जैन दर्शन

विवेक मराठी    27-May-2021
Total Views |

जैन धर्मपरंपरा प्राचीन काळापासून आहे. सृष्टिनिर्माणपासून जैन धर्म अस्तित्वात आहे. जैन धर्माचे मूळ सिंधुसंस्कृतेशी जोडले आहे. जैन धर्माचे दर्शन आपण या आणि पुढील लेखात पाहणार आहोत.


bhagwan mahavir_1 &n

जैन परंपरा वेदपूर्व काळापासून असण्याचे पुरावे आहेत. काही लोकांच्या मते सिंधुसंस्कृतीमधील लोक जैन असावेत. ऋग्वेदात ऋषभदेवांचा उल्लेख आदराने केलेला आहे.त्यामुळे किमान वेदकालीन परंपरेला समांतर श्रमण परंपरा होती, हे निश्चित.

भगवान ऋषभदेव हे जैनांचे पहिले तीर्थंकर आहेत. त्यांना भरत चक्रवर्ती बाहुबली हे दोन पुत्र होते. यांपैकी भरत राजाचा उल्लेख भागवतात जडभरत म्हणून येतो. त्यानंतर अजितनाथ हे तीर्थंकर प्रसिद्ध आहेत. हे इक्ष्वाकु वंशातील होते. गंगा पृथ्वीवर आणणार्या भगीरथाचे आजोबा! सगर यांचे चुलतभाऊ.

नंतर काश्यप गोत्रोत्पन्न श्रीसंभवनाथ, नंतर सुविधीनाथ यांच्यापर्यंत शुद्ध जैन परंपरा आढळते. बाविसावे तीर्थंकर नेमिनाथ यांचा विवाह कंसाची बहीण राजीमती हिच्याशी ठरला होता. मात्र वैराग्य उत्पन्न होऊन ते तपश्चर्या करण्यास निघून गेले. हरिवंशात हा उल्लेख आहे.

वरील सर्व तीर्थंकरांचे उल्लेख इतिहासाच्या दृष्टीने प्रथम दर्जाच्या ऐतिहासिक साधनांत नाहीत. मात्र पार्श्वनाथ महावीर यांची चरित्रे प्रथम दर्जाच्या ऐतिहासिक प्रमाणांसह उपलब्ध आहेत. ऐतिहासिक दृष्टीने जैन साहित्य हे भगवान महावीरांनंतर निर्माण झाले. महावीर वाणी हेच उपलब्ध जैन साहित्याच्या उद्गमाचे मूळ आहे. येथे प्रश्न उभा राहतो की एवढी प्राचीन परंपरा असलेल्या या दर्शनाचे साहित्य इसवीसन पूर्व 696च्या पूर्वी नसेल काय?

महावीरांचा शिष्य इंद्रभूती गौतम याने महावीरपूर्व श्रमण ज्ञानाचे संकलन पूर्व याच नावाने केले आहे. परंतु मूळ पूर्ववाङ्मय आज उपलब्ध नाही. मात्रणमो दसपूवीयाणं।असा प्रार्थनेत त्यांचा उल्लेख येतो. जैन साहित्यात 41 सूत्रग्रंथ, 31 प्रकीर्णके, 12 भाष्ये एक महाभाष्य हे उपलब्ध आहे. हे सर्व महावीरांनंतर रचले गेले.

वर्धमान महावीर ही ऐतिहासिक प्रमाणसिद्ध व्यक्तिरेखा आहे. भारतामध्ये इतिहासाचे सुसंगत ज्ञान खरोखर महावीर गौतम बुद्ध यांच्या कालखंडापासून मिळते.

व्रात्य क्षत्रियांच्या वृज्जीसंघात भगवान महावीरांचा जन्म झालालीच्छवी आणि वैशाली या उभय कुळांपासून त्यांचे राजघराणे निर्माण झालेजैन  बौद्ध ही दोन्ही दर्शने वेदप्रामाण्य नाकारणारीया अर्थाने नास्तिक आहेत.


गौतम बुद्धांच्या जीवनाची माहिती आपणा सर्वांना असते. त्यांनी स्वतः साधना करून मग साधनामार्ग दार्शनिक मांडणी केल्याचे आपण जाणतो. त्याच कालखंडात महावीरांनीसुद्धा स्वतः साधना करून, मगच साधनामार्गाची दर्शनाची मांडणी केली. परंतु त्याचा तितका ऊहापोह केला जात नाही. याचे कारण त्यांच्यामागे दीर्घ तीर्थंकर परंपरा होती. त्यामुळे त्यांनी केलेली मांडणी वेगळी असू शकते, हे लक्षात घेतले जात नाही.

जीन शासनाचा शाश्वत गाभा तसाच ठेवून जैन मताची पूर्णपणे नूतन, कालसुसंगत मांडणी महावीरांनी केली, जी समकालीन बुद्धांपेक्षा वेगळी होती. एकाच रोगावर दोन संशोधकांनी वेगवेगळी औषधे शोधून काढली होती!! एकाने विपस्सना, तर दुसर्याने प्रेक्षाध्यान!!

इसवीसनपूर्व 696मध्ये . महावीरांचा जन्म झाला. (जन्मवर्षाविषयी काही मतभेद आहेत, पण सहावे शतक सर्वांना मान्य आहे.) यशोदा नामक सुकन्येशी त्यांचा विवाह झाला होता. वर्धमान महावीरांना एक मुलगी होती. महावीरांच्या आईवडिलांनी सल्लेखना विधिपूर्वक आयुष्य संपवले. त्याचा परिणाम होऊन वर्धमानांना वैराग्य आले. वडीलभावाच्या संमतीने त्यांनी तिसाव्या वर्षी संन्यास घेतला. त्यानंतर बारा वर्षे तपश्चर्या केली. वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी त्यांना केवल ज्ञान प्राप्त झाले.

संन्यास घेतल्यानंतर महावीर कर्मार या गावी काही काळ राहिले. तेथे त्यांनी ध्यानाचे काही प्रयोग केले. ध्यानासबंधी विशिष्ट आसनांचा ते आग्रह धरत नसत. कधी बसून, तर कधी उभे राहून ते ध्यान करत.

या काळात त्यांनी कायोत्सर्ग मुद्रा साध्य केली. म्हणजे ध्यान करताना श्वासासारखी सूक्ष्म क्रिया सोडून अन्य सर्व क्रियांचे विसर्जन होय. या ध्यानप्रकारात साधक ममत्व, कार्मणशरीर तैजसशरीर विसर्जित करतो! स्थूल शरीर आणि स्थूल श्वास शिथिल करतो. त्राटक आणि ध्यान यातून कायोत्सर्ग साध्य होतो.

यानंतर महावीर दृढभूमी प्रदेशात गेले. तेथे त्यांनी एकरात्री प्रतिमा नामक साधना केली. साधनेच्या या प्रकारात पहिले तीन दिवस उपवास केला जातो. तिसर्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात कायोत्सर्ग करून सरळ उभे राहिले जाते. डोळे स्थिर करून उन्मेषनिमेष बंद केले जाते. भय आणि देहाध्यास नाहीसे करणारी ही साधना आहे. यामध्ये साधक ध्यानाच्या अंतःस्तलात खोल शिरतो, त्याला आतील संस्कारांच्या घडामोडींचा सामना करावा लागतो. अनंत पट समोरून सरकत जातो. त्या वेळी जो अविचल राहतो, तो प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करतो आणि जो विचलित होतो, तो उन्मत्त रुग्ण होतो. (श्रवणबेळगोल येथील बाहुबली यांची मूर्ती याच प्रतिमा साधनेतील आहे.)

साधनेच्या अकराव्या वर्षी .महावीर सानुलठ्ठीय गावात विहार करत होते. तेथे त्यांनी भद्रप्रतिमा ध्यान केले. हे ध्यानसत्र सोळा दिवस सोळा रात्री सुरू होते. एकांत स्थानी महावीर ध्यान करत. बसलेल्या अवस्थेत ते पद्मासन, पर्यकासन, वीरासन, गोदोहगकआसन, उत्कटासन यांचा वापर करत. कायिक, वाचिक, मानसिक, द्रव्य पर्यय हे त्यांच्या ध्यानाचे विषय असत.

त्यांचे ध्यानमुद्रेतील रूप आकर्षक असे. आचार्य हेमचंद्र म्हणतात, “हे भगवान, आपली ध्यानमुद्रा, पर्यकशयी शिथिल शरीर आणि नासाग्रस्थिर दृष्टी याचे सर्व साधकांनी अनुकरण करावे असे आहे.”

अशा प्रकारे केवल ज्ञान प्राप्त झाल्यावर प्रभू महावीरांनी जैन दर्शनाचा साधनेचा उपदेश करण्यास सुरुवात केली.

 

यामध्ये त्यांनी पुढील विषयांवर उपदेश केला -

द्रव्य

पदार्थ

त्रिरत्ने

ज्ञानाचे प्रकार

आत्मबलाचे लाक्षणिक धर्म

अणुव्रते

स्याद्वाद

नयप्रमाण

प्रेक्षाध्यान

आगमग्रंथ महावीर शासनानुसार जैनयोग तत्त्वज्ञान

सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह या पार्श्वनाथांच्या चार अनुव्रतांना महावीरांनी ब्रह्मचर्य या व्रताची जोड दिली.

 

या सृष्टीत प्रत्येक वस्तुमात्राला, पाणी आणि दगड यासारख्या वस्तूंनाही जीवन आहे असे जैन मानतात. अर्थात वाईट हाताळणीने त्यांना दुःख होते ते देणे मानवाचे कर्तव्य आहे. अहिंसा हे जैनांचे मूलतत्त्व आहे.

वैदिकांमधील कर्मवाद जैनांना मान्य आहे. पण प्रत्येक जिवात्म्याला या कर्मफळातून दुसरे कोणी मुक्त करू शकत नाही, अशी धारणा आहे. त्यामुळेच ईश्वर कल्पना नाही. भक्तीने किंवा अन्य मार्गाने कोणाला प्रसन्न करणे . नाही.

 

जैन ईश्वर मानत नसले, तरीही आत्म्याची शुद्ध मुक्त अवस्था मानतात. मानवी जीवनाचे अंतिम साध्य म्हणजे ही अवस्था होय.

जीव हा नित्य आहे. तो आपल्या कर्मफळामुळे सुखदुःखाचा अनुभव घेतो. स्वभावत: शुद्ध जीवात कर्मपरमाणू शिरल्याने तो संसारात पडतो. आत्मक्लेश, तपश्चर्या आणि खडतर साधनेने जीव मुक्त होतो. तपश्चर्येसाठी स्याद् वाद अंगी बाणवला पाहिजे.

 

जिन शासनाच्या न्यायपद्धतीला स्याद्वाद म्हणतात. या पद्धतीने जगातील कोणत्याही वस्तूचे योग्य स्वरूप अविच्छिन्नपणे दिसून येते. या पद्धतीमध्ये प्रत्येक वस्तूचा विचार स्वकीय परकीय, दोन्ही दृष्टींनी केला जातो.

हेमचंद्र सूरी म्हणतात, “हे भगवन्, पर्यायापेक्षेने विचार करता वस्तूकडे पाहिलं तर ती वस्तूच मूलद्रव्य आहे असे वाटते. आणि अन्वयापेक्षेने विचार करता एखादा पर्याय निवडला, तर तो पर्यायच मूलद्रव्य भासतो. परंतु द्रव्याचे स्वरूप अनंतधर्मसमुदयात्मक आहे हे तू सप्तभंगी नयाने दाखवलेस!”

प्रत्येक द्रव्य, क्षेत्र, काल भाव अमुक एका प्रकारचा आहे असे जैन तत्त्वज्ञान मानत नाही. त्यासाठी ते स्यात म्हणजे
 ‘कथंचितकिंवा एका प्रकारे हा शब्द योजतात.

 

कोणत्याही वस्तूबद्दल परस्पर विरोध येता सात तर्हेने विधिनिषेध दाखवता येतो. यालाच स्याद् वाद म्हणतात. सात प्रकारे दाखवल्याने याला सप्तभंगी नय असेही म्हणतात.

 

1. स्याद् अस्ति।

2. स्याद् नास्ति।

3. स्याद् अस्ति नास्ति च।

4. स्याद् अवक्तव्यम्।

5. स्याद् अस्ति अवक्तव्यम्।

6. स्याद् नास्ति अवक्तव्यम्।

7. स्याद् अस्ति नास्ति अवक्तव्यम्।

आचारांग(श्रुतस्कन्ध।)

1. पासह एगेसीयमाणे अणत्तपण्णे।

- जे आत्मप्रज्ञा जाणत नाहीत,ते विषादात जगतात।

2. एहारामं परिण्णाय, अल्लींन गुत्तो परीव्वए।

- सत्याच्या धारणेसाठी स्वतःच्या मनात रमणे सोडावे लागते।

3. अगगच मूलं, विगींच धिरे।

- हे धीर साधका,तुझ्या दुःखाचे अग्र टोक मूळ (दुखजन्म) यातील भेद जाण।

4. विस्सेणि कट्टू परिण्णाए।

- समत्वाने विषाद संपतो।

 

(समता म्हणजे लोकांतात एकांतात समान वर्तन होय! हे जैनांचे महत्त्वाचे तत्त्व आहे!)