रशिया, नॉट ट्रूली एशिया!

विवेक मराठी    18-Jun-2021
Total Views |

भाग 1

रूरिकच्या नेतृत्वाखाली त्याच्या व्हायकिंग आणि स्लाव्ह अशा मिश्र सेनेनेनेपियरनदीच्या आसपासचा प्रदेशदेखील झपाट्याने जिंकून घेतला. या दिग्विजयात नेपियर नदीच्या किनारी त्यांनी एक नगर वसविले, ते म्हणजेकियेव्ह.’ हे राज्यकर्ते कियेव्हमध्ये इतके उत्तम स्थिरावले कीकियेव्हला सर्व आगामी रशियन शहरांची जननी म्हणून दर्जा देण्यात आला. यानोव्होग्रोदआणिकियेव्हनावाच्या नगरांमधून जन्मास आलेल्या बीजरूपी रशियालाकियेव्हान रूसअसेच संबोधले जाते. ‘रूसहा शब्द फिनिश भाषेतीलरुयोसिशब्दापासून आला असावा. या शब्दाचा अर्थनौकानयन करणारेअसा होतो.

 
rushia_1  H x W

 

रशिया - एक महाकाय देश, संपूर्ण आशिया खंडाचा जवळपास 38% भूभाग व्यापून आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे रशियन सांस्कृतिक राजकीय इतिहासाच्या प्रारंभाचे वर्ष .. 862 मानले जाते. भारत, चीन, पर्शिया या देशांच्या हजारो वर्षांच्या इतिहासाशी तुलना केली, तर हे वर्ष तसे अलीकडचेच म्हणावे लागेल. जवळपास 1,000 वर्षे राजेशाहीची भक्कम पकड असलेल्या रशियात 1917 साली कम्युनिस्ट राज्यक्रांती झाली आणि मग एका महासत्तेच्या दिशेने रशियाची वेगाने वाटचाल होऊ लागली. दुसर्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या सामाईक विजयामध्ये निर्णायक भूमिका बजावणार्या रशियाचा अगदी अलीकडेपर्यंत, म्हणजे 1989पर्यंत अमेरिकेला तोडीस तोड अशी महासत्ता म्हणूनच दरारा होता.

 

 

भारताचा विचार केला, तर 1947पर्यंत आपले रशियाचे एकूण राजकीय संबंध जवळपास नगण्य होते. इंग्रजी राजवट प्रथमपासूनच रशियाबद्दल संशयी असल्याने एकूण भारतीय उपखंड रशियाच्या कोणत्याही प्रभावाखाली नसावा, यासाठीच त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र, विशेषत: 60च्या दशकानंतर तेव्हाचा सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक असा रशिया भारताचा महत्त्वाचा लष्करी भागीदार म्हणून उदयाला आला. एकूणच भारतीय नागरिकांमध्ये, आंतरराष्ट्रीय राजकारणातील आपला महत्त्वाचा मित्र देश हीच आज रशियाबद्दलची सर्वसाधारण धारणा आहे.


rushia_2  H x W

 

 

काय आहे नक्की या देशाचा इतिहास? कोणत्या वंशाच्या लोकांनी या देशाची पायाभरणी केली? जाणून तर घ्यायलाच पाहिजे, नाही का?

 

 

रशियाचा प्रारंभ जाणून घ्यायचा, तर सर्वात प्रथम आपल्यालाव्हायकिंगआणिस्लाव्हया दोन वंश समुदायांबद्दल जाणून घ्यावे लागेल. आज डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडन जिथे आहे, असा दक्षिणी स्कँडिनेव्हिया ही या व्हायकिंग्जची भूमी. .. 8व्या शतकात या वंशाच्या टोळ्यांनी युरोपमध्ये भिन्न प्रदेशांत वर्चस्व निर्माण केले. बोचरी थंडी असलेल्या प्रदेशात टिकाव धरून राहिल्याने जात्याच धिप्पाड आणि भक्कम बांध्याचे हे व्हायकिंग्ज अत्यंत कुशल नाविक होते. अशा या व्हायकिंग्जची इतकी दहशत होती, की त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण नौका लांबून दिसल्या, तरी किनार्यावरच्या लोकांचा थरकाप उडत असे.

 

त्या उलटस्लाव्हसमुदाय. तुलेनेने मवाळ आणि विनिमय पद्धतीच्या व्यापारावर अवलंबून असणारा समुदाय. ‘स्लाव्हहे अभिनामदेखील त्यांना 8व्या शतकाच्या सुमारास मिळाले असावे. पश्चिमेलाव्हिश्चुलानदी पूर्वेसनेपियरनदी या दोन नद्यांच्या मध्ये असणारा पूर्व युरोपचा प्रदेश हे त्यांचे वसतिस्थान. हे स्लाव्ह लोक व्हायकिंग टोळ्यांनाव्हॅरेंजियन्सया नावाने संबोधत असत. एकंदरच व्यापाराच्या निमित्ताने व्हायकिंग टोळ्यांचा युरोपमध्ये विस्तार होण्याच्या आधीपासूनच हे व्हायकिंग लोक स्लाव्ह लोकांना परिचित होते. ऊर्वरित युरोपच्या अगदी उलट इथे मात्र या दोन समुदायांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली होती. साधारण आठव्या-नवव्या शतकानंतर पूर्व युरोपीय प्रदेशांत विविध भटक्या टोळ्यांचा सुळसुळाट सुरू झाला होता. यामध्ये काही स्लाव्ह टोळ्यादेखील होत्या. त्यामुळे सुदूर उत्तरेला व्हायकिंग मुख्य भूमीजवळील एका नदीच्या, ‘व्होलकोव्हनदीच्या आसपासच्या स्लाव्ह समुदायांच्या प्रमुखांनी एक शक्कल लढविली. इथे राहणार्या व्यापारप्रधान स्लाव्ह समुदायाची मुख्य गरज होती संरक्षण. हे प्रमुख गरज पडेल तसेव्हॅरेंजियन्सचे संरक्षण घेऊ लागले.

प्रचलित कथा असे सांगते की एकूणच या अस्थिर परिस्थितीला कंटाळून काही स्लाव्ह समुदायांनी मोठ्या संख्येत एकत्र येऊनरूरिकनावाच्या बलाढ्य व्हॅरेंजियन्स योद्ध्याला विनंती केली, कीआमच्या प्रदेशात अराजक माजले आहे, याला वेसण घालू शकेल असा एकही नेता आसपास दिसत नाही. तरी, वर्षानुवर्षे सलोख्याचे संबंध असलेल्या व्हॅरेंजियन्सचा बलाढ्य नेता रूरिकनेनोव्होग्रोदला यावे आणि राजपद ग्रहण करावे.’ या कथेत कितपत तथ्य आहे हे माहीत नाही,

 

पण एक मात्र खरे, की .. 862च्या आसपास हारूरिकनावाचा व्हायकिंग राजा आज पूर्व युरोपात असलेल्यानोव्होग्रोदचा राजा झाला. रूरिकच्या नेतृत्वाखाली त्याच्या व्हायकिंग आणि स्लाव्ह अशा मिश्र सेनेनेनेपियरनदीच्या आसपासचा प्रदेशदेखील झपाट्याने जिंकून घेतला. या दिग्विजयात नेपियर नदीच्या किनारी त्यांनी एक नगर वसविले, ते म्हणजेकियेव्ह.’ हे राज्यकर्ते कियेव्हमध्ये इतके उत्तम स्थिरावले कीकियेव्हला सर्व आगामी रशियन शहरांची जननी म्हणून दर्जा देण्यात आला. यानोव्होग्रोदआणिकियेव्हनावाच्या नगरांमधून जन्मास आलेल्या बीजरूपी रशियालाकियेव्हान रूसअसेच संबोधले जाते. ‘रूसहा शब्द फिनिश भाषेतीलरुयोसिशब्दापासून आला असावा. या शब्दाचा अर्थनौकानयन करणारेअसा होतो.

रूरिकनंतर त्याचा विश्वासू सेनानीओलेगयाच्यावर रूरिकच्या अल्पवयीन पुत्राची, ‘आयगोरची जबाबदारी सोपविण्यात आली. ओलेगने अतिशय निष्ठेने या राजपुत्राला सक्षम केले. .. 907मध्ये आयगोरला सर्व रूस लोकांचा राजा म्हणून घोषित करण्यात आले. या व्हॅरेंजियन्स आणि स्लाव्ह या दोन मुख्य समुदायांच्या मिश्रणातून पुढे रशियन ही ओळख असलेला समुदाय तयार झाला, असे आढळून येते.

 

आज युरोपमध्ये रशियाचा जितका भाग आहे, तेवढ्या प्रदेशात साधारण पुढील 100 वर्षांत यारूसलोकांचा झपाट्याने विस्तार झाला. पूर्वीचीव्हॅरेंजियनअथवास्लाव्हही ओळख मागे पडली रशियनअथवारूसही सामाजिक अस्मिता जोर धरू लागली. अर्थात, या समाजाला अजूनही एकत्रित बांधणारा समान उपासना पंथ नव्हता.

आयगोरच्या पश्चात त्याची विधवा राणीओल्गाही रूस लोकांची राणी झाली. .. 955मध्ये पूर्वेकडील ख्रिस्ती धर्मपीठ असलेल्या कॉन्स्टंटिनोपोलिसच्या दौर्यावर असताना या शहराचे सौंदर्य, तेथील भारदस्त ख्रिस्ती उपासना स्थळे धीरगंभीर प्रार्थना यामुळे ही राणी प्रभावित झाली आणि तिने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतेलेली ती पहिली रशियन राणी. तिचा नातू सम्राट व्लादिमिर पराक्रमी निपजला. बल्गर्स नावाच्या टोळ्यांचा बंदोबस्त केल्यावर जेव्हा या बल्गर लोकांच्या जित नेत्याला हा व्लादिमिर भेटला, तेव्हा प्रथम त्याने व्लादिमिरच्या शौर्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पुढे तो असेही म्हणाला, कीराजा, तुझ्याकडे अमाप सैन्यबळ आहे, पण तुझ्या राज्याकडे आणि सैन्याकडे कोणतीही समान उपासना पद्धती नाही, तुझ्या राज्याला एका देवाचे आणि धर्माचे अधिष्ठान नाही. तू जसे आमची भूमी माझ्याकडून स्वीकारत आहेसच, तसाच आमचा पवित्र ख्रिस्ती धर्म का नाही स्वीकारत?”

 

या प्रसंगाने रशियाच्या धार्मिक इतिहासाला कलाटणी मिळणार होती. यानंतर काय घडले, रशियाची पुढची राजकीय वाटचाल आणि साम्राज्यविस्तार कसा झाला, ही सुरस कथा जाणून घेऊ आपल्या पुढच्या लेखात.

(क्रमश:)