अमेरिकन संविधान ब्रिटिश प्रेरणा आणि अमेरिकन नावीन्य

विवेक मराठी    24-Jun-2021
Total Views |

रमेश पतंगे लिखित, साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन संस्था)तर्फे नुकतीचब्रिटिश संविधान - उद्गम आणि विकास’, ‘फ्रेंच संविधान - क्रांती आणि नवीन संकल्पनांची वाटचालआणिअमेरिकन संविधान - ब्रिटिश प्रेरणा आणि अमेरिकन नावीन्यह्या पुस्तकांतील आधीच्या दोन भागांमध्ये आपण ब्रिटिश आणि फ्रेंच संविधानांसंदर्भातील पुस्तकांबद्दल जाणून घेतले. ब्रिटनची शांततापूर्ण मार्गाने, राजाचे हक्क कमी करत प्रस्थापित झालेली लोकशाही, तर ह्याच्या एकदम विरुद्ध फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली रक्तरंजित क्रांती ह्याचे नेमके वर्णन ही दोन पुस्तके करतात. ब्रिटनमध्ये हळूहळू विकसित होत गेलेली लोकशाही, तर फ्रान्समधील क्रांतीनंतर निर्माण झालेले, तथापि बदलत गेलेले संविधान ह्याचा तुलनात्मक अभ्यास वाचकांना विचारांची नवी दिशा देतो. ह्याचबरोबरीने अमेरिकन संविधान उगम हा ह्या दोन देशांहून पूर्णतः वेगळ्या परिस्थितीत होतो. त्यामुळे ह्या तिन्ही पुस्तकांचे वाचन वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठीही महत्त्वाचे आहे.

book_1  H x W:

चार
देशांचे मिळून युनायटेड किंग्डम कसे अस्तित्वात आले हे ब्रिटनचा इतिहास दाखवतो, तर पूर्णतः नवीन राष्ट्र कसे उदयास येते हे अमेरिकेचा इतिहास बघता कळते. 1620 साली 102 ब्रिटिशांना घेऊन निघालेले मेफ्लॉवर जहाज अमेरिकेत येते. अनेक संकटांचा सामना करत आणि शून्यातून निर्मिती करत तिथे ब्रिटन साम्राज्याअंतर्गत वसाहती निर्माण होतात. जॉन विक्लिफच्या पोपविरुद्ध केलेल्या बंडानंतर प्रोटेस्टंट पंथ वाढला. युरोपमधून मार्टिन ल्यूथरने रोमन कॅथोलिक चर्चविरुद्ध केलेल्या चळवळीमुळे युरोपमध्ये प्रोटेस्टंट पंथ उभा राहिला. ब्रिटनमधून अमेरिकेत वसाहतींसाठी गेलेले प्युरीटन्स, युरोपमधून अमेरिकेत गेलेले प्रोटेस्टंट ह्यांनी धर्मसंस्थेच्या विरुद्ध लिबर्टीची इच्छा धरत आपले स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले. फ्रान्स-इंग्लंड सप्तवार्षिक युद्धानंतर झालेला खर्च भरून काढण्यासाठी वसाहतींवर इंग्लंडने सक्तीचा कर लावला आणिप्रतिनिधित्व नाही, तर कर नाहीही घोषणा अमेरिकेने करून स्वातंत्र्याची बीजे लावली गेली. स्टँप ॅक्ट, बोस्टन टी पार्टी, पहिल्या कॉन्टिनेन्टल काँग्रेसचे ठराव असा देश आणि संविधान निर्माणाचा रंजक इतिहास मांडत पुस्तक पुढे जाते. ब्रिटनने अमेरिकेत केलेल्या 13 वसाहतींमध्ये भौगोलिकदृष्ट्या बरेच अंतर होते, तरीही एक राष्ट्र आणि लिबर्टीच्या भूमिकेतून ते ब्रिटनशी लढले आणि संघराज्याचे संविधान अत्यंत ताकदीने निर्माण केले.

1776 साली अमेरिकेने स्वातंत्र्याचा जाहीरनामा आधी मंजूर केला आणि स्वातंत्र्ययुद्ध नंतर झाले. त्यानंतर 1781 साली संविधान सभेने स्वतंत्र अमेरिकेची राज्यघटना निर्माण केली. 1787 साली फिलाडेल्फिया कन्व्हेन्शनमध्ये राज्यांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी विविध मसुदे समोर मांडले. ते विविध राज्यांनी संमत करण्यासाठी अमेरिकेत जो विमर्श झाला, तोही ह्या पुस्तकात अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने आला आहे. ॅलेक्झांडर हॅमिल्टन, जॉन जे, जेम्स मॅडिसन . संविधान सभा सदस्यांचे फेडरलिस्ट पेपर्समध्ये प्रकाशित झालेले निबंध, आणि त्यातील एकात्मतेचे, भेद निर्मूलनाचे, राजकीय गटांबद्दलचे विचार, बेन्जामिन फ्रँकलिन ह्यांचे भाषण, बिल ऑफ राइट्सच्या दहा सुधारणा ह्या सगळ्याचा घेतलेला परामर्श ह्या पुस्तकाला सर्वंकष बनवत आहे. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या अध्यक्षपदाहून निवृत्त होताना केलेल्या सर्वकालीन, सर्वव्यापी भाषणाच्या पुस्तकात लिहिलेल्या सारांशाने पुस्तक एक उंची गाठत आहे. वॉशिंग्टन यांनी दिलेल्या संदेशामध्येराजकीय समृद्धी ज्याने प्राप्त होते, त्यामध्ये रिलीजन आणि नैतिकता यांचे स्थान अद्वितीय आहेअसे म्हटले आहे. अमेरिकेच्या समानतेतही माणूस जन्माने नाही, तरनिर्मितीने समान मानला आहे, ह्या दोन विशेष मुद्द्यांकडेही लेखक लक्ष वेधून घेतात. कारण त्याही वेळेस अमेरिकेत वर्णभेद मानला जात होता. भारताने स्वातंत्र्य मिळवताना आणि आपले संविधान लिहीत असताना अस्पृश्यता आणि विषमता यांचे निर्मूलन करणे आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा उद्देश होता, तसा अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यात नव्हता. ‘लिबर्टीहाच त्यांचा प्राथमिक उद्देश होता, ही गोष्ट हे पुस्तक लक्षात आणून देते.

तिन्ही पुस्तके वेगळ्या दृष्टीकोनांतून लिहिली गेली आहेत. त्यामुळे एकत्रित वाचल्यावर एक समग्र अनुभव देत आहेत. इंग्लंडच्या राजांचा आणि शीतक्रांतीच्या आधारे शांतपणे झालेला लोकशाहीचा विकास हा एक फोकस झाला. इथे विविध राजांचा इतिहास येऊन जातो. फ्रान्समधील राजेशाही उलथवून टाकण्यासाठी केलेली, पण अनागोंदी निर्माण करणार्या रक्तलांच्छित क्रांतीविषयक वाचणे तिचे यश-अपयश सांगतात. स्वातंत्र्य-समता-बंधुता ही मूल्ये ज्या लोकशाहीच्या आधारे प्रस्थापित होऊ शकतात, ती क्रांतीनंतरही प्रस्थापित होऊ शकणारी लोकशाही हा एक विरोधाभास असतो. त्या क्रांतीचे विस्तृत वर्णन हा दुसरा फोकस झाला, तर स्वातंत्र्याची आस घेऊन निर्माण होत असलेल्या एकसंघ राष्ट्रासाठी झालेला तत्त्वचिंतनात्मक विमर्श, त्यातील मूल्यांवरील चर्चा हा तिसरा आवश्यक फोकस. त्यामुळे तिन्ही पुस्तके एकत्रित अधिक चांगला अनुभव देतात. काय मिळते भारतीयांना इतर देशांची संविधाने वाचून? त्याने आपल्या देशाची संस्कृती, आपण कोणत्या परिस्थितीत स्वतंत्र झालो, स्वातंत्र्य मिळत असताना आपल्यापुढे काय आव्हाने होती, हजारो वर्षांच्या संस्कृतीमध्ये नक्की कोणती शासनव्यवस्था रुळली होती, ती अनियंत्रित राजेशाही होती कीलिमिटेड मोनार्कीआणि प्रजासत्ताक? अंधानुकरण झाले का? कोणत्या विषयांवर अनुकरण योग्य होते आणि कोणत्या आपल्या मातीतील सुधारणा होण्यास आणखी वाव आहे? असे अनेक विचार करायला वाचक प्रवृत्त होतो. अनेक घडामोडी कथा स्वरूपात आणि क्लिष्ट ॅकॅडमिक भाषा वापरता लिहिल्याने हा इतिहास रंजक आणि वाचनीय झाला आहे.

पुस्तकांत जाणवण्यासारख्या एक-दोन त्रुटी म्हणजे काही ठिकाणी भाषेचा काळ बदलत आहे. काही ठिकाणी तो इतिहास म्हणून भूतकाळ, तर क्वचित कथा सांगण्यासारखा टोन येत आहे. त्यामुळे वाचताना अडखळल्यासारखे होते. तसेच फ्रान्सच्या आजच्या संविधानाविषयक अधिक माहिती हवी होती असे वाटले. मात्र ह्या पुस्तकांतून जिज्ञासा वाढतेय, हे त्यांचे यश आहे. इतक्या मोठ्या विषयावरील राष्ट्रांचा हजार-दोन हजार वर्षांचा इतिहास एका पुस्तकामध्ये लिहिणे हे प्रचंडच मोठ्या अभ्यासाचे काम आहे. अशी एकाच वेळेस तीन पुस्तके वाचकांना सोपविल्याबद्दल लेखक रमेश पतंगे ह्यांचे मन:पूर्वक आभार.

पुस्तकाचे नाव - अमेरिकन संविधान

ब्रिटिश प्रेरणा आणि अमेरिकन नावीन्य

लेखक - रमेश पतंगे

प्रकाशक - हिंदुस्थान प्रकाशन संस्था

पृष्ठे - 164 किंमत - 250 रु.

नोंदणीसाठी संपर्क 9594961858