भारतमाता विरुद्ध इंडिया

विवेक मराठी    21-Aug-2023   
Total Views |
‘इंडिया’ स्वत:चे नामकरण असे केलेले आहे, त्यांची लढाई भारतमातेशी आहे. ते म्हणतात की, इंडिया, मोदी आणि मोदी विचारांचा नाही, इंडिया हा इंडियावाल्यांचा विचाराचा आहे. त्यांचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे. चार-पाच घराण्यांवर चालणार्‍या पक्षांचा इंडिया आहे, भारतमाता ही कोट्यवधी परिवारांची भारतमाता आहे. इंडियावाल्यांचा इतिहास भारतमाता ही संकल्पनाच नाकारणारा आहे. दुसरीकडे भारतमातेच्या सेवेसाठी नरेंद्र मोदी यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित करून टाकलेले आहे. एकाच आकांक्षेने ते झपाटलेले आहेत - ही भारतमाता वैभवसंपन्न होवो, भारतमातेची संतान सुखी, आनंदी आणि सुरक्षित राहो. भारतमाता विश्वगुरुपदावर आरुढ होवो. भारतमातेचे ‘प्रधान सेवक’ या भूमिकेत ते गेली नऊ वर्षे जगत आहेत.
 

india 
मोदी विरोधकांची विषयसूची एका वाक्यात सांगता येते, ते वाक्य असे - ‘काहीही करून नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचले पाहिजे.’ या एका वाक्याने राहुल गांधी, नितीश कुमार, शरदराव पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, के.सी.आर. राव असे सर्व नेते झपाटलेले आहेत. भूतबाधा झालेला माणूस जसा दिवसरात्र भुताच्या प्रभावाखाली असतो, तसे या सर्व नेत्यांचे झालेले आहे. मोदीविरोधाचे भूत 2024ची निवडणूक झाल्याशिवाय उतरणे शक्य नाही. तोपर्यंत आपल्यापुढे या सर्वांची वक्तव्ये ऐकण्यापलीकडे कोणताही पर्याय नाही.
 
 
या सर्व नेत्यांना असे वाटते की, देशात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोठी हवा आहे. नरेंद्र मोदी यांचा प्रभाव दिवसेंदिवस कमी कमी होत चालला आहे. बंगाल आणि कर्नाटकच्या निवडणुकीत मोदींचा कोणताही प्रभाव पडलेला नाही. मोदी पुन्हा सत्तेवर येणे शक्य नाही. जनतेला आम्ही सर्व हवे आहोत. आमचा म्हणजे वर दिलेल्या सर्व नेत्यांचा असा समज झालेला आहे की, आपणच मोदींपेक्षा फार मोठे आहोत. याला घमेंड म्हणतात. त्यावरून एका कोल्ह्याची गोष्ट आठवली.
 
 
एक कोल्हा सकाळी उठला. पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी तो आपल्या गुहेतून बाहेर पडला. सूर्य नुकताच उगवला होता. सूर्याची किरणे सकाळी तिरपी पडतात. त्यामुळे सावली खूप लांब पडते. कोल्ह्याचे आपल्या सावलीकडे लक्ष गेले. तो स्वत:शीच म्हणाला, “अरे मी केवढा मोठा आहे? आज जेवणासाठी मला हत्तीच लागेल.” असा विचार करून तो हत्तीच्या शिकारीसाठी हत्ती शोधत शोधत हत्तीच्या शेजारी गेला. त्याने हत्तीवर उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण तो हत्तीच्या पायाजवळ पडला. हत्तीने आपला पाय उचलला आणि कोल्ह्यावर ठेवून दिला. कोल्ह्याचे काय झाले असेल हे चाणाक्य वाचकांच्या लक्षात आले असेल. मोदी नावाच्या हत्तीशी झुंज देण्यासाठी हे सर्व कोल्हे निघाले आहेत. आपण परिणामाची वाट बघू या.
 

india 
 
मोदींविरुद्ध लढण्यासाठी 2019 साली काही विरोधी पक्ष एकत्र आले, त्यांनी आपले बारसे करून यूपीए असे नाव ठेवले. 2023 साली त्यांनी नामांतर केले आणि आपले नाव ‘खपवळरप "Indian National Developmental Inclusive Alliance' असे केले. प्रत्येक शब्दांची अद्याक्षरे काढून INDIA  हा शब्द तयार केला. ते आता म्हणू लागले की, आता मोदी विरुद्ध इंडिया असा महासंग्राम होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी या इंडियाचे नामकरण ‘घमेंडिया’ असे केले आहे. या इंडियातील शेवटचे दोन शब्द आहेत, Inclusive Alliance. त्याचा मराठी अर्थ होतो ‘सर्वसमावेशक भागीदारी’. या सर्वांचा इतिहास पाहता सर्वसमावेशक भागीदारी म्हणजे काय, हे समजून घेतले पाहिजे.
 
 
ही भागीदारी भ्रष्टाचारी, तुष्टीकरणवादी, परिवारवादी, मुस्लीम दहशतवादी समर्थक यांची आहे. या इंडियातील आणखी दोन शब्द आहेत National Developmental म्हणजे राष्ट्रीय विकास. या सर्वांना भष्ट्राचार, तुष्टीकरणवाद, घराणेशाही, यांचा राष्ट्रीय विकास करायचा आहे. याला ते आयडिया ऑफ इंडिया म्हणतात. अशा आयडिया ऑफ इंडियावाल्यांचा महासंग्राम नरेंद्र मोदी यांच्याशी आहे.
 
 
 
नरेंद्र मोदी कोण आहेत? ते राजनेता आहेत, ते एका पक्षाचे नेता आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत की विश्वनेता आहेत? मोदी कोण आहेत? याचे एका वाक्यात उत्तर द्यायचे, तर नरेंद्र मोदी हे भारतमातेचे सुपुत्र आहेत. सुपुत्र त्याला म्हणतात की ज्याच्या मनात आपल्या आईविषयी पराकोटीचा श्रद्धाभाव असतो. सुपुत्र तो, जो आईला कोणत्याही प्रकारचे दु:ख होऊ नये याची काळजी घेतो. सुपुत्र तो, जो आईच्या गौरवासाठी आपल्या जिवाचे रान करतो. आपल्या थोर इतिहासात अशा महान पुत्रांच्या अनेक कथा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे या श्रेणीतील पुत्रशिरोमणी होते.
 
 
india

 
भारत हा इंडिया नाही. भारत हा जमिनीचा तुकडा नाही. भारत हा केवळ भूगोल नाही. भारत ही धर्मशाळा नाही. भारत हे जगतजननीचे साक्षात रूप आहे. या आपण सर्व जगतजननी भारतमातेची संतान आहोत. या भारतमातेच्या सेवेसाठी नरेंद्र मोदी यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित करून टाकलेले आहे. एकाच आकांक्षेने ते झपाटलेले आहेत - ही भारतमाता वैभवसंपन्न होवो, भारतमातेची संतान सुखी, आनंदी आणि सुरक्षित राहो. भारतमाता विश्वगुरुपदावर आरुढ होवो. भारतमातेचे ‘प्रधान सेवक’ या भूमिकेत ते गेली नऊ वर्षे जगत आहेत.
 
 
भारतमातेची संतान म्हणजे जातींचे समूह नव्हेत, उपासनापंथांचे समूह नव्हेत, भिन्न भाषा बोलणार्‍यांचे समूह नव्हेत. एकाच भारतमातेचे स्तनपान केलेली ही एकमय-एकरस भारतीय प्रजा आहे. हा आमचा एक विशाल परिवार आहे. म्हणून नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरुन भाषण करताना म्हणाले, “मेरे प्यारे परिवारजनों..” आपण सर्व एक परिवार आहोत, एक विशाल कुटुंब आहोत. भारतीय समाजरचना कुटुंबप्रधान आहे. कुटुंब अभंग राहण्यासाठी कुटुंबाचे अदृश्य सुरक्षाकवच असते, त्याला परस्पर विश्वासाचे कवच म्हणतात. या विश्वासाला तडे जातात, तेव्हा घर दुभंगते. दुभंगलेले घर टिकत नाही. गेली नऊ वर्षे नरेंद्र मोदी भारतमातेच्या विशाल कुटुंबात परस्पर विश्वास आणि प्रेम यांची अभिवृद्धी करण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या कष्टाला सीमा नाही आणि विश्रांतीची भाषा नाही.
 
इंडियावाल्यांचा इतिहास भारतमाता ही संकल्पनाच नाकारणारा आहे. त्यांच्याच पूर्वजांनी संपूर्ण वंदे मातरम कापले. त्यांच्याच पूर्वजांनी 1947 साली भारतमातेचे तुकडे केले  
 ज्यांनी ‘इंडिया’ स्वत:चे नामकरण असे केलेले आहे, त्यांची लढाई भारतमातेशी आहे. ते म्हणतात की, इंडिया, मोदी आणि मोदी विचारांचा नाही, इंडिया हा इंडियावाल्यांचा विचाराचा आहे. त्यांचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे. चार-पाच घराण्यांवर चालणार्‍या पक्षांचा इंडिया आहे, भारतमाता ही कोट्यवधी परिवारांची भारतमाता आहे. इंडियावाल्यांचा इतिहास भारतमाता ही संकल्पनाच नाकारणारा आहे. त्यांच्याच पूर्वजांनी संपूर्ण वंदे मातरम कापले. त्यांच्याच पूर्वजांनी 1947 साली भारतमातेचे तुकडे केले आणि त्यांच्याच पूर्वजांनी पन्नास हजार चौरस मैलांचा प्रदेश चीनला देऊन टाकला. ज्या प्रदेशात गवाताचे पातेदेखील उगवत नाही, हे त्यांच्याच पूर्वजांचे वाक्य आहे.
 
 
भारतमातेविषयी अशी धारणा असणारे हे इंडियावाले आहेत. त्यांची खान मार्केट गँग आहे. ही गँग आपली बुद्धी चालवून इंडियावाल्यांना विषयसूची देत असते. ते या इंडियावाल्यांना सांगतात की, इंडियाच्या पंतप्रधान कोण हे आधी ठरवू नका, राज्यांच्या निवडणुकांना महत्त्व द्या, भाजपावर हल्ला करण्याऐवजी मोदींना लक्ष्य करा. मोदींच्या शक्तिस्थानांवर प्रहार करा, मोदी कसे लोकशाहीविरोधी, मीडियाविरोधी आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे आहेत, हे सांगा. मोदींच्या काळात मुस्लीम समाजाला कसे लक्ष्य केले जाते, याची कथानके तयार करा. मोदी ख्रिश्चनविरोधी कसे आहेत, हे सांगा. मोदींचे हिंदुत्व हिटलरी हिंदुत्व आहे, हे सांगा. हे सांगणारे भरपूर लेख द वायर, द प्रिंट, अल जझीरा इत्यादी वाहिन्यांवर आहेत. त्यातील सगळा युक्तिवाद आणि बुद्धिवाद सगळे लोणी काढून घेतलेल्या आणि भरपूर पाणी टाकलेल्या ताकासारखे आहे. न त्याला चव, ना कोणतेही पोषणमूल्य.
 
 
 
मोदी जसे भारतमातेचे सुपुत्र आहेत, तसे आपणदेखील भारतमातेची कन्या आणि पुत्र आहोत. रक्ताच्या नात्याने नरेंद्र मोदी हे आपले वडीलबंधू आहेत. आपल्या परिवारातील सर्वात कर्तृत्ववान परिवारघटक आहेत. त्यांचे यश ते आपले यश, त्यांचा पराक्रम तो आपला पराक्रम, त्यांचे तेज ते आपल्या परिवाराचे तेज, त्यांची सहृदयता आणि सद्भावना ही आपल्या सर्वांचीही सहृदयता आणि सद्भावना आहे. नरेंद्र मोदी, भारतमाता आणि आपला विशाल परिवार यापासून आपल्याला विभक्त होता येणार नाही. म्हणून राहुल गांधी, शरद पावर, नितीश कुमार यांनी पुकारलेले युद्ध एकट्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाही, हे युद्ध आपल्या सर्वांविरुद्ध आहे, आपल्या परिवाराविरुद्ध आहे. आणि ते आपल्याला सर्वशक्तीनिशी लढायचे आहे. हे धर्मयुद्ध असल्यामुळे ‘जेथे धर्म असतो, तेथे विजय असतो’ हा गीतेचा संदेश आपल्याला अनुभवायचा आहे.
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.