किफायतशीर भाजीपाला - पितांबरी अ‍ॅग्री डिव्हिजन

भाजीपाला वाढीसाठी पितांबरीची उपयुक्त जैविक उत्पादने

विवेक मराठी    16-Feb-2024   
Total Views |
शेतकर्‍यांना भाजीपाला लागवडीतून खात्रीशीर उत्पन्न मिळावे, यासाठी पितांबरीच्या अ‍ॅग्री केअर विभागाने रेसिड्यू फ्री ‘स्ट्रेसिल’, ‘बी.व्ही.एफ. शील्ड’, ‘एफ.व्ही. ग्रो’, ‘यू.ए.एन. 32’ आणि ‘पी.पी.पी.’ अशा नावीन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती केली आहे. ही सर्व उत्पादने भाजीपाल्याचे उत्तम पोषण, संरक्षण आणि गुणवत्तापूर्ण पिकाची खात्री देणारी आहेत. विशेषत: या उत्पादनांमुळे भाजीपाला लागवडीचे लागतमूल्य कमी होऊन शेतकरीवर्ग किफायतशीर उत्पन्न मिळवत आहेत.
 
krushivivek
 
भिवंडी तालुक्यातील आनगाव येथील ’पितांबरी’ प्रकल्पात गेल्या अनेक वर्षांपासून प्रायोगिक तत्त्वावर भेंडी, मिरची, वेलवर्गीय भाज्या, टमाटा, वांगी आणि पालेभाज्या इत्यादी भाजीपाला पिकांचे किफायतशीर पद्धतीने उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे, पितांबरीने भाजीपाल्यासाठी लागणारी भरणी खते उपलब्ध केली आहेत. याखेरीज द्रवरूप खते बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे त्याने भाजीपाल्याचे लागतमूल्य कमी होऊन शेतकरीवर्ग किफायतशीर दरात भाजीपाला विकू शकेल.
 
 
भाजीपाल्याचे किफायतशीर उत्पन्न घेण्यासाठी ’पितांबरी गोमय सेंद्रिय खता’ची मात्रा अधिक उपयुक्त ठरते. त्यासाठी ’गोमय’ सेंद्रिय खताच्या एकरी 10 पिशव्या लागतात. या खताच्या वापरामुळे जमीन कसदार होऊन नत्र, स्फुरद, पालाश यांचा, तसेच इतर अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. देशी गायीच्या शेणापासून व गोमूत्रापासून शास्त्रीय पद्धतीने निर्मित ’गोमय’ हे पूर्ण कुजलेले खत आहे. त्यामुळे जमिनीत आवश्यक जिवाणूंची वाढ होते व हुमणी खोडकिडा, सूत्रकृमी, बुरशी इत्यादी पिकाच्या शत्रूंचा प्रादुर्भाव कमी होतो. तणांचाही प्रादुर्भाव कमी होतो. यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. पितांबरी कंपनी विविध कृषी उत्पादनांची निर्मिती करीत असते. पितांबरी कंपनीने संशोधनाअंती ’स्ट्रेसिल’, ’बी.व्ही.एफ. शील्ड’, ’एफ.व्ही. ग्रो’, ’यू.ए.एन. 32’, ’पी.पी.पी.’ आणि ’ए.पी.पी.’ अशा उत्पादनांची निर्मिती केली आहे. ही उत्पादने भाजीपाल्याचे उत्तम पोषण, संरक्षण आणि गुणवत्तापूर्ण पिकाची खात्री देणारी आहेत. ही उत्पादने सर्वच भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त आहेत.
 

krushivivek 
 
भाजीपाला पिकांत स्ट्रेसिल - सिलिका हे अन्नद्रव्य खूप महत्त्वाचे आहे. पिकांचे प्रकाशसंश्लेषण जलद होऊन उगवणक्षमताही वाढते, म्हणून पिकाच्या बीजप्रक्रियेपासून बेसल डोस, तसेच फूलधारणेपूर्वी व फळधारणेपूर्वी स्ट्रेसिल दिल्यास भाजीपाल्याची उत्पादकता वाढण्यास मदत होते. स्ट्रेसिलमध्ये तीन टक्के ’ऑर्थो सिलिसिक अ‍ॅसिड’ सिलिका स्वरूपात उपलब्ध आहे. यामुळे भाजीपाल्याच्या पानांतील पेशीभित्तिकांचा आकार वाढतो, रस शोषण करणार्‍या किडीचा हल्ला कमी होण्यास मदत होते, प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया जलद होते. परिणामी पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
 


krushivivek 
 
भाजीपाला पिके अनेक रोगांच्या बाबतीत संवेदनशील असतात. हवामानातील बदल व पाण्यावरील ताण यामुळे नेहमीच बुरशीजन्य, जिवाणूजन्य, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव जलद गतीने होत असतो व वेळीच लक्ष न दिल्यास महागडी रोगनाशके वापरावी लागतात व खर्च वाढतो. यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून ’बी.व्ही.एफ. शील्ड 25’ या उत्पादनाची फवारणी केल्यास खर्चही कमी होतो, तसेच पिकात याचा अवशेष राहत नाही. त्यामुळे भाजीपाल्याचे आरोग्यासाठी हितकारक उत्पादन होते.
 
 
’यू.ए.एन. 32’ हे उत्पादन भाजीपाला पिकाच्या लागवडीवेळी ठिबक सिंचनाद्वारे द्यावे. पिकाच्या लागवडीनंतर पिकांना नत्राची आवश्यकता भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे स्थायू स्वरूपातील खत देण्यापेक्षा द्रवस्वरूपातील खते देणे अधिक सोयीचे पडते. ही खते अधिक काळ जमिनीत पिकासाठी उपलब्ध राहतात, त्यामुळे पिकांना जास्त काळापर्यंत नत्राचा पुरवठा उपलब्ध राहतो व मनुष्यबळ, वाहतूक, साठवण अशा खर्चात कपात करता येते.
 
 
’पी.पी.पी.’ हे उत्पादन पिकांच्या फूलधारणा वाढीसाठी, तसेच फूलगळ रोखण्यासाठी फायदेशीर ठरते व त्या पिकाला स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा करते. ’पी.पी.पी.’च्या माध्यमातून फळधारणा चांगली होते.
 
 
krushivivek
 
’एफ.व्ही. ग्रो’मुळे फळांचा रंग, आकार व गुणवत्ता सुधारते व पिकाला चकाकी येते. त्यामुळे पिकाला बाजारात उत्तम भाव मिळण्यास मदत होते, म्हणून भाजीपाला पिकांसाठी फूलधारणेनंतर व फळधारणेनंतर एफ.व्ही.ग्रो. चा आणि पी.पी.पी.चा 15 दिवसांच्या अंतराने स्प्रे घेणे फायदेशीर ठरते.
 
 
’ए.पी.पी.’मुळे भाजीपाला पिकांना नत्र व स्फुरद यांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होतो. यामुळे पिकांच्या शाखीय वाढीबरोबर फूलधारणा व फळधारणा वाढते, तसेच पिकांच्या मुळांची वाढ होऊन पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
 
 
पितांबरीची ही खते ’जैविक उत्तेजक’ अर्थात ’बायो स्टिम्यूलंट’ वापरल्यास शेतकर्‍यांना फायदा झाल्याची उदाहरणे आहेत. ’बी.व्ही.एफ. शील्ड’च्या सुयोग्य वापरामुळे रुपेश सांबरे (अंताडे, ता. कल्याण) या शेतकर्‍याच्या काकडीवरील भुरीरोग नियंत्रणात आल्याचे दिसून आले आहे, तर कल्याण तालुक्यातील गुरुनाथ सांबरे यांनी भेंडीवर ’बी.व्ही.एफ. शील्ड’चा प्रयोग केला. ’एफ.व्ही. ग्रो’ या दर्जेदार उत्पादनाच्या सुयोग्य वापरामुळे टमाट्याचा आकार वाढल्याचे सुमित शेंबडे (बोरीबड, जि. पुणे) या शेतकर्‍याच्या निदर्शनास आले आहे. ’एफ.व्ही. ग्रो’चा सुयोग्य वापर करत शरद रामराव गायकवाड (पुसून ता. येवला) यांनी मिरचीवर प्रयोग केला आहे. मिरचीचा आकार वाढून दोन तोड्यांमधील अंतर कमी झाले आहे. ’स्ट्रेसिल’ या ऑर्थो सिलिसिक अ‍ॅसिडयुक्त उत्पादनाच्या योग्य वापरामुळे मिरची पिकाला फायदा झाल्याचे संजय पाटील (दहागाव, ता. शहापूर) यांनी सांगितले. झाडाद्वारे स्फुरद ग्रहण करण्याची क्षमता वाढल्यामुळे मिरचीच्या पिकाचे फुटवे वाढल्याचे त्यांनी सांगितले. दत्तात्रय मडवई (चिचोंडी बुद्रुक, ता. येवला) यांनी कांद्यावर ’स्ट्रेसिल’चा वापर केला असता रोपे सशक्त झाल्याचे आढळले. मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. आठ दिवसांनी करावा लागणार स्प्रे 25 दिवसांवर गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
पितांबरीची ही सर्व कृषी उत्पादने महाराष्ट्रातील कृषी सेवा केंद्रातून आपण विकत घेऊ शकता. भाजीपाला लागवडीबरोबरच ’पितांबरी नर्सरी फ्रँचायझी’ घेऊन शेतीतून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 35हून अधिक नर्सरी फ्रँचायझी यशस्वीपणे सुरू आहेत.
या लेखावर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
 
भ्रमण. : 9867112714, 9820979166, 8383864818.
वेबसाइट - www.pitambari.com

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.