देव, देश अन धर्मासाठी

विवेक मराठी    16-Mar-2021
Total Views |

कम्युनिस्ट, ख्रिश्चन मिशनरी, इस्लामी कट्टरतावादी, द्रविड फुटीरतावादी अशा असंख्य शक्ती हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या विरोधात कार्यरत असताना त्यांच्या विरोधात उभी ठाकणारी, हिंदू समाजात जागरूकता आणण्यात मोलाचा वाटा उचलणारी संघटना म्हणजेहिंदू मुन्नानी’. हिंदू मंदिरं, परंपरा, प्रतीकं यांच्यासाठी हिंदू मुन्नानी गेली चाळीस वर्षं तामिळनाडूमध्ये संघर्ष करीत आहे. या संघर्षात संघटनेच्या सव्वाशेहून अधिक कार्यकर्त्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं आहे. अशा हिंदू मुन्नानी संघटनेच्या कार्याचा जनकल्याण समितीतर्फेश्रीगुरुजीपुरस्काराने गौरव करण्यात आला. यानिमित्त हिंदू मुन्नानीचे तामिळनाडू राज्य अध्यक्ष के. सुब्रह्मण्यम यांची साप्ताहिक विवेकने घेतलेली ही विशेष मुलाखत..

 

RSS_1  H x W: 0
 
हिंदू मुन्नानीच्या कार्यास श्रीगुरुजी पुरस्काराचा सन्मान मिळाला. या संघटनेच्या कार्याबद्दल माध्यमांतून माहिती मिळत असतेच, शिवाय आपल्या विचार परिवारातील संघटना म्हणून आम्ही हिंदू मुन्नानीला जाणतो. हिंदू मुन्नानीच्या कार्यामागे अनेकांचं समर्पण, त्याग आहे. असंख्य कार्यकर्त्यांना बलिदान द्यावं लागलं आहे. आता या त्याग, संघर्षावर श्रीगुरुजी पुरस्काराच्या रूपाने एक सन्मानाची मोहोर उमटली आहे. त्यामुळे या क्षणी संघटनेचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून काय भावना आहेत?

1980पासून आजतागायत, गेली चाळीस वर्षं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला आहे. आमच्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. हा पुरस्कार भारतमातेसाठी, हिंदुत्वासाठी आणि संघटनेच्या कार्यासाठी आयुष्य समर्पित करणार्या आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही अर्पण करतो. हिंदू मुन्नानीला असा पुरस्कार प्राप्त होणं ही खरोखरच आम्हा सर्वांसाठी आनंदाची आणि उत्साहवर्धक बाब आहे. कारण तामिळनाडूतील वातावरण वेगळं आहे. देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण एका बाजूला आहे आणि तामिळनाडूचं दुसर्या बाजूला. हिंदूविरोधी, राष्ट्रविरोधी शक्ती तिथे मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादाचा आणि हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करणार्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा हा पुरस्कार आहे. त्यामुळे आम्ही जनकल्याण समितीचे आभारी आहोत.


सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा
....https://www.facebook.com/VivekSaptahik

एआयएडीएमके (अण्णा द्रमुक) कार्यकर्ता ते संघस्वयंसेवक आणि पुढे संघविचारांच्याच हिंदू मुन्नानी संघटनेतील एक प्रमुख दायित्व असा प्रवास आपण केला आहे. चाळीस वर्षांहून अधिक काळ आपण सामाजिक कार्यात सक्रिय आहात. आज या प्रवासाकडे आपण कसं पाहता?


एम
.जी. रामचंद्रन (एमजीआर) यांच्या प्रभावामुळे मी अण्णा द्रमुकमध्ये गेलो होतो. माझ्याकडे पक्षाच्या कामगार संघटनेची जबाबदरी 1972मध्ये देण्यात आली होती. राजकारणात जाण्याची माझी कधीच इच्छा नव्हती. त्या दिवसांत कम्युनिस्टांचा प्रभाव, शक्ती मला खटकत होती. आणीबाणीच्या काळात संघाचे कार्यकर्ते किती शांतपणे, निष्ठेने आणि नियोजनपूर्वक काम करत आहेत, हे मी पाहिलं. त्यामुळे मी प्रभावित झालो. आणीबाणी जाईल ती केवळ संघाच्या प्रयत्नातूनच! पुढे 1977च्या दरम्यान एका संघशिबिरात जाणं झालं. त्या संघशिबिरात मी संघकार्याकडे आणखी आकर्षित झालोच आणि आपल्याला पुढे संघातच काम करायचं आहे, हेही मी निश्चित केलं. कम्युनिस्टांच्या कारवायांना रोखण्यासाठी, त्यांच्या विरोधात काही करण्यासाठी मी इच्छुक असल्याचं तत्कालीन तालुका-जिल्हा प्रचारकांना सांगितलं. 1980पर्यंत संघस्वयंसेवक म्हणून मी नित्य संघकामात लहान-मोठ्या जबाबदार्या सांभाळल्या. हिंदू मुन्नानीची स्थापना झाली, त्या वेळी मी केवळ एक हितचिंतक म्हणून त्या कामाकडे बघत होतो, माझा थेट सहभाग नव्हता. पुढे थेट 1996मध्ये माझ्याकडे नगर प्रमुख म्हणून दायित्व आलं. या दायित्वानंतर खर्या अर्थाने माझी संघर्ष करण्याची वृत्ती उफाळून आली. त्रिपुरमध्ये वस्त्रोद्योग प्रसिद्ध आहे. तिथे माझाही उद्योग-व्यवसाय होता. मात्र, पुढे मी संघकार्यात - त्यातही विशेषतः हिंदू मुन्नानीच्या कामात अधिकाधिक व्यग्र होत गेलो. या कार्यात आता मी पूर्णपणे रमलो आहे. प्रांत अध्यक्ष बनल्यापासून तर मी जवळपास पूर्णवेळ कार्यकर्ता बनलो आहे.


RSS_1  H x W: 0

हिंदू
मंदिरं, प्रतीकं यांच्या रक्षणासाठी एक स्वतंत्र संघटना स्थापन करावी अशी स्थिती तामिळनाडूमध्ये का कशी उद्भवली?

तामिळनाडूमध्ये 'Hindu Religious and Charitable Endowments Department' असूनही साधारणपणे 1975 ते 2005पर्यंत राज्यातील त्या त्या वेळच्या सत्ताधारी पक्षांनी हिंदू मंदिरांना लुबाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. राज्यात मंदिरांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. त्रिपुरमध्येच एका मंदिराकडे सुमारे 1500 एकर जमीन आहे. एका एकराची किंमत तेथील किमतींनुसार प्रति एकर 1 कोटी यानुसार 1500 कोटी रुपयांची जमीन होते. अशा प्रकारे, संपूर्ण तामिळनाडूत विविध हिंदू देवस्थानांकडे जवळपास 6 लाख एकर जमीन असल्याचा अंदाज आहे. पैकी 50 हजार एकर जमीन सरकारी नोंदीतूनच गायब असल्याचा संशय आहे. राज्यव्यवस्था अस्तित्वात असतानाही गेली अनेक वर्षं राजरोसपणे तामिळनाडूत हे होत आहे. इतकंच नाही, तर मंदिरांना मिळणार्या दानरूपी उत्पन्नातून जवळपास 70% निधी सरकारकडून अन्य कारणांवर खर्च केला जातो. उदाहरणार्थ, अमुक नेत्याची जयंती-पुण्यतिथी, स्मारकं, पुतळे, कधी हज यात्रेकरूंसाठी, कधी ख्रिश्चन मिशनरी संस्थांसाठी खर्च केला जातो. आपल्या परंपरेत दर बारा वर्षांनी कुंभमेळा होतो. अनेक सर्वसामान्य श्रद्धाळू हिंदूंना असं वाटतं की अशा काळात आपण देवधर्मासाठी काही दान द्यावं. मात्र, अशा वेळीही त्या देवस्थानांवर नियुक्त केलेल्या अधिकार्याला पैसे दिल्याशिवाय ते भाविकांना दानच करू देत नाहीत, अशाही घटना घडल्या आहेत. हिंदू मुन्नानी प्रारंभापासूनच मागणी करत आहेत की, देवस्थानांच्या कारभारात सरकारने ढवळाढवळ करू नये. ज्याप्रमाणे मुस्लीम वा ख्रिश्चन धार्मिक विषयांसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे, त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांसाठीही असावी. त्यावर केवळ देखरेखीचं काम सरकारने करावं. मात्र या मागणीला सरकारने आजतागायत प्रतिसाद दिलेला नाही. प्राचीन मंदिरांबाबत तर आणखी दयनीय स्थिती आहे. काही खासगी मंदिरं - उदा., वेल्लोरचं सुवर्णमंदिर उत्तमरित्या धार्मिक सामाजिक कार्य करत आहे. दुसरीकडे प्राचीन मंदिरांवर सरकारचं थेट नियंत्रण आहे. गेल्या वर्षी कोविड काळात आम्ही मूळची मंदिरांच्या नावे असलेली, मात्र अलीकडे अतिक्रमण झालेली बळकावलेली अशी 560 एकर जमीन मुक्त केली आणि पुन्हा मंदिरांकडे सोपवली. वेल्लोरच्या जलकंडेश्वर मंदिरासाठीही हिंदू मुन्नानीने संघर्ष केला आणि तब्बल 400 वर्षांनंतर मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होऊ शकली. यासाठीचं आंदोलन अयोध्येच्या रामजन्मभूमी आंदोलनाच्याही आधी सुरू झालं होतं. तत्कालीन संघप्रचारक राम गोपालनजी यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन झालं. पुरातत्त्व विभागाकडून या मंदिराची देखभाल होत होती आणि अनेक वर्षं येथे पूजाअर्चा करण्यास मनाई होती. ही बाब आम्हा सर्व सश्रद्ध हिंदूंना वेदना देत होती. त्यातून हे आंदोलन घडलं. वेल्लोरमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात बराच काळ मुस्लीम नवाबाची सत्ता होती. त्यामुळे वेल्लोरमध्ये मुस्लिमांचं प्राबल्य बर्याच प्रमाणात आहे. त्यांच्यातील कट्टरतावादी संघटनांच्या दबावातूनच सरकारतर्फे मंदिराची पूजाअर्चा होऊ देण्याची भूमिका घेतली जात होती. या विरोधात एक मोठं जनआंदोलन उभारून हा लढा हिंदू मुन्नानीने यशस्वी करून दाखवला.

 
सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik


RSS_1  H x W: 0 

तामिळनाडूतील ही सर्व परिस्थिती तुम्ही कथन केलीत. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हिंदू मुन्नानीच्या या संघर्षात अनेक कार्यकर्त्यांना आपल्या प्राणांचं बलिदान द्यावं लागलं आहे. मात्र अशा प्रकारे हिंसक परिस्थिती कशी उद्भवली आणि हिंदू मुनान्नीने कशा प्रकारे तिचा सामना केला?


हिंसात्मक
संघर्षावर आपला विश्वास नाही आणि आपल्याला काही त्याचं प्रशिक्षणही नाही. मात्र सभोवतालची सर्व परिस्थिती पाहता आपल्याला विरोधकांच्या हिंसेला सामोरं जावंच लागणार आहे, त्यामुळे त्याही दृष्टीने आपली तयारी असली पाहिजे, असं आम्हाला आमच्या तत्कालीन मार्गदर्शकांनी सांगितलं होतं. संघटनेसाठी, समाजासाठी आणि भारतमातेसाठी जर हे करावं लागलं तर हेही करू, असा जणू कानमंत्रच त्यांनी दिला होता. तामिळनाडूमधील परिस्थिती इतकी गंभीर होती की विरोधकांच्या हिंसक विरोधामुळे आजतागायत हिंदू मुन्नानीच्या तब्बल 130हून अधिक कार्यकर्त्यांनी संघटनेसाठी संघर्ष करता करता आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आहे. संघप्रचारक रामगोपालन यांनीही अशा प्रकारे हिंदुत्व विरोधकांचं हिंसक क्रौर्य अनुभवलं आहे. ते 1984मध्ये चेन्नईहुन मदुराई असा रेल्वे प्रवास करीत होते. मदुराई स्थानकावर ते उतरले. एक मनुष्य संपूर्ण प्रवासात त्यांच्या मागावर होता. स्थानकावर उतरून पुढे जाताच त्याने रामगोपालन यांच्या डोक्यात पाठीमागून कोयत्याने वार केला. जवळपास महिनाभर ते मृत्यूशी झुंज देत होते. प्रबळ इच्छाशक्तीमुळे ते या अशा क्रूर आणि विकृत हल्ल्यातून वाचू शकले. किंबहुना हा त्यांचा पुनर्जन्मच म्हणावा लागेल. एवढं होऊनही ते नंतर डोक्यावर स्टीलची हेल्मेटसदृश टोपी घालून सगळीकडे प्रवास करत असत. ही अशी तामिळनाडूची परिस्थिती. या सगळ्या प्रकारांना राजकीय खतपाणीही मिळत होतं आणि ख्रिश्चन मिशनरी संस्था, इस्लामी संघटना आणि कम्युनिस्ट संघटना यांचाही दबाव होताच. कम्युनिस्ट, द्रविड फुटीरतावादी चळवळी, मुस्लीम संघटना आणि ख्रिश्चन संघटना अशा चार आघाड्यांवरून हे हल्ले झाले आणि हिंदू मुन्नानीने अशा चार आघाड्यांवर लढा दिला. तामिळनाडूच्या शेजारीच आणि सोबतीनेच केरळमध्येही ही अशीच परिस्थिती आहे. परंतु केरळमध्ये किमान मंदिरांच्या बाबतीत तरी इतकी वाईट परिस्थिती नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रामगोपालनजींनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या कारवायांबाबत, संकटांबाबत हिंदू समाजामध्ये जागृती निर्माण करणं, समाजाला सजग करणं हाच एकमेव पर्याय नाही. हा लढा केवळ एकट्या संघटनेचा नाही आणि एकटी संघटना त्यात विजयही मिळवू शकणार नाही. संपूर्ण समाजच एकत्र येऊन लढा देऊ शकतो. एक रेष छोटी करायची असेल तर दुसरी रेष त्याहून मोठी आखावी लागते. त्यामुळे हिंदू मुन्नानी आता प्रयत्न करत आहे की ज्या क्षेत्रात आपल्या विरोधकांचं वर्चस्व आहे, उदा., बेकरी व्यवसाय, मांसविक्री व्यवसाय .मध्ये हिंदूंचं, हिंदुत्वाला मानणार्याचं वर्चस्व वाढेल. हिंसक संघर्षाऐवजी अशा सकारात्मक दृष्टीकोनातून आम्ही वाटचाल करत आहोत. समाजासाठी हौतात्म्य पत्करणार्यास आमच्या कार्यकर्त्यांपैकी सुरुवातीला घडलेल्या काही हल्ल्यांची समाजात काहीही प्रतिक्रिया उमटली नाही. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. 2016मध्ये शशी कुमार नामक कार्यकर्त्याची हत्या झाली, तेव्हा समाजातून तब्बल 50 हजार लोक एकत्र रस्त्यावर आले. तेही आम्ही कोणतंही आवाहन करता. समाजात आपणहोऊन ही कृती घडली. त्यामुळे अनेक दशकांच्या प्रयत्नांनंतर आता लोक जागृत होऊ लागलेत, उघडपणे व्यक्तही होऊ लागलेत.


या सकारात्मक बदलांचे तामिळनाडूच्या समाजकारणावर होत असलेले परिणाम काय सांगाल?


याचा
परिणाम म्हणजे आता लोक कम्युनिस्ट संघटना, द्रविड फुटीरतावादी संघटना या वा अशा कोणत्याही हिंदुत्वविरोधी शक्तींच्या मागे जाण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात घटलं आहे. आता यापैकी केवळ इस्लामी क्रूर संघटनांच्या आडून या सर्व कारवाया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता हिंदुत्वाशी दोन हात करण्याचं काम केवळ इस्लामी संघटनांकडे आल्याचं दिसतं. पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, टीएमएमके (तामिळनाडू मुस्लीम मुन्नेत्र कळघम), तामिळनाडू तौहीद जमात अशा चार-पाच संघटना या सगळ्यात सक्रियपणे सहभागी आहेत. या अशा संघटना प्रत्यक्ष मैदानात उतरणार, यांना हिंदुत्वविरोधी राजकीय पक्षांकडून कधी उघड तर कधी छुपं समर्थन मिळणार, त्यांना ख्रिश्चन संस्थांकडून पैसे मिळणार, अशी ही सर्व यंत्रणा आहे. उदा., जल्लीकट्टूच्या विषयात पडद्यामागून हेच सर्व लोक होते. समोर आल्या त्या इस्लामी संघटना, मात्र प्रत्यक्ष इस्लामी संघटनांबरोबरच हे सर्वच लोक त्यामध्ये सक्रिय होते. 26 जानेवारी रोजी दिल्लीत घडलेल्या घटना आपण पाहिल्या. मात्र याच प्रकारच्या घटना तामिळनाडूमध्ये जवळपास 1970-80 पासून सातत्याने घडत आहेत.


RSS_3  H x W: 0

चित्रपट, मालिका, नाटकं, अलीकडे ऑनलाइन वेब सिरीज आदी माध्यमांतून हिंदू श्रद्धा, प्रतीकं यांचा अवमान, विडंबन करण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. तामिळनाडूमध्ये तर चित्रपट आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती यांचा समाजजीवनावर प्रचंड मोठा प्रभाव आहे. तामिळनाडूतील असंख्य राजकीय नेते पूर्वी चित्रपटक्षेत्रात होते. अशा तामिळनाडूमध्ये, तामिळ चित्रपट-मालिका आदींमधून हिंदू भावना-श्रद्धा-प्रतीकांशी खेळ करण्याचे उद्योग होतात का? होत असल्यास त्यावर हिंदू मुन्नानी अन्य हिंदुत्ववादी संस्था-संघटनांकडून काय केलं जातं?


होय
, तामिळनाडूमध्येही हे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात. कमल हासनसारख्या लोकप्रिय कलाकारांपासून अनेक कलाकार हिंदुत्वविरोधी अजेंडा वेगवेगळ्या माध्यमातून राबवत तात. डीएमके आणि एडीएमके हे दोन्ही पक्ष चित्रपटांमुळेच वाढले. चित्रपटातून अगदी छुप्या पद्धतीने हिंदू संस्कृतीतील देवदेवता, प्रतीकं, परंपरा यांना लक्ष्य करण्याचे प्रकार गेली अनेक वर्षं तामिळ चित्रपटातून घडत आहेत. मात्र अलीकडे लोकदेखील जागृत झाले आहेत. अशा गोष्टी लगेच लोकांच्या निदर्शनास येतात आणि त्याची तत्काळ प्रतिक्रियाही उमटते. अलीकडेचमुकुथी अम्मननावाचा एक चित्रपट आला होता. मुकुथी म्हणजे नथ आणि अम्मन म्हणजे देवी. हिंदू साधू-संत मंडळी आणि त्यांचे आश्रम यामध्ये कशा सगळ्या वाईट गोष्टी घडत असतात, भ्रष्टाचार होत असतो या थीमवर आधारित हा चित्रपट होता. याला कोणत्याही वास्तव घटनेचा आधार नव्हता, पूर्णपणे काल्पनिक कथा होती. नयनतारा या प्रसिद्ध अभिनेत्रीची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. पूर्वी अशा प्रकारचा चित्रपट आला असता आणि गेलाही असता. कुणीही त्यावर काही बोललं नसतं. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. हिंदू समाजातून या चित्रपटावर तत्काळ आणि अत्यंत संतप्त अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. अगदी मोठ्या शहरांपासून छोट्या गावांपर्यंत सगळीकडे चित्रपटाला मोठा विरोध झाला. तथापि, ही गोष्ट खरी आहे की एकूणच तामिळ चित्रपटसृष्टीत डाव्या, हिंदूविरोधी विचारांच्या मंडळींचा प्रभाव अधिक आहे. अलीकडीलबिगिलया चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता जोसेफ विजय याचा चित्रपटातील पेहराव हा खाली केशरी धोतर, वर काळा शर्ट आणि गळ्यात क्रॉस असा होता. आणि मुख्य मुद्दा म्हणजे चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी चित्रपटाला येणार्या तरुण दर्शकांना हाच पेहराव क्रॉससह मोफत वाटण्यात आला. अभिनेता विजय हा स्वतः ख्रिश्चन आहे आणि या अशा चित्रपटांच्या निर्मितीपासून सर्व गोष्टींसाठी ख्रिश्चन मिशनरी संस्थांकडून प्रचंड प्रमाणात पैसा देण्यात येत असतो. मुकुथी अम्मन चित्रपटातदेखील देवी म्हणते कीयेशू ख्रिस्त माझा मित्र आहे”. दुसर्या एका संवादात देवीचा भक्त म्हणतो, “मला तिरुपतीला जायची इच्छा आहे.” त्यावर ती म्हणते, “तिरुपती बालाजी माझ्यापेक्षा मोठा / श्रेष्ठ आहे का?” अशी असंख्य चित्रपटांतील असंख्य उदाहरणं सांगता येतील. या सगळ्या चित्रपटांच्या, कार्यक्रमांच्या विरोधात हिंदू मुन्नानीने मोठ्या प्रमाणात आंदोलनं, जनजागृती केली आहे. एका तामिळ दूरचित्रवाणी वाहिनीवर एक चर्चात्मक कार्यक्रम ठेवण्यात आला होता, ज्याचं शीर्षक होतंमंगळसूत्र हवं की नको’. वास्तविक या मुद्द्याला काहीही औचित्य वा कारण नव्हतं. तरीही जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा करण्यात आला. आम्ही आमचे कार्यकर्ते घेऊन त्या वाहिनीच्या स्टुडिओत गेलो. हा कार्यक्रम रद्द केला नाही, तर या जागेमधून कुणीही बाहेर जाणार नाही आणि कुणीही आत येणार नाही, असा कडक इशारा देऊन आम्ही तिथेच थांबलो. या आंदोलनानंतर वाहिनीला तत्काळ कार्यक्रम थांबवणं भाग पडलं. अशा प्रकारे हिंदू भावना, श्रद्धा, परंपरांना दुखावणारे चित्रपट, मालिका, कार्यक्रम तामिळनाडूमध्ये होतातच. यापूर्वीही होत होते, आजही होत आहेत. फरक इतकाच की त्या काळात त्यांना जाब विचारणारं, अडवणारं कुणीही नव्हतं. आता तामिळनाडूची सर्वसामान्य जनता या प्रकारांवर जाब विचारू लागली आहे, पेटून उठू लागली आहे.

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik


pasting