भारताचे आत्मतत्त्व ‘राम’

विवेक मराठी    06-Mar-2021
Total Views |

रामायणातील राम हा कर्तव्यधर्माचे पालन करणारा सर्वश्रेष्ठ आदर्श आहे. मानवी आयुष्यात जीवन जगताना आपल्याला अनेक भूमिका बजावाव्या लागतात. जीवनातील या प्रत्येक भूमिका कशा जगाव्यात याचा श्रीरामाने आपल्यापुढे आदर्श घातलेला आहे. रामतत्त्व प्रत्येक भारतीयाच्या मनात कोरले गेलेले आहे. राम हा आमच्या कर्तव्यधर्माचा आदर्श पुरुष आहे. राम भारताचा आत्मा आहे. राम भारताचे आत्मतत्त्व आहे.


jay shree ram_1 &nbs

मी कोण आहे?’ हा अध्यात्ममार्गातील पहिला प्रश्न असतो. त्याचे उत्तर शोधण्याच्या अनेक ज्ञानशाखा आहेत. असाच प्रश्न देशासंबंधीदेखील विचारता येतो. देशात राहणारेआम्ही सर्व कोण आहोत?’ त्याचे उत्तर प्रत्येक देशातील समाजाला शोधावे लागते. रशिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इंग्लंड आणि अमेरिका इत्यादी देश वयाचा विचार करता भारतापेक्षा खूप लहान (कमी वयाचे आहेत) आहेत. तरीदेखील त्यांनी एका भूमीवर राहणारा समाज म्हणूनआम्ही कोण आहोत?’ याचे उत्तर त्यांच्यापुरते शोधले आहे. या उत्तरामुळे हे देश राष्ट्रात रूपांतरित झाले आहेत आणि ते अनेक बाबतीत शक्तिशाली झालेले आहेत.

 

आम्ही कोण?’ या प्रश्नाचे आपल्यापुरते उत्तर असे की, आम्हीधर्म जगणारा समाजआहोत. धर्म म्हणजे उपासना पंथ (रिलीजन) नव्हे. धर्म म्हणजे व्यक्तीचे परमेश्वराशी असलेले संबंध आणि त्याची कर्तव्ये, तसेच व्यक्तीचे व्यक्तीशी असलेले संबंध आणि त्याची कर्तव्ये. इथे परमेश्वर याचा अर्थ विश्वाचे संचालन करणारी, नियमन करणारी महाशक्ती असा करावा लागतो. या महाशक्तीचे विश्व संचालनाचे नियम आहेत. उदा., गुरुत्वाकर्षणाचे नियम, गतीचे नियम, ऊर्जेचे नियम, कर्मनियम इत्यादी. या नियमांचे पालन प्रत्येकाला करावे लागते. नियम मोडला की त्याची फळे भोगावी लागतात. विश्वात एक जीवशृंखला आहे, ती परस्परपूरक आहे. परस्परावर अवलंबून आहे. माणसाने ती जर मोडली तर पूर, महामारी, चक्रीवादळे यांचा सामना त्याला करावा लागतो. म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्याला सृष्टीच्या नियमाशी जोडून घेऊन जीवन कसे जगायचे हे शिकविले. तशी आपली जीवनपद्धती झाली. जीवन जगण्याच्या या पद्धतीलाहिंदू जीवनपद्धतीअसे नाव पडले.

 

व्यक्ती-व्यक्तीतील संबंध, त्याची कर्तव्ये हा धर्माचा सर्वात मोठा भाग आहे. एका व्यक्तीने दुसर्या व्यक्तीशी कसे वागावे, याचा मूलभूत नियम सांगितला गेला की, ‘आत्मवत् सर्वभूतेषुयाप्रमाणे व्यवहार करावा. ‘मी तसा तूया भावनेने वागावे. असे वागताना ज्या वागण्यामुळे मला दुःख होते, तशा वागण्याने दुसर्यालाही दुःख होते, म्हणून चांगले वागले पाहिजे. आणि त्या वागणुकीचे अनेक नियम सर्व संतांनी आणि महापुरुषांनी सांगितलेले आहेत. दुसर्याचे धन हरण करू नये, गरजेपेक्षा जास्त संग्रह करू नये, दुसर्याला देत राहावे असे सर्व नियम सर्व उपासना पंथात सारखे असतात. (सनातनी, बौद्ध, जैन, शीख इत्यादी.)

 
jay shree ram_2 &nbs


व्यक्तिधर्माचा दुसरा भाग होतो तो कर्तव्याचरणाचा. व्यक्ती एकाच वेळी अनेक भूमिकांत असते - मुलगा, वडील, भाऊ, मित्र, पती, राजा अशा बहुविध भूमिकांत व्यक्तीला जगावे लागते. या भूमिका जगण्याची कर्तव्ये असतात. त्यांचे नीट पालन केले तर समाजात संघर्ष होत नाहीत. समाजजीवन नीट चालू राहते. दुसर्यांच्या अधिकारांचे आपोआप रक्षण होते. याला कर्तव्यधर्म म्हणतात. आपल्याकडील शब्दप्रयोग - पुत्रधमर्र्, पतिधर्म, पत्नीधर्म, मातृधर्म, समाजधर्म, राजधर्म असे आहेत. या शब्दांचा अर्थ त्या त्या स्थानावर असलेल्या व्यक्तीने पार पाडायची कर्तव्ये असा होतो. हा भारताचा जगण्याचा धर्म आहे. तो जीवनधर्म आहे. त्याच्यावर आधारित आपली जीवनपद्धती आहे आणि तिचे आजच्या काळातील नावहिंदू जीवनपद्धतीअसे आहे.


आपण
हजारो वर्षांपासून ही जीवनपद्धती अंगीकारत आलेलो आहोत. त्या धर्मदृष्टीने आपण सर्व प्रश्नांकडे बघत असतो. हा धर्म जगणारे हजारो ऋषिमुनी आणि तेवढीच राजघराणी आपल्या देशात निर्माण झाली. आपले सर्व जीवनसंघर्ष धर्म आणि अधर्म या दोन संकल्पनांभोवतीच असतात. आपले महाभारत हे धर्म-अधर्माचा संघर्ष सांगणारे महाकाव्य आहे. रामायणदेखील धर्म-अधर्माचे विवरण करणारे महाकाव्य आहे.

 

रामायणातील राम हा कर्तव्यधर्माचे पालन करणारा सर्वश्रेष्ठ आदर्श आहे. भाऊ, पती, पुत्र, राजा, मित्र इत्यादी सर्व भूमिकांत रामाचा कर्तव्यधर्म सर्वश्रेष्ठ धर्म झालेला आहे. भाऊ कसा असावा, पती कसा असावा, पुत्र कसा असावा, राजा कसा असावा.. तर रामासारखा! हे प्रत्येक भारतीयाच्या मनात कोरले गेलेले आहे. राम हा आमच्या कर्तव्यधर्माचा आदर्श पुरुष आहे. राम भारताचा आत्मा आहे. राम भारताचे आत्मतत्त्व आहे.

 
jay shree ram_3 &nbs

अयोध्येत 5 ऑगस्ट 2020 रोजी भूमिपूजनाने या आत्मतत्त्वाची म्हटले तर पुनःप्रतिष्ठापना झाली. ज्याप्रमाणे धर्माधारित जीवन जगणे ही आपली जीवनशैली आहे, त्याप्रमाणे आपल्या आदर्शांची भव्य मंदिरे उभी करून त्याची नित्य पूजा करणे हीदेखील आपली जीवनशैली आहे. मंदिरातील मूर्तीची पूजा ही एका शक्तीची पूजा, आदर्शाची पूजा असते. आपला समाज अतिप्राचीन असल्यामुळे अज्ञानामुळे, स्वार्थामुळे नको ती कर्मकांडे त्यात घुसविली जातात, हा भाग वेगळा. आणि अतिशय भव्य आशयाला कर्मकांडाचे रूप येते. पण तो आपला मूळ विषय नाही. राम आमच्या कर्तव्यधर्माचा आदर्श आहे, त्याचा जन्म अयोध्येत झाला, त्याच्या जन्मस्थानी रामप्राणतत्त्व अधिष्ठित होणे म्हणजे भारताचे प्राणतत्त्व अधिष्ठित होणे होय. इतके त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

 

योगी अरविंद सांगून गेले की, ‘सनातन धर्म आणि राष्ट्रवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’ जेव्हा आपल्याला कर्तव्यधर्माचे विस्मरण होते तेव्हा धर्माचा र्हास सुरू होतो. धर्माचा र्हास सुरू झाला की, समाजव्यवस्था बिघडते. जातींची उतरंड तयार होते. अस्पृश्यतेसारख्या घातक रूढी तयार होतात. सन्मानाला स्त्री दुरावते. संकुचित स्वार्थात लोक आणि त्यांचे समूह मग्न होतात. स्वार्थासाठी परकीयांशी हातमिळवणी करतात. लोक आत्मविस्मृत होतात.

 

स्वार्थामुळे आणि आत्मविस्मृतीमुळे पारतंत्र्य येते. अन्य धर्मीयांचे आक्रमण सुरू होते. आपलेच लोक त्याची शिकार होतात. अर्थकारणाचे तीनतेरा वाजतात. सांस्कृतिक र्हास सुरू होतो आणि सर्व समाजजीवन चैतन्यहीन आणि जड होते. कोणीही यावे आणि लाथ मारावी, अशी अवस्था होते. रामतत्त्व विसरल्यामुळे जवळजवळ सात-आठशे वर्षे या भयानक अवस्थेत आपला देश राहिला. आम्ही कोण, याचा त्याला विसर पडला. ‘आम्ही क्षत्रिय-ब्राह्मण-ठाकूर-रजपूत, मराठा, पटेल, रेड्डीइत्यादी शब्दात तो स्वतःची ओळख करू लागला. आम्ही प्रभू रामचंद्राच्या भारतातील रामतत्त्ववादी भारतीय आहोत, हे तो विसरला. अनेक संतांनी त्याची पुनःजागृती करण्याचा प्रयत्न केला. संत कबीरांनी रामतत्त्वाची एक वेगळीच संकल्पना मांडली. संत रोहिदासांनी रामतत्त्व मांडले. रामदास स्वामींनी रामतत्त्वाचा प्रचार केला. महात्मा गांधी रामनामाचा जप करीत राहिले. एकाच वेळी या देशात रामतत्त्वविन्मुखता आणि रामतत्त्वसन्मुखता असे दोन प्रवाह चालत राहिले.

 

अखेरशेवटी रामतत्त्वसन्मुखता याच्या विजयाचे पर्व 1986पासून सुरू झाले. या वर्षी रामलल्लाच्या अयोध्येतील मंदिराचे टाळे उघडले गेले आणि नंतर 1992पर्यंत सर्व देशात रामचैतन्याची लाट निर्माण झाली. सर्व कायदेशीर लढाया पार करून आयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभा करण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला. आंदोलन, न्यायालयीन लढाई हा आता इतिहास झाला आहे. त्याचा एका वाक्यात अर्थ सांगायचा, तर भारताचे आत्मतत्त्व म्हणजे रामतत्त्व पुन्हा प्रस्थापित होत आहे. देश पुन्हा एकदा समूहरूपाने धर्ममार्गावर चालण्याची तयारी करू लागलेला आहे.

 

ही वाटचाल खूप लांबची आहे. अयोध्येमध्ये जन्मस्थानावर प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहील. आपल्या रामतत्त्वाप्रमाणे म्हणजे कर्तव्यधर्माप्रमाणे, आपल्या आत्मतत्त्वाप्रमाणे राष्ट्र मंदिर उभे करावे लागेल. राम हा केवळ पार्थिव पूजेसाठी नाही. स्वर्गातील पुण्यप्राप्तीसाठी राममंदिर नाही. इहलोकी स्वर्ग आणण्यासाठी राममंदिर आहे. रामाची आरती करून, रामायणाचे पाठ करून इहलोकीचा स्वर्ग येणार नाही. रामराज्य निर्माण करण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसावे लागतात. कर्तव्यधर्माचे कठोरपणे पालन करावे लागते. आपले समाजजीवन हा राष्ट्र मंदिराचा मूलभूत पाया आहे. या समाजजीवनातील मनुष्यनिर्मित सर्व प्रकारची विषमता - मग ती जातीय असेल, आर्थिक असेल, अथवा उपासना पंथाची असेल, ती दूर करावी लागेल. एकरस, समरस, एकात्म समाजजीवन देशात उभे करावे लागेल. ते केवळ सरकारी कायद्याने निर्माण होणार नाही. प्रत्येकाने कर्तव्यधर्माचे पालन केले, तरच उत्तम समाजजीवन उभे राहील.

 

आपल्या विचार चिंतनात आर्थिक विषमता बसत नाही. जी विचारधारा आपल्याला हे सांगते की, ही सर्व चराचर सृष्टी ईश्वरनिर्मित आहे, तिचा त्यागभावनेने उपभोग केला पाहिजे; जो स्वतःसाठीच अन्न शिजवितो, तो पाप भक्षण करतो. जो संग्रह करतो तो दुसर्याचे धन लुटतो.. ही सगळी जीवनतत्त्वे जगायची असतात. याला रामतत्त्व विचार म्हणायला पाहिजे. तो आपण जगला तर आपल्याला समाजवादाची आवश्यकता नाही, कम्युनिझमची आवश्यकता नाही. आर्थिक विषमता आमच्या जगण्याच्या पद्धतीनेच जाईल. हे काम दोन-तीन पिढ्या करीत राहावे लागेल.


राष्ट्र
मंदिर उभे करण्यासाठी शक्तीची आवश्यकता आहे. राम जसा कर्तव्यधर्माचे पालन करणारा आदर्श आहे, तसाच तो सामर्थ्याची उपासना शिकविणारा आदर्शदेखील आहे. धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष प्राचीन आहे. तो आजही आहे, उद्याही राहणार आहे. या संघर्षात अधर्मी शक्ती बलवान होऊन चालत नाही, त्या निर्दयी असतात. नीती-अनीतीशी त्यांना काही घेणे-देणे नसते. ते कोणताही मार्ग अवलंबितात. रामधर्म हे सांगतो की, त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले पाहिजे. पिंडीवर विंचू चढला असता त्याला पायातील जोड्याने मारले पाहिजे, पिंडीवर जोडा कसा मारायचा असा विचार करता कामा नये, असे तुकाराम महाराज सांगतात. धर्माचे पालन करणार्यांशी धर्मव्यवहार केला पाहिजे आणि अधर्माचरण करणार्यांशी धर्मभावनेवर स्थिर राहून त्यांना त्यांच्या भाषेत उत्तरे दिली पाहिजेत. सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटला पर्याय नाही, हे रामतत्त्व आहे.


प्रभू
रामचंद्राची स्तुती करणारा किंवा आरती करणारा आणखी एक ग्रंथ करणे हेराममंदिर से राष्ट्र मंदिरया हिंदी ग्रंथाचे प्रयोजन नाही. मोहनजी भागवतांच्या शब्दात सांगायचे तर, “मनातील अयोध्याजागविण्याचे या ग्रंथाचे प्रयोजन आहे.” भव्य मंदिर तर उभे राहणारच आहे, आपल्याला आपल्या पराक्रमाने आणि स्वसामर्थ्यावर आपले राष्ट्र मंदिर उभे करायचे आहे. आपण सर्व जण मिळून हा संकल्प करू या आणि राष्ट्र मंदिर उभे करण्याच्या यज्ञात कर्तव्याचरणाची आपली समिधा अर्पण करू या.

 

(विवेकच्याराममंदिर से राष्ट्र मंदिरया आगामी हिंदी ग्रंथातील संपादकीय)