सामान्य व्यक्तीचे असामान्य कर्तृत्व

विवेक मराठी    16-Nov-2021
Total Views |
@ज्योत्स्ना निकुम्ब 8999866403
 
'Masale queen' कमलताई परदेशी यांच्या छोट्याशा उद्योगाचे रूपांतर एका बहुउद्देशीय औद्योगिक कंपनीत झाले. अंबिका मसाले आज 42 प्रकारचे मसाले तयार करते. त्यांना बिग, ताज सारख्या नामांकित हॉटेल्समध्ये व बाजारात मोठी मागणी आहे. आज या कंपनीची वार्षिक उलाढाल 80 कोटींची आहे. कधी दुसर्‍याच्या शेतात मजुरी करणार्‍या एका स्त्रीने तिच्यासारख्याच 200 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील तब्बल 56 पुरस्कार कमलताईंच्या नावावर झाले आहेत. त्यांची यशोगाथा मांडणारा लेख...


MASALA_4  H x W

Father of Scientific Management F. W. Taylor says, ""Management is the art of knowing what you want to do and then seeing that it is done in the cheapest way.''
 
हे Management च्या भल्यामोठ्या पुस्तकात लिहिलेले असते आणि त्याचा अभ्यास करून मग प्रत्यक्षात उतरविण्यास लोक झटत असतात. परंतु कुठल्याही शाळा-कॉलेजमध्ये शिकून मिळवलेल्या ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष परिस्थितीशी झुंज देत, जीवनातील चटके सहन करीत, खंबीरपणे उभी राहिलेली व्यक्ती ही कुठल्याही उच्चशिक्षित व्यक्तीपेक्षा अधिक प्रभावशाली असू शकते. अनुभवाच्या बोलाचा प्रभाव काही वेगळाच असतो. अशाच एका प्रभावशाली आणि जिद्दी आणि स्वत:ची ओळख निर्माण करणार्‍या आधीच्या भूमिहीन मजूर आणि आताच्या "Masale queen' म्हणून ओळखल्या जाणार्‍या कमलताई परदेशी. सहकार भारतीच्या आळंदी अधिवेशनात कमलताई यांची मुलाखत ऐकण्याची व त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांचा एक एक शब्द मनाला स्पर्शून गेला.
 
कमलताई परदेशी पुण्याजवळील दौंड तालुक्यातील खुटबाव गावात राहणार्‍या. अतिशय गरीब घरात जन्माला आलेली, आईवडिलांची तिसरी मुलगी. आईवडिलांना खूप आनंद झाला, म्हणून नाव आनंदी ठेवले. गरिबीच्या परिस्थितीमुळे शिक्षण नाही, पोट भरण्यासाठी फक्त कष्ट करणे एवढेच माहीत होते. मात्र लहान असतानाच आनंदी सगळ्या कामात पुढे असे. म्हणजे कुणाला दवाखान्यात न्यायचे असेल, कुणी आजारी असल्यास सोबत करणे, किंवा लहानसहान कामे करून लोकांना मदत करणे, यामुळे लोकांच्या संपर्कात राहत असे. छेलशश्र ेलक्षशलींर्ळींशचा धडा किंवा त्याची पाळेमुळे लहानपणीच रोवली गेली. ग्रामीण भाग आणि शिक्षण नाही, आणि समाजातील चालीरिती म्हणून सोळाव्या वर्षी लग्न झाले आणि लग्नानंतर आनंदीचे नामकरण ‘कमल’ असे झाले. परंतु त्या नवीन आयुष्यातही पदार्पण गरिबीतच झाले. एक भूमिहीन शेतमजूर म्हणून मिळेल तिथे जाऊन शेतात मजुरी करणे, रस्त्याची कामे करणेे, पाइपलाइनचे काम करणेे किंवा दगड फोडणे. ही कामे करत असताना जिथे असणार तिथे स्वत:च्या बाळाची झोळी बांधली आणि मिळेल तिथे चूल मांडली. काही दिवस त्यांनी स्मशानभूमीवरदेखील आपली चूल मांडली आहे, त्यांना तीन मुली झाल्या. गरिबीच्या परिस्थितीत त्यांना आणखी अपत्य नको होते. नवरा, सासरचे लोक आणि समाज या सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.
 
 
हे दगड फोडणारे हात कधी मसाले कुटून जर्मनी आणि इतर देशांपर्यंत पोहोचले, याचे त्यांना स्वत:लादेखील आश्चर्य वाटते. कधी स्वप्नातदेखील नाही पाहिले, पण ते प्रत्यक्ष घडले. भूमिहीन शेतमजूर ते एक यशस्वी बहुराष्ट्रीय कंपनीपर्यंतचा त्यांचा हा प्रवास Managementच्या point of viewनेदेखील अभ्यासण्याजोगा आहे. शेतात काम करताना त्या शेताची मालकीणबाई उशिरा आली, मग उशिरा येण्याचे कारण कळले, ते होते बचत गट. 2000 साली बचत गटांचे पेव फुटले होते आणि शेतमजुरी करणार्‍या महिला यात बचत करीत होत्या. कमलताईंना 8 रुपये मजुरी मिळत असे आणि घरातल्या सगळ्यांची पोटे भरण्यातच ती मजुरी संपत असे. पण तरीदेखील जवळच्या महिलांमध्ये हे बचत गट काय असते, आपण करू शकतो का? हे जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. मुळातच बोलक्या स्वभावाच्या कमलताईंकडे बँकेत जाण्याची जबाबदारी सोपविली आणि मनात भीती घेऊनच त्या बँकेच्या दारात जाऊन पोहोचल्या. भीती यासाठी की हातात एक पैसाही नसताना बँकेत जाऊन काय करायचे आणि कुणाशी बोलायचे? त्यांना आजही त्यांचा बँकेत जाण्याचा पहिला दिवस आठवतो. त्या खूप वेळ बँकेच्या दारातच उभ्या होत्या. बर्‍याच वेळानंतर त्यांना काय काम आहे म्हणून विचारण्यात आले आणि तेथील मॅनेजर साहेबांनी त्यांना आत बोलावून सर्व माहिती दिली. त्या आजही बँक ऑफ महाराष्ट्रच्या मॅनेजर साहेबांचे आभार मानतात की त्यांनी पैसे भरण्याची माहिती दिली. “कुठलेही काम करायचे तर दोन तरी व्यक्ती पाहिजेत, एकट्याने कुठलेही काम होत नाही.” त्यांच्या या वाक्यात संघटनाचे महत्त्व समजते. Organizing managementचा base समजला जातो. याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण तर त्यांनी लहानपणीच घेतले आणि अनुभवले होते. त्यांनी त्यांच्यासारख्याच काम करणार्‍या 5 बायकांना एकत्र आणून “काहीतरी केलं पाहिजे” हा विचार बोलून दाखवला. त्यांनी प्रथम पैशांची बचत करायला सुरुवात केली. म्हणजे capital raising.. दिवसभरात कमावलेली मजुरी खाण्यासाठी पुरत नव्हती, तर बचत कुठून करणार? मोठा प्रश्न होता. मग त्यांनी जास्तीचे काम करायचे ठरवले आणि पाचही जणी जास्त काम करून 5 रुपये रोज कमावू लागल्या. ‘अंबिका’ नावाने बचत गट सुरू झाला. काही दिवसात त्यांच्याकडे थोडे पैसे जमले. याठिकाणी आपल्याला त्यांचे ढशरा ुेीज्ञ पाहायला मिळते.
 


MASALA_1  H x W 
 
जे आपण करू शकतो, जिथे आपल्याला लिहिण्या-वाचण्याची गरज पडणार नाही आणि विकले नाही गेले तरी आपापसात वाटून वापरू शकतो, ते काम करू असे त्यांनी ठरवले आणि अनेक उद्योगांचा विचार केल्यानंतर त्यांनी मसाले बनविण्यास प्राधान्य देण्याचे ठरविले.
 
managementच्या भाषेत स्वत:च्या trength, weakness, opportunities, threats (SWOT) याचा अभ्यास केला.
 
मसाले बनविण्यास बचत गटातून 300 रुपयांची गुंतवणूक करायचे ठरविले. त्यासाठी लागणारा कच्चा माल कमीत कमी पैशात आणि जवळच मिळेल, असे ठिकाण शोधले. कुठे बाहेर गेल्यावर त्यांना लागणारा कच्चा माल कमी भावात दिसला की तो घेऊन डोक्यावर उचलून आणायचा. म्हणजेच शक्य होईत तेवढे Cost minimization करायचे. मसाले तयार करायला सुरुवात करायचे ठरले. कच्चा माल मिळाला, पण मसाला बनविण्यासाठी जागा नव्हती. कारण त्यांची झोपडी अगदी छोटी आणि त्यातही ऊन, वारा, पाऊस आणि प्राणी सगळ्यांसाठी खुली. मग एका शाळेच्या आवारात त्यांनी काम सुरू केले. मसाला बनविण्यास सुरुवातीला त्यांच्याकडे कुठलेही साधन उपलब्ध नव्हते, तरीही खचून न जाता जिद्दीने काम पूर्ण करायचे ठरविले. मग पारंपरिक पद्धतीने त्यांनी खल आणि बत्ता दुसरीकडून मागवून हाताने मसाले कांडून काम चालू केले.
 
त्यांना या वेळीही मागे खेचणारे खूप लोक होते. जवळच एक मसाला फॅक्टरी होती. त्या फॅक्टरीत तयार होणार्‍या मसाल्याचा सुगंध दरवळत असताना तुमचे मसाले कोण खाणार? असेही त्यांना एकूण घावे लागले. परंतु कोणताही व्यवसाय करण्यास फक्त सुशिक्षित असणे महत्त्वाचे नाही, तर काहीतरी चांगले करून दाखविण्याची तळमळ आणि जिद्द असणे गरजेचे असते. त्यांच्या या छोट्याशा सुरुवातीलाही बाजारात पदार्पण करण्यापूर्वीच productसाठी ही  threat होती.
 
अपार प्रयत्नांनंतर मसाले तयार झाले. मसाले तयार तर झाले, पण मसाले विकायचे कसे? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आला. यासाठी शोध चालू केला आणि जवळच असलेल्या किराणा दुकानातून प्लास्टिक पिशवी घेऊन त्यातून मसाले विकायला सुरुवात केली. मग त्याला नाव दिले बचत गटाचेच - ‘अंबिका मसाले’. Product packeging and branding केले.
 
मसाले विकायला सुरुवात झाली. आता मार्केटिंग करताना कमलताईंचे प्रभावी बोलणे कामी आले. Effective Communication कामी आले. त्यांनी ताडले की ऑफिसात काम करणार्‍यांना मसाले तयार करण्यासाठी वेळ नसणार, म्हणून त्यांनी आपला मोर्चा सरकारी ऑफिसात वळविला आणि कमलताईंच्या मसाल्याची चव कमाल दाखवू लागली. अनेक ऑफिसांत त्यांच्या मसाल्याचा सुगंध दरवळू लागला.


MASALA_3  H x W

त्यांच्या गावातील पंचायत समितीने पुण्यातील भीमथडी जत्रेची माहिती दिली आणि त्यात त्यांच्या बचत गटाची निवड झाल्याचे सांगितले. अंबिका मसाल्याची आता त्या छोट्याशा गावातून शहराकडे घौडदौड सुरू झाली. परंतु हा त्यांचा पहिलाच मोठा अनुभव होता. त्यामुळे मसाले किती प्रमाणात बनवायचे याचा त्यांना अंदाज आला नाही. त्यांनी भीमथडी जत्रेत 5 किलो मसाला विकायला आणला आणि पहिल्याच दिवशी तो संपलाही. आणखी दोन दिवस शिल्लक होते, परत जाऊ शकत नव्हते, कारण गाडीभाड्याचा प्रश्न होता. आता राहिलेल्या दोन दिवसांत काय करायचे, म्हणून त्यांनी एक शक्कल लढविली आणि झालेल्या नफ्याचाच पैसाच परत गुंतवून अजून काही पैसे कमावता येतात का, हे पाहायचे ठरविले. जवळ असेल्या सगळ्या रकमेतून पुण्यातूनच टरबूज आणली. ती विकण्यासाठी त्यांनी टरबुजाच्या फोडी करून फ्रूट प्लेट बनवून विकली आणि काही टरबुज customeला अगदी गाडीत ठेवून देण्याची सेवा दिली. Means customer is God म्हणजेच ग्राहक हा देव आणि आपल्या ग्राहकांना खूश केले. यात फार नफा नाही, पण शिकायला मिळाले - म्हणजेच  handson training  मिळाले.
हे सर्व करत असताना त्यांना बिग बझारमध्येदेखील मसाले विकण्याची संधी मिळाली. बिग बझारमध्ये त्यांना मसाले घेण्यापूर्वी मीटिंगसाठी जावे लागे. त्या म्हणतात, “मीटिंगमधले इंग्लिश मला नाही कळायचे, पण "quality' हा शब्द मात्र समजत होता.” त्यांनी त्यांच्या मसाल्याच्या क्वालिटीकडे मात्र पूर्ण लक्ष दिले. त्या म्हणतात, “आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली असेल म्हणजे आपलं नाण खणखणीत असेल, तर त्याला कुणी अडवू शकत नाही.”
 
यानंतर त्यांनी पल्ला गाठला तो वांद्रे-मुंबईचा. त्यांचा इथला अनुभव तर अगदी वेगळा होता. जाताना त्यांनी 10 किलो मसाला नेला आणि पहिल्याच दिवशी संपला. परत दोन दिवस काय करायचे? दुसर्‍या दिवशी त्यांनी वाशी बाजारपेठ गाठली आणि पूर्ण बाजारपेठ पायाखाली घातली. त्यांच्याकडे मसाला विकून आलेल्या पैशातून काय घ्यायचे विचार केला. त्या ठिकाणी त्यांना वरची पाने पिवळी झालेला मका दिसला, पण पिवळ्या पानांमुळे कुणी घेत नव्हते, म्हणून तो मला त्यांनी कमी भावात दिला. हा निर्णय त्यांनी स्वत: घेतला. (Decision making. .) तो मका परत वांद्य्रात आणला, त्याची वरची पानं काढली आणि मका हिरवागार दिसू लागला, मग तोच मका ‘शुगर फ्री sweet corn'’ असे म्हणून त्यांनी तो मोठ्या शिताफीने विकला व त्यातून व्यवस्थित नफा मिळविला. दिसते सगळ्यांनाच, पण ती आवश्यक नजर सगळ्यांकडेच असते असे नाही. यात त्यांचे मार्केटिंग strategy and marketing skill दिसते.


MASALA_2  H x W
 
आलेल्या सर्व महिला आनंदी झाल्या. मिळालेला नफा सर्वांना वाटला. Profit sharing, जे काम करणार्‍या लोकांना समाधान आणि आपलेपणाची भावना देते. म्हणजेच employee satisfaction and employee empowerment. कमलताई म्हणतात, “मला बडबड करण्याची सवय आहे. त्यामुळे लोक पटकन जोडले जातात.” मला वाटते, कुठल्याही व्यावसायिकासाठी अत्यावश्यक असणारा हा महत्त्वाचा गुण आणि व्यवहारचातुर्य त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी त्याचा पूर्ण उपयोग करून घेतला.
 
कालांतराने जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी मदत विचारल्यावर कमलताईंनी अतिशय चातुर्याने “माझ्या मसाल्यांसाठी जर्मनीची बाजारपेठ द्या” सांगितले, आणि त्यांना अंबिका मसाल्यांसाठी जर्मनीची बाजारपेठ खुली झाली. Marketing opportunity.
 
त्या म्हणतात, “व्यवसाय करताना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. कुठल्याही कामाची लाज वाटू देऊ नका. आपली चूक लगेच मान्य करा. चांगले विचार ठेवा चांगलेच होईल. व्यवहार पारदर्शक ठेवा. आपल्याबरोबर काम करणार्‍या लोकांना जीव लावा, माणसं जपा. स्वत: निर्णय घ्या. स्वत:च्या अपयशाचे खापर दुसर्‍यावर फोडू नका.” आपण पाहिले, तर managementची सगळी  principles त्यांनी आपल्या व्यवसायात लागू केलेली दिसतात.
 
 
त्यांना मुलाखतीत शेवटचा एक प्रश्न विचारला गेला की “तुम्हाला कोटी रुपये दिले, तर तुम्ही तुमचा हा तुमचा व्यवसाय विकणार का?” यावर कमलताईंनी खणखणीत उत्तर दिले, “कुणी माझ्यासमोर पैशाचा डोंगर जरी उभा केला, तरी मी विकणार नाही. स्वत:च्या घामाने आणि रक्ताने शिंपूून हा व्यवसाय उभा केला आहे. हा व्यवसाय नाही, माझा जीव आहे.” कितीही शिकलेला माणूस काय बोलणार यावर.. प्रेक्षागृहाने प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या उत्तराचे कौतुक नसते केले, तर नवल.
कमलताई म्हणतात, “धंद्यात quality आणि पारदर्शक व्यवहार असणे खूप महत्त्वाचे आहे.”
 
एका झोपडीत सुरू केलेला व्यवसाय स्वकर्तृत्वाने किती उंचीवर नेऊन ठेवला आहे.
 
एक वेळ अशी होती की त्यांच्याकडे बचत गटासाठी आधार कार्ड नव्हते. आज त्यांनी फूड लायसन्स मिळविले आहे. इन्कम टॅक्सविषयी या व्यवसायासाठी आवश्यक सर्व बाबींची त्यांना व्यवस्थित माहिती आहे. छोट्याशा उद्योगाचे रूपांतर एका बहुउद्देशीय औद्योगिक कंपनीत झाले. अंबिका मसाले आज 42 प्रकारचे मसाले तयार करते. त्यांना बिग, ताज सारख्या नामांकित हॉटेल्समध्ये व बाजारात मोठी मागणी आहे. आज या कंपनीची वार्षिक उलाढाल आज 80 कोटींची आहे. कधी दुसर्‍याच्या शेतात मजुरी करणार्‍या एका स्त्रीने त्यांच्यासारखाच 200 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांना अनेक management आणि business institutesमध्ये, तसेच रोजगार मार्गदर्शन करणार्‍या ठिकाणी मार्गदर्शन करण्यास बोलावले जाते. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील तब्बल 56 पुरस्कार कमलताईंच्या नावावर झाले आहेत. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून त्यांना गौरविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक आर्थिक शिखर परिषद व जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी त्यांच्या कर्तृत्वाची वाखाणणी केली आहे.
 
 
सभागृहात प्रवेश करताना पाहिलेल्या कमलताई आणि सभागृहातून बाहेर पडताना पाहिलेल्या व मला समजलेल्या कमलताई खूप खूप वेगळ्या होत्या.
 
कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता management पूर्णपणे कोळून प्यायलेला या कमलताईंच्या कर्तृत्वाला अभिवादन.