राष्ट्रीय प्रश्नांचे भान असणारा पत्रकार

विवेक मराठी    16-Oct-2025
Total Views |
**दिलीप करंबेळकर**
एक मुस्लीम पत्रकार संघविचारांचा आहे, याचे सर्वांना आश्चर्य वाटत असे. टोपण नावाने कुणीतरी हिंदूच हे स्तंभ लिहीत असावेत असाच त्यांचा समज असे. परंतु त्यांची जसजशी व्याख्याने होऊ लागली, तशी मुझफ्फर हुसेन हे टोपण नाव नसून खरोखरची व्यक्ती आहे, याची ओळख सर्वांना होऊ लागली. त्यांचे वक्तृत्व उत्कृष्ट व हृदयाला हात घालणारे असे. त्यामुळे त्यांनी स्वतःचा असा श्रोतृवर्ग तयार केला होता.