स्वच्छ नद्यांसाठी, स्वच्छ भारतासाठी

विवेक मराठी    07-Jul-2021
Total Views |

केमिकल इंजीनिअर असलेल्या मधुकरराव नाईक यांनी 1983मध्येॅक्वाकेमकंपनीमार्फत प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करून प्रदूषणविरहित करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला अगदी छोट्या जागेत काम सुरू झालं. आज अगदी जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पूर्ण देशभरात आणि विदेशातही त्यांच्या कंपनीचे विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने यांच्याशी झालेल्या संवादातून जाणून घेऊ त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा प्रवास.

naik_2  H x W:

आपल्या आपल्या कंपनीच्या आजवरच्या प्रवासावर चर्चा करण्याआधीॅक्वाकेमचं सध्याचं स्वरूप आणि कार्यक्षेत्र याविषयी प्रारंभी जाणून घ्यायला आवडेल.

जलप्रदूषण नियंत्रण हे आज ॅक्वाकेमचं मुख्य कार्यक्षेत्र आहे. या क्षेत्रात आम्ही वेगवेगळ्या कंपन्या, कॉर्पोरेशन्स, हॉस्पिटल्स, सोसायट्या - कॉम्प्लेक्स आणि इंडस्ट्रियल इस्टेट्स यांचं वापर झालेलं, प्रदूषित पाणी प्रक्रिया करून प्रदूषणविरहित करून देतो. यातील काही प्रकारांतील पाण्याचा पुनर्वापरही करता येतो. यासाठी काहीॅडव्हान्स ट्रीटमेंटद्यावी लागते. ती दिल्यास हे पाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध होतं. उद्योग क्षेत्रातून येणारं पाणी अधिक प्रदूषित असतं. त्यात आम्ल, अल्कली . घटक असतात. अनेकदा धोकादायक, विषारी रसायनं असतात. सदर कंपनी कोणत्या उत्पादन क्षेत्रातील आहे, यानुसार पाण्याच्या प्रदूषणाचं प्रमाण कमी-अधिक होतं. त्यामुळे आधी त्या उद्योगांचा, त्या उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणार्या घटकांचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे औद्योगिक पाण्यावर प्रक्रिया करणं अधिक अवघड असतं. दुसरीकडे हाउसिंग सोसायट्या-कॉम्प्लेक्सेस यांचं पाणी - ज्याला आपणसांडपाणीम्हणतो, असं पाणी प्रक्रिया करण्यास सोपं असतं. त्या पाण्यात प्रदूषण करणारे घटक बहुतांशी सर्व ठिकाणी सारखे असतात. औद्योगिक वसाहतींमध्ये वापरलेल्या पाण्यात अनेकदा असे विषारी घटक येतात, ज्यांची काहीच प्रक्रिया/शुद्धीकरण होऊ शकत नाही. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागते. अशा वेळी हे पाणी त्या कारखान्याच्या बाहेरच जाणार नाही, तिथेच वापरलं जाईल अशी व्यवस्था करता येते. पुनर्वापरासाठी उपलब्ध झालेलं पाणी कुठलं आहे, यावर बर्याच गोष्टी अवलंबून असतात. आधी उल्लेखल्याप्रमाणे औद्योगिक वसाहतींतील रसायनयुक्त पाणी तिथेच वापरावं लागतं. तेथील कूलिंग टॉवर्स, बॉयलर अशा ठिकाणी ते वापरता येतं. सांडपाणी मात्र अनेक ठिकाणी वापरता येतं - उदा., एखाद्या मोठ्या हाउसिंग कॉम्प्लेक्समध्ये, जिथे अगदी 2-3 हजार सदनिका आहेत, तिथे सांडपाणी प्रक्रिया करून पुन्हा टॉयलेट फ्लशिंग, गाड्या धुणं, बाग-बगिच्यांसाठी अशा अनेक गोष्टींसाठी वापरता येतं.

1983मध्ये आपण ही कंपनी स्थापन केली. आज कंपनीला जवळपास 38-39 वर्षं झाली. त्या काळात स्वतःचा उद्योग-व्यवसाय तोही अशा वेगळ्या क्षेत्रात, स्थापन करण्याचं धाडस कसं काय केलं, त्यामागील प्रेरणा काय होती?

मी मुळात केमिकल इंजीनिअर आहे. पाण्यावरील प्रक्रिया हा विषय माझा आवडीचा, जिव्हाळ्याचा आहे. माटुंगा-मुंबईच्या यूडीसीटीतून इंजीनिअरिंग करून बाहेर पडल्यावर त्या वेळच्या काही प्रथितयश कंपन्यांमध्ये अनुभवाकरिता मी 6 वर्षं नोकरी केली. स्वतंत्र व्यवसाय करण्याची इच्छा तेव्हापासून होतीच. त्यानंतर 1983मध्ये हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला अगदी छोट्या जागेत, 1-2 माणसांना घेऊन काम सुरू झालं. असं करत करत आज अगदी जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पूर्ण देशभरात आणि विदेशातही आपल्या कंपनीचे विविध प्रकल्प सुरू आहेत. 1989मध्ये वडोदरा येथे इंडो-निसान केमिकल्स या कंपनीसाठी प्लँट बांधला. त्यानंतर 1993-94मध्ये तळोजा भागात सामायिक जलप्रदूषण नियंत्रण प्रक्रिया केंद्राच्या रूपाने मोठा प्लँट बांधण्याची आम्हाला संधी मिळाली. अशी केंद्रं त्या वेळी भारतात नव्हती. या प्रकल्पाच्या वेळी मला खूप काही शिकायला मिळालं. केवळ तंत्रज्ञान म्हणूनच नव्हे, तर एखाद्या प्रकल्प उभारणीतील सर्वच घटक, अडी-अडचणी अनुभवता, समजून घेता आल्या. त्यातून पुढची झेप घेता आली. हा प्रकल्प आमच्या वाटचालीतील माइलस्टोन म्हणता येईल. देशात असे प्रकल्प राबवणार्या पहिल्या दोन-तीन कंपन्यांमध्ये आमचा समावेश होतो.

ही कंपनी स्थापन करत असताना किंवा त्यानंतरच्या या पुढील वाटचालीत आपल्या कुटुंबाची साथ, पाठिंबा कशा प्रकारे लाभला?

आमच्या कुटुंबात मी पहिला उद्योजक आहे. अशा प्रकारे व्यवसाय कुणीही केला नव्हता. काही छोटे-मोठे प्रयत्न झाले, पण मर्यादित स्वरूपात. त्यामुळे असा उद्योग-व्यवसाय त्या वेळी सुरू करणं हे मोठं धाडस होतं. आज मागे वळून बघताना मला हे प्रकर्षाने जाणवतं. मी हे शिवधनुष्य पेलू शकलो, कारण माझी पत्नी त्या वेळी अकाउंटंट जनरल ऑफिसमध्ये नोकरी करत होती. त्यामुळे तिचा पाठिंबा लाभला. एकदा माझा जम बसल्यावर मग माझी पत्नीही या व्यवसायात उतरली. आज या कंपनीची फायनान्स डायरेक्टर म्हणून माझी पत्नी कार्यरत आहे. शिवाय माझी मुलगी मुलगा दोघेही केमिकल इंजीनिअर असून कंपनीच्या व्यवसायात हातभार लावत आहेत. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबाचा भक्कम पाठिंबा लाभल्यामुळेच आमची कंपनी एवढी मोठी झेप घेऊ शकली. शिवाय देशातील आजची स्थितीही उद्योजकांसाठी सकारात्मक आहे. उदा., बिहार, उत्तर प्रदेश किंवा जम्मू-काश्मीरसारख्या राज्यांत प्रकल्प उभारायचा असेल, तर आता उद्योजकाच्या मनात संकोच राहत नाही किंवा भीती राहत नाही. विद्यमान केंद्र सरकारच्या धोरणामुळे हे सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. अगदीवन नेशन वन टॅक्सपासून अनेक गोष्टींचा समावेश होतो.

 
naik_1  H x W:

जलप्रदूषण नियंत्रण हा विषय आणि त्यातील उद्योग-व्यवसाय हे तसं वेगळं क्षेत्र आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत, परंपरेत पर्यावरणाकडे, नैसर्गिक साधनसंपत्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन अत्यंत व्यापक, उदात्त आहे. परंतु गेल्या काही काळात देशातील परिस्थिती त्या संस्कृती-परंपरांना धरून नाही, त्यामुळे प्रदूषणासारखा गंभीर प्रश्न आज आपल्यासमोर आहे. गंगा-यमुना अन्य नद्यांचं प्रदूषण हे याचंच एक उदाहरण. अशा परिस्थितीत या क्षेत्रात एक उद्योजक - व्यावसायिक म्हणून तुमचं काम आणि त्याला मिळालेलं यश कसं विशद कराल?

आपली संस्कृती आपल्याला जलसंपदा, वनसंपदा यांच्याकडे पाहण्याचा वेगळा, व्यापक दृष्टीकोन देते. परंतु, जसजशी लोकसंख्या वाढली, औद्योगिकीकरण वाढलं, तशा या नव्या समस्या आपल्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि त्यातून होणारं प्रदूषण आज अपरिहार्य आहे. पण म्हणून ते दुर्लक्षूनदेखील चालणार नाही. त्यावर कसं नियंत्रण मिळवता येईल, यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. खरं तर हे मोठं आव्हान आहे. परंतु, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे करणं शक्यदेखील आहे. पूर्वीच्या काळी एखादी समस्या उद्भवल्यास आम्हाला खूप वेळा विचार करावा लागे की या विषयात आपण उतरायचं की नाही, आपल्याकडील तंत्रज्ञान यासाठी पुरेसं आणि योग्य आहे किंवा नाही.. इत्यादी. परंतु आज सर्व प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. सरकारी धोरण, उद्योग क्षेत्र आणि नागरी लोकसंख्येची या क्षेत्रात पैसे गुंतवण्याची तयारी, हे प्रकल्प पुढे यशस्वीपणे चालवण्याची इच्छाशक्ती . गोष्टी असतील तर प्रदूषण नियंत्रण शक्य आहे. पुन:प्रक्रियेबाबत बोलायचं झालं, तर मोठ्या शहरांचं सांडपाणी हेदेखील खूप जास्त असतं. हे एवढं जास्त सांडपाणी प्रक्रिया करून फेकून दिलं तर ते मोठं आर्थिक नुकसान असतं. याउलट वीजनिर्मिती, औद्योगिक वसाहती अशा अनेक गोष्टींसाठी हे पाणी देता येऊ शकतं. सुरत, नागपूर आदी शहरांत अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. मला खात्री वाटते की आगामी काळात लोकसंख्या आणि नागरीकरणाच्या रेट्यातून होणार्या प्रदूषणावरपुन:प्रक्रियाया संकल्पनेच्या माध्यमातून नियंत्रणात आणू शकू.

एक थोडा वेगळा प्रश्न - उद्योजक-व्यावसायिकाला नोकरदाराप्रमाणे सोमवार ते शुक्रवार, 10 ते 6 अशा वेळेत आखलेलं काम करता येत नाही. 365 दिवस, 24 तास त्याला आपल्या व्यवसायाकडे लक्ष ठेवावं लागतं. अशा परिस्थितीत कौटुंबिक जीवन, आवडीनिवडी, छंद यांच्यासाठी कितपत वेळ देता येतो?

जोपर्यंत आमचा छोटा व्यवसाय होता, मोठ्या उद्योगात त्याचं रूपांतर झालं नव्हतं, तोपर्यंत मला भरपूर वेळ मिळत होता. त्या काळात खूप वाचन झालं. परंतु, जसा कंपनीचा विस्तार वाढू लागला, तसा मिळणारा वेळ कमी होत गेला. पण तरीही अधूनमधून वेळ काढून वाचन, संगीत यांच्यासाठी मी वेळ देतो. संगीत ऐकण्याचीही मला आवड आहे. शिवाय, मला प्रवासाची आवड आहे. त्यामुळे दोन प्रकल्पांच्या दरम्यान जो मोकळा काळ मिळतो, त्यात मी देशातील अनेक ठिकाणी प्रवास केला आहे, शिवाय विदेशांतही प्रवास केला आहे. याकडे दोन दृष्टीकोनांतून पाहिलं पाहिजे. एक म्हणजे व्यवसाय. जिथे टेक्निकल कन्सल्टन्सी, एखादा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी मदत आदी गोष्टींमध्ये तुम्ही कार्यरत असता, तेव्हा तुम्हाला थोडा तरी मोकळा वेळ मिळतो. परंतु दुसरीकडे जेव्हा तुम्ही स्वत: प्रकल्प उभा करता, तेव्हा मात्र वेळ मिळणं खूप अवघड होऊन बसतं. कारण त्या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक अशी दोन्ही प्रकारची जबाबदारी तुमच्यावर असते.


naik_1  H x W:  

गेल्या दीड वर्षांत, कोरोनाच्या काळात आपल्या कंपनीची आणि व्यवसायाची वाटचाल कशी होती?

कोरोना काळात आमचा टर्नओव्हर थोडा कमी झाला हे खरं असलं, तरी आम्ही आतापर्यंत कुणालाच नोकरीतून कमी केलं नाही किंवा कुणाचाच पगार कापला नाही. आतापर्यंत तरी कंपनीचं काम व्यवस्थित सुरू आहे. टर्नओव्हर कमी झाला असला तरी आम्ही नफ्यात आहोत, हेही मी आवर्जून सांगेन. आता दुसर्या लाटेतून, संभाव्य तिसर्या लाटेतूनही आपण सर्व जण, आपला देश - समाज लवकरच सावरेल आणि नवी झेप घेईल. त्याचप्रमाणे ॅक्वाकेमदेखील एक नवी झेप लवकरच घेईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

आता एक शेवटचा प्रश्न, आगामी काळात मोठे प्रकल्प किंवा योजना आपल्यासमोर काय आहेत?

गेल्या चार दशकांतील वाटचालीनंतर आज आमच्या कंपनीची स्वत:ची अशी एक ओळख, क्षमता निर्माण झाली आहे. कर्मचारी संख्या चांगली आहे, त्यांचं विविध विभागांत वर्गीकरण करून चांगली व्यवस्था निर्माण झाली आहे. परंतु काही प्रकल्प - विशेषतः सरकारी प्रकल्प जे मोठे असतात, त्यात फायनान्स हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. अशा वेळी आम्ही मोठ्या कंपन्या - ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, परंतु त्यांना आमच्या तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, अशा मोठ्या कंपन्यांबरोबर संयुक्तरित्या काही मोठे प्रकल्प राबवण्याची योजना आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षीमेक इन इंडियायोजनेनुसार, आपण आतापर्यंत जी उपकरणं आयात करत होतो त्याऐवजी आम्ही काही जर्मन कंपन्यांशी सहकार्य करून या उपकरणांचं उत्पादन भारतात व्हावं, यासाठी काही योजना आखल्या आहेत. लवकरच यांना मूर्त स्वरूप प्राप्त होईल. आगामी तीन-चार महिन्यांत हे घडलेलं आपल्याला दिसेल. भारतातील सर्व प्रकारचं जलप्रदूषण कमी करणं, नियंत्रणात आणणं हेच ॅक्वाकेमचं मुख्य उद्दिष्ट आहे. तरच आपल्या नद्या अन्य जलस्रोत स्वच्छ राहू शकतील. त्या दृष्टीने विद्यमान केंद्र सरकार गांभीर्याने काम करत आहे, अनेक नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी, शुद्धीकरणासाठी वेगाने काम सुरू आहे. ते यशस्वी होईल अशी मला आशा आहे. परंतु, या आपल्या सर्व नद्यांमध्ये जाणारं पाणी जेव्हा स्वच्छ असेल, तेव्हा या नद्या आपोआप स्वच्छ होतील. ‘स्वच्छ भारतआणिस्वच्छ नद्याहेच माझं आणि आमच्या कंपनीचं ध्येय आहे.

मुलाखतकार : िंनमेश वहाळकर

98236 93308