एका समर्पणाची विटंबना!

विवेक मराठी    29-Apr-2021
Total Views |

कोरोना महामारीच्या काळात देशभरात कित्येक स्वयंसेवक स्वत:च्या जिवाची पर्वा न करता शेवटच्या श्वासापर्यंत मदतकार्य करत आहेत. समर्पणाची अशी अनेक उदाहरणे संघाच्या इतिहासात आणि वर्तमानातही पाहायला मिळतात. नारायणराव दाभाडकर हे असेच एक उदाहरण म्हणता येईल. 'संघस्वयंसेवक' या बिरुदाने त्यांच्या या समर्पणाला अधिकच उंची प्राप्त झाली आहे. पण ती या पूर्वग्रहदूषित पत्रकारितेला किंवा सोशल माध्यमांवरील पुरोगामींना समजणे कठीण आहे!

RSS_1  H x W: 0
गेल्या
काही दिवसांपासून आपण सगळे अतिशय निराशाजनक वातावरणाचा सामना करत आहोत. कोरोनाच्या भीतीचे सावट दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. काळ सोकावण्याचा हा अनुभव एकीकडे, तर दुसरीकडे शासकीय-प्रशासकीय स्तरावरील अनागोंदी. अशा या वातावरणात माणुसकीचा गहिवर असलेली एक बातमी वाचायला मिळाली, नारायणराव दाभाडकर या वयोवृद्धाची - नागपूरमधील हे 85 वर्षीय आजोबा कोविडमुळे तेथील एका सरकारी रुग्णालयात दाखल होतात. तेथील रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची गर्दी पाहून ते व्यथित होतात. आपले आयुष्य जगून झाले आहे, कोणातरी गरजूला आपला बेड उपलब्ध होईल असा विचार करून ते घरी जाण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर दोनच दिवसांत त्यांचे निधन होते.. ही ती बातमी होती. आजोबासंघस्वयंसेवकहोते हाही उल्लेख त्यात होता. हे सकारात्मक प्रेरणादायक वृत्त सोशल मीडियावर वेगाने पसरले. या घटनेविषयीच्या हिंदी, इंग्लिश आणि अन्य भाषांतील वृत्तांनाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. संघाशी संबंधितच नव्हे, तर माणुसकीची जाणीव असलेल्या प्रत्येकाला दाभाडकर आजोबांच्या या त्यागाविषयी आदर वाटत होताअनेकांनी त्यांना दधिची ऋषींची उपमा दिलीप्रसारमाध्यमांनीही या घटनेला पुरेशी प्रसिद्धी दिली होती.


पण काही तासांतच या प्रसंगाविषयी अगदी टोकाच्या पोस्ट सोशल मीडियावर पसरू लागल्या. आधी तर हे दाभाडकर आजोबा संघस्वयंसेवकच नव्हते, हा मुद्दा धरून उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण नंतर मात्र हे वृत्त पूर्णत: खोटे असून या माणसाने अशा प्रकारचा कोणताही त्याग केला नव्हता इथपासून ते अशा नावाची कोणतीही व्यक्तीच अस्तित्वात नाही असे प्रतिदावे सोशल मीडियाच्या भिंतीवर धुडगूस घालू लागले. एका सकारात्मक घटनेचे विद्रुपीकरण करण्यात आले. त्यांच्या नावाची फेक प्रोफाइल्स बनवण्यात आली. काही पोस्ट तर इतक्या हीन पातळीवरच्या आणि अवमानकारक होत्या की एखाद्या सज्जन माणसाची शरमेने मान खाली जाईल. हे विद्रुपीकरण अर्थातचसंघकिंवासंघस्वयंसेवकया शब्दांच्या आकसातून - नव्हे, पराकोटीच्या द्वेषातून करण्यात येत होते, हे सांगायला नको. या विखारी संघद्वेषापोटी आजपर्यंत अशा अनेक सकारात्मक घटनांचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे.

या सगळ्या खेळात जेव्हा पुरोगामित्वाचा मुखवटा पांघरलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उतरले, तेव्हा मात्र लोकांच्या संभ्रमात भर पडली. कारण आजही आपल्याकडे प्रसारमाध्यमांकडे विश्वासार्हतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. स्वत:ला अभिरुचिसंपन्न वाचकांचे वर्तमानपत्र म्हणवणार्या एका दैनिकाने सोशल माध्यमाच्या भिंतींच्या हवाल्याने आपण या घटनेचे सत्य पडताळल्याचा दावा केला आणि ही घटना कशी खोटी होती, याचे वृत्त दिले.

या दैनिकाच्या वेब पोर्टलवरच्या बातमीतफॅक्ट चेकच्या नावाखाली ही घटना खोटी असल्याचे घोषित केले. ‘फॅक्ट चेकम्हणजे काय? तर ही घटना खोटी ठरवण्यासाठी पूर्वग्रहदूषित हेतूने कथित पुरावे गोळा केले गेले. रोहन मुथ्था नामक एका ट्विटर हँडलरने त्याच्या ट्वीटमध्ये दाभाडकरांविषयीचे हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले होते, त्याचाही हवाला या पोर्टलने दिला होता. मात्र दाभाडकरांची मुलगी आसावरी कोठीवान यांच्या व्हिडिओमुळे त्या तरुणाला सत्याची जाणीव झाली आणि त्यानेही आपले ट्वीट मागे घेतले. पण या दैनिकाला आणि त्याच्या पोर्टलला मात्र अशी काही जाणीव झाली नसावी. कारण दुसर्या दिवशीच्या त्यांच्या छापील आवृत्तीत दाभाडकरांच्या मुलीची प्रतिक्रिया देतानाच ती घटना खोटी ठरवण्यासाठी पुरावे देण्याची खुमखुमीही दिसत होती. या दैनिकाचे संघद्वेषी आणि पूर्वग्रहदूषित पत्रकारितेचे धोरण आता सर्वांनाच माहीत झाले आहे. पण अशा मूठभर प्रसारमाध्यमांमुळे एकूणच या चौथ्या स्तंभाविषयीचा समाजाचा विश्वास डळमळीत होत आहे. नंतर काही समाजहितैषी प्रसारमाध्यमांनी याबाबत योग्य लोकांकडे चौकशी करून वस्तुस्थिती काय आहे ते लक्षात आणून दिले.

या गढुळलेल्या वातावरणाने दाभाडकरांच्या कुटुंबीयांना किती यातना झाल्या असतील? आसावरी कोठीवान यांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया दिली, ती पाहून याची थोडी तरी कल्पना येते. सोशल मीडियावर एखाद्या घटनेचे अनेकदा भावनेच्या भरात रंजित वर्णन केले जाते. आसावरी यांच्या व्हिडिओनुसार रुग्णालयात झालेली गर्दी, तरुण रुग्णांच्या नातेवाइकांचे बेडसाठी चाललेले आर्जव हे सर्व पाहून दाभाडकर व्यथित झाले होते. दाभाडकरांनीमाझा बेड काढून त्या तरुणाला द्याअसे थेट त्या रुग्णालयाला सांगितले नसेल, मात्र त्यांनी आपल्या कुटुंबीयांना सांगताना, “मी घरी गेल्यामुळे दुसर्या एखाद्याला बेड उपलब्ध होऊन तो तरी वाचेलअसे म्हटले होते आणि ते डिस्चार्ज घेऊन घरी आले होते. यातील संदर्भांचा फरक दुय्यम आहे. त्यामुळे त्यांच्या समर्पणाचे, औदार्याचे मूल्य जराही कमी होत नाही.

राहता राहिला प्रश्न ते संघस्वयंसेवक असण्याचा. तरतन समर्पित, मन समर्पित और ये जीवन समर्पितया भावनेने प्रत्येक स्वयंसेवक जगत असतो. परोपकाराची, समर्पणाची भावना संघाच्या संस्कारांतून सिद्ध झालेली असते. कोणतीही आपत्ती असो, संघ आणि स्वयंसेवक तिथे मदतीसाठी पोहोचतात. या कोरोना महामारीच्या काळात संघाने देशभरात उभी केलेली सेवा कार्ये त्याचीच प्रचिती आहे. कित्येक स्वयंसेवक स्वत:च्या जिवाची पर्वा करता शेवटच्या श्वासापर्यंत मदतकार्य करत आहेत. समर्पणाची अशी अनेक उदाहरणे संघाच्या इतिहासात आणि वर्तमानातही पाहायला मिळतात. नारायणराव दाभाडकर हे असेच एक उदाहरण म्हणता येईल. 'संघस्वयंसेवक' या बिरुदाने त्यांच्या या समर्पणाला अधिकच उंची प्राप्त झाली आहे. पण ती या पूर्वग्रहदूषित पत्रकारितेला किंवा सोशल माध्यमांवरील पुरोगामींना समजणे कठीण आहे!