प्रक्रियायुक्त उत्पादने पितांबरीची खात्री गुणवत्तेची!

विवेक मराठी    06-Nov-2023   
Total Views |

pitambari
खात्रीशीर वाणापासून पिकांचे उत्पादन घेऊन त्यातील गुणवत्ता राखून संशोधनाच्या मदतीने नावीन्यपूर्ण प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्मिती करणे हे पितांबरीचे वैशिष्ट्य. पितांबरीने प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून ग्राहकांसाठी विविध उत्पादने उपलब्ध केली असून ही उत्पादने उत्तम चवीची, शुद्धतेची आणि गुणवत्तेची संपूर्ण खात्री देतात.
षिर्धन्या कृषिर्मेध्या जंतूंना जीवनं कृषी’ अर्थात कृषीपासून समृद्धी, प्रज्ञा प्राप्त होते, तसेच कृषी हाच सर्व मानव प्रजातीचा आधार आहे. याच सुभाषिताचा आधार घेऊन पितांबरी उद्योग समूहाने कृषी उद्योग क्षेत्रातील नवकल्पना आणि प्रगतीला चालना देण्यासाठी 2010 साली ‘पितांबरी अ‍ॅग्रिकेअर डिव्हिजन’ची सुरुवात केली. याअंतर्गत ’पीक लागवड’ ते ’प्रक्रिया उद्योग’ अशी साखळी आम्ही विकसित केली आहे. प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून पितांबरीतर्फे गूळ पावडर, खरवस, गोड लोणचे, पाचक चूर्ण, खाद्यतेल यांची निर्मिती केली जाते. ही सर्व उत्पादने उत्तम चव, शुद्धता आणि गुणवत्तेची संपूर्ण खात्री देतात. या उत्पादनांच्या विक्रीसाठी पितांबरीने ’रुचियाना’ हा ब्रँड तयार केला असून खात्रीशीर वाणापासून पिकांचे उत्पादन घेऊन त्यातील गुणवत्ता राखून संशोधनाच्या मदतीने नावीन्यपूर्ण प्रक्रियायुक्त उत्पादनांच्या निर्मितीला पितांबरी प्राधान्य देत आहे. याशिवाय पीक लागवड, गूळनिर्मिती, गोशाळा-गोमय निर्मिती, प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन केंद्र, आयुर्तेज उद्यान, बांबू पार्क, नर्सरी यासह नानाविध उपक्रम सुरू आहेत. यामुळे कोकणच्या कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण वाढीला व विकासाला हातभार लागत आहे.
 
 
आज पितांबरीचा कृषी प्रक्रिया उद्योग हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प म्हणून पुढे येत आहे. राजापूर तालुक्यातील तळवडे येथील पितांबरीच्या प्रक्षेत्रावर हळद, ऊस, भुईमूग, सोनचाफा, बांबू, केळी, भात, वरी, नाचणी, तीळ, सूर्यफूल, लिंबू अशा विविध उत्तम पिकांची लागवड करून उत्पादन घेतले जाते. या पिकांपासून उपलब्ध होणारा कच्चा माल व त्यासाठी लागणारी प्रक्रिया उद्योगाची यंत्रणा पितांबरीकडे उपलब्ध आहे. या माध्यमातून पितांबरीने शेतमालाची मूल्यवर्धित साखळी विकसित केली आहे. ’इंद्रायणी’, ’वाडा कोलम’ भातावर प्रक्रिया करून त्यापासून तयार झालेला तांदूळ ‘रुचियाना वाडा कोलम तांदूळ’ आणि ’रुचियाना इंद्रायणी’ तांदूळ पॉलिश्ड व अनपॉलिश्ड प्रकारात सध्या उपलब्ध करून देण्यात आला आहे. बाजारात या तांदळास मोठी मागणी आहे.
 

pitambari 
 
काळ्या मातीची शान असलेला ऊस कोकणच्या लाल मातीत पिकत नाही, असे मानले जाते. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पितांबरीने तळवड्याच्या मातीत ऊस लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. पिकाचे मूल्यवर्धन करण्यासाठी काढणीपश्चात तंत्रज्ञान महत्त्वाचे असते. मग यासाठी त्याची योग्य प्रतवारी, पॅकिंग व प्रक्रिया केल्यास पिकाला चांगली किंमत मिळते. केवळ साखर कारखान्यांवर अवलंबून न राहता, तसेच गुळाची वाढती मागणी व आरोग्यदायक गुणधर्म लक्षात घेऊन तळवडे येथे गुर्‍हाळ निर्मिती केली. साखरेसारख्या उत्पादनाशी स्पर्धा करून ऊस उत्पादकांसाठी एक नवीन पर्याय उपलब्ध केला. सध्या लोकप्रिय होत असलेल्या ’पितांबरी रुचियाना’ या गूळ पावडरच्या ब्रँडला गृहिणींची पसंती मिळत आहे. ’पितांबरी रुचियाना’ गूळ पावडर पाचशे ग्रॅमच्या पाकिटाद्वारे आशिया खंडासह युरोपात, आखाती देशांत पोहोचला आहे. वर्षाकाठी सुमारे दोन हजार टन रुचियाना गूळ पावडरची विक्री केली जाते. महत्त्वाचे म्हणजे गूळ पावडरमध्ये कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे ही रुचियाना गूळ पावडर ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. पितांबरीच्या गूळ प्रयोगाला यश मिळाल्यानंतर आजूबाजूचे शेतकरी आता ऊस लागवडीकडे वळले आहेत, हे विशेष. बाजार मागणीनुसार उत्पादन घेतले जाते.
अशाच प्रकारे केळीचे मूल्यवर्धन करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. पितांबरीच्या तीन एकर क्षेत्रावर उत्तम केळीचे घड (उत्पन्न) देणार्‍या ’नेंद्रान’ जातीच्या केळीची लागवड केली गेली आहे. एका रोपापासून 11 महिन्यांनंतर 13 ते 14 केळीचे घड काढण्यात यशस्वी झालो आहोत. उपलब्ध केळीचे मूल्यवर्धन करून त्यापासून केळी पावडर व वेफर्स तयार केले जातात व ’रुचियाना’ ब्रँडअंतर्गत या उत्पादनांची विक्री केली जाते. महिन्याकाठी 300 किलो ’रुचियाना बनाना वेफर्स’ची विक्री केली जात आहे.
 
 
pitambari
 
कोकणातील विविध फळांची चव विशिष्ट हंगामातच चाखता येते. ग्राहकांना वर्षभर कोकण मेव्याचा आनंद घेता यावा याकरिता आंबा, फणस आणि जांभूळ या फळांवर प्रक्रिया करून आंबा पोळी, फणस पोळी, जांभूळ पोळी अशा उत्पादनाची निर्मिती सुरु केली आहे. तसेच शेवग्याच्या शेंगांवर प्रक्रिया करून ’मोरिंगा सूप’ हे स्वास्थ्यवर्धक उत्पादनही विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. तर भविष्यात इतर कोकण मेव्यावर तसेच फळभाज्यांवर प्रक्रिया करून विविध उत्पादने आणण्याचा आमचा मानस आहे.
 
 
पारंपरिक मिष्टान्नाला स्वादिष्ट पर्याय म्हणून पितांबरीने ’रुचियाना खरवस प्रिमिक्स पावडर’ हे नवीन उत्पादन उपलब्ध केले आहे. पितांबरीच्या गोशाळेतील देशी गीर गायीच्या (ए2 दूध) चिकापासून या पावडरची निर्मिती केली जाते. या खरवस पावडरपासून घरच्या घरी झटपट स्वदिष्ट खरवस तयार करता येतो आणि त्यामुळे अल्पावधीतच आम्ही ग्राहकांच्या पसंतीस उतरलो आहोत. या आर्थिक वर्षात आतापर्यंत 18 टन पितांबरी ’रुचियाना खरवस प्रिमिक्स’ पावडरची विक्री झालेली आहे.
 
 
 
पितांबरीचा ’अरिशक्ती राइस ब्रॅन ऑइल’ हा वैशिष्ट्यपूर्ण खाद्यतेल प्रकल्प म्हणून नावारूपाला आला आहे. भाताच्या कोंड्यापासून या तेलाची निर्मिती केली जाते. वर्षाकाठी सुमारे 1300 टन अरिशक्ती राइस ब्रॅन ऑइलची विक्री होत आहे. ग्राहकांसाठी एक लीटर व पाच लीटर बाटलीमध्ये हे तेल उपलब्ध करून देण्यात आले आहे. याखेरीज ’दीपशक्ती दिव्याचे तेल’ या उत्पादनास मोठी मागणी आहे. आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असलेले ’पितांबरी पाचक चूर्ण’ही घराघरांत भोजनानंतर खाल्ले जात आहे. या उत्पादनांचीही वर्षाला 500 ते 600 किलो विक्री होत आहे. लिंबापासून तयार केलेले ’रुचियाना लाइम सॉस’ हे आंबटगोड लोणचे लोकांच्या आहारात स्वाद आणत आहे.
 
 
वरील सर्व उत्पादने पूर्ण झाल्यानंतर त्यांची गुणवत्ता चाचणी करून पॅकिंग केले जाते. ’रुचियाना ब्रँड’अंतर्गत किराणा दुकानाने ते डी मार्ट, रिलायन्स मॉल, अ‍ॅमेझॉन, पितांबरी वेबसाइटपर्यंत विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतात आणि परदेशातील 27 देशांत पितांबरीची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सर्व माध्यमांतून आम्ही वर्षाकाठी सुमारे 22 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. येत्या काळात नवनवीन उत्पादने बाजारात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
 
 
आपल्या देशाची 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या कृषीवर व कृषिपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. भारताची आजची स्थिती कृषीआधारित उद्योगांसाठी अनुकूल आहे. भारतामध्ये राज्यनिहाय पीक विविधता असल्याने भारतात प्रक्रिया उद्योगासाठी कच्च्या मालाची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे, म्हणून पारंपरिक शेतीस प्रक्रिया उद्योगाची जोड दिल्यास शेतकर्‍यांसाठी मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकते. आज गाव-खेडी पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत, येथे औद्योगिकीकरण नसल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. पण ग्रामीण भागात शेतमाल सहज उपलब्ध होऊ शकतो, अल्प सुविधांमध्ये आपण प्रक्रिया उद्योग सुरु करू शकतो व आपल्याबरोबर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो.
 
लेखक पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.