आम्ही कुणाचे वारस?

विवेक मराठी    09-Jul-2022   
Total Views |
कट्टरता हा काही समूहांचा स्थायिभाव असतो का? धार्मिक श्रद्धांबाबत समजून घेता येईल, पण ज्याने अन्याय-अत्याचार केला, त्या निझामी क्रूरकर्मा उस्मानची पाठराखण कशासाठी? उद्धव ठाकरेंनी जाता जाता नामांतराची घोषणा केली आणि तुळजापूर तालुक्यातील काटगावसारख्या छोट्या गावात त्याचे हिंसक प्रतिसाद उमटतात, हे कशाचे लक्षण आहे? आपल्यासमोर काय मांडून ठेवले आहे, याचा आपण तातडीने विचार करायला हवा.

dharashiv
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने पायउतार होताना काही निर्णय घेतले. त्यात नामांतरे हा कळीचा विषय होता. नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांच्या नावाला विरोध करणार्‍या मंडळींनी विमानतळाचे नाव दि.बा. पाटील असे करण्यास मान्यता दिली. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करा ही जुनीच मागणी घाईघाईने मान्य झाली. त्याचबरोबर उस्मानाबादचेही नामांतर धाराशिव असे झाले. उस्मानाबादचे नाव बदला ही मागणीही तशी जुनीच आहे. एका अर्थाने जुन्या मागण्या उद्धव ठाकरे सरकारने पायउतार होताना पूर्ण केल्या आहेत. अर्थात हा निर्णय घेताना राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर होताच, हे नाकारता येणार नाही. उद्धव ठाकरे गेले, नवे सरकार आले, आता आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय कायम होतील की त्याबाबत कायदेशीर बाबी तपासून घेऊन पुढील निर्णय होणार, हे पाहावे लागेल. मात्र उद्धव ठाकरेंनी घाईने घेतलेल्या या निर्णयामुळे काय झाले हे पाहिले, तर असे लक्षात येईल की आपल्या स्वार्थासाठी जाताना समाजाला आग लावली गेली आहे.
उद्धव सरकारने काडी ओढली, त्याची आग तुळजापूर तालुक्यातील काटगावसारख्या छोट्या गावात लागली. ’धाराशिव नाही, उस्मानाबाद’ अशी पोस्ट सोशल मीडियावर फिरवली गेली आणि त्याबाबत जाब विचारणार्‍या हिंदू तरुणांवर कोयत्याने वार केले गेले. दोन्ही बाजूंनी हिंसक हल्ले झाले असले, तरी सुरुवात करणारे, हल्ला करणारे कोण आहेत हे वेगळे सांगायला नकोच. यांचा उस्मानाबादचा आग्रह का? तर हा यांचा इतिहास पुरुष. निझामाच्या वरवंट्याखाली भरडून निघालेल्या मराठवाड्यात ही उस्मानी मानसिक अजूनही जिवंत असून ती इथल्या मातीशी समरस होत नाही, हीच खरी अडचण आहे. उद्धव ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय असांविधानिक असून तो रद्द करण्यात यावा, असे मुस्लीम समाजाने राज्यपालांना निवेदन दिले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. युती शासनाच्या काळात उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले होते, पण न्यायालयाने त्यास मान्यता दिली नाही. आता घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे हिंसक संघर्ष सुरू झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्याच्या नावावरून उस्मानाबाद हे नाव दिले गेले, तो सातवा निझाम मीर उस्मान अली खान हा अत्याचारी म्हणून कुविख्यात आहे. हैदराबाद संस्थान भारतात 1948 साली विलीन झाले, तेव्हाच ही दमनाची, अत्याचार-अन्यायाची चिन्हे पुसली गेली असती, तर आता नामांतर करण्याची वेळ आली नसती. धाराशिव या नावाला प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे. धारासुरमर्दिनीचे मंदिर धाराशिव शहरात आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीचे स्थानही याच जिल्ह्यात आहे. या पार्श्वभूमीवर आपण कोणता वारसा सांगणार आहोत?
 
 
dharashiv
 
काटगाव येथे झालेल्या हिंसक घटनेचा निषेध करताना त्यामागील कारणमीमांसा समजून घेणे गरजेचे आहे. नामांतर करताना राजकीय पक्षांनी लांगूलचालन करण्याचा प्रयत्न केला आहे हे तर स्पष्ट दिसत आहेच. तसे नसते, तर त्यांनी दोन वर्षे आधी संपूर्ण पूर्वतयारी करून हाच निर्णय घेतला असता. मात्र आपल्या पायाखालची जमीन सरकू लागली की लांगूलचालन हेच आधाराचे जवळचे साधन असते. उद्धव ठाकरेंनी तेच केले. त्यांचे सरकार गेले. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले असून ते या प्रश्नाचे निरपेक्षपणे उत्तर शोधतील, हे पाहावे लागेल. ’धाराशिव नाही, उस्मानाबाद’ अशी भूमिका घेणारे कोणाचे वारसदार आहेत हे उघड झाले आहे. या वारसदारांचे काय करायचे? हा खरा प्रश्न आहे.
स्वातंत्र्यानंतरही निझामाचे समर्थक आणि उस्मानी मानसिकता कुणामुळे शाबूत राहिली, हे तपासून पाहिले तर लक्षात येईल की, स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लीम लांगूलचालनाचे काम जोरदारपणे केले गेले आणि त्यातूनच मतपेढी बांधली गेली. आम्ही तुमचे हितकर्ते आहोत हे मुस्लिमांच्या मनावर ठसवून ठेवताना त्यांची वेगळेपणाची भूमिका कायम जिवंत राहील याची काळजी घेतली गेली. स्वातंत्र्यानंतर, निझामशाही संपल्यावर इथला मुस्लीम समाज भारतीय होईल, आपल्या निष्ठा, आदर्श, संस्कृती म्हणून भारतीयत्व स्वीकारेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. वेगळेपणाला प्रोत्साहन दिले गेले, समाजविरोधी घटनांकडे कानाडोळा केला गेला, यातूनच मुस्लीम समाज आपला आदर्श उस्मान असल्याचे सांगू लागला. काटगाव येथे घडलेली घटना ही हिमनगाचे टोक आहे. संपूर्ण मराठवाडा उस्मानी, औरंगजेब समर्थकांनी व्यापलेला आहे. नामांतराची घोषणा होताच विरोधाचा सूर एकवेळ समजून घेता येईल, पण हिंसा? काटगावमधील हिंसक घटना ही भविष्यात घडणार्‍या घटनां0ची नांदी आहे का? याचा विचार करावा लागेल. आणि कायदा सुव्यवस्था यांच्या आधारे आपण कुणाचे वारस आहोत हेही हिंसक कारवाया करणार्‍या समूहाला समजावून सांगितले पाहिजे. आमचा वारसा कोणता? या प्रश्नाचे उत्तर केवळ मुस्लीम समाजाने शोधायचे नसून संपूर्ण समाज आणि शासन-प्रशासन यांची ही जबाबदारी आहे. अस्मितेच्या आणि दडपशाहीच्या आधारे उस्मानी मानसिकता बळकट होत असेल, तर ती मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001