तिरुवल्लुवर एक ‘लौकिक’ संत

विवेक मराठी    08-Jun-2021
Total Views |

ऐहिक विश्वाला खरे समजून मानवकल्याणाचे कार्य करणार्या संतांना आपल्या व्यक्तिगत मोक्षाची काहीच चाड नसते. ते सर्व जीवसेवा हीच शिवसेवा मानून कर्मयोगाची साधना करतात. संत तिरुवल्लुवर यांनी याच भावनेला उचलून धरले आणि समाजाने कार्यप्रवण व्हावे म्हणून आग्रह धरला.

Thiruvalluvar, commonly k 

केवळ आपल्याच देशातील मानवांना नव्हे, तर वैश्विक स्तरावर विश्वकल्याणाचे विचारसूत्र देऊन सगळ्यांना प्रेमाच्या एकाच सूत्रात गुंफणारे एक अद्भुत विणकर म्हणजे संत तिरुवल्लुवर. यांचा जन्म विणकर समाजात झाला होता असे बहुतेक विद्वान मानतात. त्यांच्या नावातीलतिरुहा शब्द आदर दर्शवितो, तरवल्लुरहा शब्द त्यांची जात दर्शवितो. तामिळनाडूत या जातीची गणना अनुसूचित जातीत केलेली आहे. हत्तीवर बसून ढोल-नगारे वाजविणे हा या जातीचा व्यवसाय होता. एकूण, संत तिरुवल्लुवर यांचा जन्म दलित परिवारात झाला, असेच सर्व मानतात.

संत तिरुवल्लुवर यांनीतिरुकुरुळनामक ग्रंथाची रचना केली आहे. यातिरुकुरुळविषयी आपल्याफाउंडेशन्स ऑफ इंडियन कल्चरया ग्रंथात योगी अरविंद असे म्हणतात की, ‘एवढ्या मोठ्या वैचारिक चेतनेच्या उंचीचे साहित्य यापूर्वी कधीच निर्माण झालेले नाही. हे महान आध्यात्मिक काव्य आहे.’

जगाने संत आणि नि:संग वृत्ती याची घट्ट सांगडच घालून टाकली आहे. ईश्वराचा खरा भक्त हा या ऐहिक जगाबद्दलच नव्हे तर आपल्या देहाबाबतही उदासीन असतो, असेच मानले जाते. जो जगाला विन्मुख असतो तोच संत, अशीच आपली फसगत असते. पण संतांनाही - किंबहुना संतांनाच समाजसन्मुख वृत्तीने लोकसंग्रह जपावा लागतो, याचे कृतिशील उदाहरण म्हणजे संत तिरुवल्लुवर होय. ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्यांअसा विचार जेव्हा समाजात फैलावला होता आणि जग हा सर्व मायेचा पसारा आहे असे मानून जगाविषयी उदासीन राहून सर्वसंगपरित्याग करून ईश्वराच्या शोधात भटकणार्या गोसाव्यांनाच संत संबोधण्याकडे समाजाचा कल होता, अशा काळात संत तिरुवल्लुवर यांनी या कृतीचा घोर निषेध केला होता. आपल्या कर्तव्यकर्माकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नैष्कर्म्ययोग नाही, असे त्यांनी बजावून सांगितले. ते म्हणाले, “अशा लोकांपेक्षा जे वाईट कर्म करतात असे लोक अधिक श्रेष्ठ म्हणावे लागतील. कारण त्यांना आपल्या वाईट कर्मांपासून उपरती झाली की त्यांनाही भक्तीच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती करता येते.”

ऐहिक विश्वाला खरे समजून मानवकल्याणाचे कार्य करणार्या संतांना आपल्या व्यक्तिगत मोक्षाची काहीच चाड नसते. ते सर्व जीवसेवा हीच शिवसेवा मानून कर्मयोगाची साधना करतात. संत तिरुवल्लुवर यांनी याच भावनेला उचलून धरले आणि समाजाने कार्यप्रवण व्हावे म्हणून आग्रह धरला. डॉ. अल्बर्ट श्वाईत्झर यांनीइंडियन थॉट अँड इट्स डेव्हलपमेंटया ग्रंथात (पृ. क्र. 16) असे नमूद केले आहे कीया ऐहिक विश्वातचदेवाचे राज्यअवतरेल असे प्रभू येशूची विचारधारा सांगत नाही. उलट हे ऐहिक विश्व झपाट्याने नाहीसे होईल आणि त्याऐवजी येथे एक अतिमानवी विश्व साकार होईल. या नव्या विश्वात दैवी शक्तीपुढे अपात्र आणि वाईट गोष्टी पराभूत होतील. याउलट संत तिरुवल्लुवर यांचा असा विश्वास आहे की, सर्व बंधनातून मुक्त झालेला मनुष्य याच ऐहिक विश्वात स्वर्ग साकार करू शकतो आणि अत्युच्च आनंदाची प्राप्ती करू शकतो. या जगात असे परिवर्तन घडून यावे, या हेतूने जगाच्या अंतापर्यंत थांबण्याची काहीच गरज नाही. आपण आपल्यात परिवर्तन केले की झाले!’


Thiruvalluvar, commonly k

पृथ्वीवरील प्राणिमात्रांना धर्माची गरज का भासते? आपल्या देशातील विचारवंत सांगतात, ‘धर्मेण हिना पशुभिः समाना धर्मविहीन मनुष्य आणि पशू यांच्यात काहीच फरक नसतो. पशुतुल्य वागणुकीपासून मानवाला परावृत्त करण्याचे कार्य धर्म करीत असतो. यामुळेचधर्मो धारयति प्रजा:’ असा विचार मांडला गेला आहे. धर्म हा प्रजेची धारणा करीत असतो. काही विचारवंतांना वाटत असते की, सर्वशक्तिमान ईश्वर आणि मनुष्य यांच्यातील नाते जोडण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे, तर काही विचारवंतांना असे वाटते की ईश्वर आणि मनुष्यातील नाते जोडण्यासाठी धर्माची गरज आहे. पण संत तिरुवल्लुवर यांच्या विचारांची महानता अशी आहे की या त्यांनी दोन्ही विचारांतील सुवर्णमध्य साधला आहे.

संत तिरुवल्लुवर सांगतात -

प्रेम आणि ईश्वर या दोन भिन्न गोष्टी आहेत,

असे सांगतात ते खरोखरीच मूर्ख होत!

कारण, प्रेम आणि ईश्वर हे एकरूप आहेत,

ही गोष्टच ते जाणत नाहीत.

प्रेम आणि ईश्वर एकरूप आहेत,

याचा साक्षात्कार झाल्यानंतर,

ते प्रेमरूप ईश्वरात निमग्न होतात.

पाहा, आपण ज्यांना विश्वबंधुत्व आणि मानवकल्याण अशा मोठमोठ्या संकल्पना मानतो, त्याच गोष्टी अतिशय साध्यासोप्या शब्दांत संत तिरुवल्लुवरांनी मांडलेल्या आहेत.

अहिंसा परमो धर्म: ही गोष्ट जैन आणि बौद्ध विचारांतूनही प्रामुख्याने मांडली गेली आहे. पण साधकाच्या मानसिक शुद्धीकरणासाठी अहिंसेचा विचार तेथे उचलून धरण्यात आलेला आहे. अहिंसेचे माहात्म्य तिरुवल्लुवरांनाही मान्य आहे, पण सकारात्मक प्रेम आणि करुणा यांच्या आधारावर त्यांची मनुष्यमात्रांतील अहिंसा ही अधिक व्यापक पायावर उभी राहते.

संत तिरुवल्लुवर सांगतात -

करावी जीवहिंसा,

सर्व गुणांचा हा सोपान।

वध करणे प्राणियांचा,

सर्व दुर्गुणांची ही खाण॥ (33.1)

अन्न खावे सर्वांना वाटून,

सर्वांशी वागावे प्रेमाने।

हाच सर्वश्रेष्ठ शिष्टाचार,

जे परिपूर्ण विशुद्धी मतिने॥ (33.2)

परोपकाराची व्याख्या करताना संत तिरुवल्लुवर सांगतात - त्या वर्षणार्या मेघाला परतफेड म्हणून या जगातील जीव काय देतात? त्याचप्रमाणे सज्जनदेखील सत्कर्म करताना परतफेडीबाबत विचार करीत नाहीत. (211)

परिश्रमाने मिळविलेले धन हे सत्पात्र व्यक्तीच्या परोपकारासाठी उपयोगात आणले पाहिजे. (212)

दुसर्यांवर उपकार करीत शिष्टाचाराने जीवन व्यतीत करण्यासारखा दुसरा श्रेष्ठ गुण देवलोकातही नाही आणि या इहलोकातही नाही. (213)

या ठिकाणी आपल्याला संत तुकारामांचेच पुन: दर्शन होते. गुरूने मेघदृष्टीने सर्वांना समान उपदेश करावा असे म्हणणारे संत तुकाराम पुढे सांगतात -

पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे।

आपुल्याला दैवे पिके पिके भूमी॥

मेळवूनि धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी॥

तुका म्हणे तेचि आश्रमाचे फळ।

परमपद बळ वैराग्याचे॥

संत तिरुवल्लुवर यांनी आश्रमधर्म म्हणून आपल्यातिरुकुरळग्रंथात गृहस्थाश्रमाचा केवळ उपदेशच केलेला नाही, तर गृहस्थाश्रम जगून तसा आदर्श दाखविलाही आहे.

या महाकवीच्या अर्धांगिनीचे नाव होते वासुकी. ती जेव्हा मृत्युशय्येवर होती, तेव्हा हा संत म्हणाला, “हे प्रिये, तुझ्या मनात काहीतरी शंका राहून गेली आहे, असे मला वाटते. संकोचाने आयुष्यभर ती गोष्ट तू मला विचारू शकली नाहीस. पण आतातरी तू मला हवे ते विचारावेस असे मला वाटते.”

वासुकी म्हणाली, “नाथ, आपले मन मला कधी कळले नाही असे कधीही झाले नाही. पण अगदी पहिल्या दिवसांपासून भोजन करताना तुम्ही मला आपल्या ताटाजवळ एका वाटीत पाणी आणि एक सुई आणून ठेवण्यास सांगत, पण या गोष्टी मुळीच वापरत नसत. त्याचे मर्म कला कधीच कळले नाही.”

तेव्हा तिरुवल्लुवर हसून म्हणाले, “प्रिये, मला भोजन वाढताना तुझ्याकडून चुकून एखादा अन्नकण पत्रावळीच्या बाहेर पडला तर तुझ्यावर उगीच रागावण्यापेक्षा सुईने उचलून तो पाण्यात स्वच्छ धुऊन मला खाता यावा, याच हेतूने मी तुला तसे सांगितले होते. पण तुझ्या हातून आयुष्यभरात कधीच अन्नाची सांडलवंड झाली नाही. त्यामुळे त्या गोष्टीचा उपयोग करण्याची मला कधीच आवश्यकता भासली नाही. हे अन्नपूर्णे, तू धन्य आहेस!”

पतीच्या तोंडून आपली ही प्रशंसा ऐकून त्या गृहिणीने मोठ्या समाधानाने आपले डोळे मिटले. वासुकीच्या पतिभक्तीचा गौरव करताना एक आख्यायिका सांगितली जाते की, ती विहिरीवर पाणी शेंदत असताना पतीने हाक मारल्यामुळे अर्धवट वर आलेला पोहरा तसाच सोडून पतीकडे गेली होती. त्या वेळेस तो पोहरा आहे त्याच स्थितीतच स्तब्ध राहिला होता, असे म्हणतात. पतिभक्तीने जणू गुरुत्वाकर्षणाच्या नियमावरच मात केली होती. त्याचप्रमाणे संत कबीरांबाबत प्रसिद्ध असलेली आख्यायिका त्यांच्याप्रमाणेच शेले विणणार्या या महान भगवद्भक्ताबाबतही सांगितली जाते. या पतिपत्नीच्या उत्तम गृहस्थाश्रमाचे रहस्य जाणून घेण्यासाठी एक जण त्यांना भेटायला आला असताना, संत तिरुवल्लुवर यांनी भर दुपारी आपल्या हातातील एक वस्तू खाली पडली असता ती पाहण्यासाठी कंदील मागविला होता आणि वासुकी खरोखरच कंदील घेऊन तिथे उपस्थित झाली होती. पतीचे मर्म जाणणारी पत्नी लाभल्यास गृहस्थाश्रम धन्य होतो, याचे प्रत्यक्ष प्रमाणच त्या व्यक्तीला पाहावयास मिळाले होते.

संत तिरुवल्लुवरांचा गौरव करताना डॉ. अल्बर्ट श्वाईत्झर असे म्हणतात - ‘जी अत्युच्च नैतिक आणि नैसर्गिक मूल्ये आपल्याला भारतीय जनतेमध्ये विद्यमान असलेली पाहायला मिळतात, ती आपल्याला त्यांच्या महान धार्मिक ग्रंथांपेक्षा महान धार्मिक गुरूंच्या शिकवणीतून झिरपलेली आहेत, ज्यांचा जन्म कदाचित तथाकथित खालच्या जातींमध्ये झाला होता, पण जे जनसामान्यांमध्येच राहत होते आणि जनसामान्यांना जाणतही होते.’

 

कुलीनतेवर भाष्य करताना संत तिरुवल्लुवरांनी असे सांगितले आहे -

जो करील सम्यक आचरण,

तोच जाणावा खरा कुलीन।

याचा अभाव जेथे जाण।

तोच जाणावा खरा हीन॥

आम्ही सर्व शास्त्रांचे,

करून पाहिले मंथन।

सत्याहुनि वेगळा अन्य,

नाही धर्म कोणता विलक्षण॥

सारांश, समाज अथवा लोक अथवा ऐहिक जग यांना वगळून संतत्वाचा विचारच करता येत नाही. समाजात राहून आणि समाजासोबत चालूनबोलून उच्च नैतिक मूल्यांचा जीवनादर्श आपल्या जगण्या-वागण्याने समाजासमोर ठेवायचा, हेच संताचे कर्तव्य होय. समाजासाठी झिजणे हा काही संतांसाठी लोकरंजनाचा भाग नसतो. संतांना समाजात मिळून-मिसळूनच वागावे लागते. संतांना -लौकिक होऊन चालत नाही. लोकांना शिकवायचे असेल तर ज्या लौकिक मार्गाने लोक चालतात तोच मार्ग संतांनाही स्वीकारावा लागतो. माउली ज्ञानेश्वर महाराजांनाही माहात्म्यांचे वर्णन करताना म्हटले आहे - ‘मार्गाधारे वर्तावे। विश्व हे मोहरे लावावे। अलौकिक नोहावे। लोकांप्रती॥समाजसुधारकांनी समाजाच्या पुढे केवळ दोनच पावले राहावे, असे न्या. महादेव गोविंद रानडेसुद्धा म्हणत असत. संत हे बोलूनचालून समाजसुधारकच! त्यामुळे त्यांचे आचरण कसे भिन्न असेल?


संत
तिरुवल्लुवर यांच्या नेमक्या काळाबद्दल विद्वांनांत मतभेद आढळतो. त्यांनी धर्म, अर्थ, काम या सर्व विषयांवर 1330 सूत्रांचा उपदेश केला आहे. अशा 130 अध्यायांत प्रत्येकी एकूण 10 कुरुलांचा समावेश आहे. जगातील किमान शंभर भाषांत तरीतिरुकुरुळचा अनुवाद झालेला आहे, यावरूनच त्याची लोकप्रियता लक्षात येते आणि संत तिरुवल्लुवर हेविश्वमानवतावादाचे पुरस्कर्तेहोते, हे सत्य प्रकर्षाने अधोरेखित होते.