर्ता राम भोक्ता। रामरूप वसुंधरा॥ हाउपासना दैवतप्रकारातील पतितपावन भक्तवत्सल राम भक्तीच्या शब्ददर्शनाचा एक नमुना आहे. तरराम धर्माचे रक्षण।’, ‘रामे ताटिका वधिली।’, ‘रामे दैत्य संहारिले।ही अभंग चरणे योद्ध्या रामाचे वीररसपूर्ण दर्शन घडविणारी आहेत. संत एकनाथ यांचा अपवाद केला, तर बहुतेक वारकरी संतांचारामहा उपासना दैवत प्रकारातील, नवभक्तीचा विषय आहे. संत एकनाथांचा राम हा योद्धा देवबंधमोचक (वीररसप्रधान) आहे. तसाच संत रामदास स्वामींचारामहासुद्धा धर्मरक्षक, देवबंधमोचक, योद्धा आहे. सर्व संतांचा राम हा एकच आहे. पण त्या त्या संतांच्या काळची समाजस्थिती आणि त्या संतांचा रामायणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि उपदेशकार्याचा उद्देश यानुसार त्यांच्यारामरूपात, शब्दचित्रणात फरक झालेला दिसतो.

ज्ञानदेव-नामदेवादी संतांचापरब्रह्म राम

भारतवर्षामध्ये प्राचीन काळापासून उपासकांच्याशैवआणिवैष्णवअशा दोन मुख्य भक्तिपरंपरा प्रचलित आहेत. त्यामध्ये वैष्णव परंपरेत विष्णूंच्या अनेक अवतारांपैकीमर्यादापुरुषोत्तम श्रीरामआणिपूर्णावतारी श्रीकृष्णया दोघांना उपासकांमध्ये दैवत म्हणून सर्वाधिक मान्यता लाभलेली आहे. त्यामुळे वैष्णव साधुसंतांमध्येही रामभक्त कृष्णभक्त अशा दोन सशक्त परंपरा प्रचलित आहेत. महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायांपैकी प्रमुख असलेला वारकरी पंथ हा विठ्ठल देवतेचा उपासक असून विठ्ठल हे भगवान श्रीकृष्णाचेच भक्तवत्सल रूप आहे. वारकर्यांच्या अद्वैत दृष्टीने विठ्ठल, श्रीकृष्ण, श्रीराम, एवढेच नव्हे, तर शिव ही सारे एकाच ईश्वरी तत्त्वाची रूपे आहेत. आणि अशाच समन्वयवादी, उदात्त दृष्टीकोनाचे दर्शन आपणास ज्ञानदेवादी संतमंडळींच्या भक्तिसाहित्यात घडते. वारकरी भक्तिमंदिराचा पाया समजल्या जाणार्या संत ज्ञानदेवांनीजेथे रामनामाचा गजरू। तेथे बापरखुमादेवी वरू॥असे म्हटलेले आहे. राम, कृष्ण आणि विठ्ठल या तिन्ही देवांची एकरूपता व्यक्त करणारा हा एक अभंगचरण पाहा -

राम अयोध्येचा वासी। तोचि नांदे द्वारकेसी।

राम तोचि विठ्ठल झाला। रामदासासी भेटला॥

भगवान विष्णूंचा अवतार, साक्षात परब्रह्म, मर्यादापुरुषोत्तम पतितपावन, भक्तवत्सल अशा रूपात श्रीरामांचे गुण गात ज्ञानदेव -नामदेवादी संतांनी श्रीरामाची नामस्मरण भक्ती, उपासना केलेली आहे. या संतांची ही रामस्तुती, वाल्मिकी रामायणातील मानुष रामापेक्षा आनंद रामायण आदी जी रामायणे रामाला परब्रह्म मानतात, त्या कोटीतील आहे. ‘राम एव परं ब्रह्म, राम एव परं तप। राम एव परं तत्त्वं। श्रीरामो ब्रह्मतारकम्।रामोपनिषदातील हा श्लोक ज्ञानदेव-नामदेव प्रभावळीतील संतमंडळींनी आपल्या अभंग साहित्यात अनुसरला आहे, असे दिसते. त्यामुळे या परंपरेतील संतांनी रामचरित्रातील विविध प्रसंगांचा केवळ उल्लेख करीत, मुख्यरामनामकसे तारक आहे हेच मोठ्या भाविकपणे कथन केलेले आहे. ज्ञानदेव प्रभावळीतील संत सेना महाराजांचा हा अभंग पाहा - ‘रामे अहिल्या उद्धरली। रामे गणिका तारिली॥1, म्हणा राम श्रीराम। भवसिंधू तारक नाम॥2 अशाच प्रकारे नामस्मरण भक्तीचे साधन म्हणूनरामनामाचे अनंत अगाध माहात्म्य बहुतेक संतांनी आपल्या अभंगातून गाइलेले आहे.

संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत जनाबाई, संत सोपानदेव, संत सेना, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत जोगा परमानंद, संत जगमित्र नागा, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत निळोबाराय या सर्वांनीरामस्तुतीगायलेली आहे त्यातून रामनामाचेच महत्त्व प्रतिपादन केलेले आहे. संत ज्ञानदेव गाथेत, संत नामदेव गाथेत, संत तुकाराम गाथेतराम नामगुणसंकीर्तन करणारी छोटी छोटी स्वतंत्र प्रकरणेच आहेत, पण ती उपासनेच्या अंगाने गाइलेली आहेत. उदाहरणार्थ -‘राम नाम हा महामंत्र।’, ‘धन्य जन्म त्याचा जो राम उच्चारी वाचा।’, ‘धन्य धन्य आमुचे जन्म। मुखी रामनाम उत्तम॥हे अभंगचरण त्याची द्योतक आहेत.

शिवस्वराज्य काळातील सुविख्यात संतकवी श्रीधरस्वामी (.. 1659 ते 1730) यांनी लिहिलेलारामविजयग्रंथ मराठी भाविकांमधील सर्वाधिक लोकप्रिय ग्रंथ आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सामूहिक पारायण सोहळा करून आबालवृद्धांमध्ये हा ग्रंथ वाचला जातो. यारामविजयचा उद्देश मात्र भाविकांमध्ये भक्तिभाव वृद्धिंगत करण्याचाच होता, कारण तो ग्रंथ शिवस्वराज्य काळात लिहिला गेला.

अगदी अलीकडच्या काळातीलनामयोगीसंत गोंदवलेकर महाराज (.. 1845 ते 1913) हेसुद्धाराम एक उपासना दैवत, परब्रह्ममानणार्या परंपरेतील आहेत. रामनामाच्या उपासनेवर त्यांचा एकूण भर आहे. ‘नाम घेणार्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका कधीही रामनाम सोडू नकाहाच त्यांनी भक्तांना अंतिम उपदेश केलेला आहे. ‘नामापरते मानू नका सुख। रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण।’ ‘राम हा देवळात-मंदिरात नसून आपल्या हृदयात आहे. राम कर्ता अशा भावाने जगाहा त्यांच्या एकूण उपदेशाचा मथितार्थ आहे.

या पार्श्वभूमीवर संत एकनाथ आणि संत रामदास स्वामी यांचारामबराच वेगळा आहे. तो पतितपावन भक्तवत्सल आहेच, त्यापेक्षा तो योद्धा आहे. ‘रणी भंगला रावण। नित्य विजयी रघुनंदन। असा स्वत्वरक्षक, स्वधर्मरक्षक आहे. वीरवृत्तीला प्रेरणा देणारा आहे.

एकनाथांच्याभावार्थ रामायणमधीलदेवबंधमोचक राम

संत एकनाथांच्या दृष्टीनेरामायणहे राष्ट्रीय महाकाव्य आहे. रामाचा त्याग, मातापितानिष्ठा, बंधुभाव, नित्यानित्यविवेक, दीनवत्सलता हे सारेच विलक्षण आहे, पण त्यापेक्षाही रामाचा अतुलनीय असीम पराक्रम, रामाचे समाजसंघटनकौशल्य, स्वत्वरक्षणाची स्वधर्मरक्षणाची विजिगीषू वृत्ती, रामाचे रणनीतिचातुर्य आणि जन्मभूमीविषयीचे उत्कट प्रेम हे गुण संत एकनाथांना अधिक भावतात. प्रभू रामांच्या यास्वधर्मरक्षक योद्धाया रूपाचे समाजाला दर्शन घडविण्याच्या त्याद्वारे निद्रिस्त समाजात क्षात्रतेज, वीरवृत्ती जागविण्याच्या उद्दिष्टानेच त्यांनीभावार्थ रामायणग्रंथाची स्वतंत्र रचना केलेली आहे. मराठी माणसाला संत एकनाथांनीभावार्थ रामायणग्रंथाद्वारे मराठीतून रामचरित्राचा पहिला परिचय करून दिलेला आहे. चाळीस हजार ओव्यांचा हा ग्रंथ हे संत एकनाथांच्या कार्याचे विशेषत्व आहे.

संत ज्ञानदेव-नामदेवांच्या (तेरावे शतक) काळापेक्षा संत एकनाथांच्या (16वे शतक) काळची परिस्थिती खूपच वेगळी होती. संत ज्ञानदेवांच्या काळात यादवराजांचे हिंदू राज्य होते. नामदेवांच्या उत्तरकाळात महाराष्ट्रात बहामनी मुस्लीम राजवट सुरू झालेली होती. ती हिंदू प्रजेस उदारपणे वागविणारी होती. त्यामुळे ज्ञानदेव-नामदेव प्रभावळीतील संतांचे रामवर्णन हे भक्तिमार्गी उपासना देवता म्हणून आहे. परंतु संत एकनाथांच्या काळात तालिकोटच्या लढाईनंतर मुसलमांनांच्या पाच शाह्या (राजवटी) एक झाल्या हिंदू प्रजेवर धर्मांतरणासाठी अनन्वित अत्याचार सुरू झाले. अशा काळात हिंदू प्रजेमध्ये स्वधर्म, स्वदेश या विषयी वीरवृत्ती-क्षात्रतेज जागृत करण्याच्या हेतूने संत एकनाथांनी वीररसयुक्त रामचरित्रभावार्थ रामायणग्रंथाद्वारे समाजापुढे ठेवले. संत एकनाथांचीभारुडेभावार्थ रामायणयांनी हिंदू समाजात स्वत्वाची, स्वाभिमानाची जागृती केली.

फेडावया देवाची साकडी। स्वधर्म वाढवावया वाढी।

नामे मोक्षाची उभवावया गुढी। सूर्यवंशा गाढी दशा आली॥

संत एकनाथांच्या भावार्थ रामायणातील ही एक ओवी, त्या ग्रंथाच्या एकूण भावाचे संक्षेपाने दर्शन घडविणारी आहे. वाल्मिक ऋषींच्या रामायणापेक्षा संत एकनाथ यांचे भावार्थ रामायण बरेच वेगळे आहे. वाल्मिकी रामायणात सीतामुक्तीसाठी लंकादहन आहे, तर संत एकनाथ सीतेसमवेतच रावणांच्या बंदिवासातील देवांच्या बंधमुक्तीसाठी रावणवध केल्याचे भावार्थ रामायणात वीररसपूर्ण शैलीत कथन करतात. ‘देवबंधविमोचनही संत एकनाथांची संकल्पनाच पुढे समर्थ रामदासांनीही स्वीकारलेली आहे.

रावणाच्या बंदिवासात केवळ सीताच नव्हती, तर अनेक देवही घरगड्यासारखी कामे करीत खितपत पडलेले होते. ‘देवांचा राजा इंद्र चवर्या ढाळत होता, चंद्र छत्री धरीत होता, एवढेच नव्हे तर यम पाणी भरीत होता. गणपतीला गाढवे राखण्याचे काम रावणाने लावले होते, हे वर्णन मुळातून वाचण्यासारखे आहे. अशा सकल देवांची रावणाच्या बंदिवासातून सुटका करण्याचा महापराक्रम प्रभू रामांनी केला, असा रामकार्यास उदात्त व्यापक अर्थ संत एकनाथांनी दिला. ‘रावण म्हणजे धर्मांध मुसलमान बादशहा, सीता म्हणजे धर्म आणि सकल देव म्हणजे समस्त हिंदू प्रजाअसे हे रूपक आहे. या रूपकाद्वारे मदांध, सत्तांध, धर्मांध मुसलमान सुलतानांविरुद्ध असंघटित, दुर्बल, असाहाय्य हिंदू प्रजेला वानरसेनेप्रमाणे एक येऊन स्वधर्मासाठी, स्वदेशासाठी प्राणार्पणाने संघर्ष करण्याची प्रेरणा संत एकनाथांनी दिलेली आहे. संत एकनाथांचे धर्मरक्षण कार्य केवळ स्तुत्यच नव्हे, तर राष्ट्रउपकारक ठरलेले आहे. म्हणूनच अनेक राष्ट्रप्रेमी विचारवंत-लेखक-समाजधुरीणांनी एकनाथांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधन युगातील युगपुरुष न्यायमूर्ती .गो. रानडे यांनीहे महाराष्ट्राचे खरे नाथ होत।अशा शब्दात संत एकनाथांचा कार्य गौरव केलेला आहे.

संत रामदासांचाकोदंडधारी राम

माता रामो मत्पिता रामचंद्रः। स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः॥

बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा स्तोत्रामध्ये प्रभू रामचंद्रांविषयी जो भक्तिभाव व्यक्त केला आहे, तोच भाव रामाविषयी संत रामदासांच्या मनात नित्यनिरंतर वसत होता. ‘राम माझा स्वामी’, राम हाच रामदासांचा सद्गुरू होता आणिरामहीच त्यांची इष्ट उपासना देवता होती. रामदासांनीच लिहिलेलीमाय बाप बंधु स्वजन सांगाती। तूचि आदिअंती माहियेर।ही भावरचना रामाचे त्यांच्या जीवनात कार्यात कशा प्रकारचे अनन्य स्थान होते, ते व्यक्त करणारी आहे. रामाचे कोदंडधारी रूप हे रामदासांचे आवडते रूप होते. संत रामदास पंढरपूरला विठ्ठल दर्शनास गेले, तेव्हा त्यांनी विठ्ठलालाचापबाण कोठे गेले?’ असा प्रश्न केला होता. इतके ते राममय झालेले होते. रामाच्या साक्षात्कारी दर्शनातूनच रामदासांचे कार्य सिद्धीस गेले. त्यांना जीवनाच्या अनेक टप्प्यांवर अनेकदा रामदर्शन झालेले होते कार्याची प्रेरणा प्राप्त होत होती.

रामाची पदे मानसी धरीन। विश्व उद्धरीन हेळामात्रे॥

रामदासांच्या राष्ट्रकार्याचा हा संकल्प होता. देशभ्रमणामध्ये त्यांनी धर्मांध मुसलमानी सुलतानी संकटाने गांजलेला, पिचलेला, हिंदू समाज पाहिला आणि या समाजाला परदास्यातून सोडविण्यासाठी त्यांनीदेव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावाअसा राजकारणाचा घाट घातला. इतर सर्व संतांप्रमाणे त्यांनी हरिकथा निरूपणाला पहिले प्राधान्य दिलेच, तसेच त्यानंतर त्यांनी थेट राजकारणाला - म्हणजे राष्ट्रकारणाला स्वदेश-स्वधर्मरक्षणाला अग्रक्रम दिला.

समर्थ रामदास म्हणजेदासबोध’; पण रामदासांनीदासबोध’, ‘आत्माराम’, ‘मनाचे श्लोकया काव्याशिवाय रामावर विपुल लेखन केलेले आहे. त्यांच्या ओवी शतकातील एक शतक रामावर आहे; एकवीस समासातरघुनाथ ध्यान’, ‘रघुनाथ चरित्रअसे दोन समास आहेत. तसेच त्यांच्या रामायणपर 1462 ओव्यांची दोन कांडांत आणि इतर पदे स्फुट रचनांमध्ये रामच राम भरलेला आहे. यामध्येधन्य राम उपासना।म्हणत रामोपासनेला बलोपासनेचेच साधनरूप दिलेले आहे.

श्रीरामांचेश्रीराम जय राम जय जय राम’, ‘रघुपती राघव राजारामअसे जप मंत्र रामोपासनेत प्रचलित होते. पण समर्थ रामदासांनीजय जय रघुवीर समर्थअसा भक्तीबरोबरच वीररसयुक्त नाममंत्र-नामघोष जाणीवपूर्वक रूढ केला. ‘राम’, ‘सीताराम’, ‘अयोध्येचा राजा’, ‘रघुनाथया नामापेक्षारघुवीरशब्दातचवीरशब्द समाविष्ट आहे आणि पुढे रामदासांनी समर्थ शब्दही नेमकेपणे चपखलपणे योजलेला आहे. ‘जय जय रघुवीर समर्थम्हणताच प्रभू रामाचे कोदंडधारी वीर योद्धा रूप डोळ्यापुढे उभे केले आहे.

रामदास स्वामींनीही वाल्मिकी रामायणातील रामापेक्षा वेगळे, संत एकनाथांच्या भावार्थ रामायणात वर्णितदेवबंधविमोचक योद्ध्या रामाचेचित्र समाजापुढे ठेवले आहे. संत एकनाथ संत रामदास यांचे जवळचे नातेसंबंध होते. एकनाथांच्या पत्नी गिरिजाबाई या रामदासांच्या मातोश्री राणूबाईंच्या भगिनी होत्या. रामदास स्वामींचे मामा भानजी गोसावी वारकरी कीर्तनकार होते आणि ते संत एकनाथांचे अनुग्रहित होते. अशा कौटुंबिक संबंधामुळेच रामदासांना एकनाथांचे भावार्थ रामायणही परिचित होते.

राम धर्माचे रक्षण। संरक्षण दासाचे॥

रामे ताटिका वधिली। रामे सीता उद्धरली॥

रामे पाषाण तारिले। रामे दैत्य संहारिले॥

रामे बंध सोडविले। आनंदले सुरवर॥

रामे रक्षिले भक्तासी। रामे सोडविले देवासी॥

समर्थ रामदास स्वामींचा कोदंडधारी रघुवीर असा योद्धा आहे. रामाच्या वर्णनात रामदासांनी अनेक ठिकाणीपायी ब्रीदाचा तोडरअसे म्हटलेले आहे. आणि रामरायाचे ब्रीद कोणते? तरपरित्राणाय साधुनाम्। विनाशायच दुष्कृताम्।सज्जनांचे रक्षण, राक्षसाचे निर्दालन करून प्रजाजनांना सुखी, समृद्ध करीत मांगल्याची गुढी उभा करणे.

जय जय रघुवीर समर्थ।