फुटीरतावाद्यांचा ‘एल्गार’

विवेक मराठी    05-Feb-2021
Total Views |

शर्जिल उस्मानी या दिल्ली दंगलीतील आरोपीने संबंधित मंचावरून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या. परंतु देशभरात विखुरलेले नक्षलवादी, जिहादी, खलिस्तानी वारंवार भारतीय संविधान संसद, तपासयंत्रणा भारतीय संघराज्य यांच्याविरुद्ध जमावाला चिथावणी देत आहेत, याकडे सोयीस्कर किंवा अज्ञानातून दुर्लक्ष होत आहे.


Sharjeel Usmani sedition_

31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे काही संघटनांनी एकत्र येऊनएल्गार परिषदया नावाने कार्यक्रम भरवला होता. त्या कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळून जीवित वित्तहानी झाली होती. पोलिसांनी या घटनेसंदर्भात केलेल्या तपासात देशभरातून जवळपास 22 व्यक्ती अटकेत आहेत.

 
सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik
 

संबंधित व्यक्ती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) या दशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे तपासात पुढे आले आहे. सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे.

अशी अत्यंत विवादित हिंसक पार्श्वभूमी असलेल्या कार्यक्रमाला 30 जानेवारी 2021 रोजी पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा परवानगी दिली. या कार्यक्रमात देशविरोधी कृतींसाठी कुप्रसिद्ध असलेल्या अरुंधती रॉयपासून दंगलीचे गुन्हे असलेल्या आरोपींना व्याख्याते म्हणून बोलवले गेले होते. त्यांना बोलवण्यात कबीर कला मंच या नक्षलवाद्यांची फ्रंट संघटना असल्याचा आरोप असणार्या हर्षाली पोतदारने आमंत्रित केलं होतं. हर्षाली पोतदारच्या कबीर कला मंचावर पुण्यातील ताडीवाला रोड झोपडपट्टीतील प्रशांत कांबळे संतोष शेलार या तरुणांना फूस लावून नक्षलवादी बनवल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. संबंधित तरुण नक्षलवाद्यांच्या दलाचे कमांडर झाले असल्याचे पोलीस सांगतात.

30 जानेवारीला झालेल्या एल्गार परिषदेत शर्जिल उस्मानी या दिल्ली दंगलीतील आरोपीने हिंदू समाजावर अत्यंत खालच्या दर्जाची टिप्पणी केल्यामुळे देशभर आक्रोश उसळला सदर कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला.

यावर पुण्यातील एका जागरूक तरुण ॅडव्होकेट प्रदीप गावडे यांनी पुढाकार घेत शर्जिल उस्मानीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीयासंबंधी माहिती घेऊन पुढील कारवाई करूअशी प्रतिक्रिया दिली आहे.

 
सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik

या सगळ्यात लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे शर्जिल उस्मानी याने संबंधित मंचावरून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या या गोष्टीकडेच लक्ष वेधले आहे. परंतु देशभरात विखुरलेले नक्षलवादी, जिहादी, खलिस्तानी वारंवार भारतीय संविधान संसद, तपासयंत्रणा भारतीय संघराज्य यांच्याविरुद्ध जमावाला चिथावणी देत आहेत, याकडे सोयीस्कर किंवा अज्ञानातून दुर्लक्ष होत आहे.

 

शर्जिल उस्मानीवर, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कलम 153 नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु प्रदीप गावडे यांनी आपल्या तक्रार अर्जात भारतीय संविधान तपास यंत्रणा, भारतीय संघराज्या यांच्याविरुद्ध जमावाला चिथवल्याबद्दल देशद्रोहाचे कलम 124- संबंधित आरोपीविरुद्ध लावावे, असे म्हणूनदेखील पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

 

जोपर्यंत दंगलखोर जमावाकडून जीवित वित्तहानी होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वतः पुढाकार घेऊन काही करणार नाही या षंढ भूमिकेमुळे पोलीस दलाची प्रतिमा खालावलेली असून त्यातूनच दंगलखोर जमाव पोलिसांच्या ताब्यातून दोन साधूंना ताब्यात घेऊन अत्यंत निवांतपणे त्यांची निघृण हत्या करतो, तर दिल्लीमध्ये हिंसक जिहादी जमाव हिंदू असल्याच्या कारणावरून अंकित शर्मा नावाच्या पोलिसावर चारशे वार करून त्याचे प्रेत गटारात फेकून देतो. एवढेच नव्हे, तर संबंधित एल्गार परिषदेच्या ठिकाणी मागच्या वेळेप्रमाणेच या वेळीदेखील ब्राह्मण, मराठा, शिवाजी महाराज, वेगवेगळे क्रांतिकारक यांच्याबद्दल घृणा निर्माण करणारी, खोटीनाटी, संदर्भहीन माहिती लिहून दलित समाजातील विशिष्ट समुदायांत चीड निर्माण होईल, समाजात तेढ निर्माण होईल अशी पुस्तके खुलेआम वाटली जात होती. अशी पुस्तके वाचून समाजासमाजात ऐतिहासिक गोष्टींवरून वर्तमानात तेढ होत असल्याचे आपल्याला बघायला मिळते. मग अशा घटना घडू नयेत म्हणून पोलिसांनी किती प्रतिबंधात्मक कारवाया केल्या? अशा पुस्तकांवर बंदी घालावी संबंधित पुस्तके छापणार्यांची, लिहिणार्यांची सखोल चौकशी व्हावी ही मागणी आम्ही गेली तीन वर्षे वेगवेगळ्या माध्यमांतून करतो आहे.

 

परंतु संबंधित गोष्टी माझ्या घरापर्यंत येत नाहीत, तोपर्यंत मला काय करायचे आहे? या विचारात राहणारे नागरिक ज्यांमध्ये अर्थपूर्ण लाभ होत नाहीत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे पोलीस असल्यावर वेगवेगळे चेहरे वेगवेगळी नावे असणार परंतु एक विचारधारा असणाारे फुटीरतावादी या समाजाला वारंवार अस्थिर करण्यात यशस्वी होत राहणार, यात शंका नाही.
 
सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik